निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.
निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय
(No subject)
नाही नाही जिप्सी........मला
नाही नाही जिप्सी........मला यातलं बेसिकच काही माहीती नाहीये. माझ्या माबो अकाउंट वरून आता मला फोटो डकवता येत नाहीत म्हणून मी पिकासावरून ट्राय करतीय.
हो........माझं पिकासा ...गुगल अकाउंटच आहे.
ओक्के. माझं पिकासा गुगल
ओक्के. माझं पिकासा गुगल अकाउंट नसल्याने मी डायरेक्ट लिंक पेस्ट करू शकतोय.
जिप्सी इथे ही चर्चा योग्य
जिप्सी इथे ही चर्चा योग्य नाही. पण माझे बरेच फोटो तुंबलेत(शब्द चांगला नाही पण....) त्यामुळे विचारते...... १)जेव्हा आपण पिकासा लिंक देतो तेव्हा इथे डायरेक्ट फोटो दिसतो का?
२) फोटो डकवण्याची माबोची प्रोसेस काहीच वापरावी लागत नाही का?
इमेज.....ब्राउझ ...सेन्ड तो स्क्रिप ...इ.इ.?
मानुषी, मला संपर्कातुन तुमचा
मानुषी, मला संपर्कातुन तुमचा ईमेल आयडी पाठवा. मी एक डॉक फाईल क्रिएट केली आहे. ती तुम्हाला पाठवतो. त्यात स्क्रीनशॉटसहित माहिती दिली आहे.
थॅन्क्स जिप्सी. पाठवते.
थॅन्क्स जिप्सी. पाठवते.
आह्हा.. मस्त कोलाज आणी
आह्हा.. मस्त कोलाज आणी कविता.. जिप्सी धन्स.. आणी तुलाही होळी च्या शुभेच्छा..
वॉव... जागुली चं घर नेहमीच
वॉव... जागुली चं घर नेहमीच प्रसन्न, टवटवीत असेल या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात
जागु,
कैर्या तर छान लगडल्या आहेत,असे कैर्याचे भरलेले झुपके खुप कमी पहायला मिळतात,झाडाला चांगली जमीन,पाणी मिळाल्याच दिसतं.
शांकलीजी ,
लोणारबद्दल छान माहिती.
मानुषी,
चिक्कुची बाग मस्तच
शोभा, या कोकिळा ( म्हणजे
शोभा, या कोकिळा ( म्हणजे श्री कोकिळ ) केवळ याच काळात गातात. मग मात्र त्यांचा आवाज लुप्त होतो. परत दरवर्षी भरपूर प्रॅक्टीस केली तरच ते सूर गवसतात, अधूनमधून सौ कोकिळ, चित्कारतात.. ( कधीची अवघडलेय मी, मेलं एक कावळ्याचं घरटं काही शोधता येत नाही कि त्या मठ्ठ कावळोबाला हुसकावता येत नाही. कित्ती कित्ती म्हणून सहन करायचं ते मी. जळ्ळा मेला तो कोकिळेचा जन्म... वगैरे वगैरे.. )
शोभा, या कोकिळा ( म्हणजे श्री
शोभा, या कोकिळा ( म्हणजे श्री कोकिळ ) केवळ याच काळात गातात
दिनेशदा,शोभा
आज सकाळ पासुन सोसायटीजवळ एक कोकीळ (कि कोकिळा?) कुहु कुहु अशी गात आहे. त्याला मीही (शिट्टीच्या आवाजात) भरभरुन साथ दिली
दिनेश दा, शोभा.. अनिल...
दिनेश दा, शोभा..
अनिल... कोकीळ बरोबर जुगलबंदी..
वर्षु, मुलांना गंमत म्हणुन
वर्षु,
मुलांना गंमत म्हणुन सुरात सुर मिसळला ....
मानुषी अग तुझा विपु आत्ता
मानुषी अग तुझा विपु आत्ता पहिला. पण फोटो अपलोड करण तुला जिप्सीच सोप्या भाषेत सांगेल.
माझ्या पाठच्या आवारातील करंजावर रोज दोन कोकीळ आणि एक कोकीळा असतात.
मी मागे शेंग आणि फळांचे फोटो दिलेत ते कोडी ओळखण्यासाठी नाही. ती मलाच पडलेली कोडी आहेत आता हे अजुन एक मला पडलेल कोड, हे कसल झाड आहे?
वॉव्...किती सुंदर आहे झाड...
वॉव्...किती सुंदर आहे झाड... कोडं सुटेलच जाणकार लोकं आल्यावर्..मी पण उत्तराची वाट पाहतेय
अय्यो!! जागूडे तुझ्या घराच्या
अय्यो!! जागूडे तुझ्या घराच्या आसपास खजाना आहे की गं!! मज्जा आहे गं तुझी!!
अगं हा कुसुंब!! याच्या पानांची रचना अशी आहे का? - एका उप फांदीवर पानांच्या ३ जोड्या, त्यातल्या पहिल्या दोन मोठ्या, पानांना देठ अजिबात नाही आणि किंचीतशी नागमोडी... असं असेल तर हा डोळे झाकून कुसुंब आहे!! याचं बोटॅनिकल नाव स्क्लीचेरा ओलीओसा आहे. (स्पेलिंग तोंडपाठ नाही..:अरेरे: नंतर पुस्तकात वाचून सांगीन)
कहो तो कुसुंबी रंग सारी
कहो तो कुसुंबी रंग सारी रंगावा... मीराबाईची ओळ आहे ही.. पण हा सातपुड्याच्या उत्तरेलाच जास्त चांगला फुलतो.
गोव्याला स्पाईस गार्डनमधे व्हॅनिला ची वेल बघितल्यावर तिथला गाईड म्हणाला होता, कि नैसर्गिक व्हॅनिला खुपच महाग असतो. ( मी १० डॉलरला एक शेंग घेतल्याचे आठवतेय. ) आजच्या लोकसत्तामधे http://www.loksatta.com/navneet-news/kuthul-vanilla-87851/ असे लिहिलेय, कि साधारणपणे कृत्रिम व्हॅनिलाच वापरतात आणि तोही लाकडाच्या लगद्यापासून करतात... चला आपापल्या घरच्या व्हॅनिला इसेन्सच्या बाटल्यांवर काय लिहिलेय, ते बघा बरं !
कुसुंब म्हंजे लाखे चं झाड
कुसुंब म्हंजे लाखे चं झाड का???
सतपुडा..फॉरेस्ट आमच्या एम पी त ही आहे ना.. घाटातून बस जाताना रस्याच्या कडेने मैलोमैल सोबत करणार्या जंगलात ही झाडं पाहिली होती..
वर्षू, लाखेचे किडे असतात.
वर्षू, लाखेचे किडे असतात. त्यांची विष्ठा म्हणजे लाख. ते अनेक प्रकारच्या झाडावर पोसतात.
तिकडे कदाचित याच झाडावर पोसत असतील.
हा रंग म्हणूनच जास्त माहित आहे महाराष्ट्रात, कारण अशी सुंदर पालवीची झाडे फारशी दिसत नाहीत.
ऐनाची पालवी साधारण अशीच असते पण ती लवकर हिरवट होते.
रच्याकने वायंगी, कोनफळी, कुसुंबी, अबोली, अंजिरी, गुलबक्षी, हळदी, मोरपिशी, शेवाळी.. हे सगळे (खास करुन पैठण्यांमधले ) रंग निसर्गातूनच आलेले आहेत.
ओह.. असं आहे काय...
ओह.. असं आहे काय...
मागे नि.ग. वर जिप्सि ने फोटो
मागे नि.ग. वर जिप्सि ने फोटो टाकला होता कुसुंब चा त्यामुळे ते झाड पाहता क्षणीच मला त्या झाडाची आठवण आली होती. ऐन आमच्या परीसरात भरपूर आहे. पण ऐन इतका लालभडक होत नाही. हे फोटो मी उरणच्याच वेशवी येथील डोंगरावर काढले आहेत. तिथेलीच ही सगळी मला को़डी पडली आहेत.
लाख किड्यांपासुन बनते हे माहीतच नव्हत.
य्ग ५ग न्ब्ग्ब्ब्ब्ब्भ्न्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्जिक```````````````````````````````````` ब ह्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्किउ ,क,, म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
ह्या वरच्या ओळी राधाने टाईप केल्या आहेत. ती पण त्या डोंगरावर आली होती.
राधाला मम्मं हवा आहे का
राधाला मम्मं हवा आहे का ?
जागू, ऐन आणि कुसुंबीचा फोटो एकाच पोस्ट मधे टाकला तर फरक कळेल आपल्याला.
म्म्म्म्म्म............. आई
म्म्म्म्म्म............. आई गं किती गोड....
ती पुजेत म्हणतात तसे मम म्हणत
ती पुजेत म्हणतात तसे मम म्हणत असेल.
चालेल ऐनाचा फोटो तसा दिसल्यावर काढेन मी.
दिनेशदा | 28 March, 2013 -
दिनेशदा | 28 March, 2013 - 15:34
वर्षू, लाखेचे किडे असतात. त्यांची विष्ठा म्हणजे लाख. ते अनेक प्रकारच्या झाडावर पोसतात.
>> दिनेशदा, विष्ठा नाही, घाम म्हणा हवं तर
कारण तो सर्वांगातून पाझरणारा रस असतो.
After a day or so of settling, the nymphs start secreting resin from the glands distributed under the cuticle throughout the body, except mouth parts, breathing spiracles and anus.
http://nsdl.niscair.res.in/bitstream/123456789/219/1/
डॉ. अवचटांच्या, 'शिकविले
डॉ. अवचटांच्या, 'शिकविले ज्यांनी' पुस्तकातल्याच 'महाजन सर, झाडं आणि मी' या लेखातला हा एक परिच्छेद...
'एका उन्हाळ्यापासून बापूंबरोबर (श्री.द.महाजन सरांबरोबर) बाहेर झाडं पहायला सुरवात झाली. सगळी झाडं निष्पर्ण, त्यामुळे निराश झालो होतो. मी बापूंना म्हटलं,"काय उन्हाळ्यात होतं हो झाडांचं, नुसत्या तुरांट्या होऊन जातात नाही?"
"ती तगून राहण्याची फार विलक्षण स्ट्रॅटेजी आहे. पानं हा झाडाचा केवढा महत्वाचा अवयव. अन्न निर्माण करणारा. त्याचं वस्तुमान केवढं; पण प्रतिकूल परिस्थितीत ते झाड केवढा धोका पत्करतं, पाऊस येईपर्यंत जगण्यासाठी. पानाच्या खालच्या भोकांतून जे ट्रान्स्पिरेशन चाललेलं असतं, त्यात किती वॉटर लॉस असतो माहीत आहे? जवळ जवळ ९६ ते ९९ टक्के. १ ते ४ टक्के एवढंच पाणी झाड स्वत:साठी वापरतं. याला नेसेसरी एव्हिल (आवश्यक तोटा) म्हणूयात आणि तो वाचवण्यासाठी झाडं एवढा पानांचा संभार झाडून टाकतात."
तेवढ्यात एका झाडाला नवी लालसर पालवी फुटलेली दिसली. विचारलं, "मग हे कसं काय?"
आता पावसाळ्याची तयारी करायची, म्हणून जे काही झाडानं साठवलेलं असतं, ते सर्व वापरून ही पालवी आणलीय. हाही धोकाच. पण पत्करलेला. जेव्हा अनुकूलता येईल तेव्हा परत फोटोसिंथेसिसचे अवयव तयार हवेत ना!"
"पण यात मरतही असतील काही झाडं..."
"मरतात की, तुम्हाला झाडांचा एकूण मृत्यूदर माहीत आहे? ९९%, पृथ्वीवर हेवढी झाडं जन्माला येतात, त्यातली एक टक्का झाडं फक्त जगतात. म्हणून जगात, विश्वात डोकावाल तर असं दिसतं, लाइफलेसनेस इज अ रूल, अँड लाइफ इज अॅन अॅक्सिडेंट. अमुक एक म्हणत होते, अहो अमक्या गृहस्थांचं हार्ट फेल झालं. मी म्हणतो, ते चालत होतं हाच या जगातला अपघात होता. सगळे ग्रह, तारे बघा कुठंही जीवनाचं चिन्ह नाही!" परत मूळ विषयाकडे येऊन म्हणाले, "हे लक्षात ठेवूनच तेवढ्या प्रमाणात बिया निर्माण होतात. अस्थानी पडलेल्या कितीतरी बिया जागीच जळून जाणार आहेत, हे गृहीतच आहे."
एका झाडाकडे बोट करून म्हणाले, "हे बघा वारस. याला आम्ही वेडं झाड म्हणतो. ज्या वेळी सगळ्यांची पानं झडतात, तेव्हा याला पानं असतात आणि जेव्हा इतरांना पानं असतात, त्या सीझनमधे हे निष्पर्ण होतं. का ते माहीत नाही."
शांकली, डॉ. अवचटांच्या,
शांकली, डॉ. अवचटांच्या, 'शिकविले ज्यांनी' पुस्तक वाचायलाच हवे. उत्सुकता वाढते आहे.
ऑगस्ट २०१२ मधे नॅशनल पार्कच्या जंगलात "सिटी वॉक" केला होता. तेव्हा दाखवलेली कुसुंबाची पालवी... (बहुदा मी नीट ऐकले असेल आणि वहीत नीट टिपले असेल)
वा शांकली काय सुंदर उतारा
वा शांकली काय सुंदर उतारा आहे.
वा शांकली काय सुंदर उतारा
वा शांकली काय सुंदर उतारा आहे.>>>+१
वा शांकली काय सुंदर उतारा
वा शांकली काय सुंदर उतारा आहे.
धन्यवाद !
माहीम निसर्गौद्यानात बॉन्साय
माहीम निसर्गौद्यानात बॉन्साय चे प्रदर्शन भरले आहे. ते ३१/३ पर्यंत खुले आहे. एरवी हे उद्यान सकाळी सात ते दुपारी ३.३० या वेळात उघडे असते. या प्रदर्शनासाठी म्हणून ते संध्याकाळी सहा पर्यंत खुले रहाणार आहे. बॉन्साय म्हटले की नेहमीप्रमाणे फाय्कस, अॅडेनिअम,wrightia religiosaa हे नेहमीचे यशस्वी कलाकार आलेच. पण काही वाढखुंटित (खुंटवलेली) झाडांच्या कलाकृती खरोखर देखण्या आहेत. सफेत जामच्या दीडफुटी झाडावर दोन अडीज इंची रसरशीत जांब सुंदर दिसत होते. फोटो सेल फोनने काढले आहेत त्यामुळे सरळसाधे आहेत..
Pages