निसर्गाच्या गप्पा (भाग-१३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2013 - 12:06

निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्‍या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.

निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जो-एस. मामी रांगोळ्या खुप सुंदर आहेत.

दिनेशदा हिरा ची छान माहीती दिलीत.

मानुषी अग मी तुला फोटो काढून पाठवते खराटा कसा करायचा तो. माझी आई प्रार्थमिक शिक्षिका होती. अगदी शाळेतून आल्यावर सगळी कामे उरकली की संध्याकाळी ती खराटे काढायला बसायची. कारण हे झाप फुकट जाऊ नयेत म्हणून आणि अजुनही ७० वर्षे झाली तिला तरी ती खराटे काढण्याचे काम करतेच आहे. घरी गावातील लोक येऊन खराटे विकत घेउन जातात. बाजारात २० रु. ला मिळणारा खराटा ती १५ रुपयांत देते. Happy मलाही हौस म्हणून खराटे काढावेशे वाटतात. पण वेळेच गणित जमत नाही. आमचा गडी काढतो मधुन मधुन.

त्याच्या ज्या पात्या निघतात त्या बांधून ठेवायच्या. चुल पेटवताना पात्या खाली ठेवायच्या व वर लाकडे रचायची त्यामुळे चुल पेटवण्यासाठी रॉकेल वापरावे लागत नाही. चुल लगेच पेटते.

झापाचा मधला जाडा पुर्ण भाग जाळण्यासाठी वापरतात. मी चुलीवर लेख लिहीला आहे. थोड्या दिवसांनी प्रकाशीत करेन. तोपर्यंत ही आमची चुल. आता श्रावणीला सुट्टी पडल्यावर मी मधुन मधुन लावेनच.

स.सा. छान साईट आहे.

शशांकजी ते झाड नाही. मी टाकले ते वेगळे आहे. त्याबद्दल अजुन माहीती मिळाल्यास देते.

हो येतात. ज्याने मला भेट दिली तो म्हणाला कि पांढरी फुले येतात. पण विचारायला विसरले कि इनडोअर आहे कि आउट्डोअर. आतो तो रिटायर होउन गेला.

जागु, वेळ मिळेल तशी इथे येत असते. पण फरच गडबडीत. मी ठिक.

मानुषी.... सो स्वीट... काय काय गंमत आहे तुझ्या अंगणात..
दिनेश दा ,हिराची मस्त माहिती सांगितली.. गलीवर.. Lol
जागु ___/\____ आत्ता कळलं .. तुझ्यात तुझ्या आई चे गुण पुरेपूर उतरलेत.. उद्योगी, मेहनती , उत्साही , चिकित्सक, अभ्यासू, प्रत्येक गोष्टी चा, आजूबाजू च्या परिसराचा , निसर्गाचा आनंद पुरेपूर लुटणारी अशीच आहेस तू ही.. Happy

जागू आणि दिनेशदा.............माझ्या विचाराला सिरियसली मोदक दिल्याबद्दल ठांकू!
तुम्ही दोघांनी सांगितलेल्या गोष्टी माहेरी होतच होत्या. वडिलांकडे खराटे बनवणारा ठराविक वेळी यायचाच. बागेच्या एका कोपर्‍यात बसून तो हे करायचा.आंणि आम्ही भावंडं त्याला मदत केल्यासारखं करायचो. आणि त्यांचं काय डील असायचं आठवत नाही. पण आमचं आवार मोठं असल्याने आम्हालाच खूप खराटे लागायचे
दिनेशदा तुम्ही सांगितलेलं टेक्नीक वापरूनच तो भराभर खराटे करायचा.
आणि एक छोटी खोली जळणाचीच होती. घरातले सगळे बागेतलं सगळं पडलेलं "जळणेबल" तिथे नेऊन टाकायचे.
घरात एक शेगडी होती. आम्ही सगळे साधारण एप्रिल ते जुलाई/ऑगस्ट कृष्णा नदीवर पोहायला जायचो. मग आल्यावर ही शेगडी पेटलेली असायची. या शेगडीभोवती बसून आम्ही शिरा खायचो.
बागेत चूलही...........जागूसारखी..............होती. तेही बर्‍.याच वेळा भाकरीवगैरेसाठी वापरली जायची.
आणि थंडीत शेकोटी.................लवकर उठून राखुंडी लावत( तीही वडीलांनी घरी केलेली) शेकोटीभोवती मजा यायची. मग याच शेकोटीत कांदे, रताळी, बटाटे भाजायचे.

इथे आता एखादा खराटावाला मिळतो का बघते. आणि जळण साठवण्याची आयडीया बेष्ट! त्याचीच व्यवस्था करीन. आणि एखादी पर्मनंट चूलही करायला हरकत नाही.
जागू मी येणार आहे तिकडे तेव्हा आईला नक्की भेटू.

दिनेशदा हे खराटे करायचे उद्योग लहान्पणी केले आहेत. आणि ते सोलल्यावर उरणार्‍या पाती जुड्या करून जळण म्हणून वापरायचो, चांगलीच एनर्जी निर्माण होते त्यातून. तसच सुपार्‍यांच्या माळा करून उन्हात टाकायच्या वाळल्या की सोलून सुपार्‍या काढायच्या. अंबे उतरवून आढ्या लावायच्या असे उन्हाळी उद्योग असायचे. आणि कैर्‍या खाणेही .....

जागू, पुढच्यावेळी चुलीवरचं जेवण ना ?
तूम्हा सगळ्यांना लहानपणी बरी हि कामं करायला मिळाली, मला तर गावी गेल्यावर एकाही कामाला हात लावू दिला जात नसे. ( अति लाड ! )
सुमंगल, ते,झाड थोडेसे अबोलीसारखे वाटतेय खरे पण फुले आल्यावरच कळेल.

नारळ सोलल्यावर जो भाग उरतो ( सोडण ) त्यापासून माझ्या आजोळी एक त्रिकोणी उपकरण केले जायचे. त्याचा उपयोग फक्त, जात्यासभोवताचे पिठ गोळा करायला केला जायचा.

ही सोडणं बरेच दिवस पाण्यात भिजवून, मग ती मोठ्या कष्टाने कुटून त्यापासून काथ्या तयार करतात ( काथ्याकूट हा शब्द तिथला ) काथा मात्र पाण्यात लवकर कुजत नाही. झाडावरुन नारळ खाली पडल्यावर तो पाण्यात तरंगावा आणि कुजू नये म्हणून निसर्गाची योजना आहे हि. अफलातून पॅकिंग मटेरियल आहे ते.

काथ्याकूट.. मलाही पुर्वी माहित नव्हता, माझी जन्मठेप मधे याचा उल्लेख आहे, कैद्याना काथ्याकूट, कोलू अशी कामं करायला लावत.....

सुदुपार!!!

गेल्या वर्षी सोसायटी आवारातल्या झावळीचा खराटा केला होता. फक्त २५-३० काड्याच घेतल्या होत्या. नेहमीच्या साध्या सुरीने पात्याचा भाग काढून टाकला. बुंधा दोर्‍याने घट्ट बांधला. पण टोके मात्र तशीच वळवळती ठेवली (बाजारातले खराटे टोकाकडून सुद्धा एकसारखे केलेले असतात). अशा वळवळत्या टोकांचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे कपाटामागे, कपाटाखाली, बॉक्स बेडच्या खाली सहज जात होता. त्याला सगळी जळमटे / ईतर कचरा चिकटून येत होता. कशाला हवे व्हॅक्युम क्लीनर??

वळवळती टोके Happy काय मस्त शब्द योजलाय !

कपाटाखालच्या झुरळांना आणि कपाटामागच्या पालींना मस्त गुदगुदल्या होतील !

अरे देवा...........खराटापुराण लईच विंटरेष्टिंग होत चाललंय!
झुरळांना आणि कपाटामागच्या पालींना मस्त गुदगुदल्या होतील>>>>>>>
हं एक खराट्याचा उपयोग कधीच नव्हता लक्षात आला.
असो..........पण मधुमकरंद.............वळवळती टोकं मीही अगदी तश्शीच सोडीन बरं!(सीरियसली)

खराट्याची आणखी खासियत म्हणजे जर कधी अ‍ॅसिड / ब्लीच वापरले तरी खराटा वापरता येतो. फारसा परिणाम होत नाही त्यावर !

ओमानमधे खजुराच्या पानाचा असा अनेकप्रकारे उपयोग करतात. पण ती पाने सुकली तरी टोचतात !

खराट्या चे नवीन उपयोग समोर येताहेत Rofl Rofl

पूर्वी इथे खरोखरचे खराटे मिळायचे.. त्यांना पाहून नॉस्टेल्जिया चे पूर येऊन विकत घेतले जात.. तसे हे खराटे फारच बुटके असतात..
पण आता खराट्यांमधे ही चक्क भेसळ होत आहे .. कसल्यातरी रूंद ,मऊश्या काड्या वापरल्या जात आहेत..
फोटोच काढून ड्कवते इथे.. म्हंजे खराट्याचे जाणकार लोक्स यावर प्रकाश पाडतील.. Happy

अर्धा तास सलग वाचल्यावर नि.ग्.च्या शेवटच्या पानावर येवून पोहोचले. Happy
सर्व वाचून छान करमणूक झाली. खराटे-पुराण मस्त ! आम्ही पण लहानपणी खराटेच वापरत असू, अंगण झाडायला.
वर्षूताई, अभिनंदन ! लिंक पाठवायला विसरू नकोस.
सर्व फोटो मस्त !

मानुषी नक्की ये.
दिनेशदा हो पुढचे जेवण चुलीवरचे. आणि गुदगुल्या भारीच. Lol
जिप्स्या अरे दोन दिवस फोन बंद आहे. मेल कर.
वर्षू ताई किती ते कौतुक लाजले ना मी.

खराट्याच्या काड्यांनी म्हणे पुर्वी विणकाम करायचे दोन सुईवर करतात तसे.

खराटे पुराण मस्त!
वर्षूतैला पूर्ण अनुमोदन!!
आज 'प्राजक्ता'ने 'अबोली'चा फोटो टाकलाय! Happy
सुमंगल, दिनेशदा म्हणतात त्यानुसार ती अबोलीच वाटतेय पानांवरून. पण ही ना, कोकणात जी गुलाली रंगाची अबोली मिळते ना, ती असावी. त्या अबोलीची पानं अशीच लांब देठांची, थोडी रुंद आणि पातळ असतात. अर्थात फुलं आल्यावर कळेलच!
प्रा. श्री द महाजनांच्या देशी वृक्ष आणि आपले वृक्ष या दोन्ही पुस्तकांत त्यांनी ज्ञानेश्वरीतली एक ओवी उद्धृत केली आहे ती अशी ........... ' झाड जाणावे फुले, तैसे मानस जाणावे बोले '...........किती सर्वार्थाने खरी आहे नै ही ओवी!!

हो ना फुलाशिवाय झाड ओळखणे कठीणच !

प्रज्ञा, खुप दिवसांनी ! शोभा कुठे आहे ?

आणि हसून हसून पोट दुखल्यावर पाठीवर पडून पाय झाडणारी झुरळे.. हा पुरावाच नव्हे काय ?

हसून हसून पोट दुखल्यावर पाठीवर पडून पाय झाडणारी झुरळे.. ईssssssssss

दा, हे वर्णन कितीही खरं असलं तरी..........नाहीच ते............झुरळ हा कीटक निसर्गात कशाला निर्माण झालाय असा मला जन्मत:च पडलेला जन्मसिद्ध प्रश्न आहे... सगळी निसर्ग साखळी, अन्न साखळी ह्या प्राण्याला बघून, किंवा त्याचा उच्चार कानावर पडल्या पडल्या सुद्धा बाजूला पडते आणि हा प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न पडतो......................सगळी भिती, किळस या भयानक प्राण्यात एकवटलीये असं माझं ठाम मत आहे.

महानगरपालिकेच्या नियमानुसार नवीन घराला कंप्लीशन मिळण्यासाठी घराभोवती किमान पाच झाडं लावायची आहेत. कोणती झाडं आणावीत नर्सरीतून ? (मुंबई पुणे जुन्या हायवे वर एक नर्सरी आहे तिथे ७-८ फूट वाढलेल्या झाडांचे अनंत प्रकार आहेत)
झाडं ठरवताना शक्यतो देशी,सीझनल तरी फुलं येणारी,पानांचा फार कचरा न करणारी ( शेजार्‍यांच्या कपाळावर अठी नको), उभी वाढणारी हवीत ना?
उभा अशोक, पांढरा चाफा, सुपारी, .........अजून काही सुचवा की......

अवनी, तामणीचं झाड मिळालं तर लाव. ते फार पसरत नाही, पानांचा कचराही फार नाही होत आणि शिवाय ते आपलं राज्यपुष्प आहे!
कवठाचं झाडसुद्धा लावू शकतेस. तसंच रिठा, अंजनी (अंजन नव्हे हं!), रामधन चंपा, अशी बरीच आहेत.

रामधन चंपा......गुगल केल्यावर फोटो दिसला ....छान आहेत फुलं आणि पानंही मोठी दिसताहेत....
अंजनीची निळी फुलं तर वंडर्फुलच...अजून काही नावं सुचव बरं .......

अवनी फळांमध्ये सीताफळ, चिकू, पेरू, नारळ, ही झाडे लावू शकतेस.

फुलांमध्ये सोनचाफा लावू शकतेस. तो सरळ वाढतो.

शांकली झुरळ पुराण भारी.

Pages