आयपीएल फिक्सिंग : पैशाची हाव कुठवर?

Submitted by नंदिनी on 16 May, 2013 - 23:18

स्पॉट फिक्सिंगच्या आरोपामधे श्रीशांत आणि अजून दोन खेळाडूंना अटक झाली आहे. यावरून काल वृत्तवाहिन्यांमधे कालपासून गरमागरम चर्चा चालू आहेत. आयपीएल बंदच करावे अशी एक टोकाची मागणीदेखील समोर येत आहे. फेसबूक, ट्विटरवर्देखील या चर्चा रंगात आलेल्या आहेत. (मग मायबोलीने का मागे रहावे?)

पण लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की: या खेळाडूंनी फिक्सिंग केले तरी नक्की कशासाठी? आयपीएल व त्यामधून मिळणार्‍या जाहिरातींमधून कितीतरी उत्पन्न खेळाडूंना राजरोस मिळत आहे. त्याखेरीज वर्षभर इतर टूर्नामेंट्स चालूच असतात. तरीदेखील अजून पैशाच्या लोभाने हे असे फिक्सिंग करावेसे का वाटले असेल? आपण जो खेळ खेळतो त्या खेळाची प्रतारणा, ज्या संघासाठी खेळतो त्याच्याशी प्रतारणा शिवाय कायद्याने गुन्हा ठरणारी गोष्ट जर कुणी करत असेल तर ते नेमके कशासाठी? नुसती पैशाची हाव की अजून काही?? बीसीसीआयच्या खेळाडूंना आता काऊन्सिलीन्ग द्यायची वेळ आली आहे का? बीसीसीआय, खेळाडू, संघ अशा सर्वांनीच आता याचा मुळापासून विचार करायला हवा.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, स्पॉट फिक्सिंग होते ते मुळात बूकीज आणि क्रिकेटवरून चालणार्‍या सट्ट्यामधे. या व्यवहारामधे बूकीज स्वतःचा फायदा करून घेताना जर खेळाडूला साठ लाख रूपये एका ओव्हरला लावायला तयार असतील तर मुळात किती जण क्रिकेटच्या सट्ट्यावर पैसे लावतात? तेदेखील किती करोडो रूपये? भारतामधे हा जुगार इतका का फोफावत चालला आहे? हीदेखील एक प्रकारे पैशाची हावच म्हणायला हवी ना. आपल्याला ईझी मनी मिळवायची इतकी हौस का असते? कायदाम नैतिकता, मूल्ये यामधे कुठेही न बसणारी अशी ही हौस माणसामधे निर्माण का होत असावी? अशा अनेक प्रश्नांचा इथे उहापोह व्हावा ही आशा.

कृपया, वैयक्तिक ताशेरे, टीकाटिप्पणी करू नका. आपली मते सभ्य भाषेत मांडा. धन्यवाद.

(अवांतर: त्या श्रीशांतला इन्डियन टीममधे स्वत:ची जागा फिक्स करता येत नाही. स्पॉट फिक्सिंग कसलं डोंबलाचं करतोय?)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण क्रिकेटचं अहित होवूं नये याबाबत आपल्या दोघांच्या भावना तितक्याच तीव्र आहेत व यावर आपलं एकमत आहे , हें सर्वात महत्वाचं.
>>>
हो हे खरेय, अजून पन्नास वर्षांनी जेव्हा एकांतात बोअर आयुष्य जगत असेल तेव्हा वेळ घालवायला मायबोली आणि क्रिकेट या दोनच गोष्टी तर असणार... त्याचे अहित मी कसे बघेन Happy

*माउयबोली आणि क्रिकेट या दोनच गोष्टी तर असणार... *
You said it ! वय व कोरोनामुळे मीं आत्तांच त्या अवस्थेत असल्याने आणखी एक टीप देवून ठेवतो - एखादा तरी छंदही , पाककला कां असेना, जपून, हातचा राखून ठेवा. खूपच उपयोगीं येतो ! Wink

किती दिवस ऑफिसमधल्या तुमच्या निरोपसमारंभाचा तो व्हिडिओच बघत बसणार अहात ! तरी सांगत होतें, भांडी विसळणे, लादी पुसणे असे कांहीं छंद जोपासा !!
20200429_150538.jpg

दिवसांनंतर तुच क्रिकेट शोधून काढलेस नि गोर्‍यांना शिकवलेस एकोणिसाव्या शतकात असे लिहिलेस तरी मला आश्चर्य वाटणार नाही रे बाबा.>>>> एकदा शाळेत असताना क्रिकेटचा विषय निघाला होता तेव्हा आमच्या गणिताच्या सरांनी क्रिकेट हा ब्रिटिश खेळ नसून भारतीय खेळ आहे असा मुद्दा मांडला. श्रीकृष्ण कालिया वध करण्याआधी यमुनेच्या काठावर चेंडू फळी खेळत होता असा संदर्भ त्यांनी दिला होता.

खेळाडुंचं कमवायचे आयुष्य कमी असतं. प्रतिस्पर्धी टीममध्येच आणि बाहेर टपून बसलेले असतात. नैतर काही सिनेमा नाटक कलाकारांना शेवटी आसरा मागत फिरावं लागतं तसं होऊ नये म्हणून खटपट असते.

ज्या वयात क्रिकेट खेळलो त्या वयात भरपूर क्रिकेट एंजॉय केलं. इतर खेळात कदाचित जास्त प्राविण्य मिळवलं असेल पण क्रिकेटच्या चर्चा जास्त व्हायच्या. त्या काळात क्रिकेटला एव्हढी प्राथमिकता दिल्यास इतर खेळांकडे मुलं कशी आकर्षित होतील हे जाणत्यांचं म्हणणं पटायचं.

वन वे संवाद असायचा. टीव्ही किंवा वर्तमानपत्रातून इतर खेळांच्या विकासासाठी चर्चा व्हायच्या, मतं मांडली जायची. पण त्यांना लगेच काउंटर करणारे सोशल मीडीयातले ट्रोल्स तेव्हां नसायचे. तसेच इतर खेळांच्या विकासासाठी बोलले म्हणजे तुम्ही क्रिकेट विरोधी, अमका खेळाडू विरोधी, तमक्याचा द्वेष करता अशी लेबलं लावली जात नसत. खेळाडूंकडे पैसे येऊच नयेत का असा असंबद्ध प्रश्न विचारला जात नसे. भारताची एव्हढी प्रचंड लोकसंख्या आणि अकराच खेळाडू असताना सर्वांनी एकाच खेळाबद्दल बोलावे हे चुकीचेच आहे एव्हढाच त्याचा अर्थ काढला जात असे.

आज इतर अनेक खेळात खेळाडू सहभागही घेतात आणि पदकेही मिळवतात याचे श्रेय त्या वेळच्या लोकप्रिय गोष्टींना विरोध करत ठाम मते मांडणार्यांना दिलेच पाहीजे. आनंद कोणत्याही खेळात मिळतो. स्वतः खेळण्यात जास्त मिळतो.

कपिलदेव, गावसकर निवृत्त होताना सचिन आला. सुरूवातीच्या सचिनचा खेळ एंजॉय केला. त्यानंतर कुठेतरी खेळात येत गेलेला प्रचंड पैसा, त्याचे झालेले व्यावसायिकीकरण, सोशल मीडीयात हायर केलेल्या कंपन्या, हायर केलेला मीडीया, जाहीरातींसाठी नेमलेले एजंटस यावर सुद्धा अनेकदा माध्यमात येत गेले. ते ही बंद झाले. फिक्सिंग होते कि नाही याची कल्पना नाही. पण दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने बुकीशी संबंध असल्याची कबुली दिली होती. यावरून काय समजायचे ते समजून घेतले. त्याने स्वतःची करीअर संपवून घेतली, पोलिसांचा सासेमिरा मागे लागला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. आपलेही अनेक खेळाडू पकडले जायचे, बुकी नावं घेत पण कुणीच कबुली द्दिली नाही. यावरूना दक्षिण आफ्रिकेच्या माध्यमांनी भारतात प्रामाणिकपणा नाही असा सूर लावला होता.

यातून क्रिकेटमधला इंटरेस्ट संपला. आयपीएल मधे तर कोणत्या टीम आहेत, कोणते खेळाडू आहेत हे काहीही ठाऊक नसते. स्वतः खेळणे बंद झाल्याने असेल, तसेच टीव्ही मधला इंटरेस्टही संपला असल्याने बातम्या बघणेही बंद झाले. रविवारी फिटनेसपुरतं टेनिस किंवा बॅडमिंटन हॉल उघडा असल्यास ते, इतकाच संबंध उरला आहे. त्यातही सगळे जमले नाही तर रद्द होण्याचे प्रमाण ५०% असते. चर्चा करण्यातला इंटरेस्ट सुद्धा केव्हांच मावळला. त्याने काही बिघडलेले नाही.

माझ्या वेळची जी मित्रमंडळी आजही क्रिकेटची अद्ययावत माहिती ठेवून असते तिचे कौतुक वाटते. यातल्या काहींची मुलं इतर खेळात चमकली आहेत. त्याचंही खूप कौतुक आहे. ज्याला जिथून आनंद मिळतो तिथून घ्यावा. आपल्या विरोधाने गैरप्रकार बंद होत नाहीत. उलट आता इतका पैसा आलेला आहे कि विरोध मोडून काढण्याची पक्की व्यवस्था झालेली असणार. काहींचा हा पोट भरण्याचा पूर्ण वेळ व्यवसाय आहे. कुणाची मतं किती बरोबर याला अर्थ उरलेला नाही. इग्नोर करणे सुद्धा महत्वाचे असते.

आपल्या विरोधाने गैरप्रकार बंद होत नाहीत.
>>>

काही अंशी सहमत आहे.
पण या कारणास्तव विरोध करणे एकवेळ सोडले तरी आता हे असेच असणार म्हणून स्विकारू नये असे वाटते. निदान क्रिकेटप्रेमींनी तरी नाही...

असे नुसते इथे तिथे लिहून विरोध करण्यात काही अर्थ नाही.
हिंमत नि इच्छा असेल तर क्रिकेट सामने बघायला भाराभर पैसे देऊन वेळ वाया घालवायचे थांबवा.
आता लोकसंख्या एव्हढी प्रचंड की त्यात असेहि महाभाग असतात, जे क्रिकेट, सिनेमा इ. गोष्टींवर करोडॉ रुपये उधळतील. नि हे असेच चालू राहील.

Pages