मराठी म्हणी

Submitted by माणूस on 14 January, 2009 - 19:44

म्हणी साठीचे पान...

हमारे लिये काला अक्षर भैस बराबर है, इसलीय हमारे काले अक्षर मे चुका रहीगे तो कानपर्दा कर लो

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कवडी का काम नही घडी भर फुरसत नही
पादर्‍या ला पावट्याचं निमित्त
Happy

वखत पडे बाका तो गधे को कहे काका.

उच्च संग्रह तयार होतोय इथे म्हणींचा Happy

@नेहू, मराठीत पण मी ऐकलंय, `काम नाही काडीचं आणि फुरसत नाही घडीची'

- गौरी

काळी बेंद्री एकाची, सुंदर बायको लोकाची.
चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही.
काशी केली, गंगा केली, नशिबाची कटकट नाही गेली
घरात नाही तीळ पण मिशांना देतो पीळ.
केळी खाता हरकले, हिशेब देता टरकले.
कोणाला कशाचे मळणीला लसणाचे.
चारजणांनी केली शेती, मोत्या ऐवजी पिकली माती.
जाळाशिवाय नाही कढ अऩ माये शिवाय नाही रडं.
तुम्ही करा आन आम्ही निस्तरा.
दुभत्या गाईच्या लाथा गोड.

दक्षिणा- अजून म्हणी ??? ग्रेट आहेस तू. Happy

खातो गण्याचं अन काम करतो धण्याचं
केसभर गजरा अन गावभर नजरा

हे दोन्ही मकरंद अनासपुरेचे डायलॉग आहेत Happy
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....

भूक सोसावी ढोरानं अन् दुख सोसावं पोरानं.

अजून एक म्हण जुन्या म्हणीची स्त्रीयुगातली आवृती -
कुणाला कशाचं अन् टकल्याला शेंडीचं. :p

घरात २ दोरीवर ३ लुगडी तरी बाय माझी उघडी.
मी नाही त्यातली अन कडी लावा आतली.
चांभाराच्या देवाला खेटराची पुजा.
भिकार्‍याच्या उशाला भाकरी राहणार नाही.

-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
http://www.maayboli.com/node/8235

विचारांची तूट तिथं भाषणाला ऊत.
हाती नाही आडका आणि बाजारात जाऊन धडका.
जोवर पैसा, तोवर बैसा.
मुंगी व्याली, शींगी झाली, दुध तिचे किती? बारा रांजण भरून गेले, सतरा हत्ती पिउन गेले.
भोळी ग बाई भोळी, लुगड्यावर मागते चोळी, खायला मागते पुरणपोळी.
पुत्र व्हावा ऎसा गुंडा, ज्याचा त्रिलोकी झेंडा.
देणं कुसळाचं करणं मुसळाचं.

अग गौरी ..मला मराठी म्हण माहित नव्हती ...धन्स.. Happy

कांही मालवणी म्हणी -
कोनाक कित्याचा, रामाक सीतेचा [कोणाला कसल्या विवंचना, तर रामाला फक्त सीतेचीच काळजी ]
जवळची व्हकाल खुरडी [ नेहमीच्या पहाण्यातली मुलगी नवरी म्हणून नजरेत भरत नाही]
त्येचा बाय काय, माडावर गाय [माडी काढायला माडावर चढलेल्याला माडीचं मडकं भरलेलं दिसलं कीं तो तिथेच गाऊ लागतो]

घरात नाही तीळ पण मिशांना देतो पीळ.
केळी खाता हरकले, हिशेब देता टरकले.
विचारांची तूट तिथं भाषणाला ऊत.
हाती नाही आडका आणि बाजारात जाऊन धडका.
>>>>
दक्स :)... लै भारी आहेत ह्या म्हणी Happy

०----------------------०
मायक्रोसॉफ्ट सर्च ईंजिन
http://www.bing.com/

रातभर पाखडलं, काही नाही सापडलं
येलपाडीचे आले डोळे, सातरी टाकून खाली लोळे
मीन मीन मीनता, अन घोडं कुठं बांधता
चौघी चार रंगाच्या अन बुडा हेकोड्या तोंडाचा
ही ही बाई, ईथं काही नाही

..............................................................................
येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!

दक्षिणा म्हण सम्राट आहे. (की सम्राटीन) सही साठा आहे तिच्याकडे. Happy
आजी असताना बर्‍याच म्हणी ऐकल्या. आजकालच्या आया अश्या म्हणी वापरत नाहीत.

आली चाळीशी आता करा एकादशी
महार लाड करी पोरं द्वाड
आखाड्याच्या मेळाव्यात पहेलवानाची किंमत
उधारीचे पोते, सव्वा हात रिते
शिवरात्रीच्या घरी एकादशी, दोघी बसल्या उपाशी
कानात बुगडी आणि गावाला फुगडी
खर्‍याचं खोटं, लबाड्याचं तोंड मोठं
घराला नाही कौल, नुस्ता रिकामा डौल
जुनं ते सोनं, नवं ते पण हवं
डोंगरा एव्हढी हाव, तीळा एव्हढी धाव
तरण्याला लागली झळ, म्हातार्‍याला आलं बळ

हिंदी कहावत -"जिस थाली में खाया उसी में छेद"
ह्याच अर्थाची मराठी म्हण -
"जिथे खातात तिथेच हगतात"

"दोन-चार हाणा पण मला कतरिना म्हणा"

दोन-चार हाणा पण मला कतरिना म्हणा - Rofl

अशीच एक म्हण आहे मराठित
टिरीवर मारा पण पाटलीण म्हणा....

मी ऐकलेली अशी आहे
'जोड्याने हाणा पण पाटलीण म्हणा' Proud
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....

हीच म्हण.. आम्ही
दोन हाना..पन सलमान म्हणा... अशी म्हणायचो..(खासकरुन जे काडी पैल्वान जिम ला वैगेरे जाउन उगाचच शायनिंग मारायचे त्याना :फिदी:)

०----------------------०
मायक्रोसॉफ्ट सर्च ईंजिन
http://www.bing.com/

आयला दक्षिणा म्हणींचा डोंगरच रचलास तू.
हसून हसून फुटायची वेळ आली.. लगे रहो.. Happy

मागून पुढून बाप नवरा
कसायाला गाय धार्जिणी
ओली माती आणि हजार गती
चांभाराच्या देवाला खेटराची पूजा
जाणार्‍याचं जातं आणि कोठावळ्याचं पोट दुखतं
आठ हात लाकूड नऊ हात ढलपी
आधी करी सून सून मग करी भुणभुण
अडण्याचा आला गाडा वाटेवरल्या वेशी मोडा
गावंढ्या घरी गाढवी सवाशिण
आई जेवू घालीना बाप भीक मगू देईना
गाढवापुढं वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता
जावयाचं पोर हरामखोर
चोरीचा मामला अन हळूहळू बोंबला
शेळी जाते जेवानिशी खाणारा म्हणतो वातड कशी
अवघड जागी दु:ख आणि जावई वैद्य
सतरा लुगडी तरी बाई उघडी
घरची धूप घालीना आणि शेजरची डोक्यावर पदर का घेईना
======================================
पाचूच्या रानात झिम्मड पाऊस उनाड अल्लड वारा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा

सासु सांगे सुने बोध, आपण पी ऊनऊन दूध
(सुनेला शहाणपण सांगायचं आणि स्वत: मात्रं चांगलं चुंगलं हादडायचं)

हेंदरा आन हेंदरी चराय चालले गावंदरी..
(धांदरट नवरा बायको आणि कामाचा बट्ट्याबोळ)

बसे घरी हजाराचा , येरझारी दमडीचा

हातानं होईना काही तोंड करी घाई
(म्हातारं झालं तरी भूक कमी होत नाही. )

सोन्याची सुरी खूपसून घ्या उरी
(कोणत्याही गोष्टीला अवास्तव महत्व देऊ नये, दगाफटका होऊ शकतो.)

गाव सारा मामाचा एक नाही कामाचा
(हाताखाली नुसती यंत्र असून चालत नाही, पण ती कार्यरत ही असावीत.)

सासू तशी सून हा उंबर्‍याचा गुण
(खाण तशी माती तसंच हे)

वाघ पडला बावी, कोल्हं कुल्ले दावी
(आपल्यापेक्षा बलदंड संकटात पडला की दुर्बल त्याला चिडवण्याची संधी सोडत नाहीत.)

सतरा कारभारी आन एक नाही दरबारी

सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा, यांची संगत नको रे बाप्पा.
(वरच्या चारपैकी पहीले तीन कोणतीही करायला टाकलेली वस्तू वेळेत देत नाहीत.
आणि आप्पा फक्त गप्पा मारण्यात पटाईत म्हणजे वेळेची खोटी.)

अग्गायाया........
दक्षिणा तुला म्हणी सम्राज्ञी हा किताब जाहीर झाला नाय का अजुन???
बाय द वे प्रत्येक म्हणी सोबत अर्थ जमला तर लीव की.
सध्या सासुबाईंचा मुक्काम आहे घरी. त्यामुळे अध्ये मध्ये काहि काहि म्हणे मिळतात ऐकायला. अस्सल गावरान सोलापुरी म्हणी आहेत.
पण त्याना आता जास्त आठवत नाहियेत.

Pages