निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.
निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय
अरे व्वा.. लिंक वर टिचकी
अरे व्वा.. लिंक वर टिचकी मारली आणी केव्हढातरी खजाना हाती आपलं डोळ्यासमोर आला.. >>> +१
मोनालि, प्रा. राम शेवाळकरांचे
मोनालि, प्रा. राम शेवाळकरांचे विवेचन आणि लताचे गायन अशी सिडी उपल्ब्ध आहे ज्ञानेश्वरीची.
पसायदानचा फार छान अर्थ सांगितला आहे.
इथे भुता, म्हणजे सर्व प्राणिमात्रांना असा अर्थ घ्यावा लागेल.
चेतना चिंतामणीचे गाव, जे खळांची व्यंकटी सांडो.. इथे पण गाडी अडणार आहेच !
इथे भुता, म्हणजे सर्व
इथे भुता, म्हणजे सर्व प्राणिमात्रांना असा अर्थ घ्यावा लागेल.>> हो हो तो तसा घेतलाच आहे. व त्याला सांगीतले. या कारणे समानार्थी शब्द ही क्न्सेप्ट पण समजवायची आहे. धन्स
असो, आता या धाग्याला अजुन अध्यात्मीक वळण लागेल नाहितर. जागू फटके देईल
हो तर!! चीन मधे यूनान आणी
हो तर!! चीन मधे यूनान आणी शिनचियांग प्रॉविंस मधे अंजीर होतात. चायनीज भाषेत अंजीराचे नाव आहे ,' बिनफुलाचे फळ' , कारण या झाडाला फुलं येतच नाहीत, ही self-pollinating असून , फुलं अॅक्चुली फळांच्या आतच उगवतात आणी याच फुलांतील त्या मस्त क्रंची बिया , फळाचा गर खाताना
लागणार्या...
खुप समर्पक नाव आहे ! आपण
खुप समर्पक नाव आहे ! आपण मात्र " माझेच मी म्हणू कि, हे भाग्य या घराचे, दिसले मला कधीचे हे फुल उंबराचे " असे गाणे लिहिले.
उंबरामधले किडे मकोडे - http://www.maayboli.com/node/23879 हा माझा लेख.
चायनीज भाषेत अंजीराचे नाव आहे
चायनीज भाषेत अंजीराचे नाव आहे ,' बिनफुलाचे फळ' , >> वर्षू, खर्र खर्र चायनीज नाव पण दे ना. पाहुदे तर वाचताना जीभ कशी वळते
मोनालिप.. हे वाचून उच्चार
मोनालिप.. हे वाचून उच्चार लिही,मग सांगेन बरोबर आहे कि नै ते
'wú huā guǒ''
वु हुआ गुऑ. वाचायला बरे
वु हुआ गुऑ. वाचायला बरे लिहायला कठीण असे झाले
या निमित्ताने सहजच सुचले -
या निमित्ताने सहजच सुचले - वेगवेगळ्या ठिकाणच्या नि. प्रेमींनी / माबोकरांनी अशी कोडी पण घालायला हरकत नाही ना. काय मजा येईल हे शब्द जुळवताना.
चु क ली... ऊ ह्वा कुओ असं
चु क ली...
ऊ ह्वा कुओ असं म्हणायचं...
ऊ ला हवी विहीर !
ऊ ला हवी विहीर !
ऊ ला हवी विहीर !>>>>>>>>..
ऊ ला हवी विहीर !>>>>>>>>.. ती काय विहीरीत जीव देणार आहे?
अरारारारा. ते 'ह' ला काय काय
अरारारारा. ते 'ह' ला काय काय जोडला हाय बाई तु? मर्हाठीत पण वाचता येईना झाला. हे म्हणजे माझे - वाचता येईना अक्षर वाकडं असं झाला आता.
ऊ ला हवी विहीर !>>>>>>>>.. हे सहीये एकदम.
आजची तारीख, आम्हा दक्षिण
आजची तारीख, आम्हा दक्षिण गोलार्धातील लोकांना महत्वाची. आता आम्ही हळू हळू सूर्यापासून दूर जाणार.
आमच्याकडे थंडी.
अल गोर यांचा द इनकन्व्हीनियंट ट्रूथ बघितला का सगळ्यांनी ? त्यात असे दाखवलेय कि उत्तर गोलार्धाच्या मानाने दक्षिण गोलार्धात जमीन फारच कमी आहे, त्यामूळे झाडेही कमी, म्हणजेच पाने कमी म्हणजेच हवेत सोडलेला कार्बन डाय ऑक्साईड कमी म्हणजेच तपमान वाढ कमी म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग कमी.
जागु, होळीच्या तोंडावर हा १३
जागु,
होळीच्या तोंडावर हा १३ वा भाग चालु झाला आहे,त्यामुळे निसर्गाचे आणखी विविध रंग पहायला वाचायला मिळतील अशी अपेक्षा करु या !
नवीन भागाच्या शुभेच्छा !
अरे व्वा.. लिंक वर टिचकी मारली आणी केव्हढातरी खजाना हाती आपलं डोळ्यासमोर आला.. स्मित
मज्जा आली वाचताना.. Pepper longum व्यतिरिक्त अजून ही कितीतरी माहिती मिळाली..
दिनेश दा धन्स!!!
अगदी असचं !!
सुप्रभात!!!! पुन्हा एकदा
सुप्रभात!!!!
पुन्हा एकदा ऑफिसमधला वेल...
सध्या घराच्या समोरचा करंज
सध्या घराच्या समोरचा करंज मस्तपैकी कोवळी पाने लेऊन नटलाय.
"वृक्षगान" या पुस्तकात डॉ. शरदिनी डहाणुकरांनी केलेलं करंजाचं झाडाच चपखल वर्णन,
फेब्रुवारी-एप्रिलमध्ये करंजाची पान गळून पडल्यावर अनवीन पालवी येते ती त्याची कुडी धन्य करते आणि आपले नेत्र! अशी तकतकीत हिरवी; सारं झाड तेलाने न्हाऊनमाखून आंघोळ करून तयार असतं. याच टवटवीत हिरवया वृक्षावर लुब्ध होऊन कुण्या वनस्पतिशास्त्रज्ञाने याला नाव दिल होत पॉन्गामिया ग्लॅब्रा. ग्लॅब्रा म्हणजे गुळगुळीत पण नवीन नामकरणात हे कल्पक नाव लुप्त होऊन तिथे आलं पिन्नाटा. संयुक्त पानांवरून दिलेलं हे उपनाव झाडाच्या त्या गुणविशेषाची झलकदेखील दाखवत नाही.
दिनेशदा, तुमच्या लेखातुन बघुन
दिनेशदा,
तुमच्या लेखातुन बघुन आज कॅशिया शोधला..
खरतर उलट्...कॅशियाला आज तुमच्या लेखात शोधला
इथे सीप्ज मध्ये खुप झाड आहेत. गोरखचिंचेचीच १० असतील
मधु, कसला वेल आहे हा ?
मधु, कसला वेल आहे हा ? ओळखीचा वाटत नाही !
वैशाली,
सीप्झ मधल्या गोरखचिंचेच्या झाडांना फुले येतात का ? मी असे ऐकलेय कि भारतात नव्याने हि झाडे रुजत नाहीत. त्यामूळे तरुण रोपे दिसतच नाहीत.
कॅशियाचे अनेक प्रकार, राणीच्या बागेत आहेत.
मधु, कसला वेल आहे हा ? ओळखीचा
मधु, कसला वेल आहे हा ? ओळखीचा वाटत नाही ! >>>> मंकी ब्रश व्हाइन (Combretum rotundifolium) आहे का ??
हो येतात फुल. इथे खुप झाड
हो येतात फुल.
इथे खुप झाड होती.अजुनही आहेत.पण तोड्णी पण खुप आहे...:-(
मोनालिला कोडे हवे होते ना ?
मोनालिला कोडे हवे होते ना ? हे घ्या. त्या बीबी वर सोडवलेत तरी चालेल.
०५/००८
जास्मिन कुळातील फुलात ( जाई, जुई, सायली वगैरे ) सुगंध असला तरी रंग नसतातच. तर शशांक आणि शांकलीने एक प्रयोग करायचा ठरवले. यातल्या अनेक वेलींचा संकर करुन त्यांनी प्रयोगशाळेत एक वेल वाढवली.
आणि त्यांच्या प्रयोगांना यश आले. सुगंध आणि रंग यांचा अनोखा मिलाप असलेले फुल आले त्या वेलीला. इतकेच नव्हे तर एकाच फुलात, अनेक रंग दिसू लागले.
अर्थात ते फुल बघायला, नि.ग. वरचे सगळे शशांक शांकलीच्या घरी गेले. सर्वांनी त्या फुलाचे अनोखे रंग बघून, नवल केले. वर्षूला मात्र मनात असूनही येता येत नव्हते. तिने जिप्स्याला फोटो पाठवायची विनंती केली..
मग सगळ्यांना लक्षात एक गोष्ट आली. त्या दोघांनी हि वेल, प्रयोगशाळेत, कृत्रिम प्रकाशात वाढवली होती.
तिला प्रकाश अजिबात सहन होत नसे. अगदी एक नाजूक फांदी जर दिवसा प्रकाशाकडे नेली तरी कोमेजत असे. रात्रीच्या चंद्रप्रकाशाचाही प्रयोग अयशस्वी ठरला. त्यामूळे जिस्प्सी फ्लॅश वापरायला घाबरत होता.
पण वेलीच्या मनात काय होते, हे ती गाण्यात कसे सांगेल ?
शशांक, अगदी समर्पक नाव वाटतेय
शशांक, अगदी समर्पक नाव वाटतेय
मधु, त्या फुलांचा वरुन किंवा जवळून फोटो मिळेल का ? फोटोसाठी फूल तोडले तरी चालेल !
दिनेशदा तथाकथित अशोकाला
दिनेशदा
तथाकथित अशोकाला आलेली कोवळी पालवी.
शोभा, गाण्याबाबत डोकं
शोभा, गाण्याबाबत डोकं चालवायचं कि.
या झाडाला आता हिरवा फुलोरा पण येईल. याला आसुपालच हेच नाव योग्य आहे.
शोभा, गाण्याबाबत डोकं
शोभा, गाण्याबाबत डोकं चालवायचं कि.>>>>>>नाही ना चालत
या झाडाला आता हिरवा फुलोरा पण येईल. >>>>>>>>>>आलाय.
मग हिरवी फळे येतील, ती पिकून
मग हिरवी फळे येतील, ती पिकून काळी होतील, झाडाखाली सडा पडेल !
सध्या हवामान कसे आहे आपल्याकडे ? गरम व्हायला लागले का ? मला इथे बसून काळजी वाटतेय.
सध्या हवामान कसे आहे
सध्या हवामान कसे आहे आपल्याकडे ? गरम व्हायला लागले का ? मला इथे बसून काळजी वाटतेय.>>>>>>>हो. रात्री जरा गारवा असतो. पण दिवसभर गरम होत आहे. पण तरी त्यामानाने अजून कमीच आहे .
दिनेशदा, इकडे ऊन तर वाढु
दिनेशदा,
इकडे ऊन तर वाढु लागलय, आता राज्यात दुष्काळाच्या झळाही वाढतील,मुक्या प्राण्यांचा पाण्या अभावी जीव जाऊ नये हिच आशा.
अजून दोन महिने आहेत, पावसाला
अजून दोन महिने आहेत, पावसाला
गल्फ मधे उन्हाळा असायचा, आणि सध्या एसी वगैरे आहेत, पण परंपरेने पण त्यांनी उन्हाळ्याचा सामना करायचे कौशल्य कमावले होते. त्यांची घरे जाड धाब्याची असायची आणि दारे खिडक्या अगदी लहान. शिवाय उंचावरून वाहणारे थंड वारे अडवून घरात आणण्यासाठी घरावर एक मनोरा पण असे. अशा घरातले तपमान कमी रहात असे. अर्थात आधुनिक शहरातली घरे तशी नाहीत आता.
Pages