आमची जंगलरूम.
आमच्या घरात आम्ही खोल्यांना नावे दिली आहेत. ओशन रूम, जंगलरूम, स्काय रूम इत्यादी. बाकीच्या खोल्यांमध्ये नावाप्रमाणे काही सजावट नाही मात्र जंगलरूममध्ये जंगलाचे चित्र काढायचे असे बरेच आधी ठरवून ठेवले होते. या चित्रातल्या प्रत्येक प्राण्याला काहीतरी नाव आहे आणि त्या प्राण्यांच्या कथाही आहेत. कथा पुन्हा केव्हातरी इथे देईन. तोवर आमची जंगलरूम बघा.
इथे अजून टेबल, बेड इत्यादी काही केले नाही. सध्या पसारा मांडून खेळायला जागा हवीये. जरा मोठी झाली की बाकीचे करून घेणार. ते साधेच , मोठे झाल्यावरही वापरता येईल असे असणार आहे.
माणूस जितका जुना असेल तितकीच जुनी बहुतेक घर सजवण्याची कला..! राहायला घर हवं, याचं भान आलं तसंच पुढे ते छान हवं, सुंदर हवं वगैरे याचंही हळुहळू आलं असेल. लाखो वर्षे गेली, नि उत्क्रांतीसोबतच या गृहसजावटीच्या कलेतही क्रांतीकारक बदल झाले. आजही घर आणि सजावट हा विषय सामान्याच्या जवळचा, जिव्हाळ्याचा. घर सजवून देणार्या लोकांशी जिव्हाळ्याचं नातं तयार होईल असा. ही कला सहजसाध्य, सोपी असेल असं कधी वाटतं, तर कधी तिच्या वेगवेगळ्या अविष्कारांमधून, साक्षात्कारांमधून थक्क व्हायला होतं. कल्पनाशक्तीला आणि बुद्धीला आव्हान देणारी ही कला नवनवीन तंत्राला, तंत्रज्ञानाला आणि बदलांना सहज सामोरं जाते.