आयपीएल फिक्सिंग : पैशाची हाव कुठवर?

Submitted by नंदिनी on 16 May, 2013 - 23:18

स्पॉट फिक्सिंगच्या आरोपामधे श्रीशांत आणि अजून दोन खेळाडूंना अटक झाली आहे. यावरून काल वृत्तवाहिन्यांमधे कालपासून गरमागरम चर्चा चालू आहेत. आयपीएल बंदच करावे अशी एक टोकाची मागणीदेखील समोर येत आहे. फेसबूक, ट्विटरवर्देखील या चर्चा रंगात आलेल्या आहेत. (मग मायबोलीने का मागे रहावे?)

पण लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की: या खेळाडूंनी फिक्सिंग केले तरी नक्की कशासाठी? आयपीएल व त्यामधून मिळणार्‍या जाहिरातींमधून कितीतरी उत्पन्न खेळाडूंना राजरोस मिळत आहे. त्याखेरीज वर्षभर इतर टूर्नामेंट्स चालूच असतात. तरीदेखील अजून पैशाच्या लोभाने हे असे फिक्सिंग करावेसे का वाटले असेल? आपण जो खेळ खेळतो त्या खेळाची प्रतारणा, ज्या संघासाठी खेळतो त्याच्याशी प्रतारणा शिवाय कायद्याने गुन्हा ठरणारी गोष्ट जर कुणी करत असेल तर ते नेमके कशासाठी? नुसती पैशाची हाव की अजून काही?? बीसीसीआयच्या खेळाडूंना आता काऊन्सिलीन्ग द्यायची वेळ आली आहे का? बीसीसीआय, खेळाडू, संघ अशा सर्वांनीच आता याचा मुळापासून विचार करायला हवा.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, स्पॉट फिक्सिंग होते ते मुळात बूकीज आणि क्रिकेटवरून चालणार्‍या सट्ट्यामधे. या व्यवहारामधे बूकीज स्वतःचा फायदा करून घेताना जर खेळाडूला साठ लाख रूपये एका ओव्हरला लावायला तयार असतील तर मुळात किती जण क्रिकेटच्या सट्ट्यावर पैसे लावतात? तेदेखील किती करोडो रूपये? भारतामधे हा जुगार इतका का फोफावत चालला आहे? हीदेखील एक प्रकारे पैशाची हावच म्हणायला हवी ना. आपल्याला ईझी मनी मिळवायची इतकी हौस का असते? कायदाम नैतिकता, मूल्ये यामधे कुठेही न बसणारी अशी ही हौस माणसामधे निर्माण का होत असावी? अशा अनेक प्रश्नांचा इथे उहापोह व्हावा ही आशा.

कृपया, वैयक्तिक ताशेरे, टीकाटिप्पणी करू नका. आपली मते सभ्य भाषेत मांडा. धन्यवाद.

(अवांतर: त्या श्रीशांतला इन्डियन टीममधे स्वत:ची जागा फिक्स करता येत नाही. स्पॉट फिक्सिंग कसलं डोंबलाचं करतोय?)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्याच्या काळात इतकी भौतिक विषमता सर्वत्र दिसत असताना सामान्याना नैतिकतेचे धडे देणे म्हणजे आंधळ्यांच्या देशात चष्मे विकण्यासारखे आहे!

जर सुशिक्षिताना ( सुशिक्षित, शिकलेले नव्हे) प्रमाणिकपणा जमत नसेल तर बाकीच्यांकडे बघायला ही नको!

धाग्याच्या शिर्षकात पैशाची हाव आहे किवा असते हे मानल्यावर मग 'कुठवर' हा मुद्दा गौण आहे असे मला वाटते. मला अजुन हवे.... अजुन.... ह्या अजुनला काही अन्त नाही.

क्रिकेट मधे खुप पैसा आहे आणि बहुतेक मॅचेस ह्या फिक्स असतात (निकाल आधीच ठरलेले असतात). आता काहीना धोनीच्या नेतृत्वाखाली जिन्कलेला विश्वचषकही फिक्स वाटतो. त्याच विश्वचषकात चुकुन झेल घेतलेला चेन्डू यष्टीरक्षक अलगद जमीनीवर सोडतो हे सर्व you tube वर दिसल्यावरही "क्रिकेटचे सर्वच सामने" हे फिक्स नसतात असे म्हणणे भारतातला प्रत्येक माणुस भ्रष्टाचारी नसतो असे म्हणण्यासारखे आहे असे मला वाटते.

हे असे आजच घडले असे वाटत असल्यास आपल्या सारखे भोळे आपणच.... थोडे मागे डोकावल्यास... हेन्सी क्रोनी याने मॅच फिक्स मधे पुर्णपणे गुन्तल्याची कबुली दिली होती, त्याच काळात भारताचे अझरुद्दीन, जडेजा, प्रभाकर पण गुन्तले होते अशा बातम्या येत होत्या. तब्बल ६० दिवसानी CBI /IT ने अझरच्या बान्द्र्याच्या फ्लॅट मधे भर मध्यरात्री अचानक (? - असे वाटते) धाडी टाकल्या. अरे तुमच्या कडे दोन महिन्यापुर्वी अझर गुन्तल्याची खबर होती.... तर ६० दिवसानी त्याच्या कडे काय सापडणार होते?

दुसर्‍या दिवशी सर्व प्रमुख वृत्तपत्रात या धाडीचे मथळे... हे सर्व आम्ही कार्य करत आहोत हे दाखवण्यासाठी असण्याची शक्यता देखील असते.

सर्व क्रिकेटरसिकान्ना अगोदरच फिक्स झालेल्या मॅचेस बघण्यासाठी शुभेच्छा... तुमचा वेळ आहे, तुमचा दुरसन्च पण माझ्या मनापासुन शुभेच्छा. एखादी मॅच फिक्स होती हे नन्तर कळाले आणि त्यातुन नैराश्य/ वैफल्य आल्यास मायबोलीवर एक नवा धागा सुरु करणे. Happy

बीसीसीआयच्या खेळाडूंना आता काऊन्सिलीन्ग द्यायची वेळ आली आहे का? बीसीसीआय, खेळाडू, संघ अशा सर्वांनीच आता याचा मुळापासून विचार करायला हवा.
----- सल्ला (काऊन्सिलीन्ग) केवळ खेळाडुनाच का ? त्यापेक्षा खेळाडुना डोक्यावर घेणार्‍या रसिकाना सल्ला मिळणे जास्त आवश्यक आहे...

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षाच्या (श्रीनिवासन) घरापर्यत हा वणवा पोहोचलेला आहे. आभाळच फाटले आहे तर ठिगळ कुठे लावणार ?

http://www.indianexpress.com/news/police-summon-bcci-chiefs-soninlaw/111...

काळा बाजार होतोय तर तो थांबवण्यासाठी काय करावे अशा अर्थाचा कोणी धागा काढल्यास हे (इब्लिस) बहुधा 'तुम्ही माल खरेदी करू नका, मग किमती आपोआप कमी होतील' असे म्हणतील. बोलायला फार तडफदार असा हा मुद्दा वाटत असला, तरी जोपर्यंत लोकांचे संख्याशास्त्रीय दृष्ट्या लक्षणीय गट ते करत नाहीत तोपर्यंत तर काहीच होणार नाही. मायबोली हे काही एवढ्या मोठ्या स्तरावरचे व्यासपीठ नाही. बाकी जगात ज्यांना घ्यायचे ते घेणारच. हे माहीत नसेल तर तुम्ही फार naive आहात, किंवा माहीत असेल तर खोडसाळ आहात असे माझे मत. एखाद्या market मध्ये malpractices चालू असतील, तर regulations टाकण्याऐवजी लोकांनी व्यवहारच बंद करून त्या कमी होण्याची वाट पाहणे हा उपाय असू शकत नाही.

सर्व क्रिकेटरसिकान्ना अगोदरच फिक्स झालेल्या मॅचेस बघण्यासाठी शुभेच्छा... तुमचा वेळ आहे, तुमचा दुरसन्च पण माझ्या मनापासुन शुभेच्छा. >> धन्यवाद Happy
आमच्यासारख्यांच म्हणाल तर गल्लीत खेळणार्या पोरांच क्रिकेटही ऑफिसला जाताना थांबून बघणारे आम्ही . आमच प्रेम क्रिकेटवर आहे . अगदी तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळे सामने फिक्स असले तरी जोवर नारायण आणी स्टेन त्यांच्या गोलंदाजीची जादू दाखवतायत आणी गेल आणी हसी धावांची बरसात करतायत तोवर आम्हाला काय काळजी नाही Happy आणी जर सचिन आणी द्रविड फिक्सींग करत असतील तर मग या जगात विश्वास कुणावर ठेवायचा :). We cricket lovers know how much Importance to give to IPL , we follow yesterday's tied match between Pakistan and Ireland too .
त्यामुळे आमची काळजी नको .
ज्याना यात interest नाही त्यांच काय बिघडल त्याच्यावर तुम्ही निवांत चर्चा करा .

परवा "इंडीया टिव्ही" या न्युज चॅनल वर ४ माजी कर्णधारांचे स्टिंग ऑपरेशन चालु होते...

त्यात "जयवंत लेले" हे भारतीय क्रिकेट मधे एके काळी प्रसिध्द असणारे गृहस्थांनी कबुल केलेले की त्यांना श्रीलंका , न्युझीलंड भारत यांच्यात चालु असणार्या त्रिशुंखला सामन्यांमधे फिक्सिंग असल्याचा फोन आलेला... समोरच्या माणसाने सांगितलेले की अझरुद्दीन आणि जाडेजा ऐन वेळेला रनआउट होतील आणि भारत मॅच हारेल.. त्यावेळेला अंशुमन गायकवाड टिम मॅनेजर होते... लेले यांनी गायकवाड यांना फोन करुन कळवले तसे.. गायकवाड यांनी सचिन ला सांगितले..कि उद्या च्या सामन्यात असे होणार आहे.. त्यांच्या म्हणण्यानुसार सचिन ने सांगितलेले जो पर्यंत मी मैदानात उभा असेन तो असे काहीही होउ देणार नाही... मी सामना जिंकुनच देईन" प्रत्यक्ष सामन्या मधे तसेच झाले अझरुद्दीन आणि जाडेजा ऐन मौक्याला आउट झाले.... अझरुद्दीन रन आउट झाला ...जाडेजा कॅच आउट...
पण सचिन शेवट पर्यंत उभा राहुन मॅच जिंकुन दिली... असे या सिरीज मधे २ दा झाले दोन्ही वेळेला सचिन ला सांगण्यात आलेले आणि सचिन ने शेवट पर्यंत उभा राहुन मॅच जिंकुन दिली....
.
.
हा खुलासा स्टिंग ऑपरेशन मधे जयवंत लेले यांनी केलेला......

श्रीलंका , न्युझीलंड भारत यांच्यात चालु असणार्या त्रिशुंखला सामन्यांमधे फिक्सिंग असल्याचा फोन आलेला >>

तो व्हिडीओ पाहिल्यानंतर कुतुहलाने शोध घेतला असता दिसले, की अशी एकच मालिका होती. http://www.espncricinfo.com/ci/engine/series/61029.html

त्यात भारताचा न्युझीलंडशी कोठलाही सामना (पावसामुळे) पूर्ण होऊ शकलेला नाही. मुळात भारताने फायनल आणि सुरवात असे फक्त दोनच सामने जिंकले. त्यातल्या पहिल्या सामन्यात ते दोघेही नाबाद होते. फायनल मध्ये आपण पाठलाग करत नव्हतो, त्यामुळे शेवटपर्यंत उभे राहण्याचा प्रश्न नाही. सचिन त्यात बाद झालेला होता. त्या सामन्यात जाडेजाने १५ चेंडूंत २५ धावा केल्या. (शेवटच्या षटकांमध्ये.)

कदाचित मालिका सांगताना चुकली असेल, म्हणून भारत व न्युझीलंड आणि त्यानंतर भारत व श्रीलंका असे लागोपाठ सामने कधी झाले होते काय, ह्याचाही शोध घेऊन बघितला. अशी वेळ १४ मे आणि १७ मे १९९७ रोजी आली होती, परंतु त्या सामन्यांमध्ये अझरुद्दीन खेळत नव्हता.

मॅच फिक्सिंग खोटे आहे असे मी अजिबात म्हणत नाही, पण सनसनाटी claims सगळेच खरे हे शहानिशा केल्याशिवाय मानू नये. विशेषतः आजच्या प्रसारमाध्यमांकडून. (आणि जयवंत लेलेंकडून.)

मॅच फिक्सिंग खोटे आहे असे मी अजिबात म्हणत नाही, पण सनसनाटी claims सगळेच खरे हे शहानिशा केल्याशिवाय मानू नये. विशेषतः आजच्या प्रसारमाध्यमांकडून<<<< +१. मीडीयाकडून हल्ली प्रत्येक गोष्टीमधे उतावळेपणाच जास्त दिसून येतो. वास्तविक व्यवस्थित रीसर्च करून बातम्या लिहिणारे कितीतरी पत्रकार आहेत, पण मालकांना "सबसे पहले" "सबसे तेझ" अशी घाई लागलेली असते आणि मग काहीही हाफकूक्ड बातम्या आधी दाखवल्या जातात.

पण हे सचिनने कुठल्यातरी एका मॅचमधे अझरूद्दिनने हरण्याची सुपारी घेतल्यावर ती मॅच एकहाती फिरवली होती हे गॉसिप एका स्पोर्ट्स जर्नलिस्टकडून ऐकले होते. नक्की मॅच कुठली ते लक्षात नाही आता. त्यालाच विचारून बघेन. Proud

पण हे सचिनने कुठल्यातरी एका मॅचमधे अझरूद्दिनने हरण्याची सुपारी घेतल्यावर ती मॅच एकहाती फिरवली होती हे गॉसिप एका स्पोर्ट्स जर्नलिस्टकडून ऐकले होते. नक्की मॅच कुठली ते लक्षात नाही आता. त्यालाच विचारून बघेन. >>

हे मीही ऐकलेले आहे. त्यामुळे तर नक्की तीच मॅच आहे का हे बघण्याची उत्सुकता ही होती. तुम्हाला कळाले तर सांगा. Happy

"वाँटेड" चित्रपटात प्रकाशराज च्या तोंडी एक डायलॉग होता...." मै अदालत मे केह दुंगा के मेरे साथ अमिताब बच्चन है.. शाहरुख खान है.. इनको मे जानता हु... सबुत के तौर पर मेरे पास विडीओ भी है ..एक शादी मे मिला था ऐसे ही ... वो मुझे बिल्कुल नही जानते...पर ये सब साबित करने के लिये पुलिस को अदालत मे १० साल लगेंगे"
.
.>>>>>>> नेमके याच परिस्थितीचा आपल्या इथे जास्त फायदा होत आहे.......

बेटिंगचा पैसा जातोय दहशतवाद्यांकडे!
May 24, 2013, 10.36AM IST
रोहित चंदावरकर (इकॉनॉमिक टाइम्स) । मुंबई

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बडी-बडी धेंडं अडकत चालली असताना आणि भारतीय क्रिकेट आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम होत असतानाच, 'इंडियन पैसा लीग'वरील बेटिंगचा पैसा पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनांकडे जात असल्याची महाभयंकर माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी याच आठवड्यात कोर्टात सादर केलेल्या एका अर्जात हा खळबळजनक खुलासा केला आहे. या पत्राची प्रत 'इकॉनॉमिक टाइम्स'ला मिळाली आहे.

देश-विदेशातील हजारो व्यापारी आणि उद्योजक आयपीएल स्पर्धेदरम्यान हजारो कोटींचा सट्टा लावतात. त्यांचं भलंमोठं जाळं 'लँडलाइन'नं जोडलं गेलंय. बेकायदेशीर बेटिंगचा हा पैसा 'हवाला'च्या माध्यमातून दुबईला जातो आणि तिथून पाकिस्तानात पोहोचतो, याकडे मुंबई क्राइम ब्रँचनं कोर्टाचं लक्ष वेधलंय. इतकंच नव्हे तर, पाकमध्ये हा पैसा दहशतवादी संघटनांना पुरवला जात असावा, असा संशयही त्यांनी व्यक्त केलाय.

बेटिंगचा पैसा दुबईमार्गे पाकिस्तानात कसा जातो, हे आम्ही सिद्ध करू शकतो. आमच्याकडे ३० टेलिफोन नंबरची यादी आहे. हे नंबर पाकिस्तानातील असून त्यावरून आंतरराष्ट्रीय कॉल्स केले जातात. त्यापैकी बहुतांश नंबर दहशतवाद्यांचे किंवा दहशतवादी संघटनांचे असावेत, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे हे प्रकरण खणून काढण्यासाठी सखोल तपास करायची गरज आहे, असं मुंबई क्राइम ब्रँचचे प्रमुख तपास अधिकारी नंदकुमार गोपाळे यांनी मुंबई कोर्टात सादर केलेल्या एका अर्जात नमूद केलंय.

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अनेक बुकींना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असतानाच, बेटिंगचे हजारो कोटी रुपये कुठून कुठे आणि कसे पोहोचतात, हे 'प्रवासवर्णन' ऐकून पोलीसही थक्क झालेत. अशोक लखपत्रई आणि रमेश व्यास या बुकींकडून पोलिसांनी ९२ फोन जप्त केलेत. त्यापैकी अनेक फोनवरून फक्त पाकिस्तानात संपर्क केला जात होता. तसंच, १८ आंतरराष्ट्रीय सिमकार्डही पोलिसांना सापडली आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यास एका भल्यामोठ्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश होऊ शकतो, असं क्राइम ब्रँचला वाटतंय. >>>>>>>>>हि आजच्या मटा मधली बातमी---क्रिकेटवेड्यानो वाचा हि बातमी आपल्या मनोरंजनासाठी देशविघातक शक्तींचा फायदा नका करून देवू.

पिंटू , गल्ली चुकतेय Happy
बेटिंगचा पैसा जातोय दहशतवाद्यांकडे! देश-विदेशातील हजारो व्यापारी आणि उद्योजक आयपीएल स्पर्धेदरम्यान हजारो कोटींचा सट्टा लावतात>>
बेटींगचा पैसा जातोय . क्रिकेटवेड्यांचा नाही .
आता हे इल्लिगल बेटींग लावणारे अन करणारे क्रिकेट नाही खेळल गेल तर काय लगेच प्रामाणिक होणार आहेत का ?
फिक्सिंग वाईट आहे , त्याबद्द्ल बोला. पण क्लिन सामन्यावरही बेटींग होतेच की .
त्या व्यापार्याना पकडा जे पाकिस्तानात पैसा जात आहे हे माहीत असताना सट्टा लावतात .

फुकटचे पुळके आलेल्यांनो...
तुम्ही जे गाणी डाऊनलोड करतात त्या पैसा अतिरेक्यांना जातो...
तुम्ही जे चांगले वाईट व्हिडीओ पाहतात त्याचा पैसा जातो..
कर चुकवेगिरी कमी करा..लाच खाणे बंद करा..
हे स्वत: करा आधी... मग शिकवा दूसर्यांना......

गायकवाड यांनी सचिन ला सांगितले..कि उद्या च्या सामन्यात असे होणार आहे.. त्यांच्या म्हणण्यानुसार सचिन ने सांगितलेले जो पर्यंत मी मैदानात उभा असेन तो असे काहीही होउ देणार नाही... मी सामना जिंकुनच देईन" प्रत्यक्ष सामन्या मधे तसेच झाले अझरुद्दीन आणि जाडेजा ऐन मौक्याला आउट झाले.... अझरुद्दीन रन आउट झाला ...जाडेजा कॅच आउट...
पण सचिन शेवट पर्यंत उभा राहुन मॅच जिंकुन दिली...>>>>>मॅच जिंकून दिल्याबद्दल सचिनचे अभिनंदन.परंतु संघात असे प्रकार चालू आहेत हे माहिती असूनही गायकवाड आणि सचिन ने त्याची माहिती बीसीसीआय किवा पोलिसांना का नाही दिली.याचा अर्थ ते दोघेही तेव्हडेच दोषी आहेत.

त हे माहिती असूनही गायकवाड आणि सचिन ने त्याची माहिती बीसीसीआय किवा पोलिसांना का नाही दिली >>>>> तुम्हाला मिळाली ना माहीती... जा तुम्ही करुन दाखवा कंप्लेंट ....

प्रश्न तुम्ही विचारला आहे की मी ?

तुम्हाला जर वाटते की द्यायला हवी होती तर तुम्ही द्या ना.....पुळका आला तर जरा पुर्णपणे आणा ना.. उगाच दुसर्यांना कशाला सांगतात ?

.
.
राहिली गोष्ट माझी... मला नाही करायची होती Happy मी नाही केली ....

सचिनला क्रिकेटचा देव म्हणतात. दर मुलाखतीत सांगत असतो क्रिकेटवर माझे प्रेम आहे. मग संघामध्ये असे प्रकार चालू आहेत हे आधीच ठावूक असूनही तों गप्प कसा बसला.तुम्हाला कौतुक कुठले कि सारे माहित असूनही त्याने विजय कसा मिळवून दिला त्याचे. त्यापेक्षा त्याने ह्या अनागोंदी विरुद्ध आधीच आवाज उठवला असता तर भारतीय क्रिकेटला असे लाजिरवाणे दिवस आले नसते.

सगळं इतकं सोपं नसतं हो. त्याने आधीच आवाज उठवला असता तर (१) प्रकरण आधीच झाकलं गेलं असतं (२) सचिनला खोटं पाडलं गेलं असतं अशी अनेक कारणे असू शकतात.

तो स्वतः प्रामाणिक राहिला, त्याने योग्य वेळ येण्याची वाट पाहिली आणि योग्य वेळ येताच सीबीआयकडे त्याच्याकडे जी माहिती होती ती दिली. तोंड दिलंय म्हणून वाट्टेल तिथे उघडायला तो काय अमुकतमुकविचारांचानम्रपाईक आहे? Wink Light 1 Biggrin

अरे पन तुम्ही सच्चे भारतीय ना...तुम्हाला कोणी रोखले आवाज उठवायला...टॅक्स भरतात ना .. एक इन्कम टॅक्स भरलेली पावती घेउन पोलीस स्टेशनात जावा.. आणि एफआयआर अथवा कोर्टात १ रुपया भरुन पीआयएल करा..
.
इथली तिथली कारण देण्यापेक्षा कृती करुन दाखवा.. Biggrin

<< क्रिकेटवेड्यानो वाचा हि बातमी आपल्या मनोरंजनासाठी देशविघातक शक्तींचा फायदा नका करून देवू.>> कोणत्याही पोलीस अधिकार्‍याने, तपास यंत्रणेने, न्यायाधिशाने किंवा या विषयातील तज्ञाने [या धाग्यावरचे सोडून] प्रेक्षक स्टेडियमवर जावून किंवा घरीं टीव्हीवर सामने बघतात म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात बेटींग व फिक्सींग बोकाळलंय, असं म्हटलेलं माझ्या तरी वाचनात आलेलं नाही. बेटींग करणारे व बुकीज कशावरही बेटींग करतात/घेतात - पाऊस किती, कधीं,कुठे होणार, निवडणूकीचे निकाल, फुटबॉल विश्वचषक इ.इ. कशावरही. सध्यां क्रिकेट जोरात आहे म्हणून क्रिकेटवर !

बेटींग करणारे व बुकीज कशावरही बेटींग करतात/घेतात - पाऊस किती, कधीं,कुठे होणार, निवडणूकीचे निकाल, फुटबॉल विश्वचषक इ.इ. कशावरही.<<< क्रिकेटपेक्षाही जबरदस्त बेटिंग राष्ट्रीय निवडणुकांच्या वेळेला चालू असतं म्हणून आता निवडणुका बॅन करायच्या की काय? क्रिकेट पाहणे/क्रिकेट खेळणे आणि बेटिंग करणे व त्या बेटिंगसाठी फिक्सिंग करणे या पूर्ण वेगळ्या भिन्न गोष्टी आहेत. आधी प्रकरण काय आहे ते तरी समजून घ्या.

मॅच जिंकून दिल्याबद्दल सचिनचे अभिनंदन.परंतु संघात असे प्रकार चालू आहेत हे माहिती असूनही गायकवाड आणि सचिन ने त्याची माहिती बीसीसीआय किवा पोलिसांना का नाही दिली.याचा अर्थ ते दोघेही तेव्हडेच दोषी आहेत.>>>> त्यापेक्षा त्याने ह्या अनागोंदी विरुद्ध आधीच आवाज उठवला असता तर भारतीय क्रिकेटला असे लाजिरवाणे दिवस आले नसते.>>>>>

माहिती दिलीच नाही हा निष्कर्ष कशावरून? कदाचित दिलीदेखील असेल. अझर आणी जडेजा नंतर पकडले गेलेच ना? सचिन अथवा गायकवाड म्हणजे मूर्ख नव्हेत की आम्ही ही माहिती दिली म्हणून मीडीयासमोर सांगायला.

बेटींग करणारे व बुकीज कशावरही बेटींग करतात/घेतात - पाऊस किती, कधीं,कुठे होणार, निवडणूकीचे निकाल, फुटबॉल विश्वचषक इ.इ. कशावरही.
------ श्रीशान्त आणि कम्पनी ला अटक झालेलीच आहे, त्याला शिक्षा होणार अथवा नाही यावरही आता बेटिन्ग लावले जाणार (लावले गेले असेल).

हे पिंटू महाशय म्हणजे पूर्वाश्रमीचे गणू तर नव्हेत ना...???
जरा तुमचे माहेरचे नाव सांगणार का???

आणी जर सचिन आणी द्रविड फिक्सींग करत असतील तर मग या जगात विश्वास कुणावर ठेवायचा स्मित.
----- तुमचा तसेच अनेकान्चा या खेळाडूवर विश्वास आहे तो तसाच रहावा...
पण विश्वासाच्या बाबतीत हॅन्सी कोनी हे नाणे देखिल खुप वजनदार होते. त्याचे नाव यात गुन्तले होते ह्यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता.... दिल्लीच्या पोलिसानकडे त्याच्या स.न्भाषणाचे फोन रेकॉर्डस होती आणि सज्जड पुरावे होते (दिल्ली पोलिसाना सुरवातीला कुणिच सपोर्ट केला नव्हता).

काही दिवसानी त्यानेच हे सर्व आरोप मान्य केले. अचानक २००२ मधे हॅन्सीचा विमान अपघातात मृत्यु झाला, त्याच्या काळात प्रशिक्षक म्हणून गाजलेल्या बॉब वूल्मर (ते पुढे पाकिस्तान संघाचेही प्रशिक्षक होते) ह्यान्ची २००७ मधे हत्या झाली.

क्रोनी - वूल्मर ह्यान्ची जोडी खुप प्रसिद्ध होती... आणि दोघाच्याही जाण्यात कमालीचे स.न्शयाचे वातावरण आहे... आता प्रच.न्ड प्रमाणात (हजारो कोटी) पैसा आहे म्हणुन खेळाडूला सुरवातीला आमिष नन्तर दबाव, धाक वगैरे असा प्रकार होत असेल का ? एकवेळा यात ओढला गेल्यावर बाहेर पडता येत नाही अशी व्यावस्था निर्माण केली जाते.... असे काही होत असेल का ?

पोलिसात कमीशनर दर्जाच्या अधिकार्‍यावर काय प्रकारचा दबाव असू शकतो हे मी द्रोहकाल (?) या चित्रपटात बघितले आहे.

अर्थात हे सर्व माहित असुनही सामने आवडीने बघणार्‍या क्रिकेट रसिकान्चे कौतुक वाटते आणि ते सर्व सच्चे रसिक अभिनंदनास पात्र आहेत असे माझे प्रामाणिक Happy मत आहे.

उदय,

>> क्रोनी - वूल्मर ह्यान्ची जोडी खुप प्रसिद्ध होती... आणि दोघाच्याही जाण्यात कमालीचे स.न्शयाचे
>> वातावरण आहे...

ही जोडी प्रसिद्ध होती हे नवीन आहे. या माहितीबद्दल धन्यवाद! वूल्मर गेला तेव्हा मला आठवतंय की विषबाधेचा संशय असल्याच्या बातम्या प्रसृत झाल्या होत्या. मात्र नक्की निष्कर्ष निघालेला नाही.

कहर म्हणजे वूल्मर ज्या हॉटेलात उतरला होता त्याच हॉटेलात आजून एक पत्रकार मृतावस्थेत सापडला. त्याच्या मृत्यूचं कारणही विषबाधा हेच असावं असं वाचण्यात आलं होतं. या दुसर्‍या मृत्यूचा आंतरजालावर काहीच छडा लागत नाहीये. मला त्याचं नाव आठवत नाहीये. बहुधा इंग्लिश/युरोपीय धाटणीचं होतं.

कुठेतरी पाणी मुरतंय खास!

आ.न.,
-गा.पै.

ही जोडी प्रसिद्ध होती हे नवीन आहे.
----- दोघेही त्यान्च्या क्षेत्रात अत्यन्त कर्तुत्ववान होते.

वूल्मर गेला तेव्हा मला आठवतंय की विषबाधेचा संशय असल्याच्या बातम्या प्रसृत झाल्या होत्या. मात्र नक्की निष्कर्ष निघालेला नाही.
------ वूल्मर ह्याचा मृत्यु अनैसर्गिक रितीने घडवण्यत आला (सुरवातीला विषबाधा, नन्तर heart attack, आणि गुदमरुन मारले असे नतर प्रसिद्ध झाले होते). जमैकन पोलिसान्नी खुन म्हणुनच नोन्द घेतली आहे, अधिक माहिती येथे आहे,

http://en.wikipedia.org/wiki/Bob_Woolmer

Pages