Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38
मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोकण्या ! जातीने
कोकण्या ! जातीने काय???
दिनेशदा जातनिरपेक्ष आहेत
शेखरचं "साजणी" अतिशयच आवडलय.... प्रेमाची गोष्ट मधलं ओल्या सांजवेळीही अप्रतिम आहे !
जूनी गाणी मूळ गायक गायकांकडून
जूनी गाणी मूळ गायक गायकांकडून ऐकण्यासाठी, आकाशवाणी ( सध्या ज्या काही नावाने असेल ती )
यांच्याकडे सातत्याने विचारणा केली पाहिजे. त्यांच्या फोन ईन - आपली आवड जो काही कार्यक्रम असेल त्यात जर विचारत राहिलात, तर ते अवश्य गाणे शोधून काढतात. सर्व जून्या गाण्यांचे डिजीटलायझेशन केलेले आहे, त्यांच्याकडे.
हसलीस एकदा भिजल्या शारद
हसलीस एकदा भिजल्या शारद राती
बहरली फुलांनी निशिगंधाची नाती....
हे असंच आठवलं म्हणून....
एक प्रसन्न गाणं !
मिल गया...... आशा भोसलेच्या
मिल गया......
आशा भोसलेच्या आवाजातल" कवडसा' मिल गया... ढींग च्यांग ढीछ्यांग.. ढींग च्यांग ढीछ्यांग
सह्हिए कोकण्या डिटेल्स प्लीज
सह्हिए कोकण्या
डिटेल्स प्लीज
संपर्कातसुन फोन नं दे..
संपर्कातसुन फोन नं दे.. सांगतो...
'मनाचिया घावावरी...' अजून
'मनाचिया घावावरी...' अजून कुणालाच मिळालं नाही का हो?'
संपर्कातसुन फोन नं दे..
संपर्कातसुन फोन नं दे.. सांगतो...>>>>डन पाठवलाय.
'मनाचिया घावावरी...' अजून कुणालाच मिळालं नाही का हो?'>>>>>नाही, अजुन
एक होता विदुषक मधील - भरलं
एक होता विदुषक मधील - भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग... १ नंबर लावणी आहे..
बगळ्यांची माळफुले...
हे सुरानो चंद्र व्हा..
एकाच या जन्मी जणू..
काय बाई सांगू...
बाळासाहेबांची जवळ जवळ सगळी गाणी..
भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग...
भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग... १ नंबर लावणी आहे..>>>>अगदी अगदी. आशा भोसले आणि देवकी पंडित दोघांच्या आवाजात आहे. मला आशा भोसलेंच्या आवाजातलं आवडतं.
कवडसासारखीच एक लावणी आहे 'अहो
कवडसासारखीच एक लावणी आहे 'अहो सजणा दूर व्हा'
कोकण्या... माझेच नाहीत तर आशा
कोकण्या... माझेच नाहीत तर आशा भोसलेचे पण आशिर्वाद मिळतील !
आशाच्या चाहत्यांनी, तिच्याच आवाजातली
१) जरतारी लाल शाल जोडी
२) वेड्या मना तळमळसी
हो दोन नाट्यगीते ऐकावीत. ही बहुतेक तिने चित्रपटासाठी गायली आहेत.
या शब्दाला अर्थ मिळाला, भाव मिळाला... हे पण एक नाट्यगीत तिचा आवाजात आहे. बहुतेक कुठल्यातरी कोल्हटकरी नाटकासाठी गायलेय.
दिनेश, नाट्यगीते
दिनेश, नाट्यगीते चित्रपटासाठी?
शारदा नाटकातलं मूर्तीमंत भीती
शारदा नाटकातलं मूर्तीमंत भीती उभी लताने चित्रपटासाठी गायलं आहे. चाल नाट्यगीतापेक्षा वेगळी आहे.
हो फारेण्डा, चाली पण जरा
हो फारेण्डा, चाली पण जरा वेगळ्या आहेत.
माझ्याकडे, शारदा नाटकातली दोन पदे आशाच्या आवाजात पण आहेत ( म्हातारा इतुका न / श्रीमंत पतिची राणी )
त्यासोबतचे संवादही आशानेच म्हंटले आहेत असे वाटतेय.
आशा भोसलेच्या आवाजातल" कवडसा'
आशा भोसलेच्या आवाजातल" कवडसा' मिल गया... >>>>>>मनापासुन धन्यवाद कोकण्या
दोन दिवस कान भरून गाणं ऐकलं.
दोन दिवस कान भरून गाणं ऐकलं.
दोन दिवस कान भरून गाणं ऐकलं. >>>
स्वगत मोड ऑन
जाऊ दे, माधव. बेट्याचे मौज मजा करण्याचे शेवटचे काही दिवस उरलेत. करून घेउ दे मजा त्याला.
स्वगत मोड ऑफ
सुरेश भटांचे हाय व्होल्टेज
सुरेश भटांचे हाय व्होल्टेज शब्द, श्रीधरचा हळुवार संयत स्वराविष्कार.
मनाच्या पाकळ्यापाकळ्या स्पर्शून जाणारे भाव.
तरीही तितकेसे न चर्चिले गेलेले गाणे.
माझे खूप आवडते-
''तू माझ्या आयुष्याची पहाट ''
http://mp3truck.com/tu-mazya-ayushyachi-pahat-mp3-download.html
तळटीप- खास ऐकावा असा 'आयुष्याची' मधल्या पोटफोड्या 'ष' चा उच्चार
दादा कोंडकेंवर चित्रित
दादा कोंडकेंवर चित्रित झालेले, 'डौला मौलाच्या माणसा रं...' / 'माझ्या मनाच्या माणसा रं...'
असं एक गाणं आहे ना? नेमके शब्द काय आहेत, मला कुठेच हे गाणे मिळेना
रंगासेठ, 'डौल मोराच्या मानंचा
रंगासेठ, 'डौल मोराच्या मानंचा रं डौल मानंचा' असे शब्द आहेत. आता शोधा
रंगासेठ, "तांबडी माती" या
रंगासेठ, "तांबडी माती" या चित्रपटातील गाणं आहे हे.
अखेरचा हा तुला दंडवत माझ ऑल
अखेरचा हा तुला दंडवत माझ ऑल टाइम फेवरेट गाण. इतक ऐकल आहे की आता मधल्या संगीतासकट पाठ झाल आहे. पण या गाण्याचा एकच प्रॉब्लेम आहे. कोणी गाण म्हण अस सांगितल की हे म्हणता येत नाही, उगाच गैरसमज.... सुमन कल्याणपुरची सगळीच गाणी मला आवडतात आणि आशा भोसले तर दैवत आहे माझ....
मुग्धा, तुमच्या पोस्टमधून तसे
मुग्धा, तुमच्या पोस्टमधून तसे सुचित होत नाही, तरीही.. अखेरचा हा तुला दंडवत, लताने गायलेय. संगीतही तिचेच आहे.
त्यातले एको(प्रतिध्वनी) उषा
त्यातले एको(प्रतिध्वनी) उषा आणि मीनाने दिलेत.
त्यातले एको(प्रतिध्वनी) उषा
त्यातले एको(प्रतिध्वनी) उषा आणि मीनाने दिलेत.>> नविन माहिती !
ऐकताना मात्र लताच्या आवाजाशी अगदी जुळून गेलेत दोन्हीही आवाज
मुग्धा, तुमच्या पोस्टमधून तसे
मुग्धा, तुमच्या पोस्टमधून तसे सुचित होत नाही>>>>> दिनेश (मंजिरी मोड ऑन) तुम्ही काय म्हणताय ते मला कळत नाहीये. (मंजिरी मोड ऑफ) ते गाण लताने गायाल आहे माहित आहे संगीतही तिचंच आहे हे पण माहित आहे.
तुम्ही त्या गाण्यानंतर, लगेच
तुम्ही त्या गाण्यानंतर, लगेच सुमन कल्याणपूरची गाणी आवडतात असे लिहिले होते. अर्थात तसे सुचित होत नाही हे मी लिहिलेच आहे.
तुम्हाला माहीत आहे हे वाचून आनंद झाला.
जुन्या धर्मकन्या चित्रपटातलं
जुन्या धर्मकन्या चित्रपटातलं `गंगेचं पाणी पाटाला' हे गाणं कुठे मिळेल
दिनेश आणि मुग्धा....तुम्ही
दिनेश आणि मुग्धा....तुम्ही दोघांनीही सुमन कल्याणपूर यांचा वरील पोस्ट्समध्ये उल्लेख केला आहे. किती गाणी आठवावीत सुमनताईंची...असेच होऊन गेले. मुद्दाम शोधून आता "पुत्र व्हावा ऐसा...." मधील जीवनकला आणि विवेक यांच्यावर समुद्रकिनारी चित्रीत झालेले "जिथे सागरा धरणी मिळते...." मनस्वीपणे ऐकत बसलो.
सुरेखपणाची परमावधी आहे हे गाणे म्हणजे.....पी.सावळाराम...वसंत प्रभु आणि सुमनताई या तिघांच्या योगदानामुळे. पडद्यावर जीवनकला दिसलीही आहे छान.
<< अखेरचा हा तुला दंडवत,
<< अखेरचा हा तुला दंडवत, लताने गायलेय. संगीतही तिचेच आहे.>>आणि गीतकार आहेत कवि योगेश. योगेश म्हणजे आपले भालचंद्र पेंढारकर. भालजी पेंढारकर यांनी फार सुरेख रचना केल्या आहेत. पण त्या सर्व कवी योगेश या टोपन नावा खाली. तसच " डौल मोराच्या मानंचा रं ". ही पण त्यांचीच रचना.. त्यांच्याच काहि रचना
अखेरचा हा तुला
डौल मोराच्या मानचा
माझ्या कपाळीचं कुकु
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
राजाच्या रंगम्हाली
वाट पाहुनी जीव शिणला
आणि विषेश म्हणजे त्यांच्या बर्या पैकी रचना ह्या आनंदघन (लता मंगेशकर) यांनी संगीत दिलेल्या आहेत.
Pages