स्पॉट फिक्सिंगच्या आरोपामधे श्रीशांत आणि अजून दोन खेळाडूंना अटक झाली आहे. यावरून काल वृत्तवाहिन्यांमधे कालपासून गरमागरम चर्चा चालू आहेत. आयपीएल बंदच करावे अशी एक टोकाची मागणीदेखील समोर येत आहे. फेसबूक, ट्विटरवर्देखील या चर्चा रंगात आलेल्या आहेत. (मग मायबोलीने का मागे रहावे?)
पण लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की: या खेळाडूंनी फिक्सिंग केले तरी नक्की कशासाठी? आयपीएल व त्यामधून मिळणार्या जाहिरातींमधून कितीतरी उत्पन्न खेळाडूंना राजरोस मिळत आहे. त्याखेरीज वर्षभर इतर टूर्नामेंट्स चालूच असतात. तरीदेखील अजून पैशाच्या लोभाने हे असे फिक्सिंग करावेसे का वाटले असेल? आपण जो खेळ खेळतो त्या खेळाची प्रतारणा, ज्या संघासाठी खेळतो त्याच्याशी प्रतारणा शिवाय कायद्याने गुन्हा ठरणारी गोष्ट जर कुणी करत असेल तर ते नेमके कशासाठी? नुसती पैशाची हाव की अजून काही?? बीसीसीआयच्या खेळाडूंना आता काऊन्सिलीन्ग द्यायची वेळ आली आहे का? बीसीसीआय, खेळाडू, संघ अशा सर्वांनीच आता याचा मुळापासून विचार करायला हवा.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, स्पॉट फिक्सिंग होते ते मुळात बूकीज आणि क्रिकेटवरून चालणार्या सट्ट्यामधे. या व्यवहारामधे बूकीज स्वतःचा फायदा करून घेताना जर खेळाडूला साठ लाख रूपये एका ओव्हरला लावायला तयार असतील तर मुळात किती जण क्रिकेटच्या सट्ट्यावर पैसे लावतात? तेदेखील किती करोडो रूपये? भारतामधे हा जुगार इतका का फोफावत चालला आहे? हीदेखील एक प्रकारे पैशाची हावच म्हणायला हवी ना. आपल्याला ईझी मनी मिळवायची इतकी हौस का असते? कायदाम नैतिकता, मूल्ये यामधे कुठेही न बसणारी अशी ही हौस माणसामधे निर्माण का होत असावी? अशा अनेक प्रश्नांचा इथे उहापोह व्हावा ही आशा.
कृपया, वैयक्तिक ताशेरे, टीकाटिप्पणी करू नका. आपली मते सभ्य भाषेत मांडा. धन्यवाद.
(अवांतर: त्या श्रीशांतला इन्डियन टीममधे स्वत:ची जागा फिक्स करता येत नाही. स्पॉट फिक्सिंग कसलं डोंबलाचं करतोय?)
उदयन, अरे कुणाला समजवायला
उदयन, अरे कुणाला समजवायला निघालायस.... कमेंटस बघितल्यास का एकेकाच्या?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
जशी दृष्टी तशी सृष्टी म्हण आणि सोडून दे
ज्येष्ठ नागरिकाने केली
ज्येष्ठ नागरिकाने केली आय़पीएल सामन्याचे पैसे परत देण्याची मागणी रसिकलाल दोषी या ८० वर्षीय क्रिकेटप्रेमीने बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांना पत्र लिहून मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल यांच्यामध्ये १५ मे रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएल सामन्याच्या तिकिटाचे पैसे परत देण्याची मागणी केली आहे.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
दोषी यांनी आठ तिकिटांसाठी एकूण २० हजार रूपये मोजले होते. मुंबई इंडियन्सला प्रोत्साहन देण्य़ासाठी दोषी यांनी आपल्या कुटुंबियांसाठी गरवारे स्टॅंडची एकूण आठ तिकिटे तब्बल वीस हजार रूपयांनी खरेदी केली होती. १६ मे रोजी श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक झाल्यानंतर दोषी यांनी तिकिटाचे पैसे परत देण्याची मागणी केली आहे.
ही चोरी असून, आम्ही कमावलेल्या घामाच्या पैशातून बुकी चंगळ करत असल्याचे दोषी म्हणाले........>>>>>>>>>> हे अस्सल क्रिकेट प्रेमी ज्यांच्या वागण्यातून खेळ वाचवा हि तळमळ दिसून येतॆ खेळा बद्दलचे प्रेम दिसून येते बाकी सारे मनोरंजनाचे भुकेले.सामना बघून आपला दिवस मजेत जातोय न मग मरु द्या फिक्सिंग बिक्सिंग. चार हाणा पण आपले म्हणा असला हा प्रकार;)
येक भारत नावाचा देश होता.
येक भारत नावाचा देश होता. तशेच सायेबाच्या मालकीचे अनेक देश होते.
सायबाच्या देशातली बिघडलेली कार्टी कॉलोनिअल सर्विसमधे घालून पोटापाण्याला लावली जात होती. हिकडं देवाच्या क्रूपेनं सगळं आबादीआबाद हुतं. ग्याझेटेड हापिसरांसाठी महाबळेश्व्रासार्खी आन शिम्ल्या सार्खी थंढ हवेची ठिकाणं हुती.
त्या कार्ट्यांनी टाईमपाससाठी शोदला आन वाडवला एक गेम. ५ दिवस चालनार. येक जन हुबं र्हाऊन फलकूट हलविनार. येक चेंडू फेकनार. दोन तीन लोकं मिळून खेळाचा गेम. आन किमाण २२ लोकाची टीम.
किर्कट.
हाऊ किरकट तुमि लोके बगतेत. फिक्षिंग झाले, तरी बगतेत. सुप्रीम कोर्टाचे न्यायादीश पन इचारतेत की इतके छक्के कशे लागतेत. कोनाले येडी घालतेत भो? सोताले? बोलिंग टाकणाराले पटावले तशे ब्याटींग वालाले पटावायले कठीण र्हाते का?
मुद्द्याची बात.
तुम्ही का बगतेत?
बंद करा ना भो!
ते ट्यार्पी कमी पडेल तं झैरात कमी भेटतीन. मं ते टीवी वाले कमी उड्या मार्तीन, मं संतोबा कमी टावेल हलोतीन. मं बठ्ठे ठिकानावं येतीन.
ते मीडीयावाले परवापासून
ते मीडीयावाले परवापासून विन्दू सिन्गला 'अभिनेता' म्हणत आहेत
काही असो, दारा सिंगांचा आत्मा मात्र तळतळला असेल. बीसीसीआयला ललित मोदी परत आणायला लागणार आहे आता. तसं झालं तर भारी धमाल येईल.
पिंटू. हा धागा मुद्दाम वेगळा काढला कारण आयपीएलच्या स्वरूपने चालू केलेल्या बीबीवर फक्त खेळाची चर्चा होत राहू दे.
उदयन, मी आधी पन तेच लिहिले होते. पूर्ण मॅच फिक्स करता येणे जवळ जवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. मी क्रिकेट कधी खेळले नाही, पण जेवढं अनुभवलंय त्यावरून 'प्रत्येक खेळाडू विकाऊ आहे' असं तर कदापि म्हणू शकणार नाही. ज्यांना क्रिकेट हा खेळ म्हणून समजत नाही तेच लोकं "प्रत्येक मॅच फिक्स आहे" असं ओरडत असतात.
तुम्ही का बगतेत?
>> इब्लिसभाऊ, आम्ही बघतो म्हणून तुम्हाला काही विशेष त्रास होतोय का? तुम्ही बघत नाही, गूड. आम्हाला बघायचं आहे बघू द्या की. जाहिराती बघू, चीअरलीडर बघू नाहीतर धोणी-मलिंगाची हेअरस्टाईल बघू. आमचा टीव्ही, आमची केबल, आमचा वेळ.
सुप्रीम कोर्टाचे न्यायादीश पन इचारतेत की इतके छक्के कशे लागतेत. <<<< आं?? मी वाचलं की न्यायाधीशांनी विचारलं की फोर आणी सिक्स कसे फिक्स करता येऊ शकतात??
illegal or legal, it's pretty
illegal or legal, it's pretty impossible to stop fixing, be it spot or match. Legalizing betting allows government, sports organizations (not players) to involve in controlling it in order to avoid it compromising integrity of game. >> > असामी +१ . आणि हे आपण इथे पाहतोय मग ती घोड्यांची रेस असो वा सुपर बोल असो. ह्यावेळी सुपरबोल ला तर ९८ मिलियनच्या बेट्स लावल्या होत्या , विचार करा त्यावर मिळणार्या टॅक्सेसचा.
जसं की गुजरात मध्ये दारुवर बंदी आहे पण मी जेव्हा गुजरात मध्ये होतो तेव्हा आम्हाला पाहिजे ती ,पाहिजे तेवढी दारु अॅव्हेलेबल होती , म्हणजे मिळायचं ते मिळतचं, शेवटी नुकसान कोणाचं ?
>>म्हणजे मिळायचं ते मिळतचं,
>>म्हणजे मिळायचं ते मिळतचं, शेवटी नुकसान कोणाचं ?
आपलच, समाजाचं, आणि देशाचं.. हे जेव्हा आपल्याला कळेल तो सुदिन!
बेटींग कायदेशीतर करा या न्यायाने "भ्रष्टाचार", सर्व घोटाळे, अनधिकृत बांधकामे सर्वच कायदेशीर्/अधिकृत करा असेही म्हणता येईल.. थोडक्यात ऊलटी गंगा- अमेरीकेत बेटींग, गँबलींग ई. कायदेशीर करताना त्याला आवश्यक्/पुरक्/नियंत्रक अशी कायद्याची चौकट अस्तित्वात आहे हे विसरता कामा नये.
सर्वच घृणास्पद आहे- पैशासाठी पकडायचे आणि पैसे घेऊन सोडायचे.. आणि वर म्हणायचे सर्वच कायदेशीर करा. सरकारच्या तिजोरीत भर घालायला जे आधीच करबुडवे आहेत त्यांच्याकडून वसुली केली तरी पुरेसे आहेत.. (गेल्या वर्षी मुंबई ईंडीयन व ईतर दुसरे संघ यांनी हिशेबात "तोटा" दाखवला होता.. कमाल आहे! )
इब्लिस, >> मुद्द्याची बात. >>
इब्लिस,
>> मुद्द्याची बात.
>> तुम्ही का बगतेत?
>> बंद करा ना भो!
अगदी बरोबर प्रश्न! त्याचं काय आहे की दारूड्याला एकदा चटक लागली की सोडणं अवघड होऊन बसतं. तसाच हा प्रकार आहे.
आ.न.,
-गा.पै.
लोकहो, इथे काही जण म्हणतात की
लोकहो,
इथे काही जण म्हणतात की बेटिंग कायदेशीर करा. पण त्यामुळे फिक्सिंग कमी कसे होईल ते कळत नाही. मला वाटतं की फिक्सिंग आणि बेटिंग या वेगवेगळ्या समस्या आहेत. बेटिंगात पैसा असल्यामुळे फिक्सिंग होते. बेटिंग कायदेशीर केले तरी त्यायला पैसा कमी होणार नाहीये. त्यामुळे फिक्सिंग थांबवायला वेगळे उपाय करावे लागतील.
आ.न.,
-गा.पै.
परवा बीसीसीआय ने जाहीर केलं
परवा बीसीसीआय ने जाहीर केलं की ती एक पूर्ण खाजगी संघटना आहे. 'अशा टीमला राष्ट्रीय संघ म्हणायचं का' हा बर्याच जणांना पडलेला प्रश्न मलाही पडलाय आणि एक प्रकारची अस्वस्थता वाटते आहे. वाईट वाटतंय... इनडायरेक्टली, बीसीसीआय ही भारतापेक्षा मोठी आहे असंच ना?
इब्लिस व गापै यांचे एकमत झाले
इब्लिस व गापै यांचे एकमत झाले म्हणजे Cricket is a great unifying factor in India हे पुन्हा सिद्ध झाले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
परवा बीसीसीआय ने जाहीर केलं
परवा बीसीसीआय ने जाहीर केलं की ती एक पूर्ण खाजगी संघटना आहे...---->>>>>>>>म्हणजे आपण इतके वर्ष ज्या म्याचेस पाहत होतो त्या भारतीय संघाच्या नसून बीसीसीआय ह्या खासगी संघटनेच्या होत्या तर. मग का आपण ह्या खेळाडूना डोक्यावर घेऊन नाचतो. त्यांना सरकारतर्फे पद्मश्री सारखे मानाचे पुरस्कार देतो अर्थात त्यांना ह्या पुरस्काराशी काही घेणे देणे नसते. मागे जाहिरातीत व्यस्त असल्यामुळे आदरणीय धोनिसाहेब आणि हरभजन हे महापुरुष पद्मश्री पुरस्कार घ्यायला उपस्तिथ राहिले नव्हते.सचिन तेंडूलकर हा देशासाठी खेळत नसून बीसीसीआय ह्या खाजगी संस्थेसाठी खेळतो तर त्याला भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी कशी काय होते.म्हणजे बीसीसीआय स्वताला खासगी संस्था म्हणवून घेते त्यांना देशाचे काही घेणे पडले नाही. क्रिकेट प्रेमिंशी काहीही घेणेदेणे नाही ते त्यांचा क्रिकेट नामक व्यवसाय करायला बसलेत. आपण क्रिकेटला इतके महत्व देतो कि त्यामुळे देशविघातक शक्ती ह्या क्रिकेटवेड्यांच्या कायम ऋणात राहतील.आपल्या मनोरंजनासाठी आपण त्यांना मालामाल करत आहोत.थोडक्यात काय धन्य ते बीसीसीआय धन्य ते क्रिकेटप्रेमी नि धन्य ते सट्टेबाज.बाकी इतके फिक्सिंगचे आरोप होऊनही क्रिकेटवेडे सामन्यांना जी गर्दी करत आहे. त्यांनी सट्टेबाज नक्कीच सुखावले असतील;)![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बेटींग कायदेशीतर करा या
बेटींग कायदेशीतर करा या न्यायाने "भ्रष्टाचार", सर्व घोटाळे, अनधिकृत बांधकामे सर्वच कायदेशीर्/अधिकृत करा असेही म्हणता येईल.. थोडक्यात ऊलटी गंगा- अमेरीकेत बेटींग, गँबलींग ई. कायदेशीर करताना त्याला आवश्यक्/पुरक्/नियंत्रक अशी कायद्याची चौकट अस्तित्वात आहे हे विसरता कामा नये. >> भाऊ अरे बेटींग कायदेशीर करा म्हणजे हि काय्द्याची चौकट आणायला हवी हे साहजिकच होत नाही का ?
भाऊ अरे बेटींग कायदेशीर करा
भाऊ अरे बेटींग कायदेशीर करा म्हणजे हि काय्द्याची चौकट आणायला हवी हे साहजिकच होत नाही का ? >>>>>> आहे त्या कायद्याची चौकट पाळली जात नसेल, आहेत ते कायदे धाब्यावर बसवुन खाउगिरी चालत असेल, तर कायदेशीर केल्यावर मग काय ! मज्जाच मज्जा.
दाऊदला हराम पैसा नकोय.
दाऊदला हराम पैसा नकोय.
(No subject)
दाऊदच काही माहित नाही पण
दाऊदच काही माहित नाही पण आपल्या क्रिकेटरना मात्र हवाय.
फारएण्ड | 23 May, 2013 -
फारएण्ड | 23 May, 2013 - 11:52 नवीन
इब्लिस व गापै यांचे एकमत झाले म्हणजे Cricket is a great unifying factor in India हे पुन्हा सिद्ध झाले
<<
और ये लगा......... सिक्क्षर्...![69.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u35881/69.gif)
हे झंप्याक झपांग
और ये लगा.........
और ये लगा......... सिक्क्षर्... >>>>>>>> फिक्स आहे सिक्सर !
नंदिनी ताई, >>तुम्ही का
नंदिनी ताई,
>>तुम्ही का बगतेत?
>> इब्लिसभाऊ, आम्ही बघतो म्हणून तुम्हाला काही विशेष त्रास होतोय का? तुम्ही बघत नाही, गूड. आम्हाला बघायचं आहे बघू द्या की. जाहिराती बघू, चीअरलीडर बघू नाहीतर धोणी-मलिंगाची हेअरस्टाईल बघू. आमचा टीव्ही, आमची केबल, आमचा वेळ.
सुप्रीम कोर्टाचे न्यायादीश पन इचारतेत की इतके छक्के कशे लागतेत. <<<< आं?? मी वाचलं की न्यायाधीशांनी विचारलं की फोर आणी सिक्स कसे फिक्स करता येऊ शकतात??
<<
मुद्दाम्हून मुद्याले बगल देऊन र्हायले का तुम्ही? तुमाला हवे ते बगाले मी रोक्ले का? हेयरस्टाईल आन चियरलिडरांत बी फिक्षिंग केले का कुणी? का तसे मी लिवले? उग्गा फाटे फोडून र्हायले बा तुम्ही.
मी फकस्त इचारले, 'का बगतेत'? ते तुम्ही पर्सनली का घेते? आन घेतेत तं सांगा ना मंग, का काय भेटते फिक्षिंग केलेले म्याच बगून?
की महाराष्ट्राच्या बोली भाषा वापरून बोललेले समजले नाही नीटसे?
आमचा टीव्ही, आमची केबल, आमचा वेळ. अगदी बरोबर. तुमच्या घरी तुमच्या पैशांनी काय करता याच्याशी मला घेणे नाही. पण इथे चव्हाट्यावर धागा काढून धुणी धुवायला आणलीत, तर आम्ही विचारणारच की धुवायची वेळ का आली?
कृपया, वैयक्तिक ताशेरे, टीकाटिप्पणी करू नका. आपली मते सभ्य भाषेत मांडा. धन्यवाद.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हे डिस्क्लेमर टाकून वर तुमचा मला उद्देशून लिहिलेला तुमचा हा "सभ्य" प्रतिसाद शोभतोय का ताई तुम्हाला?
>>http://timesofindia.indiati
>>http://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/spot-fixing-hits-ipl-6...
आर पि. सिंग च्या "त्या" 'दोन फूट नो बॉल' ने सुरुवात करायला हरकत नाही....
>>भाऊ अरे बेटींग कायदेशीर करा
>>भाऊ अरे बेटींग कायदेशीर करा म्हणजे हि काय्द्याची चौकट आणायला हवी हे साहजिकच होत नाही का ?
अरे ते काय मंडईतून भाजी आणण्या एव्हडे सोपे आहे का..? ईथे आहे ती चौकट कायम ठेवताना सिस्टीम ची लक्तरे झाली आहेत... भावना पोचल्या पण सूचना अगदीच वस्तूस्थितिशी फारकत घेणारी आहे.
असो.
की महाराष्ट्राच्या बोली भाषा
की महाराष्ट्राच्या बोली भाषा वापरून बोललेले समजले नाही नीटसे?
<< माझा अहिराणीशी फारसा संबंध नाही, म्हणून नीट समजले नाही. पण तुम्ही का बघता हाच प्रश्न विचारला आहे ना? आम्ही खेळ आवडतो म्हणून बघतो हे आधी सांगून झालेलं आहे. तरी तुम्ही परत तोच प्रश्न विचारलाय म्हणून सांगितलं आमचा टीव्ही, आमची केबल, आमचा वेळ.
यामधे "असभ्य" काय लिहिलंय मी?
"I hang my head in shame "
"I hang my head in shame " Our sports minister says after hearing IPL fixing case![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
By that logic he should have buried himself in the ground after hearing about so many corruption cases against his colleague
व्हायव्हा लीड करणे असा एक
व्हायव्हा लीड करणे असा एक प्रकार असतो. उत्तर असे द्यावे की पुढचा प्रश्न आपल्याला हवा तो येईल. अशी कला अवगत करावी लागते. पासिंग साठी ५०% मार्क लागतात आमच्यात.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तर,
>>की महाराष्ट्राच्या बोली भाषा वापरून बोललेले समजले नाही नीटसे? <<
याचा संबंध,
"सुप्रीम कोर्टाचे न्यायादीश पन इचारतेत की इतके छक्के कशे लागतेत. <<<< आं?? मी वाचलं की न्यायाधीशांनी विचारलं की फोर आणी सिक्स कसे फिक्स करता येऊ शकतात??"
याचेशी जोडा पाहू? अहो, प्रश्न अर्धवट इस्कटून काहीतरीच टंकायचे असले तर असे होते. पूर्ण वाक्य काय आहे?
ते असे आहे :
"सुप्रीम कोर्टाचे न्यायादीश पन इचारतेत की इतके छक्के कशे लागतेत. कोनाले येडी घालतेत भो? सोताले? बोलिंग टाकणाराले पटावले तशे ब्याटींग वालाले पटावायले कठीण र्हाते का?"
यातले, बोल्ड केलेले कटवून टाईप काय केले तुम्ही?
वरतून,
>इब्लिसभाऊ, आम्ही बघतो म्हणून तुम्हाला काही विशेष त्रास होतोय का?< हे!
पुढे चियरलीडर्स अन मलिंगाची हेयरस्टाईल. हे मी कधी तरी बोललोय का? अरे पहा नं? हेयरस्टाईल तुम्हाला आवडते याने मला काय फरक पडतो?? यालाच म्हणतात पर्सनल घेणे, अन "असभ्य" बोलणे. बॉलरने बोगस बॉल टकला, तरी छक्के कसे काय लागू शकतात? असे जर न्यायाधीश विचारत असतील, तर, बॉलिंगवाले पुराव्यासकट पकडून तुमच्या समोर उभे आहेत, बॅटिंगवाल्यांबद्दल सांगायलाच हवे का? आर यू नाईव्ह? ऑर आर यू अ सुप्रीम कोर्ट जज?
नंदिनी ताई, माझ्याशी पर्सनल घेऊन र्हायले का भो तुम्ही?
रच्याकने: ती अहिराणी नव्हे. अहिराणी मां असं नै बोल्तंत. हाऊ वर्हाडी बोली शे. इत्ली तित्ली गल्लत बी व्हईं तं मले मालूम नै. काल्दिं सक्काय्ले इच्चार्च्जो
बरं, चूक झाली. तुमच्याइतके
बरं, चूक झाली. तुमच्याइतके हुशार आम्ही नाही.
आता तुमच्याकडे विषयाशी संबंधित काही असेल तर बोला. धन्यवाद.
>>आता तुमच्याकडे विषयाशी
>>आता तुमच्याकडे विषयाशी संबंधित काही असेल तर बोला. धन्यवाद.
+१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि कुठल्याही राणीच्या भाषेत नको, शुध्द मराठीत बोललात तर बरे होईल..
सध्या या खेळाडूंना अटक करताना
सध्या या खेळाडूंना अटक करताना ४२० कलम वापरलेले आहे असे दिसते. आयपीएल ही खाजगी संस्था असल्याने यात फौजदारी गुन्हा होऊ शकतो का? कोणी तज्ञांनी माहिती दिली तर बरे होईल.
योग, अहो, दहा वर्षे झाली
योग,
सो तुम्हाला माफ केले.
अहो, दहा वर्षे झाली तुम्हाला मायबोलीवर! "राणी"च्या नव्हे, तर आईच्या, किंवा व्हर्नाक्युलर मराठीत "माय"च्या भाषेत बोलण्यासाठी "मायबोली" आहे. ती my बोली नव्हे इतका उजेड तुमच्यात पडला, तरी तुमचे +१ झिल तोडणे थांबेल. पण तुम्ही राणीच्या कॉमनवेल्थमधल्या महान किर्कट खेळाचे, व तत्सम थिल्लरपणाचेच प्रशंसक आहात, असे दिसते.
---
नंदिनी ताई,
तुम्ही किती हुशार हे मी विचारलेच नाही. मला त्याच्याशी घेणे देणे नाही. तुम्ही, तुमची केबल, तुमचा वेळ, तुमची हुशारी इ. तुमच्या पाशी. मी कोण?
पण, तुम्ही चर्चाविषय मांडला. त्यात डिस्क्लेमर लिहिले, अन वरतून मला नाव घेऊन पर्सनल टिप्पणी केली, हे तुम्हाला माफ झाले का? स्वतःस विचारा. मी विषयास धरून बोलत होतो. मला किती अन का वैयक्तिक रित्या दुखते/त्रास होतो, याची आस्थेने चौकशी तुम्हीच केलीत हो!
जरा माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या ना? 'आवड्ते म्हणून बघतो' काये? हेयरस्टाईल का चियरगर्ल्स?
मी विचारले, तुम्ही पर्सनल घेऊन र्हायले का? असेल तं सांगा? ते सांगायचं नाही. उग्गं मी हुशार का तुम्ही ते कशाला आणताय मधे?
विषयाला धरून तं विचारलं? की तुम्ही का बघता? दिसतंय ना फिक्सिंग? अन मा. न्यायाधीशांचे स्टेटमेंटही इतक्या सहजतेने शेंबडे पोर*ही खोडू शकते. (*पक्षी मी)
परत मूळ प्रश्नास बगल. देऊन प्रतिसाद लिहिलात.
पुन्हा एकदा, शुद्ध मराठी प्रश्नः
तुम्ही पर्सनल का घेताहात?
अवांतर स्टेटमेंटः पर्सनल घ्याय्यचेच असेल तर डिस्क्लेमर काढा तो लेखातून. मी माझे सर्व प्रतिसाद उडवतो.
अजून एक बाफ लवकरच धारातिर्थी
अजून एक बाफ लवकरच धारातिर्थी पडणार.
तुम्ही पर्सनल का घेताहात? <<
तुम्ही पर्सनल का घेताहात?
<< मी कुठेच काहीच पर्सनल घेत नाही. तुम्हीच अगम्य भाषेमधे लिहित आहात- मला अहिराणी वर्हाडी येत नाही. माझ्या दृष्टीने त्या अगम्यच आहेत. तुम्ही प्रश्न विचारला होता "तुमी का बगतेत?" त्यावर स्पश्ट शब्दात उत्तर दिले होते. क्रिकेट खेळ आवडतो, चीअरलीडर्सचे डान्स आवडतात. खेळाडूंची हेअरस्टाईल आवडते म्हणून बघतो. पुन्हा तेच विचारते आहे. त्याचे उत्तर द्या आधी. तुम्हाला काही प्रॉब्लेम? आमचा टीव्ही, आमची केबल, आमचा वेळ.
यामधे तुम्हाला असभ्य वाटत असेल तर त्यानंतरचे चव्हाटा, धुणी धुणे वगैरे शब्द तुमचेच शब्द फार सभ्य आहेत ना? इथे येऊन व्हायवा वगैरे जे काही लिहिलंत ('तुमच्यात' पन्नास टक्के लागतात हे पण लिहिले आहे त्याचा इथे काय संबंध होता हो? म्हणे विषयाला धरून बोलत होतो.) तुम्हाला क्रिकेट (खेळ म्हणून अथवा त्यामधलं राजकारण, अर्थकारण) अथवा सध्या चाललेले फिक्सिंग प्रकरण याबद्दल काही लिहायचे असले तर लिहा. अन्यथा धन्यवाद दिलेच आहेत वरती. सतत काहीतरी लिहून चर्चेचा धगा भरकटवू नका. तुमच्यासारखे लोक येऊन कुठल्याही धाग्यावर भलता विषय चालू करून काय वाट्टेल ते बडबडायला सुरूवात करतात म्हणून डिस्क्लेमर द्यायची वेळ येते.
अॅडमिन, कृपया या आयडीकडे लक्ष द्याल का? विनाकारण कुठलीही चर्चा चाललेली असली की तिथे जाऊन भलतेच काहीतरी लिहून येणे, मायबोलीचे तारणहार असल्यागत "चव्हाट्यावर धुणी धुणे" वगैरे शब्दप्रयोग वापरणे, कुणी कुणाला अनुमोदन दिले तर लगेच त्याला झिलतोडे ही पदवी बहाल करणे हे जरा अति होतंय.
Pages