निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर
आजच्या फोटोत असणार्या
आजच्या फोटोत असणार्या पिवळ्या फुलांच्या रंगाची पण उलट्या u आकाराची फुले येणारे व पिंपळाच्या पानासारखी पाने असणार्या झाडाचे नाव माहित आहे का हो? पाने रूंद व शेंडीविना असतातन >>> येळेकर तुम्ही 'भेंडा' बद्दल बोलताय बहुतेक, जागुने फोटो टाकलेत असं पुसट आठवतयं.
धन्स मामी ते गाणं ह्या
धन्स मामी
ते गाणं ह्या लिंकवर बघायला मिळेल
https://www.youtube.com/watch?v=MdSLCHoGzC8
जर्दाळुची फुलेही साधारण अशीच दिसतात ना?
माधव, अवश्य. मी गोरखचिंचेवर
माधव, अवश्य.
मी गोरखचिंचेवर फोटोफिचर करु शकेन इतक्या संख्येने झाडे आहेत इथे !
शांकली,
कॉफिची फळे पिकून लाल होतात आणि लंबगोल असतात. खरं तर त्या फळांना आणि बियाना ना तो स्वाद असतो ना चव. भाजल्याशिवाय तो स्वाद येतच नाही. कोकोच्या बियांना पण अजिबात चव नसते. नुसत्या पिठूळ लागतात. सात दिवस फर्मेंट केल्यावरच तो रंग आणि चव येते. चहाचेही तसेच.... या स्वाद आणणाच्या प्रक्रिया ज्याने शोधल्या असतील, तो ग्रेटच !
वर्षूची काय खबरबात ? इमेल / मेसेजेस ना उत्तर नाही. स्काईपवर बघा बरं.
या स्वाद आणणाच्या प्रक्रिया
या स्वाद आणणाच्या प्रक्रिया ज्याने शोधल्या असतील, तो ग्रेटच >> दिनेश, या प्रक्रिया अपघातानेच शोधल्या गेल्या असाव्यात. प्रक्रिया झालेल्या कॉफी / चहाचा वास इतका टेम्पटींग असतो की तो चाखून बघायची इच्छा होणे स्वाभाविक आहे. आणि मग ती प्रक्रिया कोणती असावी याचा अंदाज बांधण्याएवढी बुद्धी माणसाकडे नक्कीच होती.
माझ्या प्रश्नाच उत्तर कोणीच
माझ्या प्रश्नाच उत्तर कोणीच दिलं नाही.
शोभा, ती हायब्रीड भाजी आहे.
शोभा, ती हायब्रीड भाजी आहे. चव कशी होती ते सांग.
माधव,
इथिओपियामधल्या काफ्का गावी, काही बकर्या एका झाडाची फळे खाऊन जरा जास्तच उड्या मारत असत, त्यावरून कॉफीचा शोध लागला. आणि त्या नावावरून कॉफीला ते नाव पडले, असे वाचले होते. इथिओपियन एअरलाइन्सने प्रवास करताना मी मुद्दाम त्यांची कॉफी मागून घेतो. इथिओपियाचीच आहे ना ? असे विचारल्यावर त्या हवाई सुंदर्यांच्या चेहर्यावर अभिमान दिसतो.
त्या देशातील माणसे सावळी असली तरी नाकीडोळी खुप सुंदर दिसतात. खुपदा भारतीय चेहर्यांचा भास होतो.
तिथले लढवय्ये एवढे शूर होते कि कुठल्याही पाश्चिमात्य देशाला, त्या देशात वसाहत करता आली नाही.
एकदा निवांतपणे जायचे आहे त्या देशात.
आपण सरसकट आफ्रिका म्हणून उल्लेख करतो पण इथला प्रत्येक देश सर्वच बाबतीत वेगवेगळा आहे.
शुभ सकाळ नि ग कर्स!!
शुभ सकाळ नि ग कर्स!!
हाय सुमंगल. अग तुझ ते रोपट
हाय सुमंगल. अग तुझ ते रोपट कसल ते कळल का?
महाबळेश्वरच्या सगळ्याच झाडांवर अशी शेवाळ चढलेली होती.
हाय जागू. नाही ग. मी वाट
हाय जागू. नाही ग. मी वाट बघतेय त्या झाडाला फुले येण्याची. फक्त कळत नाहिये कि बाहेर ऊन्हात ठेवु कि नको.
खरे तर मी माझ्या छोटुकल्या बागेच्या झाडांची चित्रे मला येथे टाकायची आहे. पण तुमच्या इतका उत्साह नाहीये माझ्यात.
मग येथे येऊन वाचत बसते.
सुप्रभात. सुमंगल अग तुझ्यात
सुप्रभात.
सुमंगल अग तुझ्यात उत्साह आहे म्हणूनच तर इथे न चुकता सुप्रभात करतेस. जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा टाक फोटो.
जागू, मी आजवर दगडाला चिकटलेले
जागू, मी आजवर दगडाला चिकटलेले तेच शेवाळ समजत होते, हेही शेवाळच हे लक्षातच आले नाही. किती मेंटल ब्लॉक्स असावेत माणसाला मनात जे आहे तेच दिसते फक्त, त्याव्यतिरिक्त दुसरे काही पाहुच इच्छित नाही
तु शेवाळ म्हण आपली, मी तरी त्याला मॉस म्हणते. आंबोलीलाही हे मॉस भरपुर मिळते. या दिवसात झाडांवरुन नुसते लोंबत असते. मी गेल्यावर्षी भरपुर काढुन आणलेले. याच्या मॉसस्टिक्स बनवुन त्याच्यावर वेली किंवा मॉन्स्टेरासारखी खोडात जास्त दम नसलेली झाडे लावता येतात. गच्चीत खायची पानेही यावर सोडता येतील. बाजारात मॉसला खुप भाव आहे. काही वर्षांपुर्वी ६० रुपये किलो होता. सध्याचा रेट माहित नाही. मॉसस्टिक्स तर खुपच महाग मिळतात.
आंबोलीला याला बरगद किंवा असेच ऐकु येणारे काहीतरी नाव आहे. मला आठवत नाहीय आता.
हो साधना कृषीच्या
हो साधना कृषीच्या दुकानांमध्ये असतात हे मॉस विकायला. आता अंबोलीवरुन मला पण घेऊन ये मॉस.
साधना / जागू, तुम्हाला ते मॉस
साधना / जागू, तुम्हाला ते मॉस हाताळताना खाज नाही का येत. मी पूर्वी मॉसस्टीक घरी बनवायचो पण प्रचंड खाज सुटायची. मग मनीप्लँटचे वेड कमी झाले माझे
साधना / जागू, तुम्हाला ते मॉस
साधना / जागू, तुम्हाला ते मॉस हाताळताना खाज नाही का येत
हे माणसामाणसावर अवलंबुन असते बहुतेक. मला तरी काही त्रास झाला नाही. एकदा मी मॉसस्टिक बनवत असताना घरी काही कामासाठी एक गृहस्थ आलेले. मॉसस्टिक बनवताना जी थोडीफार धुळ उडत होती त्याचा त्यांना त्रास झाला. बाजारचे शेवाळ जुनाट असते, काळपट पडलेले असते, त्यामुळे कदाचित त्रास होत असेल.
आंबोलीचे हिरवेगार असते. कारण ते ताजे असते, जागुच्या फोटोतल्यासरखे.
साधना, . कुंडीत माती एकदम
साधना, . कुंडीत माती एकदम लिमिटेड असते. बाल्कनीत ठेवलेल्या असल्या तर वार्याने , उन्हाने पाण्याची वाफ होऊन जाते अन झाडं लगेच मान टाकतात. अशा वेळेस हे मॉस झाडाच्या भोवती पसरायचे. मॉस स्वतःच भरपूर पाणी रिटेन करते व मातीचा वरचा थर सुकत नाही. शिवाय हळू हळू हे मॉस डिसिंटिग्रेट होऊन मातीत मिसळत रहाते त्याने पण मातीचं टेक्स्चर सुधारतं.
सुप्रभात!!!! आज शनिवार, १ जून
सुप्रभात!!!!
आज शनिवार, १ जून २०१३, लोकसत्ता वास्तुरंग पुरवणी, जागू चा "चूल नावाची माझी सखी" लेख आहे. आत्ताच वाचून झाला. लगेच सांगायला आले.
जागू फार छान लिहिले आहे, अगदी असा काही अनुभव नसताना सगळे कसे डोळ्यासमोर उभे राहीले. छानच.....
काल ऑफिसात थोडे काम कमी
काल ऑफिसात थोडे काम कमी असल्याने आणि सोबत कॅमेरा असल्यामुळे पुन्हा एक चक्कर हिरानंदानी बागेत मारली. (डिसेंबरात ऐरोलीला ऑफिस शिफ्ट झाल्यावर हे सगळ मिस करणार ).
अंजन वृक्षाची फळे. (जितकं फुल सुंदर तितकीच हि फळेही )
प्रचि ०१
प्रचि ०२
हे फळ कसलं ?? प्रचि ०३ हि
हे फळ कसलं ??
प्रचि ०३
हि त्याची पाने
प्रचि ०४
आणि हे ही सापडलं तिथे प्रचि
आणि हे ही सापडलं तिथे
प्रचि ०५
प्रचि ०६
हि त्याची पाने
प्रचि ०७
याचा सुगंधही दरवळत होता
याचा सुगंधही दरवळत होता
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
mast photo ahet jipsy 5 no
mast photo ahet jipsy 5 no kiti chaan disatey. toraN lavlyasarkhe.
इथे Magnolia फुलले आहेत
इथे Magnolia फुलले आहेत सगळीकडे. मी पहिल्यांदाच ही फुले पाहिली आणि हे त्यातून मोठ्ठे पराती एव्हढे..वेडीच झाले... गाडी थाम्बवून फोटो काढले.
जागूताईचा लेख वाचला.
जागूताईचा लेख वाचला. (लोकसत्ता, वास्तुरंग, मुंबई आवृत्ती, शनिवार १/६/१३). छानच आहे. माझ्याही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. अभिनंदन!
जिप्स्या ते अवोकॅडो असावेत,
जिप्स्या ते अवोकॅडो असावेत, निदान दिसताहेत तरी तसेच. (हा अंधारातला तीर आहे हा, मी केवळ दिसण्यावरुन तीर मारलाय)
प्रची नं ५ काय आहे ते मलाही सांगा. माझ्याकडे अजुन फोटो आहेत त्याचे. ऐशुच्या पुण्याच्या शाळेत मला सापडले हे गेल्या महिन्यात. ती पिटुकली फुले फुलल्यावर तर चक्क एखादा वळेसार बांधलाय असे वाटते. फोटो अपलोड करता आले तर करते रात्री.
मेधा, धन्स गं.. कधी एखाद दिवस बाहेर जायचे तर उपयोग होईल.
जागु, तुझा लेख वाचला गं सकाळीच.
बकुळही मस्तच. आज ऐशुच्या मैत्रिणीची एक परिक्षा आहे तिच्याबरोबर ती चेंबुरला अणुशक्ती नगरात गेलीय. तिथुन फोन केला की ती जिथे बसलीय तिथे जवळच बकुळीचे दोन महाकाय वृक्ष आहेत आणि त्यांचा भयानक (:) ) वास सगळीकडे पसरलाय. (ऐशुला फुलांचे वास आवडत नाही, डोके दुखायला लागते).
मला फोनवरुन सांगतेय की तु इथे येशील तर वेडीच होशील, अणुशक्ती नगरात झाडे नाहीयेत तर महाकाय वृक्ष आहेत आणि एक-दोन नाही तर भरपुर, जंगलाचा भास व्हावा इतके. भर उन्हाळ्यात तिथे गारवा पसरलाय. आणि गेटमधुन एकदा आत गेले की आता शाळा दुकाने सगळे.. आतल्या माणसांना बाहेरचा वारा नकोच लागायला याची पुर्ण व्यवस्था. तिथल्या उंच बिल्डिंगींच्या वरच्या मजल्यावर बसलेल्या घारी ती खाली बसुन मोजतेय
सुप्रभात! साधने, तुझी लेक
सुप्रभात!
साधने, तुझी लेक तुला 'लाईव्ह कॉमेंट्री' करतेय. आणि तू 'लाईव्ह कॉमेंट्री रायटिंग' करतेयस का?
हो गं... आताच तिला तिथे
हो गं... आताच तिला तिथे भेंडाचे झाड सापडले. ते भेंड आहे ते तिला माहित नव्हते. ती पिंपळाची पाने चोरुन हा कोण चोर उभा आहे असा विचार करत होती.
साधने, लेक पण निसर्ग मैत्रिण
साधने, लेक पण निसर्ग मैत्रिण का?
प्रचि ५, नेवराचे आहे. मागे
प्रचि ५, नेवराचे आहे. मागे दिनेशदांनी सांगितले होते त्याबद्दल
http://www.maayboli.com/node/41996?page=20
गमभन, ते वेगळं. त्या झाडाला
गमभन, ते वेगळं. त्या झाडाला मी आणि जिप्सी दोधेही अगदी चांगले ओळखतो. त्याचे कळे फुलल्यावर त्यातुन लाल फुले येतात. शिवाय ती फुले माळेसारखी लटकतात (जिप्स्या, तु तिवराला ओळखायला चुकणार नाहीस ना रे???, फोटोतले तिवर असते तर तु नक्कीच ओळखले असते ना?? )
जिप्स्याने टाकलेल्या माळेला पांढरे कळे आहेत आणि त्याला पांढरी फुले येतात. आणि फुले फुलल्यावर खरेच गजरा गुंफलाय असे वाटते.
एनीवेज, माझ्याकडचे फोटो टाकते संध्याकाळी/रात्री. मलाही उत्सुकता आहे
ती निसर्गापेक्षा प्राणी
ती निसर्गापेक्षा प्राणी मैत्रिण जास्त आहे. निसर्गाकडे लक्ष देते केवळ आईला अपडेट्स देता यावे यासाठी.
Pages