निसर्गाच्या गप्पा (भाग-१३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2013 - 12:06

निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्‍या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.

निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहुसंख्य 'निग'वाले मुंबईकर आहेत त्यांच्यासाठी खास...

'सिमेंट-कोंक्रीटचं जंगल अशी या मुंबापुरीची सतत संभावना होत असते. पण एकेकाळी इथं अमाप वृक्षसंपदा होती, असं सांगितलं तर कुणाला नवल वाटायला नको. आपल्याच डोळ्यांसमोर कितीतरी हिरवाया नाहीशा होऊन तिथे सहनिवास उभे राहिलेले आपण बघतो. मग काळाच्या प्रवासात उलटं चालत मागे मागे गेलो तर ?
मुंबई ही एकेकाळ्ची वृक्षात्मजा असणारच. मुंबईतल्या गावांची नावंच देतात हा दाखला. इथं 'बाभूळ'नाथ आहे, 'ताड'देव आहे, 'चिंच'बंदर आणि 'चिंच'पोकळी देखिल आहे. 'उंबर'खाडी आहे, 'भेंडी'बझार आहे, 'फणस'वाडी, 'केळे'वाडी, 'बोर'भाट आहेत. आणि काळाच्या ओघामधे वृक्षांची नावात उलटापालट होऊन बनलेली गावं आहेत. त्यामधे 'माडमळ्या'चं मनमाला, 'पाडळी'चं पारळ-परळ, 'वड'आळीचं 'वरळी' झालं आहे.
कधी काळी मुंबईच्या रस्त्यांना झाडांची ओळख होती. मुंबईत 'सातार' (सातताड) स्ट्रीट होता. 'दोन तार' स्ट्रीट (दोन ताड - Twin Brab Street) होता, आणि एखाद्या वाहतूक बेटाजवळच्या झाडाचं नाव त्या परिसराला देऊन झाडाची ओळख पटवली गेली होती. दक्षिण मुंबईतल्या एलफिन्स्टन सर्कलजवळ सेंट थॉमस कॅथेड्रलसमोरच्या एका चिंचेमुळे तो परिसर होता 'आमलीयागल'. आज मात्र झाडंही नाहीत आणि नावंही नाहीत!'
.................डॉ. डहाणूकरांच्या 'हिरवाई' पुस्तकातल्या मनोगतातून.

हुश्श..............!झाले बाबा एकदाचे वाचून !
मामी, सर्व फोटो ए-वन!
शशांकजी, शांकली पुस्तकातले उतारे ईथे देण्याचा तुम्हा दोघांचा उपक्रम फारच छान !

मुंबईत लॅबर्नम रोड पण आहे. तुलसी पाईप रोड आहे, मिंट रोड आहे !

भेंडीबाजार मात्र जरा गोंधळात टाकणारे आहे. ते बिहाईंड द बजार असे असणार. खास भेंडीसाठी कुठला बाजार ?
संगीतात मात्र हे घराणे आब राखून आहे. लता मंगेशकर पासून अनुराधा कुबेर पर्यंत !

भायखळा, म्हणजे देखील भाया नावाच्या माणसाचे खळे होते.

शांकली छान उतारा. तु मागे विचारलस की ते कुसुंबाचे फोटो वेशवीच्या डोंगरावरचेच आहेत का? हो तिथलेच आहेत ते. तिथे एकविरा मातेच देऊळ आहे व बाजूला ही वनसंपदा आहे. पळस, कुडा, उक्शी, करंज, कडूलिंब, निलगिरी, जांभूळ, आंबा, सावर, पर्जन्य वृक्ष ही माझ्या ओळखीची झाडेही तिथे आहेत.

तुला दिसलेले निळे फुल माझ्या माहेरी आहे.

सगळ्यांच्या गोष्टी धम्माल.

हे माझ्या माहेरी असलेले लव फळाचे झाड. लव फळ हे पिकल्यावर शेंदरी होत. फळाचा आकारण साधारण संत्र्याएवढा असतो. आत सिताफळाप्रमाणे पण पांढर्‍या आणि भरपूर बिया असतात. फळ आंबट गोड असत. आस्वाद घेउन खाणार्‍याला पाव फळ खायला १५ मिनिटे लागतात Lol

ह्या फोटोतील हिरवी फळे तेवढी तग धरतील. बाकी पिवळी असलेली गळून पडतील.

ह्याची पानेही खरखरीत असतात.

शांकली, मुंबईत जांभळी गल्ली आहे, टॅमरिंड लेन आहे, सुपारीबाग आहे, कांदेवादी आहे ,पेरूबाग आणि वाडी आहे चिकूवाड्या तर अनेक आहेत..बोरीबंदर आहे, बोरिवली आहे, जायफळवाडी सुद्धा आहे. बाकी बैंगनवाडी, वडाळे, वडगादी, वगैरेही आहेत. यातल्या काही नावांच्या आणखीही काही व्युत्पत्ती सांगितल्या गेल्या आहेत. बोरीबंदर येथे बोहरी लोकांची वस्ती खूप होती. म्हणून ते बोहरीबंदर. .आजही तेथे बोहरा बझार आहे. भेंडी बाझारची दुसरी व्युत्पत्ती मनोरंजक आहे. क्रॉफर्ड मार्केटच्या मागची बाजू ती बिहाइंड द बझार. त्याचे भेंडी बझार झाले. परळसंबंधी आणखी दोन व्युत्पत्ती आहेत. एक म्हणजे ह्या भूभागाचा आकार परळासारखा थोडा खोलगट, सखल आहे. (आजही पावसामध्ये सर्वात आधी पाणी साचते ते परळमध्ये.) दुसरी व्युत्पत्ती म्हणजे इथे परळी वैजनाथाचे प्रतिकृतीसम किंवा त्याला वाहिलेले, त्याची मूर्ती असलेले मंदिर होते कारण एका विचारसरणीनुसार मराठवाड्यातून आलेला बिंब राजा या देवाचा भक्त होता आणि त्याने इथे नव्या प्रदेशात आपल्या आराध्यदेवतेचे मंदिर उभारले. पुढे पोर्चुगेझांनी त्याचे चर्चमध्ये रूपांतर केले.
घासबंदर,भातबाजार,दाणाबंदर ही नावे तिथे ज्या वस्तूचा व्यापार चाले त्यावरून आलेली आहेत.
याशिवाय जमिनीचे तत्कालीन स्वरूप दाखवणारी खेतवाडी,चिखलवाडी,धोबीघाट, धोबी तलाव,खारेघाट,खार, दांडा,जू, रानवाड,कांटेवाडी चौपाटी, खडक, पहाडी, भरडा, भरडावाडी डोंगरी, अशी नावेही आहेत.

हिरा मस्त माहीती. खरच तुमचा खुप अभ्यास आहे.

आमच्या उरण मधली काही नावे सांगते.
झाडांवरून - बोरी, जांभुळ पाडा, करंजा, पालक मैदान, बेलपाडा, आपटा
प्राणी Lol बोकडविरा, डुक्करखाडी, कोंबुडभुजे, एलीफंटा

कडू लिंबाचा फुलोरा.

मिंट रोड आहे >>> दिनेशदा, मिंटरोडचं नाव त्या रस्त्यावर टांकसाळ होती / आहे म्हणून पडलंय.
भेंडीबाजार मात्र जरा गोंधळात टाकणारे आहे. ते बिहाईंड द बजार असे असणार. >>> हे खासच. अगदी अगदी पटलं. Happy

मुंबईमधे लव्ह लेन देखील आहे. त्याची व्युत्पत्ती ठाऊक आहे का कुणाला इथे? >>> Happy नंदिनी, कल्पना नाही पण करता येतेय. Proud
वरळीला लवग्रोव नावाचं एक पंपिंग स्टेशनही आहे. या स्टेशनमध्ये सांडपाण्यावर प्रक्रीया करून मग समुद्रात सोडतात.

लव ग्रोव हे नाव खरेच प्रेमावरून पडले आहे. पूर्वी हा समुद्रकिनारा होता आणि झाडझाडोर्‍याने भरलेला, निर्जन असा होता तेव्हा ब्रिटिश युगुले इथल्या एकांताचा आणि आल्हाददायक वातावरणाचा उपभोग घेत. संस्कृतमध्ये याचे नामकरण आपण 'प्रेमराजी' असे करू शकलो असतो.

शांकली छानच उतारा
जागू हे फळ पाहिले नव्हते कधी
शांकली मलाही अशीच निळी फुलं दिसली होती. पाषाण लेकच्या कडेला.

जो एस ती फुले शांकलीने टाकलेल्या फुलापेक्षा वेगळी आहेत. मी पाहीली आहेत म्हणून मी हे सांगू शकते.
ते पिवळ फुल शिवण च आहे.
खालची पाने बांडगुळासारखी वाटत आहेत.

जागू धंन्यवाद, शिवणच फूल आणि ही फळं वेताळ टेकडीवर दिसली होती. ही पानंपण त्या फळांच्या झाडाचीच आहेत.

हल्ली अशी फळं बर्‍याच झाडाना दिसताहेत.
P2161026.JPG

हा पक्षी दिसला होता टेकडी परिसरात. पण इतका अस्थीर आहे की फोटो काढण अवघड होतं.
P2161030.JPG

हल्ली अशी फळं बर्‍याच झाडाना दिसताहेत. >>>> सुधीर, सावरीची फळं आहेत ती - त्यातूनच त्या "म्हातार्‍या" बाहेर पडतील यथावकाश व तो पाठमोरा हिरवा पक्षी तांबट किंवा पुकपुक्या आहे ( Coppersmith Barbet).

जो_एस, जागु मस्त आहेत प्रचि..
तो पक्षी, हिरव्या रंगाने होळी खेळून आलेल्या चिमणी सारखा दिस्तोय..
हीरा, खूप सुंदर माहिती..

जो_एस - मस्त फोटो.

हीरा, शांकली, जागू : छान छान माहिती !

मामी : ऐन उन्हाळ्यात स्विस चे फोटो पाहून अगदी गार गार वाटलं.

शशांक : <पुकपुक्या >. हे हे हे.. काय नाव आहे. आवडलं Happy

जो एस. कधी घेतलात तो फोटो? कारण आतापर्यंत त्या म्हातार्‍या रस्त्यावर आल्यासुद्धा. पण फोटोत शेंग अजुनही हिरव्या दिसत आहेत.

मोनाली अग काही ठिकाणी अजुन हिरव्याच आहेत शेंगा सावरीच्या. हवामानाचा परीणाम असेल.

हे मासतोडीचे फुल. इवलेशेच असते. जवळ गेल्यावर मंद सुगंधही येतो. हे झुडूप पुर्ण काटेरी असते. पटकन हात लागला तर त्याच्या टणक आणि बाकदार काट्याच्या रचनेमुळे कातडी/मास पटकन फाटले जाते व थोडे रक्तही येते म्हणून ह्याला मासतोडी म्हणतात. हीचा वापर कुंपणासाठी करतात. लहानपणी हिने भरपुर जखमा दिल्या आहेत कुंपणातून इकडे तिकडे करताना Happy

जागु , कसलं नाजूक आहे फूल.. असल्या नाजुक फुलाचं रक्षण नीट व्हावं म्हणून काटेदार झालं असेल हे झुडुप..

असेय होय जागू. हम्म्म्म्म्म.

असो. मध्यंतरी आपला त्या हनुमान फळाबाबत विषय झालेला. आज फेबु वर काहि फळे व त्यांचे उपयोग असा फोटो पाहिला.

त्यातील एक - कॅन्सरसाठी उपयुक्त असे -
Soursop
Plant - Soursop is the fruit of Annona muricata, a broadleaf, flowering, evergreen tree native to Mexico, Cuba, Central America, the Caribbean and northern South America: Colombia, Brazil, Peru, Ecuador and Venezuela. Soursop is also produced in Somalia. Wikipedia
Scientific name: Annona muricata
Rank: Species
Higher classification: Annona
हे बहुदा वर्षू नी फोटो दिलेले चायनीज सिताफळ होते तसे दिसतेय. का मला चुकुन तसे वाटले?

जो_एस, तुम्ही दिलेला फोटो बहुधा ओसाडी नावाच्या गवतफुलाचा आहे. मी पुस्तकात बघून सांगेन नंतर. या फुलात अजून २-३ रंग पण असतात. पांढरा, गुलाबी वगैरे.

जागू, मासतोडीचा फोटो मस्तच आलाय. ही फुलं खूपशी पाचुंद्यासारखी आहेत. पण ते फिलॅमेंट्स जरा विरळ आहेत पाचुंद्यापेक्षा.
आणि जांभ़ळाचा फुलोरा क्यूट! अगं मी अगदी परवाच पाहिलं जांभळाचं एक झाड....पानं जवळ जवळ नाहीत म्हणावीत इतकी कमी दिसत होती. मी मनात म्हणत होते..दिसतंय तर जांभळासारखं...पण पानं??? आणि नीट निरखून बघितल्यावर मग ओळख पटली!!

शकुन, हा तांबट ना, पुक पुक असा ओरडतो..(किंवा भांडीगल्लीत पितळेच्या किंवा तांब्याच्या भांड्यांवर ठोके देताना जसा आवाज येतो तसा तो आवाज काढतो) म्हणून त्याचं नाव पुकपुक्या!! Happy

लव्ह ग्रोव्ह जवळ एका प्रेमी युगुलांनी आत्महत्या केली होती म्हणून त्याला ते नाव पडले. सध्या तिथे पंपिंग स्टेशन आहे. भरतीला गटाराचे पाणी परत शहरात शिरू नये म्हणून तिथे झडपा लावल्या आहेत.

जो_एस ते पिवळे फूल गंभारी / शिवण चे. दशमूरारिष्ट मधे त्याचे मूळ वापरतात.

Pages