स्पॉट फिक्सिंगच्या आरोपामधे श्रीशांत आणि अजून दोन खेळाडूंना अटक झाली आहे. यावरून काल वृत्तवाहिन्यांमधे कालपासून गरमागरम चर्चा चालू आहेत. आयपीएल बंदच करावे अशी एक टोकाची मागणीदेखील समोर येत आहे. फेसबूक, ट्विटरवर्देखील या चर्चा रंगात आलेल्या आहेत. (मग मायबोलीने का मागे रहावे?)
पण लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की: या खेळाडूंनी फिक्सिंग केले तरी नक्की कशासाठी? आयपीएल व त्यामधून मिळणार्या जाहिरातींमधून कितीतरी उत्पन्न खेळाडूंना राजरोस मिळत आहे. त्याखेरीज वर्षभर इतर टूर्नामेंट्स चालूच असतात. तरीदेखील अजून पैशाच्या लोभाने हे असे फिक्सिंग करावेसे का वाटले असेल? आपण जो खेळ खेळतो त्या खेळाची प्रतारणा, ज्या संघासाठी खेळतो त्याच्याशी प्रतारणा शिवाय कायद्याने गुन्हा ठरणारी गोष्ट जर कुणी करत असेल तर ते नेमके कशासाठी? नुसती पैशाची हाव की अजून काही?? बीसीसीआयच्या खेळाडूंना आता काऊन्सिलीन्ग द्यायची वेळ आली आहे का? बीसीसीआय, खेळाडू, संघ अशा सर्वांनीच आता याचा मुळापासून विचार करायला हवा.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, स्पॉट फिक्सिंग होते ते मुळात बूकीज आणि क्रिकेटवरून चालणार्या सट्ट्यामधे. या व्यवहारामधे बूकीज स्वतःचा फायदा करून घेताना जर खेळाडूला साठ लाख रूपये एका ओव्हरला लावायला तयार असतील तर मुळात किती जण क्रिकेटच्या सट्ट्यावर पैसे लावतात? तेदेखील किती करोडो रूपये? भारतामधे हा जुगार इतका का फोफावत चालला आहे? हीदेखील एक प्रकारे पैशाची हावच म्हणायला हवी ना. आपल्याला ईझी मनी मिळवायची इतकी हौस का असते? कायदाम नैतिकता, मूल्ये यामधे कुठेही न बसणारी अशी ही हौस माणसामधे निर्माण का होत असावी? अशा अनेक प्रश्नांचा इथे उहापोह व्हावा ही आशा.
कृपया, वैयक्तिक ताशेरे, टीकाटिप्पणी करू नका. आपली मते सभ्य भाषेत मांडा. धन्यवाद.
(अवांतर: त्या श्रीशांतला इन्डियन टीममधे स्वत:ची जागा फिक्स करता येत नाही. स्पॉट फिक्सिंग कसलं डोंबलाचं करतोय?)
someone just shared on fb..
someone just shared on fb.. when all the arrests done by Mumbai and Delhi police.. there will be tournament between 2 teams only.. Arthur Road Indians vs Tihar Daredevils..
<< भराभर बुकीज, कुकीज, व
<< भराभर बुकीज, कुकीज, व खेळाडू, अधिकारी ई. ना पोलिस 'ऊचलत' आहेत हे पाहून एका अर्थाने बरे वाटले. >> पूर्वीच्या आयपीएलच्या अनेक सत्रात बुकींवर धाडी , ' उचलणं' झालंय. पण खरंच त्यापैकीं कुणाला शिक्षा झालीय का, निदान तशी व्हावी म्हणून पद्धतशीर प्रयत्न झाला का, याचा मात्र मिडीयाने पाठपुरावा केलेला दिसत नाही. निदान माझ्या तरी वाचनात /पहाण्यात तसं आलेलं नाही. तात्पुरती त्याला खूप प्रसिद्धी दिली जाते एवढंच ! मोदी प्रकरण इतकं गाजलं ,काय झालं त्याचं शेवटीं ? कीं हाही एक प्रकारच्या मोठ्या फिक्सींगचाच भाग असतो, देवच जाणे !
<< पण तुम्हाला आयपील बद्दल का एवढा राग आहे? >> इथल्या चर्चेत प्रकर्षाने जाणवतं तें हेच कीं बेटींग, फिक्सींग, भ्रष्टाचार, बेलगाम हांव याबद्दलच्या घृणेपेक्षां फक्त क्रिकेट पहाणार्यांवर आसूड ओढण्याचा आसूरी आनंदच इथं ओसंडून वाहतोय - बेटींग, फिक्सींग इत्यादीचा क्रिकेट पहाण्याशीं सुतराम संबंध नसतानाही !!
CSK च्या सो कॉल्ड ओनरचा पूर्ण
CSK च्या सो कॉल्ड ओनरचा पूर्ण मॅच फिक्स करण्यात देखील हात आहे असे TOI आणि मुंबई पोलीस म्हणते म्हणजेच CSK चे अनेक विजय नक्की विजय आहेत का? देखील आता रडार खाली आले आहे.
माझ्यामते
१. श्रीनिवासन ह्यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा टीम ओनर म्हणून आणि चेअरमन म्हणून त्यांना अनेक घटना आधीच कळू शकतील व ते तसे प्रतिबंधक उपाय योजू शकतील. तसेही तो जावई दोन दिवस आलाच नाही म्हणजेच बरीच सारवासारव झालेली दिसते.
श्रीनिवासने २०११ मध्येच रैना, अॅबि मॉर्केल ह्यांना त्याच टीम मध्ये ठेवण्यासाठी रुल्सला धाब्यावर बसविले हे ही पुढे आले आहे. सबब श्रीनिवासनची गच्छंती अटळ ठरावी. (कालच्या डीनर मध्ये काय ठरले ते आज दुपार पर्यंत पुढे येईलच म्हणा)
२. टीम ओनरच गुंतल्यामुळे आजच्या मॅचला माझ्या मते काही अर्थ उरत नाही.
३. CSK ही टीम आता उरू नये ती खारीज केली जावी.. ज्या टीमचा ओनरच असे करतो ती कुठलीही टीम (कितीही चांगली असली तरी) टीम म्हणवून घेण्याच्या लायकीची नाही.
ही विशलिस्ट )
बेटींग, फिक्सींग इत्यादीचा
बेटींग, फिक्सींग इत्यादीचा क्रिकेट पहाण्याशीं सुतराम संबंध नसतानाही !!
----- क्रिकेटचे सामने पहाण्यार्याची सन्ख्या जास्त त्या प्रमाणात तसा बेटींग मधे ओतला जाणारा पैसा जास्त.
उद्या विटू दान्डू अथवा कबड्डी हे खेळ कमालीचे लोकप्रिय झाले तर तेथेही शरद पवार, दालमिया प्रभुती उगवतील आणि तेथेही बेटींग, फिक्सींग प्रकार सुरु होतील.... येथे क्रिकेट हे केवळ एक निमीत्त आहे, क्रिकेटचा संबंध बेटींग, फिक्सींगशी नक्कीच नाही पण क्रिकेट कमालीचे लोकप्रिय असण्याचा संबंध नक्कीच आहे.
CSK ही टीम आता उरू नये ती
CSK ही टीम आता उरू नये ती खारीज केली जावी.. ज्या टीमचा ओनरच असे करतो ती कुठलीही टीम (कितीही चांगली असली तरी) टीम म्हणवून घेण्याच्या लायकीची नाही.>>> केदार ते आयपीएल च्या नियमातच आहे, म्हणूनच त्याची "ओनर" म्हणून प्रोफाईल घाईघाईत बदलून टाकली होती काल.
त्या आरपीसिंगने चांगला फूटभर नोबॉल टाकला होता तेव्हाही शंका आली होती
केदार तुमच्या अपेक्षा अगदी
केदार तुमच्या अपेक्षा अगदी रास्त आहेत... पण जे आपल्याला मिडीआच्या नजरेने जे दाखवले जाते ते केवळ वर-वरचे आहे. या बातम्या आताच का आल्यात? हजारो कोटीन्चे व्यावहार अनेक वर्षे बिन्बोभाट सुरु आहेत...
कुठेतरी पैशाची देवाण घेवाण करण्यात गणिते चुकली, कुणाला तरी अपेक्षीत % मिळाला नाही... आणि प्रकरण बाहेर आले असावे (असा अन्दाज).
माझा प्रतिसाद डिलीट मारला.
माझा प्रतिसाद डिलीट मारला. आयपील बघणारे गाढव अहेत हा मुद्दा आता सिद्ध झाला आहे त्यामुळे तो लिहिवा लागेलच!
शिवाय तुम्हाला गाढवांसमोर गीता वाचायला कोणि सांगितली आहे का? वाचायची/गायचीच असेल तर आयपीएल न बघण्यार्या शहाण्यांसमोर वाचा.>>>> तुम्हा मुद्दा समजतच नाहि राव! गीता ज्याला समजते त्याच्यासमोर वाचुन काय उपयोग आहे ? गाढवासमोरच वाचावी लागते या आशेने की काहितरी शिकेल.
<<क्रिकेटचे सामने
<<क्रिकेटचे सामने पहाण्यार्याची सन्ख्या जास्त त्या प्रमाणात तसा बेटींग मधे ओतला जाणारा पैसा जास्त.>> ह्या समीकरणाला काय आधार आहे ? अनिश्चिततेला वाव असलेल्या ज्या घटनेबद्दल [ उदा. कोणताही लोकप्रिय खेळ, निवडणूका, इ.इ.]जेवढ्या प्रमाणात सर्वत्र माहिती सहज उपलब्ध असते त्या प्रमाणात बेटींगच्या जाळ्याचा आवाका वाढतो, हे समजण्यासारखं आहे. पण पहाणार्यांच्या संख्येचा व बेटींग वाढण्याचा संबंध कसा लावतां येईल ?
माणुस, कृपया विषयाशी संबंधित
माणुस, कृपया विषयाशी संबंधित प्रतिसाद लिहा ही पुन्हा एकवार विनंती. धन्यवाद.
पण पहाणार्यांच्या संख्येचा व बेटींग वाढण्याचा संबंध कसा लावतां येईल ?<<<<
या धाग्यावरच नव्हे, तर इतरत्रही मुळात कित्येक लोकांना बेटिंग म्हणजे काय आणि फिक्सिंग म्हणजे काय हेच समजत नाहीये असं जाणवतंय. जेवढं मला माहित आहे तेवढं इथे लिहिते. इतर जाणकारांनी त्यात भर घालावी ही विनंती.
क्रिकेटच्या बेटिंगमधे लोकप्रियता हा एकच निकष नक्कीच नाहीये. कारण, पावसाचा अंदाज, निवडणुका, फूटबॉल वर्ल्ड कप या सर्वांवर बेटिंग निर्धास्तपणे चालू असते. मुळात, बेटिंग म्हणजे जुगार आणि जुगार तिथेच खेळला जातो जिथे अनिश्चिततेचे चान्सेस जात. हे स्टॅटिस्टिक्स वाले लोक जास्त योग्य रीत्या सांगू शकतील. आता जेव्हा हा जुगार खेळला जातो तेव्हा जास्तीत जास्त पैशाच्या मोहामधे पडूनच खेळला जातो. इतर कुठल्याही जुगाराप्रमाणे बेटिंगचे रूल्स असतातच. उदा: आजच्या मॅचमधे पहिली बॅटिंग कुनाची असेल यावर पैसे लावता येतात, किंवा आज सचिन तेंडुलकर आज सेंच्युरी मारेल की नाही यावरदेखील. सर्वात जास्त लोक पैसे कोण जिंकेल अथवा कोण नाही यावर पैसे लावतात. ५०-५० चान्सेस असल्याने हे बेटिंग जास्त नुकसानदायी ठरत नाही. पण स्पॉट बेटिंग हे सर्वात एक्सायटिंग आणि तोट्यात नेणारं बेटिंग. यामधे या एका ठराविक ओव्हरला किती रन्स मिळतील यावर बेटिंग लावायचे. लावणारे लोक कमी असले तरी पैशाचं प्रमाण प्रचंड असतं यामधे.
हे बेटिंग अर्थात बूकीमार्फत लावण्यात येतं. हे बूकींचं जाळं कसं पसरलं आहे हे आता मीडीयामधून वाचतच असाल. फिक्सिंग तेव्हा होतं, जेव्हा बूकी हा जुगार कंट्रोलमधे ठेवायचा प्रयत्न करतात. स्पॉट फिक्सिंग म्हणजे एका ओव्हरमधे बॉलर अमुक नोबॉल टाकणार यावर जितके पैसे लावून घ्यायचे, आणी मग बॉलर फिक्स करायचा की तू एकही नो बॉल टाकू नकोस. ज्यांनी पैसे लावले आहेत ते सर्व लोक बोंबलले, त्यांचे पैसे पाण्यात. फिक्सिंगमुळे धाबे दणाणतात ते या लोकांचे. मॅचेस फिक्स होत आहेत हे जर मीडीयामधे येत असेल आणि याच लोकांनी बेटिंगमधे पैसे लावणे बंद केले तर फिक्सिंग करनेका कोइ चान्स नही.
सर्वसामान्य प्रेक्षक ज्याने या मधे पैसे लावलेले नाहीत आणि खेळ बघायचा एंटरटेनमेंट म्हणून बघत आहे, त्याला अर्थाअर्थी काहीही फरक पडत नाही, फरक पडतो तो ज्यांनी पैसे लावले आहेत त्या लोकांना. कारण, या बेटिंगमधे अक्षरशः लोकांनी घरे वगैरे पण गहाण ठेवलेली असतात. हेडरमधे मी जो दुसरा मुद्दा लिहिलाय तो अशाच सामान्य माणसांबद्दल लिहिलाय. ईझी मनीच्या या लोभापायी या पैसे लावणार्या लोकांना चक्क सर्रास उल्लू बनवलं जात आहे. त्या लोकांनी हा जुगार थांबवला तर सर्वात जास्त फायदा त्यंचा होईल.
शिवाय तुम्हाला गाढवांसमोर
शिवाय तुम्हाला गाढवांसमोर गीता वाचायला कोणि सांगितली आहे का? वाचायची/गायचीच असेल तर आयपीएल न बघण्यार्या शहाण्यांसमोर वाचा. >>
इथल्या चर्चेत प्रकर्षाने जाणवतं तें हेच कीं बेटींग, फिक्सींग, भ्रष्टाचार, बेलगाम हांव याबद्दलच्या घृणेपेक्षां फक्त क्रिकेट पहाणार्यांवर आसूड ओढण्याचा आसूरी आनंदच इथं ओसंडून वाहतोय - बेटींग, फिक्सींग इत्यादीचा क्रिकेट पहाण्याशीं सुतराम संबंध नसतानाही ! >> +1
>>CSK ही टीम आता उरू नये ती
>>CSK ही टीम आता उरू नये ती खारीज केली जावी.. ज्या टीमचा ओनरच असे करतो ती कुठलीही टीम (कितीही चांगली असली तरी) टीम म्हणवून घेण्याच्या लायकीची नाही.
थोडे भावनेच्या भरात आहे.. विधान नाही पटत... एका ओबिला पायी अख्ख्या अफगाण ला बेचिराग करण्यासारखे हे आहे.. फार तर या मालिकेपुरते ही टीम कदाचित बाद ठरवता येईल पण तेही पुराव्यानिश सर्व काही सिध्द झाल्यावरच. With anything such as betting/fixing, the game stand to lose quite more than the guilty folks, players, and us sports lovers... घरात झुरळे झाली म्हणून कुणी घर विकत नाही किंवा सोडून जात नाही... तसेच आहे हे. सर्वच दोषींवर किमान यावेळी तरी कडक कारवाई व्हावी. तेव्हडे देखिल पुरेसे आहे.
योग पण आयपीएल चा नियमच तसा
योग पण आयपीएल चा नियमच तसा आहे. म्हणूनच तो ओनर नाही हे दाखवायचा खटाटोप अचानक चालू झाला.
टीम बरखास्त म्हणजे सर्वांना रेझ्यूमे घेऊन फिरा असे सांगणे असा माझ्या दृष्टीने यात अर्थ नाही. प्रमुख टीम व्यवस्थापन बरखास्त. जे नवीन व्यवस्थापन येइल त्यात सध्याचे खेळाडू व इतर सपोर्ट स्टाफ ला प्राधान्य - तसेही चेन्नई च्या टीममधले बरेच खेळाडू कोणीही सहज घेईल असेच आहेत, त्यामुळे त्यांना चिंता नाही. मात्र बाकी असंख्य नोकरदार सपोर्ट स्टाफ असेल त्यांना पुन्हा तेच रोल दिले तर कोणाचे यात नुकसान नाही.
ओह ओके.. म्हणजे सद्य
ओह ओके.. म्हणजे सद्य व्य्वस्थापन्/मालक बरखास्त करून नविन आणणे असे म्हणायचे आहे का..? तर मग "नविन मालक" कोण पुढे येणार हाच प्रश्ण आहे.. म्हणजे पुढील खेपेस ऊलटे होईलः चेन्नई चा संघ विकत घ्यायलाच पहिले बिडींग होईल
झक्कींना इंव्हेस्ट्मेंट करायची आहे का विचारून पहा बरे.. आयपिल ७ एकदम गाजेल माबो वर. झक्की आणि चेन्नई संघ २४x७ सतत टिव्ही वर..
बेटिंग,फिक्सिंगने क्रिकेट
बेटिंग,फिक्सिंगने क्रिकेट ह्या खेळाला कीड लागली आहे.सर्वत्र हीच चर्चा चालू आहे मात्र भारतीय संघातील महान आजी नि माजी क्रिकेट खेळाडूंनी ह्याबाबत काहीच प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. क्रिकेट ह्या खेळाच्या जीवावर ह्या खेळाडूंनी मानमरातब, करोडो रुपये कमावले. आज त्या खेळाची बदनामी होत असताना हे खेळाडू गप्प का असा प्रश्न पडतो.
पिंटू मग त्या न्यायाने हा दोष
पिंटू
मग त्या न्यायाने हा दोष आपणासर्वांचाच. अगदी तुमचाही. कारण क्रिकेट मध्ये तर केवळ काही कोटीचा भ्रष्टाचार झाला पण ज्या देशाच्या खुद्द पंतप्रधाण, संरक्षण मंत्री, सेनादलाचे प्रमुख अन हजारो मंत्री ते नगरसेवक असे रोज हजारो कोटीचा भ्रष्टाचार करतात त्याबद्दल तुम्ही काय केले? तोच न्याय तुम्ही तुम्हालाही लावून पाहा.
सद्य व्य्वस्थापन्/मालक बरखास्त करून नविन आणणे असे म्हणायचे आहे का.. >> हो. म्हणजे टीम श्रीनिवासन ह्यांनी दुसर्याला विकावी.
पण तसेही आता सर्व प्लेअर ओपन झालेत म्हणजे सर्वांचे कॉन्ट्रॅक्ट संपले आहेत. पहिल्या आयपीलच्या वेळी जसे झाले तसेच आता परत ७ व्या वेळी पण होईल. चेन्नईचा संघ तोच राहिल ह्याची ग्यारंटी नाही. आणि राहीलाच म्हणजे ( धोणी, रैना, अश्विन, मुरली,जडेजा ही अर्धी भारतीय टीम) तर मग परत २०११ सारखीच रुल मध्ये फेरफार केली असे समजावे लागेल.
सर्वत्र हीच चर्चा चालू आहे
सर्वत्र हीच चर्चा चालू आहे मात्र भारतीय संघातील महान आजी नि माजी क्रिकेट खेळाडूंनी ह्याबाबत काहीच प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. क्रिकेट ह्या खेळाच्या जीवावर ह्या खेळाडूंनी मानमरातब, करोडो रुपये कमावले. आज त्या खेळाची बदनामी होत असताना हे खेळाडू गप्प का असा प्रश्न पडतो.>>> अगदी बरोबर केलेले आहे खेळाडूंनी. मुळात दर वेळेला उतावळेपणाने प्रतिक्रिया द्यायलाच हवी असा अट्टहास का? सध्या चालू तपासकार्य चालू असल्यामुळे खेळाडू (आजी माजी पाजी सर्वच) मीडीयामधे काहीतरी बोलून अजून गोंधळ न उडवून देणे हीच उत्तम स्ट्रॅटजी. त्यासाठी सर्व खेळाडूंना शाबासकी
श्रीनिवासन अजून किती खोटं बोलणार आहे? गुरूनाथ इतके दिवस डग आऊटमधे बसायचा तो काय एंथुझिअॅस्ट म्हणून?? लोकं सत्तेची किती हावरी असतात!!
आयपीएल हे आता आले .दाऊदची
आयपीएल हे आता आले .दाऊदची टोळी हि गेल्या तीस वर्षापासून सामने फिक्स करत आहे अशी बातमी सह्याद्रीच्या बातम्या मध्ये दाखवण्यात आली. वरती पण काही एतेहासिक सामन्यांचे उल्लेख झाले. सचिनला सामन्यात काही खेळाडू फिक्सिंग करताहेत हे माहित होते तरीही त्याने विजय मिळवून दिला वैगरे वैगरे.अझर,जडेजा ह्या खेळाडूना हि फिक्सिंग मुळे बाहेर जावे लागले होते.आपले जे जुने खेळाडू असतील त्यांच्याकडे फिक्सिंग प्रकरणाबद्दल बरीच माहिती असेल त्यांची पोलिसांनी चौकशी करावी बरेच तथ्य बाहेर येतील. हे खेळाडू स्वत: येउन माहिती देतील ह्या भ्रमात राहू नये.
बाळ पिंटू, संपले आता
बाळ पिंटू,
संपले आता आयपीएल.... काही ठोस मुद्दे नसतील तर तेच तेच उगाळत बसून लोकांना बोर करण्यापेक्षा दुसरा एखादा धागा आणि विषय शोधा राव
http://blogs.timesofindia.ind
http://blogs.timesofindia.indiatimes.com/the-dirty-picture/entry/tribute...
हे के श्रीनिवास रावने लिहिलेलं एन श्रीनिवासन वरचं आर्टिकल. श्रीनि मस्तच लिहितो.
<< सचिनला सामन्यात काही
<< सचिनला सामन्यात काही खेळाडू फिक्सिंग करताहेत हे माहित होते >>फिक्सींग करणारे खेळाडू काय ड्रेसींग रूममधे हें जाहीर करतात का ? आणि संशयास्पद वाटलं तरी जाहीरपणे असा आरोप/तक्रार कुणी करूं शकेल का ?
परवां 'आयबीएन लोकमत'वर बापू नाडकर्णी यांची 'ग्रेट भेट'मधे मुलाखत घेतली निखील वागळेनी. बापू नाडकर्णी , सध्याचं वय ८० वर्षं, ४१ कसोटी [८८ बळी]व १९१ फर्स्टक्लास सामने [५०० बळी]; जागतिक विक्रम असल्यासारखी या सर्व सामन्यात १.६ ची षटकामागें धांवा देण्याची सरासरी. शिवाय, कसोटीत १ व फर्स्ट क्लास सामन्यात १४ शतकं. अत्यंत मेहनती, प्रामाणिक, अभ्यासू व रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध. त्याना विचारलं गेलं सचिनबद्दलचं त्यांचं मत. " सचिनबद्दल मीं बोलणं म्हणजे क्रिकेटचाच अपमान करण्यासारखं आहे; इतकी प्रगल्भता आहे त्याची !". " म्हणजे तुम्हीही त्याला क्रिकेटचा देव मानतां ? " "प्रश्नच नाही. तो देवच आहे क्रिकेटचा !"
सांगण्याचा उद्देश - गोलंदाजी वर अपार मेहनत घेतल्याने ज्यांच्या डाव्या हाताचीं बोटं वांकडी झालीं आहेत असा हा जागतिक किर्तिचा ज्येष्ठ खेळाडू त्याच्या मानाने पोरसवदा असलेल्या ज्या सचिनबद्दल जाहीरपणे असं म्हणतो, त्या सचिनबद्दल आपल्यासारख्यानी कांहीही बोलण्यापूर्वीं खूप विचार करणं आवश्यक नाही का ? सचिन, द्रविड, लक्ष्मण यांच्यासारख्या प्रतिभावान व चारित्र्यसंपन्न खेळाडूंचे आयते उपलब्ध असलेले आदर्श तरुण पिढीसमोर ठेवण्याऐवजीं, त्यांच्यावर उगीचच चिखलफेंक करणं दळभद्रीपणाचं लक्षण तर नाही ना !
पण तसेही आता सर्व प्लेअर ओपन
पण तसेही आता सर्व प्लेअर ओपन झालेत म्हणजे सर्वांचे कॉन्ट्रॅक्ट संपले आहेत. पहिल्या आयपीलच्या वेळी जसे झाले तसेच आता परत ७ व्या वेळी पण होईल. >> भाऊ, प्लेअर ओपन झालेत म्हणजे पुढच्या वेळेसाठी काही retention clause अजून पर्यंत नाही एव्हढाच रे. त्याचा अर्थ तो auction च्या वेळी नसेल असा मुळीच नाही.
श्रीसंत परत येतोय आयपील मध्ये
श्रीसंत परत येतोय आयपील मध्ये..
श्रीसंतला पुन्हा बघायला
श्रीसंतला पुन्हा बघायला उत्सुक आहे !
धागा आणि प्रतिसाद वाचले नाहीत. पण आयपीएलमध्ये फिक्सिंग हा काही देशद्रोहाचा गुन्हा झाला नाही. साधी फसवणूक आहे ती आपल्या बॉसशी जे आपणही आपल्या कामाच्या ठिकाणी कित्येकदा करतो. किंबहुना कित्येकदा बॉसच्याच सांगण्यावरूनही सामना फिक्स होत असेल.
त्यामुळे फक्त प्रेक्षकांनी हे ध्यानात ठेवायला हवे की समोरचे सारे फिक्स असू शकते. जसे चित्रपट बघून झाल्यावर त्यात जे हिरोने ढिशूम ढिशूम करताना दाखवले ते खरे नसून अॅक्टींग असल्याचे कोणी सांगितले तर आपल्याला धक्का बसेल का? नाही ना? तेच धोरण आयपीएल बघताना ठेवायचे असते.
आय पी एल मध्ये कोण ग सभ्य
आय पी एल मध्ये कोण ग सभ्य भाषा वापरत? शाहरुख पासून सगळे तिथे गोंधळ करतात.
>>>>>>
धागा आणि प्रतिसाद वाचायला घेतले आणि पहिल्याच पानावर हे वाचले.
क्रिकेट असो वा राजकारण वा समाजकारण, शाहरूखच्या उल्लेखाशिवाय कुठलीही चर्चा अपुरी हे पुन्हा जाणवले
असो, जिथे आंतरराष्ट्रीत सामन्यात फिक्सिंग करून देशद्रोह करणारे अझर जडेजा आता कॉमेंटरी बॉक्स आणि क्रिकेट शोमध्ये दिसतात तिथे आयपीएलमध्ये केवळ पैश्यासाठी फिक्सिंग करणार्या खेळाडूंची कारकिर्द संपवणे हे डबल स्टँडर्ड आहे.
*साधी फसवणूक आहे ती .* 100%
*साधी फसवणूक आहे ती .* 100% असहमत ! क्रिकेटचा
संपूर्ण डोलारा ज्या पायावर उभा आहे, नेमके तिथेच घातलेले घाव आहेत हे . अक्षम्य !!! एकदां का सामन्यांच्या सच्चाईबद्दलचा विश्वास उडाला कीं क्रिकेट हा चेष्टेचा विषय होईल ( फिकसींगच्या काळात तसा होण्याच्या बेतांत होताच ) , व खेळाच्या अधोगतीची वाटचाल वेगाने सुरूं होईल.
*अझर जडेजा आता कॉमेंटरी बॉक्स आणि क्रिकेट शोमध्ये दिसतात तिथे आयपीएलमध्ये केवळ पैश्यासाठी फिक्सिंग करणार्या खेळाडूंची कारकिर्द संपवणे हे डबल स्टँडर्ड आहे.* - अझर , जडेजा याना महत्व देण्याविरूद्ध आवाज उठवणं हें औचित्यपूर्ण, तशाच इतरांची कारकिर्द संपल्याबद्दल खेद करणं ( तें प्रथमदर्शनी दुःखद वाटूनही ) चूकीचं , असं मला वाटतं.
एकदां का सामन्यांच्या
एकदां का सामन्यांच्या सच्चाईबद्दलचा विश्वास उडाला कीं क्रिकेट हा चेष्टेचा विषय होईल
>>>>>
क्रिकेट नाही, आयपीएल नावाची सर्कस चेष्टेचा विषय होईल. दोघांत फरक आहे. कित्येक क्रिकेटप्रेमी आयपीएलची चेष्टा करतातच.
अझर , जडेजा याना महत्व देण्याविरूद्ध आवाज उठवणं हें औचित्यपूर्ण, तशाच इतरांची कारकिर्द संपल्याबद्दल खेद करणं ( तें प्रथमदर्शनी दुःखद वाटूनही ) चूकीचं , असं मला वाटतं.
>>>>>>
म्हणून मी माझ्या विधानात ना खेद व्यक्त केलाय ना कश्याचे समर्थन. फक्त डबल स्टॅण्डर्ड असू नये ईतकेच. ते सुद्धा आंतरराष्ट्रीय सामन्यात देशाशी गद्दारी करणार्यांशी तुलनेत मवाळ आणि आयपीएलमध्ये फ्रँचायझींशी गद्दारी करणार्यांशी तुलनेत कठोर हे आणखी उलट वाटते.
*फक्त डबल स्टॅण्डर्ड असू नये
*फक्त डबल स्टॅण्डर्ड असू नये ईतकेच.* आयपीएलमधे खेळणारे व आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे खेळाडू तेच असले, तर त्याना फिक्सिंगबाबत मात्र डबल स्टॅण्डर्ड लावणंही मग कसं योग्य ठरतं ? 'देशाशी गद्दारी' , ' मालकांची फसवणूक ' इ.पेक्षा लाखो क्रिडाप्रेमींच्या विश्वासाची क्रूर चेष्टा ही खरी आक्षेपार्ह बाब आहे व ती आयपीएल व आंतरराष्ट्रीय सामन्यांना तितक्याच तीव्रतेने लागू होते. आयपीएलमधे फिकसींग होणं व आयपीएलची चेष्टा होणं स्वीकृत असेल, तर इतरही लहान व मोठ्या सामन्यांत तें स्वीकृत होणं क्रमप्राप्तच आहे; खेळाडू व बव्हंशी प्रेक्षक तर तेच आहेत ना !
जिथे आंतरराष्ट्रीत सामन्यात
जिथे आंतरराष्ट्रीत सामन्यात फिक्सिंग करून देशद्रोह करणारे अझर जडेजा आता कॉमेंटरी बॉक्स आणि क्रिकेट शोमध्ये दिसतात तिथे आयपीएलमध्ये केवळ पैश्यासाठी फिक्सिंग करणार्या खेळाडूंची कारकिर्द संपवणे हे डबल स्टँडर्ड आहे>>>> हे पटत आहे. तिघांचेही गुन्हे सारखेच आहेत. पण तिघांनाही वेगवेगळ्या न्याय हे पटत नाही .
देशाशी गद्दारी' , ' मालकांची
देशाशी गद्दारी' , ' मालकांची फसवणूक ' इ.पेक्षा लाखो क्रिडाप्रेमींच्या विश्वासाची क्रूर चेष्टा ही खरी आक्षेपार्ह बाब आहे
>>>>
क्रिडाप्रेमींचा विश्वास हे देशासाठी खेळताना शंभर टक्के लागू पण आयपीएलबाबत हे व्यक्तीसापेक्ष झाले भाऊ. तुम्ही आयपीएलमध्ये भावना गुंतावता की नाही यावर ते तुमच्यापुरता अवलंबून आहे.
हा, एक ग्राहक म्हणून तुमची फसवणूक ग्राह्य धरली जाऊ शकते. तुम्ही आयपीएल बघायला पैसे मोजत आहात तो खरा थरार बघायला आणि ते तुम्हाला तो दाखवायचा आश्वासन देऊन खोटे दाखवत आहेत तर ती तुमची फसवणूक झाली.
पण भारताचे प्रतिनिधीत्व करत देशासाठी खेळताना कोणी मुद्दाम ठरवून खराब खेळत असेल तर तो मोठा गुन्हा आहे.
*पण भारताचे प्रतिनिधीत्व करत
*पण भारताचे प्रतिनिधीत्व करत देशासाठी खेळताना कोणी मुद्दाम ठरवून खराब खेळत असेल तर तो मोठा गुन्हा आहे.* ' 'फिक्सिंग ' ही वृत्ती आहे व ती अशी selectively वापरणं हें सुद्धा क्रीडाक्षेत्रात निषिध्दच समजणं अपरिहार्य आहे .
Pages