Submitted by निंबुडा on 26 December, 2010 - 08:52
राहत्या किंवा नवीन घरात अंतर्गत सजावटीच्या दृष्टीने काही बदल करायचे झाल्यास पडणार्या प्रश्नांवर चर्चा आणि विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बाफ.
घराचे रंगकाम, फर्निचर, टाईल्स लावून घेणे, प्रकाशयोजना, किचन ट्रॉलीज्, फ्लोरिंग, गृहोपयोगी वस्तू, उपकरणे, घरात नवीन फर्निचर किंवा उपकरणाच्या दृष्टीने करावे लागणारे सिव्हील बदल, खरेदीच्या उत्तम जागा इ.इ. जे काही घराच्या सजावटीत अंतर्भूत असेल त्यावरील प्रश्नोत्तरे इथे अपेक्षित आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोणाला पुण्यामध्ये चांगलं काम
कोणाला पुण्यामध्ये चांगलं काम करुन देणारा सुतार माहिती असल्यास सांगा प्लीज.
शर्मिला, जेवढ्या गाद्या
शर्मिला, जेवढ्या गाद्या ठेवायच्या आहेत तेवढ्या उंचीचा एक लाकडी बॉक्स बनवून घ्यायचा. तो बॉक्स वरच्या बाजूने उघडा हवा. सरकू नये म्हणून एक अटॅचमेंट येते ती त्याच्या तळाला (चारी कोपर्यांना) लावायची.
मग बॉक्स मध्ये सगळ्या गाद्या ठेवायच्या. सगळ्यात वरची गादी शक्यतो कॉयरची असावी म्हणजे ती डीफॉर्म होत नाही. आणि ती बॉक्सच्या कडेच्या वर आली पाहिजे म्हणजे बसल्यावर लाकुड टोचत नाही.
खालच्या खूर्चीसारखे कॉपर / गोल्ड पेंटींग असले तर अफाट मस्त लुक येतो.
माधव धन्यवाद! लाकूड किंवा रॉट
माधव धन्यवाद! लाकूड किंवा रॉट आयर्नची रेडीमेड फ्रेम मिळू शकेल का कुठे?
हे सांखेडा फिनिश.
हे सांखेडा फिनिश. राजस्थानातून येतं.
रॉट आयर्नची फ्रेम हवी असेल तर
रॉट आयर्नची फ्रेम हवी असेल तर गोदरेज वाल्यांना विचारून बघा. ते स्टील / आयर्नचे फर्नीचर गरजेनुसार बनवून देतात. रॉट आयर्नचे देतात का याची चौकशी करावी लागेल. नसेल तर कीचन ट्रॉली बनवणार्या कारागीरांना (शोरूम नको) विचारा. ते बर्याचदा करून देतात.
पण रॉट आयर्नच्या फ्रेमला तो भारतीय बैठकीचा एथ्नीकल लूक नाही येणार. त्याकरता लाकूड उत्तम.
फर्निचर सुताराकडून करुन
फर्निचर सुताराकडून करुन घेण्यापेक्षा विकत आणलेले जास्त चांगले असे मला नेहमीच वाटत आलय पण खुप लोक अजुनही सुताराला अव्वाच्या सव्वा (वापरलेल्या मटेरीअलच्या प्रमाणात) पैसे देवुन चार चार महीने घरभर पसारा करुन फर्निचर करत बसताना दिसतात... थोडेसे कस्टमायझेशन वगैरे फायदे सोडले तर (तसेही तयार फर्निचरची डिझाइनही हल्ली मेड टू ऑर्डर करुन मिळतातच की!) फर्निचर करत बसण्यात शहाणपणा आहे का?
माफ करा पण विकतच्या
माफ करा पण विकतच्या फर्निचरच्या किमती आणि दर्जा यांचा ताळमेळ असतोच असे नाही हो. विशेषतः मोठे वॉर्डरोब्ज वगैरेंच्या बाबतीत.
बुमरँग, हल्ली मेड टू ऑर्डर
बुमरँग, हल्ली मेड टू ऑर्डर फर्निचर सुद्धा दुकानदार त्यांच्या वर्कशॉप मधेच बनवतात. आणि आणुन दोनचार तासात फिट करतात. मोठे भिंतीतले वॉर्डरोब वगैरे खरच मेड टू ऑर्डर असलेलेच चांगले. ते वॉर्डरोबही सुतार दुकानात बनवुन घरी आणतात आणि अगदी दोन तासात फिट होतात. सोफा, कॉफी टेबल वगैरे रेडिमेड आणता येईल. ते पाच सहा वर्षांनी सहज बदलताही येते.
ते पाच सहा वर्षांनी सहज
ते पाच सहा वर्षांनी सहज बदलताही येते>>> जे जे आपल्याला ५-६ वर्षानी घराच्या लुक चेन्जसाठी बदलावे वाटते ते रेडिमेड घ्यावे. फेकुन देताना वाइट वाटणार नाही. कारण किमंत कमी असेल.
पण बेड, वार्डरोब्स, कपाट वे मजबुत केले की टेन्शन नाही.
अजुनही सुताराला अव्वाच्या
अजुनही सुताराला अव्वाच्या सव्वा >> दुकानात जे स्वस्त फर्निचर असते त्यात बहुतांशी लाकुड नसतेच. आणि ज्या शोरुम खरोखर लाकडाचे फर्निचर बनवतात त्यांच्याकडच्या वस्तूंचा भाव घरी करवून घेतलेल्या फर्निचरपेक्षा जास्तच असतो.
रेडीमेड फर्निचर दिसायला खूप आकर्षक दिसते पण दोन एक वर्षात त्याची रया पार जाते. त्यातली फिक्स्चर्स (कड्या, बिजागिरे, हँडल इ) अत्यंत कमी दर्जाचे असल्याने वापरायला पण त्यास होऊ लागतो.
त्या शोरुम मध्ये जे काही रेडीमेड असेल तेच शक्यतो निवडावे. त्यांचा दर कमी असतो. पण कस्टमायझेशन करत गेलो तर दर पटापट वाढत जातो तेंव्हा आपल्याला तो जाणवत नाही. पण जेंव्हा अंतिम किंमत आपण तुलना करतो तेंव्हा आपण फार काही बचत केली नाहीये (घरी बनवलेल्या फर्निचरच्या तुलनेत) हे समजते. परत दर्जा सुमारच असतो.
पण घरी कचरा होउ नये, वारंवार फर्निचर बदलता यावे असे वाटत असेल तर रेडीमेड फर्निचर खूप सोयीचे पडते.
नवीन घरासाठी निर्मिती, किचन
नवीन घरासाठी निर्मिती, किचन डेकॉर वगैरे ट्राय करतोय... पण सगळे डिझाईन, लेआउट काम स्वताच्याच डोक्याने चालू आहे.... क्रिएटीव्ह इनपुट देणारा पुण्यातला एखादा चांगला इंटीरीअर डेकोरेटर माहीत आहे का?
बाथरुम मध्ये कॉर्नर पीसेस
बाथरुम मध्ये कॉर्नर पीसेस लावायचे आहेत, साबण, शँपू ठेवण्यासाठी.
कडाप्पा/ग्रॅनाइट पीसेसच्या ऐवजी ग्लास टॉप लावायचा विचार आहे. तसेच बाथरुम मधील कपडे अडकवण्यासाठीचा रॉड पण हवा आहे.
त्यासाठी लागणारे कॉर्नर पीसेस, बीम्स, स्क्रू इ. साहित्य पिंपरीला कुठे मिळेल? पुण्यात बोहोरी आळीत मिळते पण दरवेळी एवढ्या लांब जाणं जमत नाही. मी पिंपळेसौदागर मध्ये राहतो.
तसेच हे काम करुन देणारे कुणी माहितीतील आहे काय?
रंगासेठ.. पिंपरीला शगुन चौक
रंगासेठ..
पिंपरीला शगुन चौक ते साई चौक या दरम्यान ही सगळी दुकाने आहेत. होलसेल मधे मिळेल सगळे..
धन्यवाद आणि हे लोक
धन्यवाद आणि हे लोक फिटींगसाठी पण मदत करतील ना? या विकांताला चक्कर मारुन येतो तिथे.
रंगाशेट, एक महत्वाची
रंगाशेट,
एक महत्वाची सूचना.
कन्सिल्ड पाईप फिटींग असेल, तर पाईप कुठून कुठे गेलेत त्याचा अंदाज आधी घ्या, मग ड्रिल मारा. शक्य असल्यास बिल्डिंगचा प्ल्यान असेल त्यात वायरिंग व प्लंबिंगचा नकाशा असतो. तो रिफर करा.
ड्रिल ने पाईप वा केबल पंक्चर झाले तर लै हाल पडतील..
>>बाथरुम मध्ये कॉर्नर पीसेस
>>बाथरुम मध्ये कॉर्नर पीसेस लावायचे आहेत, साबण, शँपू ठेवण्यासाठी.
रंगाशेठ, आजकाल क्रोम फिनिश मध्ये मस्त सोप होल्डर मिळतात रेडिमेड... भरपूर व्हरायटी असते... ते फिटींगला पण कडाप्पा वगैरेपेक्षा सोपे असतात
हे लोक फिटींगसाठी पण मदत
हे लोक फिटींगसाठी पण मदत करतील ना?>>> अर त्या दुकानदराना नका विचारु.
तुम्ही राहताय तिथे एखादा प्लायवुड / हार्डवेअर विकणारा दुकानदार असेल तर त्याच्याकडुन मिस्त्रीचा नंबर मिळेल.
साधारण एका ड्रिलला ५-२० रु असा कैपण रेट सांगतील (पिम्पळेसौदागरात तर कापण्याचाच प्रयत्न असेल). बार्गेन करा.
मी एले़ट्रिकल कामासाठीचा माणुस आलेला त्यालाच सर्व काम दिलं.
इब्लिसरावानी दिलेली सुचना लक्षात ठेवा.
कन्सिल्ड प्लम्बिन्ग मध्ये चुकुन जरी ड्रिल मारलं आणि पाइप फुटला तर लीकेज आणि भिंतीना ओल, मग रंग जाणे हे प्रकार होतात.
पुणे येथे आमचे सम्पुर्ण घर
पुणे येथे आमचे सम्पुर्ण घर ( दुमजलि ) renovate करायचे आहे .. म्हणजे आतुन जिना, kitchen , ई ई ..बरच मोठ काम आहे ...कुणी विश्वासु , आणी नवीन कल्पना असणारा/री माहीत आहे का?
त्वरीत सम्पर्क साधला तर बरे ....
Stainless steel bathroom
Stainless steel bathroom accessories pan chaan milatat.
धन्यवाद, मी पिंपरीला चौकशी
धन्यवाद, मी पिंपरीला चौकशी केली आणि काही दुकानातून कोटेशन्स आणलीत. आत्ता बघू दसर्यानंतरच लावावे लागणार हे.
इब्लिसराव, सूचना नक्की लक्षात ठेवतो. झकासराव, दुकानदाराला नाही विचारलं. इथलाच कुणीतरी एक मेस्त्री पकडून आणनार.
सुहास्य, विपुत मेल केली आहे.
सुहास्य, विपुत मेल केली आहे.
आम्ही दिवाळीत नविन घरी शिफ्ट
आम्ही दिवाळीत नविन घरी शिफ्ट करणार आहोत. त्याआधी तिथे फर्निचर करून घ्यायचे आहे. आमच्याकडे आधीचे फारसे फर्निचर नाही. कपाटे नाहीत त्यामुळे वॉर्डरॉब्स करून घेणे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. हे वॉर्डरॉब्स रेडिमेड विकत घेणे योग्य की सुताराकडून बनवून घेणे योग्य ते ठरवता येत नाही आहे.
सद्ध्याचे आमचे बजेटही फार नाही (तंगीच आहे). पण रहायला जायच्या आधी किमान किचन आणि वॉर्डरॉब्स करून घ्यायचेच असा माझा हट्ट आहे. कृपया मार्गदर्शन करावे. कुणी सुतार असल्यास सांगावे.
आम्ही दिवाळीत नविन घरी शिफ्ट
आम्ही दिवाळीत नविन घरी शिफ्ट करणार आहोत>>>> तुम्ही २० दिवसांनी नव्या घरी जाणार आहात,तर एवढ्या कमी काळात वॉर्डरॉब्स सुताराकडून बनवून घेणे कठीण वाटते.तसेच तुमच्या गरजा ,निवड तसेच बजेट यांचा ताळमेळ घालून शांतपणे बनवून घ्या.मात्र किचन जरूर बनवा.
डायनिंग टेबल..ग्लास टॉप .....
डायनिंग टेबल..ग्लास टॉप ..... कसं वाटतं?
ओरखडे पडतील म्हणून नेहमी कवर करावं लागतं का ? बहुतेक ठिकाणी कवर केलेलं बघितलय... मग ग्लास टॉप घेऊन काय उपयोग ?
अजून काय अनुभव ?
आईकडचं जुनं डायनींग टेबल
आईकडचं जुनं डायनींग टेबल आम्ही अगदी सुरवातीला बर्याचदा कव्हर करायचो. नंतर नंतर बंद केलं. आईने अशातच त्याच टेबलाची काच कापून थोडं छोटं टेबल बनवलंय. काचेचा हा टेबल-टॉप जवळपास १२-१४ वर्ष जुना असूनही अजूनही काचेवर ओरखडा वैगरे नाहीये.
मी खरंतर हल्ली कुणालाच काच कव्हर केलेली बघितलं नाहीये.
सहेली .... मीळाले ...ईमेल
सहेली .... मीळाले ...ईमेल मळ्ळालि तर बरे होयिल ....
मुंबईत कोणाला चाइल्ड रूम
मुंबईत कोणाला चाइल्ड रूम डेकोर संदर्भात फर्निचरची / वॉल पेपर्स ची दुकाने इ इ माहिती आहेत कां? एखादी थीम घेऊन कस्ट्माइजड बेड आणि स्टडी टेबल करायचा विचार आहे.
अंथरूणं-पांघरूणं ठेवण्यासाठी
अंथरूणं-पांघरूणं ठेवण्यासाठी काय सोय करता येईल. माझ्याकडे बेडला स्टोअरेज नाहीये.
बहूतेक याच धाग्यावर किंवा
बहूतेक याच धाग्यावर किंवा मागे कुठेतरी नीधप नी प्लास्टिकच्या स्टोरेज ट्रॉली बोक्सेसबद्दल लिहिलं होतं. पलंगाखाली ठेवता येतिल असे. मला आमच्या भागातल्या लोकल प्लास्टिकच्या दुकानात दिसले होते तसे बॉक्स. तसं काही मिळालं तर बघा अंथरूणं-पांघरुणं ठेवायसाठी.
घरात एक लिनन कॅबिनेट असेल (
घरात एक लिनन कॅबिनेट असेल ( उसगावातील घरांत सोय असते) नाहीतर वेगळे बनवून घेता येइल.
Pages