निसर्गाच्या गप्पा (भाग-१३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2013 - 12:06

निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्‍या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.

निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधुरा, मग ते झाड गुलाबी तबेबुयाचे असणार. त्याची फुलं तू वर्णन केलीस तशी असतात. आणि भिरभिरत खाली पडतात. गुलाबी तबेबुया साधारणपणे जानेवारीच्या आसपास फुलतो (निदान पुण्यात तरी. क्वचित हवामानानुसार फुलण्याचा हंगाम थोडा पुढेमागे होऊ शकतो). पानांची रचना थोडी सावरीच्या पानांसारखी आहे का?

जिप्स्या कोवळ्या शेंगांच्या बिया खाताना काहीच वाटत नाही. छान लागतात. शेंगा थोड्या जुन असतील तर त्या बिया सोलून खाल्या की वटाण्या सारख्या लागतात.

काल आईकडे जाऊन मेफ्लॉवरचा कंद घेउन आले.

आता पुण्यात तामण पण फुलायला लागली आहे. टिळकरोडवर पंडित शोरूम पाशी फूटपाथवरची तामण मस्त फुलली आहे. आता सारसबागेकडे लक्ष ठेवायला पाहिजे. तिथली, शिवाय आदमबागेपासची तामण सुद्धा फुलण्याच्या बेतात असावी.>>>>>>>>>>>.शांकली कधी जायच? Wink
शांकली तू रविवारी घरी आहेस का? चक्कर मारायचा विचार आहे. Happy

मे फ्लॉवर फुलल्यावर मस्त दिसतो. माझ्याही माहेरी एका लायनीत ७/८ मे फ्लॉवर्स होते. त्याच्यावरून अलगद हात फिरवला की हाताला पिवळे पराग लागून तळवा छान पिवळा व्हायचा.

त्याच्यावरून अलगद हात फिरवला की हाताला पिवळे पराग लागून तळवा छान पिवळा व्हायचा.
मानुषी मला इश्य इश्य झाल की ग. Lol आता विचारी नको हसणारी बाहुली का टाकली ?

हाय सुमंगल आज लवकर आलीस का?

ही पांढरी कोळशिंद.

टिळकरोडवर पंडित शोरूम पाशी फूटपाथवरची तामण मस्त फुलली आहे. >>>>>>>>>>>फुलं कोणत्या रंगाची आहेत? (प्रश्न स्निग्धाचा व माझाही आहे. ) Happy

ते टि आय एफ आर मधले झाड समुद्रफळाचे तर नाही ? खुप मोठी फुले असतात. पर्जन्यावृक्षाच्या फुलासारखीच पण बरीच मोठी. माझ्या आत्येभावासोबत ते झाड बघितल्याचे आठवतेय. त्याला अभिषेकपात्रासारखी फळे लागतात.

००

पळसाच्या फुलांपासून रंग करतात. कपडे वगैरे रंगवता येतात. अगदी सुरक्षित रंग असतो तो.

०००

जागू, लगेच खाल्ल्या त्या शेंगा. पटकन शिजणार्‍या आहेत त्या. ते झाड जरा कमकुवत असते त्यामूळे सहसा झाडावर चढत नाहीत. काठीनेच शेंगा काढतात.
बहाव्याला नवी पालवी आली कि लेमन कलरची फुलपाखरे बरीच येतात. फुलांवरही येत असावीत पण दिसत नसावीत. आणि त्या फुलपाखरांच्या अळ्या खायला भरपूर पक्षीही येतात.

मॉव्ह कलरची..

त्याच्यावरून अलगद हात फिरवला की हाताला पिवळे पराग लागून तळवा छान पिवळा व्हायचा.
मानुषी मला इश्य इश्य झाल की ग. आता विचारी नको हसणारी बाहुली का टाकली ?>>>..:हाहा: Lol

जागू, इतक्या इवल्या फुलाचा फोटो खूप क्लियर आलाय!! ही वनस्पती; तालीमखाना म्हणून एक औषधी वनस्पती असते अगदी सेम तिच्या सारखीच दिसतिये. फक्त फुलं हिची पांढरी आहेत आणि तालीमखानाची जांभळ्या-निळ्या रंगाची असतात. Happy

ते टि आय एफ आर मधले झाड समुद्रफळाचे तर नाही ? खुप मोठी फुले असतात. पर्जन्यावृक्षाच्या फुलासारखीच पण बरीच मोठी. माझ्या आत्येभावासोबत ते झाड बघितल्याचे आठवतेय. त्याला अभिषेकपात्रासारखी फळे लागतात. >>>>>> नाही दिनेशदा, हे समुद्रफळ नाही. आवारात समुद्रफळाची खूप झाडे आहेत (त्यांना समुद्री ओक म्हटले आहे.) समुद्रफळाची पाने बदामच्या पानांसारखी आणि फळ तुम्ही म्हणता तसे अभिषेकपात्रासारखे तर फुले पर्जन्यावृक्षाच्या फुलासारखीच पण बरीच मोठी. खाली पडलेले फुल जर नुकतेच पडलेले असेल आणि त्याला हवेत उडवून खाली येताना लाथ मारली तर पाकळ्यांचा छान शॉवर पडतो. (हा आचरटपणा आहे पण काहीजण असे उद्योग करताना पाहीले आहे.)

बाकी ज्या झाडाचा फोटो आहे त्याला कधी फळे / शेंगा आल्याचे पाहीले नाही.

हा तालीमखाना....

mp 004.jpg

याचे काटे मात्र बाभळीच्या काट्यांची आठवण करून देतील इतके टोकदार असतात.

आणि ही पानं....

mp 005.jpg

जागू, Happy

शांकली, जागू, जिप्सी आणि इतरही सर्वजण एवढे फोटो कसे काय मिळतात तुम्हाला काढायला. मस्त !

धन्यवाद madhu-makarand Happy ! तुम्ही त्या झाडाचे, पानांचे जवळून काढलेले फोटो टाकू शकाल कां?

जागुले................"पराग" इज द की वर्ड की काय म्हण्ते मी? आँ? तुला इश्श्य इश्श्य झालं ते!

मानुषी अगदी बरोबर की ग. परत लाजले.

शांकली अग तेच झाड हे तालिमखानाच. पण एका पुस्तकात मी त्याच नाव कोळशिंद वाचलय. आमच्याकडे तर सरळ निळी कोरांटी म्हणतात. त्या निळ्याचीच ही पांढरी जात आहे.

प्रज्ञा त्या फुला पानांना इच्छा असते नि.ग. वर यायची म्हणून आमच्या कॅमेर्‍यात येतात तेच. Happy

जॅग्स... , तुझे वाक्य वाचल्यावर लगेच संदर्भासहित स्पष्टीकरण समजलेले मला Wink

आमच्याकडे तर सरळ निळी कोरांटी म्हणतात. त्या निळ्याचीच ही पांढरी जात आहे.

हो, खुप साधर्म्य आहे हिचे कोरांटीशी. जागु मला वाटते तु याची भाजीही टाकली होतीस इथे, रानभाज्या मध्ये.

हो साधना अगदी बरोबर.
आत्ता मला शांकलीचा मेसेज आला की आजच्या वास्तुरंग मध्ये माझा चुलीवरचा लेख आला आहे. आमच्या पुरवणीत नाही. म्हणजे तो पुणे आवृत्तीमध्येच टाकला असेल.
शांकली अग नेटवर पण मला सापडत नाही. तुला मिळाली लिंक तर दे ना इथे.

हो आजच्या लोकसत्ताच्या वास्तुरंग पुरवणीत जागूचा 'माझी सखी चूल' हा लेख आलाय. पण त्याची लिंक कशी बरं द्यायची? मला कुणी सांगेल का?
बाय द वे.... जागूडे तुझं मन:पूर्वक अभिनंदन!! (ही बाई एकच आहे की अनेक मिळून एक सांगते कुणास ठाऊक!! कारण इतक्या सार्‍या वेगवेगळ्या गोष्टी करत असते ना!!....................:फिदी:)

हो मानुषी लोकसत्ताचा. पण तो पुण्याच्या आवृत्तीमध्ये आला आहे. मुंबईच्या नाही.

शोभे तु पण शोध नेटवर Happy

शांकली Lol

शांकली दिसले. अजुन त्रास देते फक्त मधला भागच दिसतोय प्लिज जरा पुर्ण लेखाचे तुकडी तुकडीने फोटो टाक.

ओके

Pages