निसर्गाच्या गप्पा (भाग - १४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 May, 2013 - 15:22

निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहा पहा -जिप्सी आत्तापासूनच "दोन दोन स्मायली" टाकायला लागलाय ......

जिप्सी - पहिली ओळख माबो चीच करुन दिलीस काय रे ???

तोंडल्याच्य बिया केव्हाची शोधतीये पण मिळतच नाहीयेत. काल त्या दुकानातल्या माणसानं मौलिक माहिती दिली की तोंडल्याच्या बिया नसतातच, तोंडल्याकरता वेलीचाच तुकडा लावावा लागतो.
सोला आने सच....

जो-एस, माझेच फोटो ढापुन इथे टाकलेत असे वाटतेय Happy माझ्याकडेही शेवटाच्या फोतोत दिसतेय तेवढे अननस आलेय, फोटो अगदी सुरवातीपासुन काढलेले पण कार्ड करप्ट झाले.

जो-एस, तुमच्याकडे कुंडीत अननस इतका छान झाला. सहीच.
सध्या माझी झाडं अजिबात वाढत नाहीयेत. जैसे थेच आहेत. फुलंही नाहीत. आता पावसाची वाट बघतेय म्हणजे जरा नीट वाढतील. घरी नव्हते तेव्हा सायफनिंग तत्वाने पाच झाडांना पाण्याची सोय करुन गेले होते. आणि उरलेल्यांना पाणी घाल असे कामवालीला सांगितले होते पण चुकुन त्या पाच झाडांनाही पाणी घातले गेले. आणि त्यापैकी सदाफुली अतिपाण्याने कुजली. निशिगंधाला मात्र बरेच कोंब आले. आता फुलं कधी येणार देवजाणे.
आता पावसाळा आला कि पुन्हा सदाफुली आणि इतर फुलं लावेन.

दिनेशदा, जो , छान फोटो. Happy
जो, छोट्या कुंडीत एवढा अननस आला? म्हणजे मी पण गॅलरीतल्या कुंडीत लावून बघेन म्हणते. Happy

लवकरच जिप्सी सर्व "गुलाबी वनस्पती" असा धागा काढणार आहे - .....>>>>>>>>>>आता इथे कसले धागे काढतोय तो? आता तो दुकान पालथी घालताना दिसेल धागे बघत. (साड्यांचे आणि ड्रेसचे) Proud

जिप्सी - पहिली ओळख माबो चीच करुन दिलीस काय रे ???>>>>>>>>>>कदाचित माबोची असेल. पण नि.ग. ची नक्कीच नाही. एवढी आनंदाची बातमी इथे येऊन सांगावीशी नाही वाटली ह्याला. म्हणजे बघा. Uhoh
कशाला जीव खाताय बापड्या जिप्स्याचा? तो इथे येतोय वाचायला.... वाट पहा आता.>>>>>>...बरोबर साधने. आता त्याला इकडची वाट दिसणारच नाही. वाट दिसणार ती फक्त ' तिकडची' Wink

पहा पहा -जिप्सी आत्तापासूनच "दोन दोन स्मायली" टाकायला लागलाय ......>>>>>>>>>>>शशांकजी किती सूक्ष्म निरिक्षण आहे हो तुमचं. मी आत्ता थो.पु.वर पाहिलं तिथेही दोन दोन स्मायली आहेत. Lol

लाजलेला जिप्सी कसा दिसतो, याचा कुणीतरी फोटो काढा रे.

मामी, गवार फार फोफावते. उगाच नाही ती गायींना खायला देत. ( गौ आहारी = गवारी Happy )

तोंडल्याबाबत मलाही बिया असाव्यात असे वाटतेय. इथे अनेकदा रानात तोंड्ल्याचे / कारल्याचे वेल दिसतात.
पण ती वेलही घरात लावली तर सगळी बाल्कनी भरून जाईल. मटकीचा वेल लावून बघ. पाने शोभिवंत असतात.

जो, अननसाचे फुल छानच. आपल्याकडे गोव्याची म्हणून वेगळी अननसाची जात असते. त्यात बिया असतात.
अर्थात त्या बिया लावून अननसाचे झाड उगवत नाही. इथे युगांडाची म्हणून आणखी एक वेगळी जात असते.
आतून पांढरी असते. मधला दांडाही खुप गोड लागतो आणि वरची साल पण पातळ असते.

लाजलेला जिप्सी कसा दिसतो, याचा कुणीतरी फोटो काढा रे.>>>>>>>>>...दिनेशदा, आता या फ़ोटोग्राफ़रचा फ़ोटो कोण काढणार? तोही लाजलेला असताना? Proud

जिप्स्या अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.

जिप्स्याच्या पुढच्या थिम
गुलाबी हवा, गुलाबी स्वप्न, गुलाबी वाट, गुलाबी पहाट, गुलाबी ऋतू, सारे काही गुलाबी गुलाबी गुलाबी Lol

मामी माझ्याकडे तोंडलीचा वेल आहे. कसा पाठवू बोल की येतेस न्यायला?

माझ्याकडे पण आहे तोंडलीचा वेल. पण कुंडित असल्याने त्याला एकुण ४/५ तोंडलीच आली. त्या पांढर्‍या ढेकुणांनी जीव खाल्ला आहे..तोंडलीचा पण आणि माझा पण.

अननस लावायला ह्वा Happy

अश्विनी अग अननस विकतो त्याच्याकडे भरपुर असतात अननसाचे वरचे शेंडे. त्याच्याकडून मागुन आणायचा आणि कुंडीत लावायचा. माझ्याकडे पण आहे कुंडीत पण सावलीत असल्याने अजुन फळ धरत नाही.

जिप्स्या अवांतर नाही हे सगळ नैसर्गिकच आहे Lol

अवांतर गप्पा पुरे आता, धाग्याशी संबंधित बोलुया >>>>>>>>>>>>हो क्का? Wink
जिप्स्या अवांतर नाही हे सगळ नैसर्गिकच आहे >>>>>>>>>>>+१०००००००००००००००००००००००००००००००० Lol

मामी, गवार फार फोफावते. उगाच नाही ती गायींना खायला देत. ( गौ आहारी = गवारी ) >>> ओहो, अशी आहे का उपपत्ती?

तोंडल्याबाबत मलाही बिया असाव्यात असे वाटतेय. इथे अनेकदा रानात तोंड्ल्याचे / कारल्याचे वेल दिसतात. पण ती वेलही घरात लावली तर सगळी बाल्कनी भरून जाईल. मटकीचा वेल लावून बघ. पाने शोभिवंत असतात.>>> बाल्कनीभरून वेल नक्कीच चालेल मला. मटकी??? वॉव आत्ताच लावून टाकते. धन्स, दिनेशदा.

जागू ...... मी तुझ्याकडून तोंडलीचा वेल घेणारच घेणार. तिथे कधी येईन ते माहित नाही पण जर कोणी माबोकर तुझ्याकडे आले तर नक्की पाठवून देशील का?

मी दोन दिवस इथे नव्हते तर आपल्या जिप्सीभौंनी कायतरी करून ठेवलेलं दिसतंय!:डोमा:
फेबुवरही पाहिलं बरं आम्ही...
एनीवेज हार्दिक अभिनंदन बर्का गुर्जी!
खूप सगळ्यांचे फोटो आणि कायकाय सगळं वाचतेय........पण ते काय एवढं महत्वाचं नाय! नाय का हो गुर्जी!

मामी तुला कुठल्या ठिकाणच्या मायबोलिकरांकडे दिले म्हणजे घ्यायला सोपे पडेल?
वर्षू ताई कुठे गडप झाली आहे ?

मामी रानातली तोंडली बर्‍याचदा रानटी म्हणजे कडू असतात.

अरेरे नका ते आपल्या जिप्सीला उगाचच छळू! का सगळे बिचार्‍याला दोन दोन फुलं टाकून छळतायत? जिप्सी वाईट्ट लोकं आहेत, लक्ष देऊ नकोस त्यांच्याकडे. त्यापेक्षा तू हा फोटो बघ ... जरा बदल म्हणून! Proud

(आमचं आपलं पुदिना पुराण कंटीन्यु)

नागपुरात पुदिना १०० रुपये छटाक अशी बातमी कालच स्टार माझावर ऐकली, अन कसं श्रीमंत श्रीमंत वाटलं.

दिनेशदा,
इथे एक मामाजीका जलजिरा प्रकार येतो. "बदी और बाय को नष्ट करता है" अशी त्याची जाहिरात असते. आता बायको नष्ट करणारे पेय म्हणुन पिऊन पाहिला, तर जहाल तिखट निघाला. तो पार्सल आणून पाणिपुरीचे पाणी म्हणून मस्त लागतो Wink

जो_एस
आमचा पुदिना जरा इब्लिस प्रकारचा आहे. इथे सावलीत ४३+ टेंपरेचर अ‍ॅवरेज आहे. मरणी उन्हात असते ती कुंडी, तरी असा माजलाय मस्त Wink

***
जिप्सी यांचे लग्न ठरल्याबद्दल अभिनंदन.
(लगता है जमाना बदल गया है. आमच्या मित्र कंपनीत (आमच्या लग्नाच्या काळी) लग्न ठरल्यावर सांत्वन करीत असत Wink अभिनंदन नव्हे) Light 1

(लगता है जमाना बदल गया है. आमच्या मित्र कंपनीत (आमच्या लग्नाच्या काळी) लग्न ठरल्यावर सांत्वन करीत असत अभिनंदन नव्हे)>>>>>>>>>>>>>>>>>> Rofl Rofl

इब्लिस,
उसाचा रस अर्धी वाटी + लिंबाचा रस -२ चमचे , मूठभर पुदिन्याची पाने जराशी चुरडून , भरपूर बर्फ + हवी तितकी रम = मोहितो नावाचे कॉकटेल .
कितीही पुदिना वाढला तरी कमीच पडेल Happy

महाबळेश्वरला आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो त्याच्या मागच्या बाजूला जांभळांची झाडे होती. जांभळे अगदी बारीकच तिथली सगळी. ती खायला पहिल्या दिवशी शेकरू आले. आमचा सगळा वेळ त्याला कॅमेर्‍यात कैद करण्यातच त्या संध्याकाळी गेला.

Pages