निसर्गाच्या गप्पा (भाग-१३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2013 - 12:06

निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्‍या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.

निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या गवताला 'कावळ्याचे पोहे' म्हणतात ना?
आणि पिंपळ छानच.. इथे मी काल एक पिंपळ बघितला..कृत्रिम वाटेल इतका पोपटी रंग आला होता त्याला..

रावी, आंब्यापासून सफरचंदापर्यंत अनेक फळांच्या बिया पेरून जी झाडे येतात, त्यात त्याच झाडाच्या फळांचे गुणधर्म ( रंग, स्वाद, आकार ) उतरत नाहीत. हि नावे मुद्दाम घेतली कारण या दोन फळांच्या बाबतीत फार कलमाकलमी झालेली आहे. म्हणून फांदी लावून / डोळा खुपसून / गुटी बांधून कलम करतात. अशा कलमात मूळ झाडाचे गुणधर्म तर उतरतातच शिवाय फळधारणा लवकर होते. पण एकंदर आयूष्य मात्र कमी होते.

हा प्रकार मानवाच्या फायद्याच्या असला तरी, निसर्ग मात्र मूळ वाणाचे काही गुणधर्म टिकवण्याचा प्रयत्न करतो आणि बियांपासून जे झाड तयार होते त्यात ते उतरतात.

बटाटा / ट्यूलिप्स / सफरचंद / मारिजुआना या पिकांबाबत अशा फार उलथापालथी झाल्या आहेत आणि त्यासंबंधी एक सुंदर माहितीपट यू ट्यूबवर आहे.

अनिल छान माहिती,,
दिनेश दा,फार गोड आहेत फोटो..
पिंपळ,चल्दल,, शशांक :), खरय समर्पक नांव,,
कावळ्याचे पोहे..वॉव्पहिल्यांदाच ऐकल हे नाव

दा, कॉपर प्लँटची फुलं खरंच खूप सुंदर दिसतात. मी ही फुलं मैत्रिणीकडच्या छोट्या भंगातून बघितली होती. नुसत्या डोळ्यांनी छोट्टुस्सा गुच्छ दिसतो.
ती गवतं (आपलं गवत फुलं) मस्तच!! आणि 'इथल्या पिंपळपानावरती..अवघे विश्व तरावे.....' असंच वाटतंय काहीसं फोटो आणि लिखाण वाचून...:स्मित:
बाकी निसर्गात रमणार्‍या सर्वांनाच या जन्मावर आणि जगण्यावर प्रेम करावंस वाटतंय हे नक्की.
अनिल, लिंक फार मस्त आहे. ही रानवा संस्था कुणी स्थापन केलीये ते बघितलं पाहिजे.

पिंपळाच्या पानाचा फोटो मस्तच आहे...माझ्या शाळेजवळ एक पिंपळ होता.शाळेत असताना त्याच्या पानांना पुस्तकात ठेऊन जाळी पडायचा प्रयोग करायचे दिवस आठवले..:)

वर्षू अगं सूर्यदेवाचं आणि आमचं सध्या जरा वाकडं आहे त्यामुळे जवळ दुरून कसाही घेतला तरी फोटोत काही रंग येत नाही..तरी बघ तुला हे कसं वाटतंय..आणखी एक आधी काढलेल्या पांढर्^या चेरीप्रकाराचा आहे आणि एक घरचीच अझिलिया..छोटीच आहे पण मस्त बहरलीय... Happy एंजॉय...:)

cherry1.jpgcheery2.jpgAzilia.jpg

वेका हे फोटो मोठे झाले तर खुप छान वाटेल. खुप सुंदर आहेत फुल.

हे आपट्याचे छोटे झाड. सध्या छान कोवळी पालवी येऊन गेली आहे. आपटा म्हणजेच दसर्‍याला वाटतात ते सोन्याचे प्रतिकात्मक पान. ह्या पानांचा आकार, ठेवण किती कलात्मक आहे. पोटाच्या विकारावर ह्याचे पान उपयोगी असते. आम्ही कडू करांदे उकडताना त्यात ह्याची पाने घालतो. दसर्‍याच्या तोरणातही ह्या पानांचा उपयोग होतो. आपट्याच्या झाडाला शेंगा येतात त्या गोड लागतात. आम्ही चाळा म्हणून लहानपणी ह्या शेंगा खायचो.

वेका, हेच फोटो पिकासामधे प्रोसेस केले तर रंग टाकता येतील. तशीही छानच दिसताहेत.
जागू, आपट्याचे झाड खुप जणांना माहित नसते. ( कांचनालाच आपटा समजतात ) त्याची कधी पिवळी फुले दिसली तर अवश्य फोटो टाक.

शांकली, आजोळी घराजवळ दोन मोठे पिंपळ होते. आईच्या लहानपणापासून होते. इतके दाट होते कि त्यांच्या
फांद्या एकमेकांत गुंतल्या होत्या. मे महिन्यात आम्ही अंगणात झोपायचो आणि नजरेसमोर या दोघांची अखंड सळसळ. चांदण्यात तर पाने चमचम करत असत. ( अर्थात भुताखेतांच्या गोष्टी असायच्याच. )
गेल्यावर्षी वीज पडून एक पिंपळ गेला.. पण जोपर्यंत माझी वाणी आहे तोपर्यंत त्या पिंपळाची आठवण राहीलच.
मला "र" चा उच्चार शिकवणारी ती पत्रावळ त्याच्याच पानाची तर होती.
मामाने दुसर्‍या पिंपळाला पार बांधलाय. तिथेच गणपतीचे देऊळ आहे छोटेसे.

हो दिनेशदा मी नक्की आता लक्ष ठेवते फुलांवर.
आपट्याची पाने जाड असतात तर कांचनची पातळ आणि मोठी असतात.

आमच्या खिडकीतून झालेले खाटीक दर्शन.

वा मस्तच आलेत हे खाटीकचे फोटो.
मी आपट्याची झाडं वेताळ टेकडीवर पाहिली होती, छान मोठ्या शेंगा लागल्या होत्या. त्याचा फोटो काढून मी हे ग्रिटींग केलं होतं तेव्हा.
d.jpg

उद्या आपल्या वर्षूची बिजींग रेडीओवर लाईव्ह मुलाखत आहे... >>>> वा, वर्षुताई. मस्त. कशाबद्दल आहे?

आनंद, अभिमान, कौतुक... सर्व वाटले. >>>> दिनेशदा + १

अरे वा ... वर्षूतै, अभिनंदन! कशाबद्दल आहे मुलाखत?
पिंपळाचं आणि माझं जुनं नातं आहे. लहानपणी आमच्या क्वार्टरच्या अंगणात एक पुरातन पिंपळ होता. उन्हाळ्यात चांदण्यामध्ये बाहेर झोपतांना त्याच्या पानांची सळसळ ऐकणं हा एक जगावेगळा अनुभव असायचा. पिंपळ एवढा मोठ्ठा झाला, तरी अवखळपणा कमी होत नाही त्याचा.

वर्षू अभिनंदन..या मुलाखतीची लिंक असेल तर पाठवून दे Happy

पिकासामध्ये फोटो टाकायचा एकंदरित आळस केला पण आधी माबोच्या सुविधेवरून्ही मोठे फोटो टाकता यायची सोय होती नं? असो बहुतेक मी गंडलेय यावेळी शिवाय फोनवरून फोटो काढल्यामुळेही असेल साइजचा गोंधळ केलाय Wink

जागु ते गुलाब कित्ती छान आहेत गं Happy

उन्हाळ्यात चांदण्यामध्ये बाहेर झोपतांना त्याच्या पानांची सळसळ ऐकणं हा एक जगावेगळा अनुभव असायचा. पिंपळ एवढा मोठ्ठा झाला, तरी अवखळपणा कमी होत नाही त्याचा. >>>>>> नेमकं लिहिलंय ....
पिंपळाचा अवखळपणा ... Happy

वा! वाचतेय वाचतेय.........................................! मस्त.
अरे वा ..........वर्षूची कशाविषयी मुलाखत आहे?
गच्चीतल्या पाण्याच्या टाकीवर थोडं पाणी झिरपत असतं तिथे रोज हे सनबर्ड पाणी प्यायला येतात.
DSCN2069.JPG

उद्या आपल्या वर्षूची बिजींग रेडीओवर लाईव्ह मुलाखत आहे... >>>> वा, वर्षुताई. मस्त. विषय काय गं?
चायनीज मधे नसली तर आम्हालाही दे रेकॉर्डींग ऐकायला Happy

आपलीच लाईव्ह मुलाखत आपण कशी ऐकायची, असा प्रश्न पडला होता वर्षूला. कुणीतरी ती रेकॉर्ड करेल अशी अपेक्षा आहे.

मानुषी, मस्त पोझ दिलीय. एका मातीच्या पसरट भांड्यात पाणी ठेवले तर या दिवसात पक्ष्यांची झुंबड उडेल तिथे.

जिप्सीभौ
मला इग्नोर का बरं मारता?
जो एस..............मस्त आयडिया!
दिनेशदा.............मागच्या उन्हाळ्यात गच्चीच्या कठड्यावर ठेवली होती एक मातीची थाळी पक्ष्यांसाठी . पण ते बहुतेक खरंच इतके नाचले की ४/५ दिवसातच त्या थाळीचे तुकडे खाली सापडले.
आमच्या गावातल्या कुंभारवाड्यात आता बरोब्बर माहितीये की लोक पक्ष्यांसाठी थाळी नेतात.
पसरट थाळी द्या म्हटलं की विचारतात की पक्ष्यांसाठी का?

Pages