स्पॉट फिक्सिंगच्या आरोपामधे श्रीशांत आणि अजून दोन खेळाडूंना अटक झाली आहे. यावरून काल वृत्तवाहिन्यांमधे कालपासून गरमागरम चर्चा चालू आहेत. आयपीएल बंदच करावे अशी एक टोकाची मागणीदेखील समोर येत आहे. फेसबूक, ट्विटरवर्देखील या चर्चा रंगात आलेल्या आहेत. (मग मायबोलीने का मागे रहावे?)
पण लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की: या खेळाडूंनी फिक्सिंग केले तरी नक्की कशासाठी? आयपीएल व त्यामधून मिळणार्या जाहिरातींमधून कितीतरी उत्पन्न खेळाडूंना राजरोस मिळत आहे. त्याखेरीज वर्षभर इतर टूर्नामेंट्स चालूच असतात. तरीदेखील अजून पैशाच्या लोभाने हे असे फिक्सिंग करावेसे का वाटले असेल? आपण जो खेळ खेळतो त्या खेळाची प्रतारणा, ज्या संघासाठी खेळतो त्याच्याशी प्रतारणा शिवाय कायद्याने गुन्हा ठरणारी गोष्ट जर कुणी करत असेल तर ते नेमके कशासाठी? नुसती पैशाची हाव की अजून काही?? बीसीसीआयच्या खेळाडूंना आता काऊन्सिलीन्ग द्यायची वेळ आली आहे का? बीसीसीआय, खेळाडू, संघ अशा सर्वांनीच आता याचा मुळापासून विचार करायला हवा.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, स्पॉट फिक्सिंग होते ते मुळात बूकीज आणि क्रिकेटवरून चालणार्या सट्ट्यामधे. या व्यवहारामधे बूकीज स्वतःचा फायदा करून घेताना जर खेळाडूला साठ लाख रूपये एका ओव्हरला लावायला तयार असतील तर मुळात किती जण क्रिकेटच्या सट्ट्यावर पैसे लावतात? तेदेखील किती करोडो रूपये? भारतामधे हा जुगार इतका का फोफावत चालला आहे? हीदेखील एक प्रकारे पैशाची हावच म्हणायला हवी ना. आपल्याला ईझी मनी मिळवायची इतकी हौस का असते? कायदाम नैतिकता, मूल्ये यामधे कुठेही न बसणारी अशी ही हौस माणसामधे निर्माण का होत असावी? अशा अनेक प्रश्नांचा इथे उहापोह व्हावा ही आशा.
कृपया, वैयक्तिक ताशेरे, टीकाटिप्पणी करू नका. आपली मते सभ्य भाषेत मांडा. धन्यवाद.
(अवांतर: त्या श्रीशांतला इन्डियन टीममधे स्वत:ची जागा फिक्स करता येत नाही. स्पॉट फिक्सिंग कसलं डोंबलाचं करतोय?)
भाऊ +१ बेस्ट वे बेटिंग लिगल
भाऊ +१
बेस्ट वे बेटिंग लिगल करुन टाका , किमान भारत सरकारला मजबुत टॅक्स तरी मिळेल. >> +१ ललित मोदीच्या वाक्यांशी सहमती दाखवायची वेळ येईल असे वातले नव्हते.
सहज पैसा मिळत असेल तर त्याच्याकडे वळण्याचा मोह टाळणे भल्या भल्यांना जमलेले नाहि.
ह्या सर्व प्रकाराचा एक मोठ्ठा दोष BCCI वर जातो. आयपील चे एकंदर स्वरुप बघता mature नसलेले खेळाडू, प्रचंद पैसा, अनैतिक उद्योगांमधे गुंतलेले shady characters, quick glamour एव्हढे स्फोटक रसायन एकत्र आहे म्हटल्यावर ६ सीजन्स झाल्यावरही anti corruption measures असू नयेत ? जे domestic anti-corruption and security wing म्हणून आहे ते फक्त तोंड देखले आहे नि त्या unit ने ह्या प्रकारामधे किंवा गेल्या वर्षीच्या स्टींग operation मधे फक्त प्रकार जाहिर झाल्यावर जे काहि करायचे ते केले आहे. domestic level वर counselling वगैरे प्रकार फार दूरचे.
BCCI has strongest opposition to ICC's anti-corruption and security unit (ACSU) which is not really surprising when you consider modus operandi of BCCI in general.
For that matter N. Srinivasan's comment about being shocked by blue bolt from sky are hilarious though, coming from the man who has conflicting roles of being BCCI president and owner of the participating team, where playoff games are alays played in home ground of the same team, same team gets preferential treatment during IPL auction and 'suitable' umpires are chosen in playoffs. Ahem ! this is not fixing really ! 
बेस्ट वे बेटिंग लिगल करुन
बेस्ट वे बेटिंग लिगल करुन टाका >>>>>> त्याने काय होइल ? मैच फिक्स करायला जास्तच उत्तेजन मिळेल!
त्यापेक्षा मैच फिक्सिंगच लीगल करुन टाका
असामी, उपरोधाने म्हणत असशील
असामी, उपरोधाने म्हणत असशील तर ठीक आहे पण बेटिंग लिगल करुन काय होणार? मॅच फिक्सिंग खुपच गंभीर आहे त्यापेक्षा. ज्यांच्या जीवावर हे सगळं चालतं त्या मायबाप प्रेक्षकाची धडधडीत फसवणूक आहे मॅच फिक्सिंग.
बेटीग लिगल करुन NSE वर टाकणे.
बेटीग लिगल करुन NSE वर टाकणे. हा उत्तम उपाय. आहे.
If anybody is betting in bulk money on particular stuff like how many runs in one over can be on investigation radar.
Not all people betting are fixing match. They are victim of match fixing. Betting is legal in UK & Singapore. In Singapore all money from betting business goes for charity.
बेटिंग लिगल करुन काय होणार?
बेटिंग लिगल करुन काय होणार? मॅच फिक्सिंग खुपच गंभीर आहे त्यापेक्षा. >> बुवा गोंधळू नका असे. बेटींग लीगल झाले कि त्याच्यावर regulations नि control लावता येतो. हा प्रकार काहि नवा नाही. मॅच फिक्सिंग न होण्यावर अधिक control आणता येणे शक्य होईल. तोवर नि नंतरची कुठे ना कुठे तरी हे प्रकार सुरूच राहणार. पण ह्या संपूर्ण प्रकाराचा एक मोठा भाग लीगल झाल्यामूळे हा राक्षस थोडा तरी काबूत ठेवता येईल. अर्थात त्याने फिक्सिंग पूर्णपणे बंद होईल असा भाबडा आशावाद माझ्याकडेही नाहिये.
असामी, माझा साधा प्रश्न होता.
असामी, माझा साधा प्रश्न होता. बेटिंगशी मॅच फिक्सिंगचा काय संबंध? बेटींग लिगल केल्याने असा काय रेग्युलेशन किंवा कंट्रोल आमलात आणता येइल जेणेकरुन लोकं मॅच फिक्सिंग करता पैसे देणे आणि घेणे बंद करतील?
पण ह्या संपूर्ण प्रकाराचा एक मोठा भाग लीगल झाल्यामूळे हा राक्षस थोडा तरी काबूत ठेवता येईल.>>>>> हा पण नुसताच आशावाद वाटतोय मला. बेटिंग लिगल केले तरी फक्त लोकं टॅक्स भरायला लागतील असं म्हणूयात इथेही परत आशावाद आलाच कारण भारतात लोकांना (खास करुन व्यवसाय करणार्यांना) फक्त पैसे कमवायचे असतात,मार्ग कुठलाही असो, वैध किंवा अवैद्य आणि त्या पशातून सरकार ला टॅक्स देणे म्हणजे जवळ जवळ पापच वाटतं त्यांना (भारतात ब्लॅकचा पैसा किती आहे हे आपण सगळेच जाणतो). आता टॅक्स भरला म्हणून त्यांची भूक कमी होइल की वाढेल? रेग्युलेशनचे म्हणाल तर लिगल केल्यामुळे टॅक्स इवेजन ह्या अँगलमुळे इन्कम टॅक्स वाल्यांच्या अखत्यारीत हे येइल येवढ्ं होऊ शकतं आणि सरकारला जास्त टॅक्सरुपी पैसे मिळायला मदत होईल पण जास्तीत जास्त पैसे कमवायला ही लोकं थेट खेळाडू, अंपायर वगैरेंना पैसे खाऊ घालणार नाहीत ह्याची ग्यारंटी काय? थोडक्यात मला अजूनही बेटींङ लिगल करुन मॅच फिक्सिंग ला आळा कसा घालणार हे कळत नाही.
बेटींग लीगल झाले कि
बेटींग लीगल झाले कि त्याच्यावर regulations नि control लावता येतो >>>>>>>
असे regulations नि control लावता येत असते आणी ते सहजासहजी पाळले जात असते तर मग इतकी चर्चा करायचीच गरज पडली असती का ? regulations नि control लावता येत असते आणी ते सहजासहजी पाळले जात असते तर मग ilegal बेटिंग झाले असते का ?
बेटींग लीगल झाले तर एवढेच होइल की सरकारी नोकरांना, पोलिसांना अजुन एक खायला कुरण मिळेल.
भारतात लोकांना (खास करुन
भारतात लोकांना (खास करुन व्यवसाय करणार्यांना) फक्त पैसे कमवायचे असतात,मार्ग कुठलाही असो, वैध किंवा अवैद्य आणि त्या पशातून सरकार ला टॅक्स देणे म्हणजे जवळ जवळ पापच वाटतं त्यांना (भारतात ब्लॅकचा पैसा किती आहे हे आपण सगळेच जाणतो
वैद्यबुवा, जरा हिंदी सिनेमा नि भारत यातून बाहेर येऊन ज्या देशात रहाता तिथल्या गोष्टीत जास्त लक्ष घाला म्हणजे भारत काही विशेष वेगळा आहे, टीकेला पात्र आहे असे नाही हे कळेल. या बाबतीत जगातल्या देशांनी (नेहेमीसारखेच) भारताला पाSर मागे टाकले आहे. ब्लॅकचा पैसा काय नि देशाबाहेर पैसे ठेवणे काय, सरकारला टॅक्स न देण्याच्या क्लृप्त्या अमेरिकेत राहून शिका.
नि कुठल्याहि मार्गाने पैसे मिळवायचे हे कुठे बरे जास्त चालते? देशातल्या लोकांना उपाशी मारून चीनमधल्या लोकांकडून स्वस्तात काम करून घेऊन स्वतःची तुंबडी भरण्याचे धंदे करून जास्त पैसे कोण मिळवतो?
जसे सिनेमात लोक अभिनय, संगित, दिग्दर्शन, (आणि हो, वेशभूषा सुद्धा) इ. बघायला जातात, इतर धंदे काय चालतात ते माहित असून तिकडे दुर्लक्ष करतात. तसे आपण, काय छान क्षेत्ररक्षण, फलदाजी, गोलंदाजी तेव्हढे बघावे. बाकी उग्गाच जग सुधारण्याच्या गोष्टी करू नये.
वैद्यबुवा, जरा हिंदी सिनेमा
वैद्यबुवा, जरा हिंदी सिनेमा नि भारत यातून बाहेर येऊन ज्या देशात रहाता तिथल्या गोष्टीत जास्त लक्ष घाला म्हणजे भारत काही विशेष वेगळा आहे, टीकेला पात्र आहे असे नाही हे कळेल.>>>>>>>
झक्की, अहो आता भारतात चाललेला क्रिकेट मधला भ्रष्टाचार व फसवणूक हा विषय नाहीये का आपला? मग मी बाकी देश कसे भ्रष्टाचारात पुढे आहेत ह्याबद्दल कशाला भाष्य करु?
>> बाकी देश कसे भ्रष्टाचारात
>> बाकी देश कसे भ्रष्टाचारात पुढे आहेत ह्याबद्दल कशाला भाष्य करु?
म्हणजे? त्याशिवाय धागा भरकटणार कसा?! कैत्तरीच प्रश्न!
<<...तसे आपण, काय छान
<<...तसे आपण, काय छान क्षेत्ररक्षण, फलदाजी, गोलंदाजी तेव्हढे बघावे.>> व 'स्पॉटफिक्सींग' हें देखील क्रिकेटच्या गाजलेल्या ' ग्लोरिअस अनसर्टन्टीज'पैकींच आणखी एक आहे असें समजावे !

डोळे फाडफाडून आयपीएल
डोळे फाडफाडून आयपीएल पहाणार्यांच्या डोळ्यात चांगलीच तिखटाची पूड टाकण्यात आली आहे

हुडा अरे फक्त क्रिकेट करताच
हुडा
अरे फक्त क्रिकेट करताच पबलिक आयपियेल बघतात असं वाटतं की काय तुला? खुप दिवसांनी दिसलास? आल इज वेल?
<< आयपीएल पहाणार्यांच्या
<< आयपीएल पहाणार्यांच्या डोळ्यात चांगलीच तिखटाची पूड टाकण्यात आली आहे>> पण झोंबून थयथयाट होतोय भलत्यांचाच !
पण झोंबून थयथयाट होतोय
पण झोंबून थयथयाट होतोय भलत्यांचाच ! >>
सगळीकडेच , " मी आधीच नव्हतं का सांगीतलं" टाईप लोकं असतातच.
लोकांना खेळापेक्षा भ्रष्टाचार
लोकांना खेळापेक्षा भ्रष्टाचार आणि फिक्सिंगच्या चर्चेतच जास्त रस आहे असे दिसतेय
दोन महीने तो आयपीएलचा धागा चालू आहे, तिकडे चांगल्या खेळाला दाद द्यायला काही निवडकच लोक असतात आणि इथे टीका करायला मात्र आयड्यांची ही गर्दी!
पाँटींग/द्रवीडच्या कॅचेसचे कौतुक करायला, हैद्राबादच्या जिगरला दाद द्यायला, सचिनचा खेळावर कौतुकाचा वर्षाव करायला, डेल स्टेनच्या तोफखान्याला सलाम करायला अणि गेलच्या खेळीवर जीव ओवाळून टाकणारे दोन शब्द लिहण्यापेक्षा काही काही लोकांना बीसीसीआय, आयपीएल, संघमालक आणि खेळाडू यांना शिव्या देणारे पॅराच्या पॅरा लिहण्यातच परमानंद मिळतो असे दिसतेय!
स्पॉट/मॅच फिक्सिंग सारखे प्रकार कधीच क्षम्य नसतात पण ते चांगल्या प्रामाणिक खेळापेक्षा आणि खेळाडूंपेक्षा मोठे पण नसतात
बुवा माझ्या तुटपुंज्या
बुवा माझ्या तुटपुंज्या माहितीनुसार regulations नि controls नी fixing सारख्या गोष्टी काबूत ठेवता येतात हे वाचले होते. अर्थात मी trained economist नसल्यामूळे माझे मत चुकीचे असू शकते. illegal or legal, it's pretty impossible to stop fixing, be it spot or match. Legalizing betting allows government, sports organizations (not players) to involve in controlling it in order to avoid it compromising integrity of game. कुठल्या aspects वर betting करता येते हे ठरवता येईल. त्याचा दुरुपयोग आत्ताही होत आहे नि नंतरही होईल पण system transparent बर्याच गोष्टी, जसे कि कोणावर बेटींग होते, कोण कोणाला कसे approach होते, पैसे कुठे अधिक फिरतात वगैरे monitor करता येईल. हे सगळे कसे होते हे थोडेसे गूगलत तर सापडेल.
ह्याने मॅच fixing ला संपूर्ण आळा बसेल ह्याचे उत्तर तरीही नाहि असेच आहे. बाकी सगळ्या system चा कशा ना कशा प्रकारे गैर फायदा घेणारे सगळीकडेच असतत त्यामूळे system असावी कि नाही हा प्रश्न किंवा सर्वसमावेशक system असावी कि नाही ह्यापेक्षा practical system असणे महत्वाची असे मला वाटते.
( इथे मी टॅक्स चा मुद्दा मांडलेलाच नाहिये हे लक्षात घ्या).
>>एका १२ वर्षाच्या मुलाचा जीव
>>एका १२ वर्षाच्या मुलाचा जीव गेला या बेटिंगमुळे >>
प्रियाशी सहमत.. यातून निर्माण होणारे सामाजिक प्रश्न पैशाच्या हावेपलिकडे जातात, रक्तरंजित निर्घृण कृत्ये वाचताना थरकाप होतो. त्या लहान मुलाचा काय दोष होता ? या घटनेचा कसला न्याय कधी होईल ?
लोकांना खेळापेक्षा भ्रष्टाचार
लोकांना खेळापेक्षा भ्रष्टाचार आणि फिक्सिंगच्या चर्चेतच जास्त रस आहे असे दिसतेय >> स्वरुप ह्यात खटकण्यासारखे काय आहे ? its scandalous and bound to gather more toms. IPL चा धागा आहेच ना जिथे आपण क्रिकेटबद्दल बोलतोय. ज्यांना क्रिकेट्मधे interest नसेल ते नाहिच येणार तिकडे.
असामी, तू मला माझा गोंधळ झाला
असामी, तू मला माझा गोंधळ झाला असं म्हंटलास म्हणून मला वाटलं की तुझ्याकडे त्याचा डायरेक्ट संबंध कसा ह्याबद्दल माहिती आहे. इकॉनॉमिस्टचा मुद्दा बरोबर आहे आणि मला नेमकं तेच जाणून घ्यायचं होतं. बर्याच वेळा आपला ह्या गोष्टीचा अभ्यास नसल्यामुळे नेमके कनेकशन कसे आहे ते कळत नाही.
स्वरुप, क्रिकेट मध्ये इंटरेस्ट आहे पण सध्या आयपिएल मध्ये नसेल असंही होऊ शकतं ना? मला स्वतःला आयपिएल ची आवड अशी नाहीच लागली पण भारताच्या मॅचेस असल्या की आवर्जून बघतो. ह्याउपर आयपिएल बघत असून सुद्धा तिथे बाफं वर चर्चा करायची कोणाची इच्छा नसेल हे ही असू शकतं. थोडक्यात इथे लिहायला/ह्या विषयावर लिहायला आयपिएल वर चर्चा केलीच पाहिजे हे प्रीरेक्व्जिट नाही असू शकत.
कदाचित त्या बूकी, सट्टेबाज
कदाचित त्या बूकी, सट्टेबाज लोकानी खेळाडुना धमकावाले असेल की जर तुम्ही आम्हाला सह्कार्य नाही केलेत तर आम्ही तुमच्या जीवाच काही बर वाईट करु म्हणुन? आणि एकदा तुम्ही पैशाच्या मोहामधे फ़सलात की बाहेर पडणे कठीण. असे ही झालेले असु शकते.
फक्त क्रिकेट करताच पबलिक
फक्त क्रिकेट करताच पबलिक आयपियेल बघतात असं वाटतं की काय तुला
तेच तर, चीअरलीडर्स असतात, नटनट्या असतात प्रेक्षकात. नाहीतर इतर चांगले दिसणारे लोक मोठ्या टीव्हीवर दाखवतात. कदाचित खेळाडू भडकून एकमेकांना थोबाडीत मारतात, कुणि तरी बाइ कुणाला तर मिठ्या मारते, लै गंमत राव.
थोडक्यात इथे लिहायला/ह्या विषयावर लिहायला आयपिएल वर चर्चा केलीच पाहिजे हे प्रीरेक्व्जिट नाही असू शकत.

इन जनरलच मायबोलीवर लिहायला आय डी नि कीबोर्ड हे दोनच प्रेरेक्विझिट.
अक्कल गहाण ठेवून, विषयाला सोडून बोलणे, भलताच अर्थ काढून कुणाला तरी नावे ठेवणे अशी गंमत करायला यायचे. त्यातल्या त्यात या धाग्यावर काही काही लोक बारीक नजर ठेवून आहेत असे दिसते. हे लोक इतरहि धाग्यावर मधेच कुठेतरी काहीतरी लिहीतात. मूळ विषयाशी संबंधित असेल असे नाही. कुठे महत्वाच्या नसलेल्या चुका काढणे वगैरे.
दोन महीने तो आयपीएलचा धागा
दोन महीने तो आयपीएलचा धागा चालू आहे, तिकडे चांगल्या खेळाला दाद द्यायला काही निवडकच लोक असतात आणि इथे टीका करायला मात्र आयड्यांची ही गर्दी!>>>>>>>>> असे असेल तर आनंदच आहे. आयपीएल हा मुर्खाचा बाजार आहे हे बहुसंख्यांना कळतय ही काहि वाइट गोष्ट नाहि.
स्पॉट/मॅच फिक्सिंग सारखे प्रकार कधीच क्षम्य नसतात पण ते चांगल्या प्रामाणिक खेळापेक्षा आणि खेळाडूंपेक्षा मोठे पण नसतात>>>>>> म्हणजे काय बुवा ? स्पॉट/मॅच फिक्सिंग तर कधीच क्रिकेटपेक्षा मोठे झाले आहे. नाहितर राजकारणातले भ्रष्टाचारी धुरंधर अध्यक्षपदासाठी काय देशप्रेम म्हणूण येतात ? पण डोळ्यावर झापडे बांधुन रहाणार्यांबद्दल आमचे काहिच म्हणणे नाहि.
>>हे प्रीरेक्व्जिट नाही असू
>>हे प्रीरेक्व्जिट नाही असू शकत.
बरोबर आहे वैद्यबुवा.... सक्ती नाहीच आहे.... पण जितकी पोटतिडकीने आणि तावातावाने टीका केली जाते... दोषारोप केले जातात..... ती कळकळ चांगल्याचे कौतुक करताना दिसत नाही
आयपीएलचे जाउ द्यात हो पण वरती गळा काढणारे बरेच आयडी कधी क्रिकेटच्या धाग्यावर पण दिसले नाहीत
आयपीएलचे जाउ द्यात हो पण वरती
आयपीएलचे जाउ द्यात हो पण वरती गळा काढणारे बरेच आयडी कधी क्रिकेटच्या धाग्यावर पण दिसले नाहीत>>>> परत तेच, अहो आपले tax चे पैसे घेउन त्यातुन पैसे खायचे, शेतकर्यांना पिण्याला पाणी हवे असताना मैदानावर पाणी मारायचे, परत सर्व कर माफ, बाहेरच्या देशातुन हे गाड्या आणणार, त्यातहि कर माफ मिळवणार, तिकडे १५ दिवस पाण्यात हक्कची जमीन जाउ नये म्हणुन शेतकी पाण्यात उभे रहातात तर इकडे यांनी जागा घेतली की यांना वेगळा FSI हवा. कसे काय यायचे हो त्या धाग्यांवर कौतुक करायला!
बर पण इथे आयपीएलला नावे ठेवले म्हणुन गळा काढणारे आयडींना रणजी मधे खेळलेल्या बुज्रुर्ग खेळाडुंची आज जी दुरवस्था आहे , त्यांना जी मदत हवी आहे त्याची माहिती तरी ठेवतात का ?
<< चीअरलीडर्स असतात, नटनट्या
<< चीअरलीडर्स असतात, नटनट्या असतात प्रेक्षकात. नाहीतर इतर चांगले दिसणारे लोक मोठ्या टीव्हीवर दाखवतात. कदाचित खेळाडू भडकून एकमेकांना थोबाडीत मारतात, कुणि तरी बाइ कुणाला तर मिठ्या मारते, लै गंमत राव.>> आपल्याला फक्त गुणी,प्रतिभावान, उदयोन्मुख व प्रथितयश महान खेळाडू हे सर्व आपलं कसब पणाला लावून खेळताना पहायला मिळाले कीं बस्स ! बाकी, II जो जें वांछिल, तें तो लाहो, प्राणिजात II
भाऊसाहेब जबरीच! एक
भाऊसाहेब
जबरीच!
एक अॅडिशनः
"चीअरगर्ल स्क्रीनवर दिसेल तेव्हा तुम्ही माझ्याकडे बघत जा, म्हणजे चीअरफुलही वाटेल आणि क्रिकेटमधील स्वारस्यही वाढेल"
डोळे फाडफाडून आयपीएल
डोळे फाडफाडून आयपीएल पहाणार्यांच्या डोळ्यात चांगलीच तिखटाची पूड टाकण्यात आली आहे
----बंद असलेल्या डोळ्यात तिखटाची पूड जाणारच नाही...
मॅच फिक्स, स्पॉट फिक्स हे सर्व क्रिकेटचे अविभाज्य अंग आहे.... माना अथवा मानू नका. मी सर्व खेळ आवडीने गंम्मत म्हणुन बघतो.
माणुस यांच्या पोस्टीशी सहमत...
नेहेमीप्रमाणेच भाऊंचा षटकार !
नेहेमीप्रमाणेच भाऊंचा षटकार ! चेंडू सीमेपलिकडे!
>>जो जें वांछिल, तें तो लाहो,
>>जो जें वांछिल, तें तो लाहो, प्राणिजात
हा शालजोडीतला मात्र मस्त
न्यूजवाल्यांना दोन दिवसाचे मस्त खाद्य मिळाले!
Pages