मेळघाटातील पक्षी २०१३

Submitted by हर्पेन on 6 September, 2013 - 13:29

या वर्षी मैत्रीतर्फे मेळघाटात गेलो असताना दिसलेल्या पक्षांची प्रकाशचित्रे

१. ठिपकेदार मनोली Scaly-breasted Munia

२. कापशी Black-winged Kite

३.

४. ठिपकेदार होला

५.

६. वटवट्या

७.

८. क्रेस्टेड बंटिंग

९. पाकोळी

१०.बुलबुल

११.टिटवी Red wattled lapwing

१२. मराल Lesser Whistling Duck

१३.

१४. दयाळ Oriental Magpie Robin

१५.

१६. हा पक्षी अगदीच दूर होता त्यामुळे रेकॉर्ड शॉट म्हणतात असा आहे हा फोटो, पण चोचीवर असलेल्या गाठीमुळे हे नकटा नावाचे बदक Comb Duck असावेसे वाटते

१७. खाटीक

१८. वटवट्या

१९. नीलपंख

२०.खंड्या

२१. दयाळ Oriental Magpie Robin

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहेत सर्व फोटो .७वा पक्षी प्रिनिआ वटवट्या कैमेऱ्याला लवकर सापडत नाही . दयाळ डोळयांनी काळा पांढरा वाटतो पण फोटोत काळयाऐवजी निळी झाक येते .

वा, मस्त आहेत रे हे फोटो...
१७ - खाटिक
१९ - नीलकंठ, / ब्लू जे/ इंडियन रोलर
२० - किंगफिशर (व्हाईट ब्रेस्टेड)
आश्चिगला आवताण दे - तो फटाफट नावे सांगेल बघ ....

४. ठिपेकदार होला
६, ७ वटवट्या
९. पाकोळी (Swallow)
१७. खाटिक (Shrike)
१८. वटवट्या (Ashy Prinya)
१९. निलपंखी (Indian Roller)
२०. खंड्या (White breasted Kingfisher)

भरपुर झाले की. Happy सगळ्याची नावे बदल बरे. काही राहीली असल्यास सांग.

८ नंबरचा क्रेस्टेड बंटींग वाटतो आहे.

केलेत बदल वरती, धन्यवाद, शशांक, इंद्रा, Happy
कापो - आता पक्षी निरिक्षणासाठी मस्त मौसम चालू होण्याची चाहूल लागते आहे, सध्या सकाळी खूप वेगवेगळे आवाज येत आहेत. या वर्षी अगदीच कवडी नाहीतर गेलाबाजार पाषाणला तरी जाऊया Happy