निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर
त्या ज्या पंखवाल्या मुंग्या
त्या ज्या पंखवाल्या मुंग्या आहेत त्यांना एक नवा शब्द कळला 'रोहिण्या' रोहीणी नक्षत्रात येतात म्हणुन म्हणे त्या रोहिण्या.
वनगाई म्हणजे तो पैसा किडा का,
वनगाई म्हणजे तो पैसा किडा का, शोभे?>>>>>>>>>...नाही तो खूप जाड असतो. ह्या अगदी आपली ’गोम’ दिसते ना तशाच असतात.
रोहिण्या, वनगाई ... काय मस्त
रोहिण्या, वनगाई ... काय मस्त नाव आहे.:)
आर्ये, अग या दिवसात खरी
आर्ये, अग या दिवसात खरी कोकणात मजा असते. कडकडणार्या विजा, धो धो कोसळारा पाऊस. (आणि विरळ घरे असल्यामुळे त्याचा आनंद घेता येतो) पावसात स्वच्छ धूवून हिरवीगार खालेली झाडे, गढूळ पाण्याचे पाट आणि त्यातून पळ्णारे खेकडे, नळ्यातून्/कौलातून गळणार्या पागोळ्या, जोराचा वारा, आणि त्यातच छत्री घेऊन, उलटी होणारी छत्री सावरत नदीच पाणी बघायला जाणारे आम्ही. नदी गढूळ पाण्याने दुथडी भरून वाहतेय. पाणी साकवावरून वहातय. वहाताना बराचसा साकव बरोबर घेऊन जातय. पाण्यातून साप, झाडे, क्वचित जनावरेही वहात आहेत. सगळा देखावा डोळ्यासमोर उभा राहिला.
शोभे का अशा आठवणी काढून मनाला
शोभे का अशा आठवणी काढून मनाला डागण्या देतेयस?
आत्तच तळवड्याचा पाऊस पाहून आले. काल घरी जाताना या वर्षीचा पहिला पाऊस अनुभवला.
सगळा देखावा डोळ्यासमोर उभा
सगळा देखावा डोळ्यासमोर उभा राहिला. >>>> बोलता बोलता सहज शब्दातुन तु तो उभा केलास
व्वा...शोभे!! खरच गावाकडचा
व्वा...शोभे!! खरच गावाकडचा पाऊस अनुभवण्यासारखा.
खरच गावाकडचा पाऊस
खरच गावाकडचा पाऊस अनुभवण्यासारखा. स्मित>>>>>>>>असं वाटतयं असंच निघाव आणि कोकण गाठावं
मस्तच शोभा. हे वाचता वाचता
मस्तच शोभा. हे वाचता वाचता आमचे कोकणातले घर डोळ्यासमोर आले. खरे तर मी धो धो पावसात कोकणात क्वचितच गेले आहे. पण वाचताना ते घर आणि आता तिथे काय देखावा असेल ते डोळ्यापुढे आले.
शोभा, मस्तच वर्णन. आम्ही
शोभा, मस्तच वर्णन.
आम्ही लहानपणी पाऊस सुरु होईपर्यंत क्वचितच कोकणात रहात असू. ७ जूनला शाळा सुरु व्हायच्या आत परत मुंबईला यावे लागे. त्यामुळे माझ्या आठवणी या गोव्याच्या. म्हणजे कळत्या वयातल्या.
नाही म्हणायला, कोल्हापूरला कधी कधी वळीव आम्हाला गाठायचा. गारा पण बघितल्या. फक्त बघितल्याच कारण आजोबा, अजिबात घराबाहेर पडू देत नसत.
आणि बाहेर पडून तरी काय फायदा. चिखलात पाय गेला ना तर पाय वर उचलताना पावलाखाली एक इंच मातीचा थर बसायचा. आजोळी सगळी भुसभुशीत माती.
दक्षिणा, बाग मस्त आहे . कीप
दक्षिणा, बाग मस्त आहे . कीप इट अप. पेपरोमिया, मनी प्लांट, वेगवेगळे फर्न्स, शतावरी हे सर्व बाल्कनीत / छोट्या कुंड्यांमधून वाढवायला सोपे प्रकार आहेत
यू ट्यूबवर ANTS नावाचा एक छान
यू ट्यूबवर ANTS नावाचा एक छान माहितीपट आहे.
मुंग्यांमधे कुणीही नेता बगैरे नसतो. ( राणीमुंगी फक्त अंडी देते व ती नवे वारुळ वसवते. पण ती नेता नसते.)
नेमके कुठल्या दिशेने अन्न शोधायला जायचे. किंवा एकाचवेळी दोघीतिघींना अन्न मिळाले तर कामकरी मुंग्यांनी कुठे जायचे, हे निर्णय समूहाने घेतले जातात. त्यासाठी त्या खास रसायनाचा वापर करतात.
वारुळात बुरशीची शेती त्या करतात पण त्या शेतीत निर्माण होणारा कार्बन डाय ऑक्साईड पण योग्य तर्हेने वारुळाबाहेर टाकला जातो. मुंगी काचेवर उलटे लटकून आपल्या वजनाच्या कित्येक पट वजन उचलू शकते. ( ते गुणोत्तर मानवाला अशक्य आहे.) हे सगळे त्या माहितीपटात फार सुंदर तर्हेने दाखवलेय.
>>पुरंदरे शशांक | 4 June,
>>पुरंदरे शशांक | 4 June, 2013 - 00:45
संशोधक शेतकरी - श्री. दादाजी खोब्रागडे.
श्री. दादाजी खोब्रागडे यांच्याबद्दलची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद शशांक! किती द्रष्टेपण दादाजींचं!
>>भाताच्या लोंब्या जेव्हा निसवायला लागल्या तेव्हा दादाजींची नजर वेगळ्या दिसणार्या तीन लोंब्यांवर गेली.
निसवणे म्हणजे काय?
शोभा१२३, पावसाचं छान वर्णन !
शोभा१२३,
पावसाचं छान वर्णन !
मृगाचा किडा ना तो ?>>>>हो
मृगाचा किडा ना तो ?>>>>हो दिनेशदा, मृगाचा किडा तो.
बागेत लावलेल्या वेलांपैकी ३
बागेत लावलेल्या वेलांपैकी ३ वेल आले. एक वेल तुडवला जाऊन मेला. (गल्लीत खेळणारी मुलं बॉल आला म्हणून सारखी आत येतात.) कारल्याला कारली लागली आहेत.
एक गंमत..............कारल्याची फुलं दिवसभर फुललेली असतात. पण दुसर्या वेलाची फुलं संध्याकाळनंतर इतकी फुलतात की काय सांगू! ही संध्याकाळी फुलणारी फुलं दिवसा अगदी मिटलेली असतात. पण ही फुलं कशाची आहेत ते लक्षात येत नाही. दोडका, घोसाळं, दुधी यापैकी कशीची तरी नक्की. कारण एवढेच वेल लावले होते. (याला म्हणतात डोक्याचं खोकं!)
टोंमॅटोची कंपाउंडच्या भिंतीकडेला बरीच रोपं आली होती पण एकही जगलं नाही ....असं का झालं असेल?
तर ही संध्याकाळनंतर फुलणारी फुलं(जाणकार सांगतीलच...)
ही त्याची पानं
आणि आता हे कारल्याचं फूल
मानुषी, मस्त फोटो. तो
मानुषी, मस्त फोटो. तो कढीपत्ता पण मस्तच दिसतोय.
जागतिक पर्यावरणदिनाच्या
जागतिक पर्यावरणदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!
मानुषी ही मोठ्ठी गोल पानं मला
मानुषी ही मोठ्ठी गोल पानं मला तरी घोसावळ्याची वाटतायत.
दक्षे........................
दक्षे..........................बघ मी म्हटलं नव्हतं...............आवडीचं रूपांतर वेडात................!
वाह! जिप्सी छान
वाह! जिप्सी छान प्रचि.
मानुषीताई, तो घोसाळ्याचा वेल आहे. आता फुले येऊ लागली आहेत ना, मग त्याला खत घालायला हवे, पुढे फळधारणेसाठी त्याची गरज पडेल झाडाला.
मानुषी धन्यवाद! खूप
मानुषी धन्यवाद! खूप वर्षानंतर ही फुले पहायला मिळाली.
काल इकडे लक्ष्मीरोड वगैरे भागात थोडासा पाऊस झाला. पण मी इथे असताना माझ्या घराच्या परिसरात (तिकडच्या भागात) सपाटून पाऊस झाला. मोठमोठ्या गारांनी घराच्या खिडक्या धुतल्या.(खिडक्या थोडक्यात वाचल्या) वादळाने तर काही झाडे मूळापासून उन्मळून पडली, कित्येक झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडलेल्या होत्या, अनेक ठिकाणी ड्रेनेज उसळ्या मारत होती. विजेच्या तारांवर फांद्या पडल्यामुळे वीज गायब झाली होती. घरी जाताना वाटेत पडलेल्या फांद्या बघून, कॉर्पोरेशनच्या लोकांनी फांद्या तोडल्या असतील असे वाटले, पण आजूबाजूचे दृष्य पाहात पहात घरी गेले तर, वरील रसभरीत वर्णन ऐकायला मिळाले.
पण मला प्रत्यक्षात काहीच अनुभवता आले नाही. गारा पण खाता आल्या नाहीत.
मानुषी, मस्त फोटो. तो
मानुषी, मस्त फोटो. तो कढीपत्ता पण मस्तच दिसतोय. >>>>>>>>> चक्क गुर्जींचं सर्टिफिकेट!
गमभन..........हो आता खत घालीन. घरातल्या ओल्या कचर्याचं खत आहे रेडी.
बघ शोभा मी म्हटलं नव्ह्तं मी पाठवीन पाऊस म्हणून.....:डोमा:
मानुषी शोभे हो, मी ऑफिसात
मानुषी
शोभे हो, मी ऑफिसात असताना सिंहगड रोडलाही जोरदार पाऊस झाला, अगदी आडवा तिडवा.
त्यामुळे माझी सदाफुलीची एक फांदी वाकली आहे. संपुर्ण बाल्कनीभर मातीच माती. बेडरूम मध्ये पण पाणी.
त्यामुळे माझी सदाफुलीची एक
त्यामुळे माझी सदाफुलीची एक फांदी वाकली आहे. संपुर्ण बाल्कनीभर मातीच माती. अरेरे >>>>>:अरेरे:
बेडरूम मध्ये पण पाणी. >>>>>>>>>>अग मग रात्रभर पोहत होतीस की काय
<<यू ट्यूबवर ANTS नावाचा एक
<<यू ट्यूबवर ANTS नावाचा एक छान माहितीपट आहे......<<<
दिनेशदा...तुमच्याकडे माहितीचा खजिना आहे. नक्की बघेन हा माहितीपट.
एवढीशी काय ती मुंगी पण त्यांच्या कामात किती सुसुत्रता आहे!!
मानुषी, घोसाळ्याचा वेल कसला बहरलेला दिसतोय!!
दक्षे. किती बारीक निरिक्षण करायला शिकलीस झाडांचं.!
एवढीशी काय ती मुंगी पण
एवढीशी काय ती मुंगी पण त्यांच्या कामात किती सुसुत्रता आहे!! स्मित>>>>>>>>>>>>आर्ये, काल माझ्या मनात हाच विचार आला. एका कणा एवढे डोके तिचे. पण ती किती विचार करत असेल. कालच मला , आपली अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी घेऊन जाणार्या मुंग्या दिसल्या. आता पाऊस येणार हे त्यांना कसे समजले असेल? खरच या निसर्गाची कमाल आहे.
बघ शोभा मी म्हटलं नव्ह्तं मी पाठवीन पाऊस म्हणून.....डोळा मारा>>>>>>>>>>.मानुषी धन्यवाद!
माझ्याकडे एक मोठा गुलाब ही
माझ्याकडे एक मोठा गुलाब ही आहे, ठराविक कालावधीनंतर मी त्याची छाटणी केली... मग नुसत्या काड्या उरल्या होत्या. मी रोज निरिक्षण करायची त्याचं हळू हळू पालवी यायला लागली. एक कळी सुद्धा आलेली. मग बाल्कनीत कुंड्या ठेवायला स्टँड करताना तो फॅब्रिकेटर वर चढला आणि उतरताना बरोबर त्या नाजूक डहाळीवर. कळी मोडली, पालवी मेली.. मग पुन्हा नव्या पालवीची वाट पाहिली. माझी मैत्रिण आलेली रहायला. मी रोज सकाळी उठले की पहिली बाल्कनीत जाऊन कळ्या आणि झाडांचा प्रोग्रेस पाहते. एक दिवस तिने पाहिलं आणि १०-१५ मिनिटांनी म्हणाली की झाडांबरोबर गप्पा मारून झाल्या असतील तर या आता आत.
खरंच माझ्या घरची ही छोटी रोपं म्हणजे माझे कुटुंबिय आहेत.
खरंच माझ्या घरची ही छोटी रोपं
खरंच माझ्या घरची ही छोटी रोपं म्हणजे माझे कुटुंबिय आहेत. स्मित>>>>>>>दक्षे, छानच!
खरंच माझ्या घरची ही छोटी रोपं
खरंच माझ्या घरची ही छोटी रोपं म्हणजे माझे कुटुंबिय आहेत
मी गेले कित्येक वर्षे माझ्या या कुटूंबीयांची काळजी घेत होते. पण गेली ३-४ वर्षे पुर्ण दुर्लक्ष झालेय. आता नव्या जोमाने सुरू करणार...
Pages