निसर्गाच्या गप्पा (भाग - १४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 May, 2013 - 15:22

निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संशोधक शेतकरी - श्री. दादाजी खोब्रागडे.

रोजच्या निरीक्षणातून काहीतरी वेगळं घडत असल्याचं लक्षात येण्याची आणि यांतून चांगल्या गोष्टींचा दीर्घकाळ पाठपुरावा करण्याची क्षमता फार थोड्या लोकांना लाभलेली असते. अशी निरीक्षणक्षमता लाभलेले दादाजी खोब्रागडे हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड गावचे कष्टाळू शेतकरी. त्यांनी नेहमीप्रमाणे पटेल-३ ही भाताची जात आपल्या शेतात १९८३ साली लावली. भाताच्या लोंब्या जेव्हा निसवायला लागल्या तेव्हा दादाजींची नजर वेगळ्या दिसणार्‍या तीन लोंब्यांवर गेली. शेतातील इतर लोंब्यांपेक्षा या तीनच लोंब्या इतक्या वेगळ्या का आणि कशा ?

या तीन लोंब्यांवर सतत नजर ठेवून कापणीच्या वेळेस वेगळ्या काढून, सुकवून निघालेलं धान्य जपून ठेवलं. पुढील पाच वर्षं कुणाला काहीही न सांगता दादाजींनी भाताचं हे बीजगुणन चालू ठेवलं. १९८३ मध्ये तीन लोंब्यांपासून प्रारंभ झालेला प्रवास १९८९मध्ये तीन क्विंटल उत्पादनापर्यंत पोहोचला आणि अनेक वर्षांच्या चुकांपासून शिकत शिकत अखेर एक नवीन वाण्(जात) निर्माण झालं. या वाणातील तांदूळ प्रचलित वाणापेक्षा वेगळ्या प्रकारचा, दिसायला आकर्षक, अत्यंत बारीक दाणे असलेला आणि चवदार होता. हातावरील मनगटी घड्याळाच्या हिंदुस्तान मशीन टूल्स नावावरुन या वाणाचं एच. एम. टी. असं नामकरण झालं.

घरच्या गरिबीमुळे त्यांना खूप अडचणी आल्या. पण त्यातूनही त्यांनी भाताच्या नऊ जाती शोधल्या. अशा या दादाजींना ५ जाने. २००५ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या सोहळ्यात भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या हस्ते ५० हजार रु., स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
अहोरात्र राबून उपेक्षित जीवन जगणारा एक अल्पभूधारक शेतकरी, ज्याच्यामुळे देशातील अनेक लोकांचे जीवन पालटले -अशा या व्यक्तिची दखल अमेरिकेतील फोर्ब्स या मासिकाने घेतली व २०१० साली त्याला प्रसिद्धी दिली.
महाराष्ट्र शासनाने त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेतली व त्यांना २५हजार रु. व ५० ग्रॅ सोन्याचे पदक देऊन सत्कार केला.
-साभार दै. लोकसत्ता पुणे आवृत्ती (४ जून २०१३, लेखिका- शुभदा वक्टे, मराठी विज्ञान परिषद, मुंबई २२)

सुप्रभात.

वा दादाजींना सलाम.

ह्यावरुन मला पुन्हा जुनी आठवण आली. आमच्याही भाताच्या कणश्या झाल्या की शेतातील काही कणश्या उंच असत मग अशा कणश्या आम्ही कापुन वेगळ्या ठेवायचो. त्या कणशा राता तांदळाच्या असायच्या. राता तांदूळ दिसायला लाल, चविला गोड. अगदी सुरवातीला तर आमची त्याच तांदळाची शेती होती. भाकर्‍याही राता तांदळाच्या आणि भातही. भात लाल व्ह्यायची. भाकरीला खुप छान चव असायची. दिसायला नाचणीच्या भाकरीसारखी. हल्ली खुप कमी मिळतो हा राता तांदूळ.

दिनेशदा, जिप्सी, जागू, मस्त फोटो. Happy
शोभे, तुला पावसाने का फसवले? इथे तर आलाय..>>>>>>>>>>>काल थोडासा आला. पण आज परत सकाळ पासून येवढे भरून आले होते की ऑफिसला येतानाच भिजणार असे वाट्ले होते. पण आता चक्क ऊन पडलय. Sad

राता तांदूळ दिसायला लाल, चविला गोड. अगदी सुरवातीला तर आमची त्याच तांदळाची शेती होती>>>>>>>>जागू ह्याची पेज केली की वर तुपासारखा तवंग यायचा का? आमच्या कडे लहानपणी असा लाल लहान पण सुंदर वास आणि पेजेवर तवंग येणारा तांदून होता. पण गेल्या कित्त्येक वर्षात परत तसा तांदूळ दिसला पण नाही. Uhoh

शशांकजी, छान माहिती. दादाजी म्हणजे एक कर्तुत्ववान माणूस. Happy

शांकली...........नेवरीचे तुरे काय सुंदर नाजूक दिसताहेत!
जागू फुगे अगदी पारदर्शक आहेत.
जिप्सीभौ .................काय दिवस आलेत.......(लुक हू इज टॉकिंग!!) ........... म्हमईतला मानूस नगरातल्या पावसाला बलिवतोया! असो.......लागोपाठ ३ रात्री जबरदस्तच पाऊस झाला. रस्त्यांची वाट लागली!
लाइटी(नगरी भाषा बरं ही!) गेल्यामुळे फ्रिजातल्या सामानाचीही वाट!
आजही पावसाची हवा आहे.

शोभ खरंच मज्जा आहे. पारा थोडा उतरल्यामुळे मस्त वाटतंय! येईल हो ..........हळूहळू आमच्या गावचा पाऊस तुमच्या गावालाही!

नमस्कार निगकर. Happy
मी माझ्या घरी काही झाडं लावली आहेत. त्याचे फोटो इथे मला टाकायचे होते पण मोबाईलमधून जमत नाहिये. त्यामुळे आडलंय.

मला झाडांची आवड नव्हती पुर्वी. म्हणजे कधी एक्स्प्लोअर च केली नव्हती. कारण आम्ही कायम चौथ्या मजल्यावर राहिलो. माझे काका होते हिरव्या बोटांचे कुठुनही काडी लावली तरी ते झाड बहरलेच समजा.
माझ्या पुण्यातल्या जुन्या घरी सुद्धा मैत्रिणीने खूप झाडं लावली होती पण त्यांना पाणी घालायची वेळ आली की आमचं वाजायचं.
नविन घराला छोटी टेरेस आहे ती पहिल्यांदा मोकळीच होती. झाडं लावायची नाहीत कारण त्यांची निगा राखणं आपल्याला जमणार नाही असं पक्कं वाटलं होतं. तरी पण मैत्रिण सारखी मागे लागली. मग हळू हळू एकेक करत झाडं आणली. सध्या तुळशी, कोरफड, जास्वंद, मधुमालती, ३ प्रकारचे गुलाब, जाई जुई, पाम इ. आहेत. मध्यंतरी २ प्रकारच्या सदाफुली लावल्या होत्या दोन्ही वाळल्या आत्ता आहे ती तिसरी, चांगली फुललीये. Happy जास्वंदाला फुलं येणं बंद झालं आणि काही पांढरं पांढरं दिसायला लागलं मग ते मी पुर्ण कापलं मातीच्या वर फक्त २ पेरं खोड ठेवलं. आता त्याला चांगली पालवी फुटली आहे. मदनबाणही होता सुकुन मरून गेला. जाईजुईचा वेल ही पुर्ण सुकला होता, मग एकदा असंच माझ्या झाडवालीनं एक सदाबहार नावाचं खत दिलं मला ते घातलं आणि तो वेल चांगला फुटला. अजून नव्याने फुलला नाही पण त्याला जीवदान मिळालं हेच खूप झालं.
बाकी सुट्टीच्या दिवशी सकाळी मी घरात असेल त्या हत्याराने माती वरखाली करते. पाणि घालते.
२-३ आठवड्यांनी खत घालते. गुलाबाला भरपूर कळ्या येतात.

वा दक्षे, एकदा आवड लागली कि जपली जातेच.

जागू, फुल छानच आहे. यातला फक्त सिंगल प्रकार मी बघितला होता.
जागू, तूला राळे माहित आहेत का ? वरीसारखेच पण सोनेरी दिसणारे धान्य असते. त्याचा भात पण छान होतो.
मी मुंबईत नाही बघितले, पण कोल्हापूरला मिळाले होते.

मानुषी, दिनेश शोभा Happy

मी इथलं बरंच काही वाचते. पण तुमच्या इतकी निरिक्षणशक्ती माझ्यात नाही. अन्यथा इथे माझ्या ऑफिसच्या अवती भवती भरपूर झाडं आहेत. मदनबाण नुस्ता कळ्यांनी बहरलाय. पण फोटो म्हणलं की गाडी अडते. Sad

दक्षे खुप छान वाटल वाचून. आणि निरिक्षणशक्ती ही आवड लागली की आपोआप येते ती तुझ्यात येईलच.

दिनेशदा राळे ऐकल आहे पण पाहिले नाही अजुन.
आमच्याइथे पण पाऊस रोज संध्याकाळी १ तास पडतो.

जागू, तो लाल तांदुळ म्हणतेयस तो कोकणात मिळतो बहुतेक तोच असावा असे वाटतेय. त्याचाच उकडा तांदुळ करुन तो पेजेलाच वापरतात. चव अतिशय मस्त. आजारपणात / अशक्तपणात पेज खाल्ली की छान तरतरी येते.
आईबाबांकडे अजुनही मिळतो. आई त्याचा उकडा तांदुळ करुन ठेवते.

जागू, तुझा वास्तुरंग मधला लेख छान आहे. अभिनंदन

मागे फेब मधे घरी लावलेल्या वडाच्या झाडाच्या खोडाला जास्तीची मुळे फुटण्यासाठी एका भागाला किंचित स्क्रॅप करुन त्यावर माती लावुन प्लॅस्टीक गुंडाळुन ठेवलं होतं. आता छाटायचे म्हणुन ते प्लॅस्टीक काढले तर खोडाला मधेच छान मुळे फुटली होती. तिथुन छाटले की वरचे रोप नव्या सोपासारखे लावता येते. असे करण्याबद्दल नेटवरच माहिती वाचली होती.

फोटो आणू शकलेय.

हा गुलाब. सध्या टोटल ९ तरी फुलं आहेत. फोटो ३-४ दिवसापुर्वी काढलेला आहे तेव्हा २ फुलली होती.

gulab.png

अरे ते पहिल्या पावसाच्या वेळेस दिसणारे लाल रेशमी किडे कुणाला दिसले असतील तर फोटो टाका. आठवण येतेय त्या किड्यांची >>>>>आर्या, हे घे Happy

राळे फार प्राचीन काळापासून वापरात आहे. "राळियाची खिचडी" हा पण प्राचीन प्रकार आहे. शिजायला वेळ लागतो पण शिजल्यावर मस्त लागतो.
बेळगावचा काळा भात म्हणून पण एक प्रकार असतो. रंगाने काळेच असतात ते दाणे.
आसाम भागात, कोमल चावल म्हणून एक प्रकार असतो. हे तांदूळ शिजवावे लागत नाहीत. नुसते पाण्यात भिजवले कि झाले आणि दुसरे असतात "चाक हौ". हे तांदूळ मुळातच सुवासिक आणि चवीला गोड असतात.

आता तर थाई, व्हिएटनामी, नायजेरियन, केनयन, अंगोलन, इतालियन, पोर्तुगीज.. असे सगळे तांदूळ चाखून बघितलेत. प्रत्येकाची चव वेगळी.

सावली धन्स. रात्या तांदळाचा कधी उकडा तांदूळ केल्याचे माहीत नाही. पण आता मिळाला की मी फोटो टाकेन. त्याला पटणीही म्हणतात.

दक्षिणा, जिप्सी फोटो छान.

दक्षे... भारीच! तुझ्यात निगकर होण्याची लक्षणं दिसतायत. Happy चिनी गुलाब, ऑफीस टाईम लावलेत की नाही. चिनी गुलाबांनी पुर्ण भरुन गेलेली कुंडी मस्त दिसते. मला तर या दिवसात तेरड्याचेही सर्व रंग आवडतात.

व्वाह!! जिप्स्या...तुमाखमि!! Happy
काय गोडुला दिसतोय तो किडा!! पहिल्या पावसानंतर हे कुठे गायब होतात कुणास ठाऊक?

मला एक कळत नाही. पाऊस सुरु होण्याच्या आधी आमच्याकडे पंखवाल्या मुंग्या/ कि किडे? घरभर दिसतात. त्यांना खायला मग पालीही मधेच कुठुनतरी उपटतात.
नंतर अचानक हे किडे गायब होतात. Uhoh

मस्त गं. झाड लहान आहे त्यामानाने पण फुलं चांगली आलेली दिसतायत.

दक्षे,त्या गठ्ठ्याने पडणार्‍या किड्यांनाच 'पैसा' म्हणतात ना? हात लावल्यावर गोल होतो तो. Uhoh

आर्या,
पंखवाले नर आणि मादी असतात. मिलन झाल्यावर नर मरतात आणि बेडूक आणि इतर पक्षी यांच्या अन्नाची सोय होते. माद्या आपले पंख आपणच तोडतात आणि नव्या वारुळाला ( आयुष्याला ) सुरवात करतात. असे तोडलेले पंख पण भरपूर दिसतात. मुंग्या / वाळवी वगैरे किटकांत हि "पद्धत" आहे.

दक्षे, खरंच छान जोपासली आहेत झाडे.

दक्षे, मस्त फोटो. शाब्बास! लगे रहो! Happy आता आम्हाला आणखी फोटो पहायला मिळणार. Happy

आर्ये, अग, कालच आमच्या घरी या मृगाच्या किड्याची आठवण काढली होती. आमच्या कडे असे खूप यायचे पहिला पाऊस पडला की. तसेच अगदी छो्टी छो्टी बेडक्यांची पिल्ले, छोटे छोटे चामटे, (खेकडे) पण अगणित असायचे. अंगणात पाऊल टाकताच यायच नाही. इतके ते इकडे तिकडे पसरलेले असायचे. तसेच त्या वनगाई, गोम असते या तशाच असायच्या. अनंत पायांच्या पण निरुपद्रवी. सगळ्या एका रेषेत चालायच्या. एकसुद्ध्या रांगेतून इकडे तिकडे होणार नाही. कमाल आहे निसर्गाची. हे सगळ आठवून, आणि यातल आता काहीच पहायला मिळत नाही म्हणून खूप वाईट वाटतय. Sad

<<मुंग्या / वाळवी वगैरे किटकांत हि "पद्धत" आहे.<<
ओह... हे माहित नव्हतं. काय पण त्यांचं आयुष्य आहे. Sad

वनगाई म्हणजे तो पैसा किडा का, शोभे?

Pages