Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला खात्री आहे.. आत्ता या
मला खात्री आहे.. आत्ता या क्षणी ह्या बीबीवरचे सगळे झी मराठी पाहाण्यात दंग आहेत.
मधुरा कुलकर्णी.. तुमची विपु
मधुरा कुलकर्णी.. तुमची विपु बंद आहे. तुम्ही हेडरमधला फोटो अपडेट करुन आता श्रीजान्हवीचा फोटो टाकाल का?
(No subject)
मामा अपडेट हवे बर का
मामा अपडेट हवे बर का
मला खरतर वाटल होत की जानूला
मला खरतर वाटल होत की जानूला मामाचे खरेदी प्रकरण कळेल आणि ती ते सगळे दागिने कपडे परत करेल ज्याने आजीना तिचा स्वभाव थोडा तरि कळेल अस काहितरी दाखवतील....ते जानूच्या स्वभाव बघता योग्य ठरल असत...पण नाहि मंदेने मंदपणेच वागायचे ठरवले आहे तर आपणतरि किती तळमळ्णार....
किती वाईट चालला आहे हा २
किती वाईट चालला आहे हा २ तासांचा भाग.....!!! इतक्या कारस्थानी लोक !!! एक ५ मिनिट सुद्धा काही प्रसन्न गोष्ट नाही दाखवता येत आहे या लोकांना.....आता पर्यंत च्या सगळ्या चांगल्या कामावर अगदी बोला फिरवला आहे....
एक ५ मिनिट सुद्धा काही
एक ५ मिनिट सुद्धा काही प्रसन्न गोष्ट नाही दाखवता येत आहे या लोकांना....>>>काय झालं?
झाल लग्न
झाल लग्न
कै च्या कै ए हे सगळ्ळं.. अरे,
कै च्या कै ए हे सगळ्ळं.. अरे, त्या आपटे ला मस्त सुनावणार्या या जान्हवीचं कौतुक वाटलं होतं..ती या छपराट आईचे धंदे चालवून घेते?? आई अस्ली म्हणून काहीहीही अन्याय सहन करायचे??छे छे..ये बात कुछ हजम नही हुई..
काय तो हावरट पणा..हाराची चोरी
काय तो हावरट पणा..हाराची चोरी काय.....साडी अन दुसरा हार मागणे काय....अती दाखवताहेत!!!न पटण्या जोगे..
<<एक ५ मिनिट सुद्धा काही
<<एक ५ मिनिट सुद्धा काही प्रसन्न गोष्ट नाही दाखवता येत आहे या लोकांना>>
अर्रर . . आम्ही तर वाट बघतोय नेट वर केव्हा अपलोड होतंय याची. worth watching नाहीये का?
मला तर वाटतंय जान्हवीच्या वडलांनी अशा बाईशी दुसरं लग्नच नको होतं करायला. बिचाऱ्या जान्हवीला लहानपणापासून इतकं नसतच लागलं सोसयला.
आणि त्या मामाला तर बघितलं की थोबडावसं वाटतं :raag: :raag:
मी तर म्हणते, या श्री आणि
मी तर म्हणते, या श्री आणि जान्हवी ने पत्रिका नकोत, अक्षता नकोत हे सगळं केलं, मग रजिस्टर च लग्न करायचं न..अजून आदर्श.. ऊगाच काहीहीही
एकूण काय दिग्दर्शकाने ढेप
एकूण काय दिग्दर्शकाने ढेप खाल्लीच तर
ढेप कधीच तर खाल्लीये..आता
ढेप कधीच तर खाल्लीये..आता फक्त शिक्कामोर्तब!!
<<ढेप कधीच तर खाल्लीये..आता
<<ढेप कधीच तर खाल्लीये..आता फक्त शिक्कामोर्तब!!>> +1
वाटलं होतं की या लग्नाच्या एपिसोड मध्ये तरी नाही खाणार . .
आजचा भाग खूप आवडला. सगळ्यांचे
आजचा भाग खूप आवडला. सगळ्यांचे अभिनय अत्यंत क्लास. सगळी पात्रे आपल्या स्वभावानुसार पर्र्फेक्ट वागत होती. राहून राहून एलदुगोतल्या लग्नाची आठवण येत होती.
अजून अशोक यांचे अपडेट्स यायचे आहेत, त्यामुळे आणखी लिहीत नाही.
अहो पण काम होतच काय? खरोखरीच
अहो पण काम होतच काय? खरोखरीच द्यायचं होतं लाऊन लग्न..शोभतो तसापण जोडा अगदी..
श्री ने आज दाढी केली असती तर बरं झालं असतं नै!!
लग्नाच्या समारंभात मामाचा
लग्नाच्या समारंभात मामाचा चोरटॅपणा,आईचा हव्यास आवडला नाही.
लग्न अगदी बावनकशी दाखवले.
लग्न अगदी बावनकशी दाखवले. म्हणजे अगदी गोखले-सहस्रबुद्धे यांचे लग्न शोभले. कोहली-चोप्रा यांच्या लग्नातल्या परंपरा न घुसडल्याबद्दल खूप मस्त वाटले.
जान्हवीच्या आईचे आणि मामाचे आजचे वागणे बघता 'अन्याय करणार्याने करत जावे, सोसणार्याने सोसत जावे' अशी इतर मालिकांसारखी या मालिकेचीही गत होऊ नये असे प्रकर्षाने वाटले. 'सोसणार्याने सोसता सोसता अन्यायाचे प्रत्युत्तर द्यावे' हा भाग पण आवर्जून यायला हवा.
माधव अनुमोदन
माधव अनुमोदन
रविवार २० आक्टोबर २०१३ ~
रविवार २० आक्टोबर २०१३ ~ अपडेट
~ होणार होणार म्हणून झी ने गाजावाजा केलेले श्रीरंग गोखले आणि जान्हवी सहस्त्रबुद्धे यांचे शुभमंगल झाले एकदाचे. लग्नाचा भपका सीरिअल्स परंपरेनुसार नेत्रदीपक करण्यासाठी जे जे प्रयत्न करायचे असतात ते निर्मात्यांने केल्याचे दिसत होतेच, त्याबद्दल तक्रार करण्यास जागा नाहीच. प्रमुख कलाकार, सहाय्यक कलाकार तसेच कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून आलेली सारी मंडळी अशी काही सजून आली होती की प्रेक्षकांच्या नजरा त्यावरच खिळल्या. पण इतक्या चांगल्या वातावरणाला गालबोटही पाहिजेच असा लिखित नियम सार्याच सीरिअल्सच्या जडणघडणीला असल्याने देवस्थळींनी त्याचेही कटाक्षाने पालन केल्याचे दिसले आणि ते करण्यासाठी शशीकलाबाईंची मानपान खा-खा वृत्ती आणि मामाची चोरीलबाडी अशी पात्रे कार्यरत होतीच. आईआजीच्या "मी घर सोडून जाणार" या निर्णयाने चटका बसलेल्या पाच आया जरी लग्नकार्यात सामील झाल्याचे दिसत असल्या तरी त्यांचा त्यात मनापासून सहभाग, उत्साह कमीच दिसला. शरयू एकटी पूर्णपणे सहभागी दिसली. शशीकलाबाईने आपल्याला सोनेरी काठाची साडी मुलाकडील लोकांनी दिली नाही म्हणून लग्नावर बहिष्कार टाकण्याचे ठरविले, त्यावेळी सदाशिवरावांनी आवाज चढवून, "आत्ताच्या आत्ता हॉलमधून बाहेर जा...उद्या पूजेला मी माझ्याशेजारी सुपारी ठेवीन..." यावर जान्हवीचे रडणे, हात जोडून दोघांना शांत करण्याचा प्रयत्न हे प्रकार चालू होते; पण त्याचे वेळी अत्यंत कावेबाजपणाने मामा जान्हवीला आईआजीने दिलेला चंद्रहार चोरतो...खिशात घालतो....बाहेर सटकतो. थोड्यावेळाने जान्हवीला हार गेल्याचे समजताच तिचे धाबे दणाणते...कारण उद्या लग्नाच्यावेळी गळ्यात तो हार हवाच हवा.... शोधाशोध होते, पण चंद्रहार सापडत नाहीच. त्याच रात्री श्री तिला मनिषकडून बाहेर बोलावून घेतो, काहीतरी गप्पा मारण्यासाठी... ती जाते, पण श्री ओळखतो की ती रडत होती...कारण विचारतो, तर ती रडतरडतच 'माझ्याकडून तो चंद्रहार हरवला...' असे सांगतो. श्री गंभीर परिस्थिती ओळखतो, चटदिशी काहीतरी निर्णय घेतो...आणि तिला सांगतो, "अगं, तुझा हार इथल्याच एका नोकराला सापडला आणि त्याने तो मला आणून दिला आहे. मी थोड्यावेळाने नंदनकडून तुझ्या खोलीत पाठवून देतो...". नंतर तातडीने नंदनला त्यांच्याच सोनाराकडे पाठवून नवा हार आणला जातो...तो गीताकडून सकाळी पूजेला बसलेल्या जान्हवीला दिला जातो...आणि एक अध्याय संपतो.
लग्नात अन्य काही विघ्ने येत नाहीत. सोनेरी काठाची साडी आणि एक हार दिल्याशिवाय मी जावयाला ओवाळायला येणार नाही अशी अडवणूक करणार्या शशीकलाबाईचा हट्ट आईआजीकडून पुरविला जातो. प्रत्यक्ष लग्नाच्या वेळी सर्वकाही रितिरिवाजानुसार होते. अक्षता टाकल्या जात नाहीत....मंगलाष्टका म्हटल्या जातात आणि टाळ्यांच्या गजरात जान्हवी श्री ला हार घालून सौ.जान्हवी श्रीरंग गोखले होते..... हसते !
मालिकेतील एक मोठे आणि उत्सुकता लागलेले प्रकरण इथे संपते....सारेजण निदान वरकरणी तरी आनंदात आहेत. उद्या नवीन सून मोठ्या अशा सासुरवाडीत येणार....तिथून नवा अध्याय सुरू करतील अशीच चिन्हे आहेत.
अरे व्वा.. झालं एकदाच
अरे व्वा.. झालं एकदाच लग्न!!
मामा .. नेहमीप्रमाणे मस्त अपडेट...
"त्यातल्या त्यात ही सिरियल
"त्यातल्या त्यात ही सिरियल बर्यापैकी पचनी पडण्याजोगी आहे. फक्त काही गोष्टी अति दाखवल्यात. कला बाईंचं कळा लावणं आणि मामाच्या चोर्या... आणि ते त्याचं भविष्य सांगणं तर अगदी डोक्यात जातं." >>> दक्षिणाच्या
या विधानाशी बर्याच अंशी सह्मत.
श्री, जान्हवी यांच्या अभिनयातली सहजता, जान्ह्वीच्या वडिलांचं काम करणार्या अभिनेत्याचा अगदी पटण्यासारखा सहज अभिनय या जमेच्या बाजू आहेत. परिस्थितीने दबलेला असला तरी उगाच (ए.के. हन्गल टाइप) रडवेपणा न करता मस्त भूमिका वठविली आहे. त्याची छोटी छोटी एक्स्प्रेशन्स बघण्यासारखी असतात.
मिलिंद फाटक नाव आहे का या अभिनेत्याचं ?
एकूणच या सिरीअलचे कास्टिंग छान झालंय.
तो मामा मात्र अगदी जुन्या वळणाचा नाटकी अभिनय करतोय.... डोक्यात जातोय...
जुन्या नाटकांमधल्या 'शंकर घाणेकर' च्या टाइप खरखरीत आवाज काढून बोलतोय असे वाटते.
मिलिंद फाटक नाव आहे का या
मिलिंद फाटक नाव आहे का या अभिनेत्याचं ?>>> नाही मनोज कोल्हटकर आहे.
'शंकर घाणेकर' ?? kaka Shankar
'शंकर घाणेकर' ??
kaka Shankar Ghanekar kuni june nat aahet ka?
गेल्या ३-४ भागा पासून जानव्ही
गेल्या ३-४ भागा पासून जानव्ही जे वागते आहे ते यापूर्वी दाखवलेल्या तिच्या व्यक्तिमत्वास पटणारे नाही. श्री कडून आपल्या वडलांच्या ऑपरेशन साठी पैसे ण घेणारी, अनिल आपटेला सुनावणारी....
ही ती जानव्ही नव्हे असेच वाटत होते.
पण लग्न मात्र एकदम छान झाले मराठी मालिकेतील पहिलेच भव्यदिव्य लग्न (मुख्य म्हणजे कोणतेही पंजाबी रिवाज न दाखवता ) अस्सल मराठी लग्न.....
लग्न लागले, आता
लग्न लागले, आता सिरीयलवाल्यांनी पहिले काम केले पाहिजे म्हणजे त्या नतद्रष्ट मामाला गायब करा सिरीयलमधून, तसे नाही झाले तर तो आणि त्याची बहिण सतत सिरीयलमधली निगेटिव्ह एनर्जी वाढवत राहतील आणि जान्हवी-श्री यांच्या नात्यात रंगत नाही येणार.
आमच्या घरी मुंबईला फोन केला
आमच्या घरी मुंबईला फोन केला होता काल.. म्हणजे फोन करण्याचा गाढवपणा केला... घरचे सगळेच "लग्ना"त होते.
श्री-जान्हवीच्या डोक्यावर अक्षता पडल्या की सुटलो... अशा सात्विक जबाबदारीवर लग्नं अटेंड करणं होतं.
एकच एपिसोड नेटवर मामासहेबांच्या आगाऊपणाचा बघण्याचं धाडस केलं. आणि इतकं डोक्यात गेलय की, पुन्हा बघण्याची इच्छा नाही.
अरे हा फोटो बदला आता ...
अरे हा फोटो बदला आता ... दोघांचा लावा.
हुश्श.. वाचले सगळे अपडेट्स..
हुश्श.. वाचले सगळे अपडेट्स.. काही कारणामुळे मी नाही पाहू शकले कलाचा भाग... पण आता वाटतयं बरचं झाल. श्री आणि जान्हवी आवडत असले म्हणून काय झालं? दोन तास त्या शिशकला बाई आणि मामाला सहन नाही करू शकत. आता लग्न झालं, त्यामुळे बाकीच्या मालिकांप्रमाणेच जान्हवीवर एकामागोमाग एक संकटे येत राहणार, सहा सासवांना जिंकणे, आई व मामाच्या कारवायांमुळे हताश , त्रस्त होणे, त्यात रडणे, मग श्रीने तिला समजावणे आणि परिस्थिती सुधारणे... बापरे! या सगळ्यात त्या दोघांच नात छान फुलायला जागा कुठे आहे?
Pages