महाबलिपुरम (भाग १)
महाबलिपुरम म्हणजेच मामल्लापुर हे चेन्नईपासून ६० किमी अंतरावर असलेले एक प्रसिद्ध ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. पल्लव राजघराण्यामधे हे शहर एक विकसित बंदर होते आणि इथून बंगालच्या उपसागरातून पूर्वेकडच्या देशाशी व्यापार केला जात होता. तमिळमधे याच शहराला कौतुकाने "कडल मल्लै" म्हटले जाते (समुद्र टेकडी).
इथे असलेली बरीचशी शिल्पे ही खोदकाम करून बनवण्यात आली आहेत. (रॉक कट). यापैकी अर्जुनाची तपश्चर्या हे एकाच दगडात खोदलेले भव्य बास रीलीफ (मराठी शब्द सांगा) हे इथले एक प्रमुख आकर्षण आहे. ही बहुतेक शिल्पे सातव्या ते नवव्या शतकामधे खोदलेली आहेत. संपूर्ण शिल्पांवर महाभारताचा प्रभाव जाणवत राहतो.
या ऐतिहासिक शहरामधील ही काही प्रकाशचित्रे:
१. ब्रह्मा-विष्णु-महेश मंदिर: शंकराची पिंड नंतर विजयनगर साम्राज्याचा काळामधे बसवण्यात आली. त्याआधी शंकराचीदेखील मूर्तीपूजा होत असावी. ब्रह्मादेखील इथे चार तोंडाचा नाही, त्याचे कारण गाईडला विचारले तर त्याला ते नीट सांगता आले नाही.
===================================================
गजलक्ष्मी:
वराह अवतार:
==========================================
देवीपुढे बळी देणारा भक्त (मला हा पौराणिक संदर्भ लक्षात येत नाहीये. कुणी सांगेल का??)
=========================================
वामनावतार:
या मंदिरामधे छताला वापरलेले नैसर्गिक रंग अजून टिकून आहेत: ( हे रंग सातव्या वगैरे शतकातील आहेत की नाही ते मात्र नक्की माहित नाही)
=====================
याला कृष्णाच्या लोण्याचा गोळा म्हणतात:
==========================
महाबलिपुरम (भाग २) http://www.maayboli.com/node/45030
महाबलिपुरम (भाग ३) http://www.maayboli.com/node/45038
वा मस्तच आहे महाबलीपुरम, आणि
वा मस्तच आहे महाबलीपुरम, आणि ती रंग इतक्या वर्षांपूर्वीचा असेल तर अजूनही छान टिकलाय.
कृष्णाचा लोण्याचा गोळा सुंदर.
ते लोणी खाली कसं सरकलं नाहिये
ते लोणी खाली कसं सरकलं नाहिये अजुन?
फोटॉ छान आहेत..
मस्त फोटो. शेवटचा अप्रतिम.
मस्त फोटो. शेवटचा अप्रतिम.
जबर्दस्त आहे.......
जबर्दस्त आहे.......
ते पहिल्या ३ प्रचिंमध्ये
ते पहिल्या ३ प्रचिंमध्ये ब्रम्हा, विष्णू आणि शिव कसे ओळखता आले? कारण हातातील आयुधे बहुतेक समानच दिसतायत. ३र्या प्रचित थोडी वेशभूषा वेगळी वाटतेय.
गमभन, शिव ओळखता आला कारण तिथे
गमभन, शिव ओळखता आला कारण तिथे पिन्ड ठेवली आहे. (ही पिंड नंतर ठेवली गेली आहे).
ब्रह्मा आणि विष्णु ज्या रांगेत आहेत त्यानुसार असावेत असा अंदाज! नवर्याने ब्रह्मा आणि शंकर यांचं जानवं सेम असल्याचा आणि विष्णुचं जानवं वेगळं असल्याचा उल्लेख मात्र केला होता.
इथे माहिती देणारा जो गाईड होता, त्याला नीट सांगता येत नव्हतं, म्हणून आम्ही हे मंदिर झाल्यावर गाईड बदलून घेतला. त्याने बर्यापैकी नीट माहिती दिली. परत एकदा, वरदालाच आमंत्रण देते. तीच नीट सांगू शकेल.
हो, त्याच काही खुलासा करतील
हो, त्याच काही खुलासा करतील