निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर
आर्या, तशीही ही भाजी कुठेही
आर्या, तशीही ही भाजी कुठेही जगते. इथे पण दिसते पण नेमकी खात्री नसल्याने मी खात नाही !
शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक
शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!!!!
दिनेश, ही रोपटी दिसताहेत ती
दिनेश, ही रोपटी दिसताहेत ती अजुन इंचभर वाढली की उपटतात आणि त्याची भाजी करतात. आंबोलीला त्याला रवो म्हणायचे, भाजीला रव्याची भाजी. मला कित्येक वर्षे रवो म्हणजे आपला गव्हाचा रवा वाटायचा
रस्त्यावर कुत्रे पसरलेले असतात ते माणसासारखेच ढिम्म पडुन राहतात, कितीही हॉर्न दिला तरी हलत नाहीत, अगदी जवळ गाडी नेली की आपल्याकडे तु.क. टाकुन मग उठुन जरासे बाजुला सरकतात.
ऐशुच्या मते माणसाचे अन्न खाऊन खाऊन ते माणसासारखेच ऐदी झालेत. आता हे कावळ्यांनाही लागु करायला हरकत नाही. माणसासारखे अन्न साठवुन ठेवायची सवय लागली.
हो, मालवणला पण हाच शब्द वापरत
हो, मालवणला पण हाच शब्द वापरत असत. मला वाटतं विरळणी करताना जी रोपे उपटत असत, त्याची भाजी करत असत.
हे बेसिल आहे का? आमच्या
हे बेसिल आहे का?
आमच्या पुदिन्याला अश्या मंजिर्या आल्यात. आधी कधी पाहिल्या नव्हत्या.
(हे फोटो टाकायला बाफ शोधून काढला तर दिनेशदांनी आजच पुदिना अन बेसिल चे फोटो डकवले आहेत)
निगकर्स उशिराने नव्या
निगकर्स उशिराने नव्या भागाच्या शुभेच्छा.
एकसे एक फोटो आहेत.
पाण्यासंबंधी - कोल्हापुरात एका माणसाने गेली काहि वर्षे फक्त रेनवॉटर हार्वेस्टींगने जमवलेले पाणी वापरले आहे.
घराच्या चारही बाजुला ४ विहिरी व वरती टाक्यांत ते पाणी साठवतात. हे पाणी त्या कुटुंबाला वर्षभर पुरते.
मी बहुदा अॅग्रोबन मधे वाचले हे मागच्या आठवड्यात. नक्की आठवत नाहिये.
दिनेशदा किती सुंदर फोटो आहेत!
दिनेशदा
किती सुंदर फोटो आहेत! सदाफुली तर झकासच आहे.
माझ्याकडच्या सदाफुलीने इतके हातपाय पसरले होते की जवळजवळ सर्व कुंड्यात सदाफुली डवरली होती.
पण त्यामुळे २-३ गुलाबाची झाडे मेली. निष्ठूरपणे सर्व उपटावी लागली.सदाफुलीचे शेवटी काय तर Fittest for Survival झाले असेल!
रस्त्यावर कुत्रे पसरलेले
रस्त्यावर कुत्रे पसरलेले असतात ते माणसासारखेच ढिम्म पडुन राहतात, कितीही हॉर्न दिला तरी हलत नाहीत, अगदी जवळ गाडी नेली की आपल्याकडे तु.क. टाकुन मग उठुन जरासे बाजुला सरकतात.
<<
रात्री त्यांना माज येतो. टूव्हीलर वाल्यांच्या मागे लागून जीव घेतात. अत्यंत भीतीदायक प्रकार.
मनेका गांधीबाईंनी भूतदया दाखविल्यानंतर या भटक्यांना आवर घालण्यासाठी कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत व करतात. हे सगळे पैसे लोकल नगरपालिकांच्या नगरसेवकांनी बोगस नसबंद्या दाखवून खाल्लेत. जय मनेका
जागु पोळ्याचे व मानुषी ते
जागु पोळ्याचे व मानुषी ते सुंदर नाजुक कापसाचे फोटो अप्रतीम. लाजवाब.
जिप्स्या अरे
जिप्स्या अरे न्युज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज. वॉव. कॉन्गो.
इब्लिस तो बेसिल असणार.
इब्लिस तो बेसिल असणार. पानांचा वास घेऊन बघा. आणि पाने मुलायम लागायला हवीत.
सब्ज्याची पाने पण अशीच असतात, त्यांनाही छान वास येतो पण ती चामट असतात.
पुदीना खुडत राहीला पाहिजे म्हणजे मंजिर्या येणार नाहीत. पण बिया हव्या असतील तर मंजिर्या ठेवाव्या लागतील.
..
मोनालि, खुप दिवसांनी ? मजेत ना ?
कुत्र्यांसाठी, आसाम भागातल्या
कुत्र्यांसाठी, आसाम भागातल्या लोकांना बोलवायला हवे. त्या भागात सर्रास कुत्रे खातात. एवढेच नव्हे तर ते बाजारात ( त्यासाठी ) विकायलाही येतात. ( संदर्भ, पूर्वाचल. लेखक अविनाश बिनीवाले ) फिलिपीन्समधेही
कुत्रे खातात.
सर्वप्रथम जिप्सी तुझं हार्दिक
सर्वप्रथम जिप्सी तुझं हार्दिक अभिनंदन!! बाय द वे आम्हाला सा.पु. चे पेढे कधी मिळणार ते सांग आधी!!
दा, सदाफुली कसली मस्त फुललीय! कमाल आहे ना! पाणी, खत काही नाही, तरी फुलणं अगदी भरभरून!! आणि तुमची घरची बाग सुद्धा काय मस्त बहरतिये... सह्ही!!
या बागेची हौस होतीच. नव्या
या बागेची हौस होतीच. नव्या घरात छान ऐसपैस बाल्कनी आहे. माती मात्र विकत आणावी लागली.
पुदीना आणि बेसिल इथे मिळाले तेच खोचले. बाकी बिया भारतातून आणल्या होत्या ( वर्षभर तशाच पडून होत्या.)
ही गोविंदीची फुले ना ? पण हे झाड अगदीच लहान आहे. लहान म्हणजे केवळ २ फूट. कदाचित वाढेल आणखी.
आता जिप्सीला काही विचारले, तर
आता जिप्सीला काही विचारले, तर घरी विचारून सांगतो.. असे उत्तर मिळणार बहुतेक
पुदीना खुडत राहीला पाहिजे
पुदीना खुडत राहीला पाहिजे म्हणजे मंजिर्या येणार नाहीत.
<<
अहो एक काडी कुंडीत लावली तिचा भर उन्हाळ्यात इतका जंगलासारखा वाढलाय. याला खुडायचा म्हणजे खुडून भाजीवाल्याला विकावा लागेल.
एकदा अक्खा दीड मजली वाढलेला कढीलिंब तोडून विकलाय मी भाजीवाल्यांना ३०० रुपयांत तोडणार्याने ४०० रुपये मजूरी घेतलेली. आता परत अर्धा मजली उंच झालाय तोच
***
रच्यकने.
लिंबाचं (खाण्याचा. कडूनिंब नव्हे..) रोप लवकर मोठे व्हावे यासाठी काही युक्ती आहे का? माझा १२ वर्षे जुना लिंब जळाला. नवा २ वर्षांचा आहे पण अजून गुडघ्यालाही लागेना. अन हो. कुंडीत नाही, जमीनीत आहे.
आपल्याकडे पुदीन्याचा एवढा
आपल्याकडे पुदीन्याचा एवढा वापर होत नाही.
तूमच्याकडे "मथुरा का जलजिरा वाला" येतो का ? तो आनंदाने नेईल.
लिंबाजवळची माती जरा सैल करावी लागेल. मी भारतात असताना शेतकर्यांसाठी एक हॉट लाईन होती. तिथे
अशा प्रश्नांची हमखास उत्तरे मिळत. गरज वाटल्यास चित्रीकरणही दाखवत. मला वाटतं दक्षिणेकडचा एक चॅनेल होता तो.
इब्लिसांच्या पहिल्या फोटोतला
इब्लिसांच्या पहिल्या फोटोतला सबजा वाटतोय.
दिनेशदा, माझीही बेसिलची पाच रोपं आलेत पण फारच हळू वाढताहेत. चालेल चालेल. हळू का होईना, वाढून देत. भाजीचं अळू मात्र कुंडीत असूनही दर पंधरा दिवसांनी कापावं लागतं. आज कापलं की दुसर्या दिवसापासून रोज एकतरी नविन पान हजर!
कालच नामदेव उमाजी मधून भरपूर शेणखत आणलंय. पावसाची चाहूल लागतीये, सगळ्या कुंड्या एकदा उकरून शेणखत घालणार आहे. पामची मुळं अतिच वाढलीयेत. त्यामुळे कुंडीतली माती वरवर येतेय. आता हे लिहिताना लक्षात आलं त्याचा फोटो काढायला हवा. काढून इथे टाकेन. खूप मजेशीर दिसतंय.
नामदेव उमाजीमधून पालकाच्या आणि गवारीच्या बिया आणल्यात. तोंडल्याच्य बिया केव्हाची शोधतीये पण मिळतच नाहीयेत. काल त्या दुकानातल्या माणसानं मौलिक माहिती दिली की तोंडल्याच्या बिया नसतातच, तोंडल्याकरता वेलीचाच तुकडा लावावा लागतो. हे जरा नवलाचंच वाटलं. असतात की तोंडल्यात बिया. कारल्यासारख्या त्याही लागत असतील अशी माझी कल्पना.
कोणाला माहित आहे का याबद्दल? आणि तोंडल्याचे वेल कुठे मिळणार?
दा, ती गोविंदी नाहीये. पण
दा, ती गोविंदी नाहीये. पण त्याच कॅपॅरॅसी कुळातली काबा या नावाचं झुडुप सदृश वेल असं हे रोप आहे. मी पुस्तकात बघून त्याचं बोटॅनिकल नाव नंतर सांगू शकेन.
इथे पुण्यात सुद्धा नामदेव उमाजी यांचं दुकान आहे.
मामी, बर्याच वेली, ह्या त्यांची कडी लावली की; म्हणजे दाब कलमाने येतात. पण तोंडले पिकले की वाळवून (कडकडीत उन्हात) मग त्या बिया रुजवल्या तर लागतील असं वाटतंय. हा प्रयोग मी कधी केला नाहीये. पण शक्य झाला तर करून बघायला हरकत नाही. नाहीतर कडं करून लावणं हा उपाय आहेच.
पुदीना वाढायला लागला की खुपच
पुदीना वाढायला लागला की खुपच वाढतो, त्याला प्रखर उन मात्र चालत नाही, नाहीतर पान लहान होत जातात.
माझ्याकडे लिंबू आणि मोसंब्याची झाडंआल्येत कुंड्यांमधे. मोसंब्याची वाढ खुपच आहे सारख कापत रहावं लागतं. २,३ वर्ष झाल्येत. किती वर्षानी फळं येतात त्याला.
नुकताच अननस आला, पुर्ण झाडावर पिकु दिला त्यामुळे फारच गोड आणि मधूर चव होती त्याची. अगदी छोट्या कुंडीत लावला होता. मला वाटलं होतं एवढ्याश्या मातीत काही येणार नाही.
वा जो, अननस खूप मस्त दिस्तोय
वा जो, अननस खूप मस्त दिस्तोय ....... सर्व प्र चि ही अतिशय सुंदर ......
आकाश अजुनही निरभ्र आहे आभाळ
आकाश अजुनही निरभ्र आहे आभाळ कधी भरून येणार?
जो, केवढी मोठी कुंडी वापरलीत
जो, केवढी मोठी कुंडी वापरलीत अननसाकरता?
जिप्स्या, आभाळाचं सोड, जरा मनात डोकावून बघ... अगदी भरून आलं असेल
माधव जो, मस्त फोटो
माधव
जो, मस्त फोटो
जिप्स्या, आभाळाचं सोड, जरा
जिप्स्या, आभाळाचं सोड, जरा मनात डोकावून बघ... अगदी भरून आलं असेल >>>> अगदी अगदी ....
लवकरच जिप्सी सर्व "गुलाबी वनस्पती" असा धागा काढणार आहे -
"गुलाबी वनस्पती" >>>
"गुलाबी वनस्पती" >>>:हहगलो:
शशांकजी.... दिवाळीनंतर
शशांकजी....
दिवाळीनंतर बघा..., गुलाबी थंडी, गुलाबी फुलं...गुलाबी वनस्पती असं सगळं माबोच गुलाबी होउन जाईल.
गुलाबी वनस्पतींनंतर जिप्सीची
गुलाबी वनस्पतींनंतर जिप्सीची नवी थीम -
"हिरवा हिरवा ऋतू , हिरवा हिरवा ऋतू ...
अधिकच तो वाटे हिरवा" .....
सगळं माबोच गुलाबी होउन जाईल
सगळं माबोच गुलाबी होउन जाईल >> गुलाबोली
(No subject)
Pages