आयपीएल फिक्सिंग : पैशाची हाव कुठवर?

Submitted by नंदिनी on 16 May, 2013 - 23:18

स्पॉट फिक्सिंगच्या आरोपामधे श्रीशांत आणि अजून दोन खेळाडूंना अटक झाली आहे. यावरून काल वृत्तवाहिन्यांमधे कालपासून गरमागरम चर्चा चालू आहेत. आयपीएल बंदच करावे अशी एक टोकाची मागणीदेखील समोर येत आहे. फेसबूक, ट्विटरवर्देखील या चर्चा रंगात आलेल्या आहेत. (मग मायबोलीने का मागे रहावे?)

पण लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की: या खेळाडूंनी फिक्सिंग केले तरी नक्की कशासाठी? आयपीएल व त्यामधून मिळणार्‍या जाहिरातींमधून कितीतरी उत्पन्न खेळाडूंना राजरोस मिळत आहे. त्याखेरीज वर्षभर इतर टूर्नामेंट्स चालूच असतात. तरीदेखील अजून पैशाच्या लोभाने हे असे फिक्सिंग करावेसे का वाटले असेल? आपण जो खेळ खेळतो त्या खेळाची प्रतारणा, ज्या संघासाठी खेळतो त्याच्याशी प्रतारणा शिवाय कायद्याने गुन्हा ठरणारी गोष्ट जर कुणी करत असेल तर ते नेमके कशासाठी? नुसती पैशाची हाव की अजून काही?? बीसीसीआयच्या खेळाडूंना आता काऊन्सिलीन्ग द्यायची वेळ आली आहे का? बीसीसीआय, खेळाडू, संघ अशा सर्वांनीच आता याचा मुळापासून विचार करायला हवा.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, स्पॉट फिक्सिंग होते ते मुळात बूकीज आणि क्रिकेटवरून चालणार्‍या सट्ट्यामधे. या व्यवहारामधे बूकीज स्वतःचा फायदा करून घेताना जर खेळाडूला साठ लाख रूपये एका ओव्हरला लावायला तयार असतील तर मुळात किती जण क्रिकेटच्या सट्ट्यावर पैसे लावतात? तेदेखील किती करोडो रूपये? भारतामधे हा जुगार इतका का फोफावत चालला आहे? हीदेखील एक प्रकारे पैशाची हावच म्हणायला हवी ना. आपल्याला ईझी मनी मिळवायची इतकी हौस का असते? कायदाम नैतिकता, मूल्ये यामधे कुठेही न बसणारी अशी ही हौस माणसामधे निर्माण का होत असावी? अशा अनेक प्रश्नांचा इथे उहापोह व्हावा ही आशा.

कृपया, वैयक्तिक ताशेरे, टीकाटिप्पणी करू नका. आपली मते सभ्य भाषेत मांडा. धन्यवाद.

(अवांतर: त्या श्रीशांतला इन्डियन टीममधे स्वत:ची जागा फिक्स करता येत नाही. स्पॉट फिक्सिंग कसलं डोंबलाचं करतोय?)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयपीएल आवडून घ्यायचा प्रयत्न केला एक सिझन पण आय जस्ट कान्ट !
मला ती फक्त' एंटरट्र्न्मेन्ट' वाट्तते , फार तर क्रिकेट वरचा मुव्ही चाल्लाय असं वाट्त , ़लुक्स १००% फेक टु मी :).
पैसेच मिळवायला आलेत सगळे या ना त्या प्रकारे :).

डीजे, मग राजरोस मिळवू देत की पैसे. कोण नाय म्हणतंय. वाटलं तर अजून दोन चार डान्स शोज करा, लग्नांमधे गेस्ट म्हणून जा, पण फिक्सिंग करून स्वतःचे करीअर धोक्यात कशाला घालताय? Proud

आपली मते सभ्य भाषेत मांडा. >> Happy Now that he's paid a heavy price for having a towel, maybe he should check with Ranbir Kapoor price for dropping the towel. सभ्य इनफ?? Happy (तुझाच डान्स शोचा मुद्दा जरा सभ्य भाषेत मांडला) आय पी एल मध्ये कोण ग सभ्य भाषा वापरत? शाहरुख पासून सगळे तिथे गोंधळ करतात. आम्हा बिचार्या मा.बो. वाल्यांना सभ्यतेचा आग्रह.

एका ओव्हर मधे १४ रन्स किंवा जास्त द्यायचे...पण रन्स काढणे तर फलंदाजाचे काम... भले गोलंदाजाने कितीही वाईट चेंडु टाकला तरी समोरच्याने त्यावर अचुक फटका मारणे सुध्दा तेवढेच महत्वाचे असते....
वाईड टाकलेल्या चेंडुवर स्वेअरकट मारताना आउट झालेले कित्येक फलंदाज आहेत...आता फलंदाजाला कुठे माहीती आहे की समोरच्या गोलंदाजाला अमुक तमुकच रन्स द्यायचे आहेत ..????

फिक्सिंग हे वाईटच आहे... आणि अश्या खेळांडुंना मोक्का लावणार आहे हे जाहीर केलेले आहे......

उदयनला अनुमोदन, रवी शास्त्री म्हणतो तसे 'हाउएव्हर बॅड डिलिव्हरी, यू स्टील हॅव टू हिट द बॉल'.
प्रोफेशनल क्रिकेटर्सचा करिअर स्पॅन फार थोडा आहे आणि स्पर्धा भयानक त्यामुळे मिळतेय तोवर ओरबाडून घ्या असा विचार करीत असावेत.
काल आयबीएन-लोकमतवर वागळे एकदम इमोशनल गळा काढत होते; 'ज्या नेट्मधे सचिन खेळला तिथेच अंकित चव्हाण कसा निपजला?' गिव्ह मी अ ब्रेक, संबंध काय याचा?

तारे........... तब्बल ३ वर्ष सतत बेंच वर बसलेला होता.....त्याला चांसच मिळाला नाही.... प्रचंड गुणवत्ता असलेल्या खेळाडुंना वावच नाही मिळत.... पण याचा अर्थ हा होत नाही की त्यांनी फिक्सिंग करावे....
या बाजुकडे देखील लक्ष द्यावे

This spot Fixing scandal has given all IPL haters a chance to bash . The media has gone to levels of "CALL IPL OFF"
The funniest thing is politicians calling for this
Yes , there was spot fixing , no defending it , Ban them for life , but where it doesn't happen ? How can whole IPL be bad because of this ? What about Cronje and Azhar then ? Or Amir or Danish ? It's just about person's integrity , where there is a Shree , there is a Dravid . It's as simple as that . It's just entertainment anyway , enjoy it .
If you want to really watch cricket , ENG - NZ IS UNDERWAY , WATCH BOULT SWINGING RED CHERRY !!

एक दोन खेळाडूंमुळे आयपीएल बंद करण्याची मागणी होते तर.... सगळे राजकीय पक्ष आधी बंद करा... आणि संसद बरखास्त करून देश आर्मी कडे द्या....

दिपांजलीच्या पहिल्या पोस्टला अनुमोदन.
हे आयपीएल कशाशी खातात मला काही कळत नाही. पण बडी बडी धेंडं म्हणे खेळाडूंचा लिलाव करून त्यांना विकत घेतात.
आपल्याकडे राष्ट्रपती राजवट सुरू व्हायला हवी. असली थेरं बंद करून जे काही पैसे असतील ते गोर गरिबांच्या कल्याणासाठी वापरायची सक्ती करायला हवी. पैशाच्या जोरावर माजलेत सगळे. ज्याला त्याला नुसते पैसे हवेत.

IPL चा एकंदरीत फॉर्मॅट स्पॉट फिक्सिंगला पुरक आहे, एखादी विकेट, ओव्हर, ओव्हरथ्रो, बॅटींग ऑर्डर याने निकालात मोठा फरक पडू शकतो, त्यामुळे याकडे एक सिरिअस क्रिकेट म्हणुन न बघता मनोरंजन म्हणुन बघायचे मग फार धक्का बसत नाही.

बेटींग लिगल करावे हेच योग्य

नुसती पैशाची हाव की अजून काही?? >> मला नेहमी असा प्रश्न पडतो की खेळाडू यात स्वतःहून गुंततात की त्यांना जबरदस्तीने गुंतवलं जातं? बूकी, सट्टा, अंडरवर्ल्ड कनेक्शन इत्यादी शब्द कानावर पडले की असं वाटतं की खेळाडूंना यात गुंतवणं हा जबरदस्त ब्लॅकमेलिंगचा प्रकार असावा.

कुठला विषय कुठे चाललाय ? जिथे पैसा आहे तिथे भ्रष्टाचार आहे . आयपीएल चा आणी क्रिकेटचा काय संबंध ?
असो , हे सगळ प्रत्येक खेळात चालत . ज्याना खरोखर यात interest आहे , त्यांच्यासाठी . जरूर वाचा .
इटलीच्या टॉप फुटबॉल लीग मधला प्रकार , आणी त्यावर्षी इटलीने वर्ल्ड कप जिंकला होता .
http://en.wikipedia.org/wiki/2006_Italian_football_scandal

<<<<<<<<एका ओव्हर मधे १४ रन्स किंवा जास्त द्यायचे...पण रन्स काढणे तर फलंदाजाचे काम... भले गोलंदाजाने कितीही वाईट चेंडु टाकला तरी समोरच्याने त्यावर अचुक फटका मारणे सुध्दा तेवढेच महत्वाचे असते....
वाईड टाकलेल्या चेंडुवर स्वेअरकट मारताना आउट झालेले कित्येक फलंदाज आहेत...आता फलंदाजाला कुठे माहीती आहे की समोरच्या गोलंदाजाला अमुक तमुकच रन्स द्यायचे आहेत ..???? >>>>>>>उदयनजिनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला आहे त्या फलंदाजान्चीही चौकशी झाली पाहिजे

नंदिनी,

खूप चांगला धागा. प्रश्न मात्र असे मांडले आहेत की त्यांची उत्तरे पार क्षणाचा मोह, गुन्हेगारी मानसिकता ते अध्यात्म वगैरेपर्यंत स्पॅन व्हावीत.

या खेळाडूंनी फिक्सिंग केले तरी नक्की कशासाठी?<<< एक शक्यता अशी आहे की मुख्य आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळण्याची शक्यता नसल्याने याच स्पर्धेदरम्यान जमतील तितके कमवून घ्यावेत.

नुसती पैशाची हाव की अजून काही?<<< नुसती पैशाची हावच असावी, पण ही हाव मात्र प्रचंड असावी. 'नुसती' या शब्दाने वर्णिण्यासारखी मर्यादीत नसावी. अर्थातच माणसवरील संस्कार, मोह टाळण्याची इच्छा नसणे, प्रामाणिकपणाचा अभाव, कायद्याबाबत बेदरकारी ही सगळी कारणे त्यामागे असावीत.

बीसीसीआयच्या खेळाडूंना आता काऊन्सिलीन्ग द्यायची वेळ आली आहे का? <<< यातील 'आता' हा शब्द थोडा ट्रिकी आहे. हे हल्लीच वाढले आहे असे आपण सगळे समजतो. कोण जाणे खूप आधीपासून होत असेल आणि प्रकाशात आलेच नसेल? आठवा: पाकिस्तानचे अकरा खेळाडू असतानाही फक्त इम्रान खानने केलेले अपील त्यांच्या दोन पंचांनी उचलून धरणे आणि सहाव्या स्टंपवर जाणारा बॉल पायचीत होण्यास कारणीभूत होणे! परिणाम, चार टेस्टमध्ये भारत शून्य विरुद्ध चार असा हारणे! तसेच, फक्त भ्रष्टाचार हीच बाब कौंसेलिंगसाठी पोटेन्शिअल बाब आहे का? शिवीगाळ, मारामार्‍या, नाईट क्लब्ज, कोड ऑफ कंडक्टचे पालन न होणे हे सगळेच नाही का?

तर मुळात किती जण क्रिकेटच्या सट्ट्यावर पैसे लावतात? तेदेखील किती करोडो रूपये?<<<

आपण टीव्हीवर पाहतो तो आय पी एल सामना एक निव्वळ 'दृष्य परिणाम' आहे असे इमॅजिन केले, तर याचे थोडेसे उत्तर कल्पिता येईल असे वाटते. हे सामने हे मुळातच कुरण उपलब्ध होण्यासाठी आहेत व ती भूमिका ठामपणे घेतली गेलेली आहे. दिखावा प्रचंड प्रमाणात असणे हे मुळातच पैसा खोर्‍याने ओढण्यासाठी आहे. मग तो पांढरा असो वा काळा! तेव्हा, सामन्यासाठी होत असलेली उलाढाल ही अक्षरशः नगण्य ठरेल अशी उलाढाल सामन्याबाहेरील सट्टेबाजांच्या जगात चालते असे दिसून येईल आणि पैसा काळा होताना पाहून डोळे पांढरे होतील. किंबहुना, सट्टा करता यावा म्हणून सामने योजले जात आहेत की काय असे वाटावे अशीही परिस्थिती दिसेल. त्यामुळे करोडो आणि अब्ज हे आकडे क्षुल्लक ठरून परार्धामध्ये गणती करावी लागेल.

भारतामधे हा जुगार इतका का फोफावत चालला आहे?<<<

१. भारतामध्ये क्रिकेटवेडे जगात सर्वाधिक आहेत.
२. नीतीमूल्ये न पाळणार्‍यांची व तशीही एकुणच लोकसंख्या खूप असणार्‍या देशात भारत बराच वरच्या क्रमांकावर आहे.
३. फितुरी, देशद्रोह हे शाप आपल्या देशाला अधिक आहेत असे इतिहास सांगतो.
४. कायद्याची अंमलबजावणी शैथिल्यपूर्ण असून कायद्यांची तीव्रता हास्यास्पद आहे.

कायदा नैतिकता, मूल्ये यामधे कुठेही न बसणारी अशी ही हौस माणसामधे निर्माण का होत असावी?<<<

उघड आहे, वरील बहुतेक कारणे आणि कष्टांचा कंटाळा!

उत्तरे अगणित आहेत, प्रश्नही तितकेच! पण एकच विचार केला तरी हे सगळे संपू शकेल. 'मला असे करायचे नाही आहे' एवढे प्रत्येकाने ठामपणे ठरवले तरच सुधारणा होणे शक्य आहे. आणि नेमके हेच जवळपास अशक्य आहे. Happy

एक हॅन्सी क्रोनिए होता ज्याने फक्त सहज म्हणून पीचची माहिती दिली व प्रामाणिकपणे कबूल केले तर दक्षिण आफ्रिकेने त्याला सहा महिने अज्ञातवासात ठेवून नंतर एका (बहुधा ठरवून केलेल्या) विमान अपघातात मारून टाकले. एक अजय जडेजा आहे ज्याने काहीही कबूल केले नाही पण रोज त्याचा हासरा आणि नाचरा चेहरा निर्लज्जपणे झळकतो आणि आपणही निर्लज्जपणे तो बघतो. एक नवज्योत सिद्धू आहे ज्याने हॉकीस्टिकने चक्क एकाचा खून केलेला आहे तो कपिलदेवसारख्याच्या मांडीला मांडी लावून गप्पा मारायला टीव्हीवर बसतो. Happy

-'बेफिकीर'!

<<आपल्याला ईझी मनी मिळवायची इतकी हौस का असते? कायदाम नैतिकता, मूल्ये यामधे कुठेही न बसणारी अशी ही हौस माणसामधे निर्माण का होत असावी?>> ह्याचं अचूक उत्तर शोधणं अत्यावश्यक असूनही सांपडणं कठीणच. क्रिकेटच्या संदर्भात मला सहज सुचलेले हे कांहीं विचार उत्तराकडे नेतातच अशी माझी स्वतःचीच खात्री नाहीय-
१] ह्या हौसेच्या विळख्यात सारी व्यवस्थाच अडकली असताना क्रिकेट मात्र त्यापासून पूर्णपणे अलिप्त राहील अशी अपेक्षा करणं योग्य आहे का ?;
२] अशा वातावरणातही कायदा व नैतिकता पाळून पैसे मिळवणारे द्रविड, सचिन, लक्ष्मण इत्यादींसारखे जे खेळाडू आहेत त्यांचं कौतुक करायचं सोडून त्यांच्या मिळकतीवर उपहासात्मक शेरेबाजी केल्याने त्याप्रकारच्या वर्तणुकीच्या आदर्शांचंच खंडन होत नाही का ?;
३] समाजाच्या एका मोठ्या घटकाच्या प्रत्येकच गोष्टीला हेटाळणीपूर्वक " मिडल क्लास मेंटॅलिटी' म्हणून धुडकावण्याचं फॅडही घातक ठरत असावं; त्या घटकाने जोपासलेलीं चांगलीं मूल्यंही या फॅडमुळे बाद ठरत गेलीं असावीत;
४] निखळ गुणवत्ता व प्रामाणिक प्रयत्न या ऐवजीं कसल्याही मार्गाने मिळवलेला पैसा व यश याचंच उदात्तिकरण होत राहिलं तर मुलांपुढे तेच आदर्श ठेवण्यासारखं नाही का होत ?; व
५] खेळण्याचा व खेळ पहाण्याचा आनंद निकोप वृत्ती जोपासतो याचं आत्यंतिक महत्वच आपल्याला मनापासून पटलेलं नसावं; त्यामुळे खेळाकडे एक तर टवाळगिरी/ टाईमपास किंवा मटक्यासारखा जुगार असंच बव्हंशी पाहिलं जात असावं;

आजच्या 'मिड-डे'मधे डॉन ब्रॅडमन यांचं एक पूर्वीचं विधान छापण्यात आलं आहे. त्याचा स्वैर अनुवाद -
"आपण इथून पुढे कुठे जाणार आहोत ? कसोटी व एकदिवसीय सामन्यांच्या रेट्यात प्रवास, प्रसिद्धि व दबावाखाली वावरणार्‍या हल्लीच्या खेळाडूंची मला कींव वाटते. अमाप पैसा हे त्याबद्दलचं बक्षीस आहे. पण, परिणामीं व्यक्तीनिष्ठ कामयाबीचं [ personal achievement ] समाधान कमी व धंदेवाईकपणाला शरणागती अधिक असं झालं असण्याची मला काळजी वाटते. हें सगळं योग्य दिशेने चाललंय का, हें फक्त इतिहासच ठरवूं शकेल "

@बेफिकीर
>>एक हॅन्सी क्रोनिए होता ज्याने फक्त सहज म्हणून पीचची माहिती दिली व प्रामाणिकपणे कबूल केले तर दक्षिण आफ्रिकेने त्याला सहा महिने अज्ञातवासात ठेवून नंतर एका (बहुधा ठरवून केलेल्या) विमान अपघातात मारून टाकले. एक अजय जडेजा आहे ज्याने काहीही कबूल केले नाही पण रोज त्याचा हासरा आणि नाचरा चेहरा निर्लज्जपणे झळकतो आणि आपणही निर्लज्जपणे तो बघतो. एक नवज्योत सिद्धू आहे ज्याने हॉकीस्टिकने चक्क एकाचा खून केलेला आहे तो कपिलदेवसारख्याच्या मांडीला मांडी लावून गप्पा मारायला टीव्हीवर बसतो. <<

सहमत. पण एका अतिथोराला विसरलात.
ज्याला मॅच फिक्सिंगमधे सामील झाल्याबद्दल भारताकडून खेळण्यास बंदी घातली होती तो अझरुद्दिन तर काँग्रेसचा खासदार म्हणून संसदेत बसतो. कायदे करण्याचा अधिकार बाळगतो. त्याचेही या देशातील लोकांना कांही वाटत नाही.
श्रीसंथने देखील निराश होउ नये आपले लोक त्याला खासदारकी, आमदारकी वा कुठले ना कुठले तरी मानाचे पद देतीलच! किंबहुना आता तर तो अशा पदांसाठी अतियोग्य झाला. त्याने सत्तेवर कोण येईल याचा अंदाज घेऊन कोणत्यातरी .योग्य त्या राजकीय पक्षात लवकरात लवकर ऊठबस सुरु करावी .

भाऊ +१
नं ३ फारच महत्वाचा. राहूल द्रविडने अनेक मुलाखतीत त्याच्या मिडल क्लास मनोवृत्तीलाच धन्यवाद दिले आहेत. आणि नं ५ चे काय बोलावे. इथे अगदी त्या मुद्द्याला धरून अनेक प्रतिक्रिया दिसत आहेत.

केवळ १० % फालतू क्रिकेटर असल्यामुळे उरलेल्या ९० % खेळाशी प्रामाणिक असलेल्या क्रिकेटर्स कडे का दुर्लक्ष करा?

भाऊ ,
५] खेळण्याचा व खेळ पहाण्याचा आनंद निकोप वृत्ती जोपासतो याचं आत्यंतिक महत्वच आपल्याला मनापासून पटलेलं नसावं; त्यामुळे खेळाकडे एक तर टवाळगिरी/ टाईमपास किंवा मटक्यासारखा जुगार असंच बव्हंशी पाहिलं जात असावं; > +१०००००००००

खेळण्याचा व खेळ पहाण्याचा आनंद निकोप वृत्ती जोपासतो याचं आत्यंतिक महत्वच आपल्याला मनापासून पटलेलं नसावं; त्यामुळे खेळाकडे एक तर टवाळगिरी/ टाईमपास किंवा मटक्यासारखा जुगार असंच बव्हंशी पाहिलं जात असावं;<<< हे पटलं.

जिथे पैसा आहे तिथे भ्रष्टाचार आहे
जगात जेंव्हा प्रथम पैसा निर्माण झाला तेंव्हापासून हे चालू आहे.
भारतात अजूनहि धर्मातली तत्वे, सत्य, अहिंसा,नैतिकता इ. अधून मधून आठवतात म्हणून उद्वेग.

देव करो नि अमेरिकेसारखे भारतातहि न होवो. अमेरिकेत असले बरेचसे प्रकार कायदेशीर करून टाकले, त्यामुळे इथे असले प्रकार करून श्रीमंत होणे म्हणजे अक्कलवान समजले जाते.

ह्या हौसेच्या विळख्यात सारी व्यवस्थाच अडकली असताना क्रिकेट मात्र त्यापासून पूर्णपणे अलिप्त राहील अशी अपेक्षा करणं योग्य आहे का ?;
+१००.

भारतातच नाही तर जगात कुठेहि, असा धंदा दाखवा कि जिथे असले गैरप्रकार होत नाहीत. राजकारण, सिनेमा, व्यापार या धंद्यात सगळे राजरोसपणे, कायदेशीरपणे चालते का? (कदाचित राजकारणात गैरप्रकार पण राजरोसपणे होत असतील! :डोमा:) क्रिकेटमधे फिक्सिंग काय, नि इतर अनेक धंद्यात कर बुडवणे, मालात भेसळ, फसवणूक हे सगळेच प्रकार गैर.

अशा वातावरणातही कायदा व नैतिकता पाळून पैसे मिळवणारे द्रविड, सचिन, लक्ष्मण इत्यादींसारखे जे खेळाडू आहेत त्यांचं कौतुक करायचं सोडून त्यांच्या मिळकतीवर उपहासात्मक शेरेबाजी केल्याने त्याप्रकारच्या वर्तणुकीच्या आदर्शांचंच खंडन होत नाही का ?;
अहो नाही हो भाऊ, त्यांना नाही कुणे नावे ठेवत. Light 1

उलट ते आदर्श असल्याने इतरांचे गैरवर्तन जास्त खटकते. जोपर्यंत लोकांना ब्रॅडमन वगैरे आठवतात तोपर्यंत हे खटकेल, मग हे असेच असते म्हणून बरेचसे लोक बिचारे इतर उद्योग बघतील. खरे तर स्वतःच खेळावे, ते सगळ्यात उत्तम.

The funniest thing is politicians calling for this
त्यात फनी काय? राजकारणी लोक असेच असतात, ज्यामुळे प्रसिद्धि मिळेल असे काहीतरी करायचे. लोकांनी मते दिली तर निवडून आल्यावर इतर असलेच धंदे स्वतःला राजरोसपणे करता येतील.

एक गोष्टः
एका राज्यात एक पक्ष सत्तेवर आल्यावर दारूबंदी करायचे, कारण त्यात काळा बाजार करून त्या पक्षाला पैसे मिळत. दुसरा पक्ष सत्तेवर आला की ते जुगार बंद करत, मग त्याचा काळा बाजार करून त्यांना पैसे मिळत. कित्ती कित्ती हुष्षार नै?

आगाऊ +१. जितका वेळ मिळतोय त्यात कमाई करुन घ्या ह्या लोभाला बळी पडत असतील खेळाडू. हे झाले पैसे घेणारे, पैसे देणार्‍यांचे म्हणाल तर इथे पैसे मिळवायची संधी आहे म्हंटल्यावर पैसे देणारेही चिक्कार उभे राहतात. कडक नियम आणि त्यांचे कडक एन्फोर्समेंट येवढा एकच उपाय दिसतो. लोकांची पैशाची हाव किंवा एकंदरितच क्रिकेट कडे सट्टा म्हणून बघण्याची प्रवृत्ती बदलणे वगैरे निव्वळ अशक्य आहे, फक्त जी लोकं सरळ आहेत त्यांची मधल्या मध्ये वाट लागू नये आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांना दर्जेदार क्रिकेट ऐवेजी आधीच निकालात काढलेले सामने बघायला मिळू नये म्हणून तरी एन्फोर्समेंट वर भर दिलीच पाहिजे.
खरं तर एन्फोर्सेमेंट वाले (स्वतः आय पि एल चे चालक) सुद्धा काही कमी लोभी नाहीत पण तो एक वेगळा चर्चेचा विषय आहे.

नंदिनी,

तुमचा उद्वेग समजू शकतो. मी एक मध्यमवर्गीय आहे. तुम्हीही अशाच मध्यमवर्गीय आहात असं गृहीत धरतो. तुम्ही म्हणताय की पैशाची हाव एव्हढी कशी काय. तर एका म.व.च्या चष्म्यातून बघूया.

असं बघा की तुमचं घर बर्‍यापैकी जागेत बर्‍यापैकी मोठं असावंसं वाटतं, बरोबर? नेमकं तसंच अंकित चव्हाणलाही वाटतं. घरांचे भाव एव्हढे आहेत की याकरिता सरळपणे पैसा कमवायचा म्हंटला तर पन्नाशी उलटेल. मग करा स्पॉट फिक्सिंग.

अर्थात, ज्यांच्याकडे आधीच स्थावरे आहेत त्यांना हा मुद्दा लागू पडत नाही. पण म.व. घराच्या जागी उच्चवर्गीय कार किंवा महागडे पर्यटन वगैरे ठेवून बघा. लगेच संगती लागेल.

वाममार्गाकडे वळलेल्या खेळाडूंना पैशापेक्षा त्या पैशातून मिळणार्‍या सुविधा दिसत असतात. असा आपला माझा तर्क!

मात्र सध्या चालू असलेल्या श्रीसंत, अंकित आणि अजित यांच्या भ्रष्टाचारापेक्षा मला दिल्लीतले नावाजलेले पोलीस निरीक्षक बद्रीश दत्त यांचा संशयास्पद मृत्यू अधिक महत्त्वाचा वाटतो. त्यांचा या निश्चितीच्या अन्वेषणाशी काही संबंध नव्हता असं दिल्ली पोलीस म्हणतात. खखोदेजा.

आ.न.,
-गा.पै.

Pages