निसर्गाच्या गप्पा (भाग-१३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2013 - 12:06

निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्‍या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.

निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, दिनेशदा आणि शांकली आभार.
आतच ठेवून बघते फुले येतात का? आणि आले कि टाकते पुन्हा फोटो.
खुप आवडते येथे येऊन वाचायला. पण तुम्हा लोकांसारखे समर्पित नाहीये मी.
जागू, टाक ग नाव तुझ्या वरच्या यादीत. शरमाशर्मी येईन.
असो, हे पान असेच ओघळत रहो.
Happy

मानुषी आज आई कडे जाऊन तुझ्यासाठी खराटा काढण्याचे फोटो आईकडून काढून घेतले.

झावळ्यांच्या पात्या काढताना माझे काका.

झावळीच्या पुढच्या छोट्या पात्या तशाच सोडायच्या. त्या खुप छोट्या असल्याने खराट्याचा आकार वरखाली होतो. पुढचा भाग आणि तासुन राहीलेला झावळीचा पुर्ण भाग जाळण्यासाठी उपयोगी पडतात.

मानुषी अशी पाती काडीच्या बाजूने चिमटीत धरायची आणि सुरी आत खुपसायची काडीच्या जवळ किंवा काडीला लागुन.

सुरी घुसवून पुर्ण पाती काढायची.

राहीलेला पाठचा भाग पुन्हा सुरी मागे ओढून किंवा पाती उलट्या दिशेने फिरवून काधून टाकायची.

माझी आई ह्याला परत थोड पॉलिश करते म्हणजे पातीचे कण असतील तर तासते. तिला ते सरावाचे आहे.

ही माझी आई.

काडी काढल्यावर राहीलेल्या पात्या जळणासाठी बांधून ठेवायच्या.

हा तयार झालेला खराटा. आमच्या इथे ह्याला बुताराही म्हणतात. आई असाच प्युअर देते. बाजारात मध्ये मोठी दांडी टाकून देतात.

हा गुदगुल्या वाला शेपटांचा भाग. पण जमिनीवरील पाला पाचोळा काढताना हा कोयत्याने तासतात. नाहीतर पाला पुढे सरकताना अडथळा येतो.

हा हातात धरायचा भाग सध्या सुतळीने बांधला आहे पण तो काथ्याने चांगला घट्ट बांधावा लागतो.

जागुले धन्य आहेस गं बाई तू .. खास आई कडे जाऊन खराटा प्रात्यक्षिक करून लगेच फोटो डकवलेस ही..
__/\__

तुझ्या आई ला पाहून खूप आनंद वाटला आणी त्यां चा उत्साह पाहून इतकं छान वाटलं ना... लक्की यू जागु!!! Happy

जागू - खराटा प्रात्यक्षिकाकरता मनापासून धन्स...
तुझ्या आईला आवर्जून नमस्कार सांग...
तुझ्या आईचा उत्साह तुझ्यामधेही उतरलेला दिसतोय ....
खूपच चांगली गोष्ट .....

मेकिंग ऑफ खराटा....मस्तच गं जागू. तुझी आई ग्रेट आहे. या वयात त्यांचा उत्साह आणि कामातली सफाई खूप शिकण्यासारखी आहे. तुझ्या आई वडिलांना नमस्कार सांग.
सुमंगल, ते रोप कदाचित बाल्समचंही असू शकेल बरं का. (बाल्सम आपल्या तेरड्याच्या कुळातलंच आहे.)

वर्षू, शांकली,शशांक तुमचा निरोप आई पर्यंत पोहोचवते.
तिच्या कडील हे हिरव्या चाफ्याचे फुल. उन्हाळयामुळे साईझ छोटी झाली आहे.

जागू धन्य आहेस बाई!
आता मात्र मला खराटा करावाच लागेल.
आईला नमस्कार सांग हं!
तुझ्या आईचा उत्साह तुझ्यामधेही उतरलेला दिसतोय >>>>>>>>>> अगदी अगदी!
जरा वेगळा विषय आहे पण रहावत नाही म्हणून लिहिते.....
आंबेडकर जयंती अक्षरशः दिवाळी सारखी ४ दिवस चालू आहे. मगापासून २ तास झाले.........."मुझिक"
इतक्या जोरात लावलंय की खिडकीच्या काचा थरथरताहेत. दारं खिडक्या "गच्चिम" बंद आहेत तरीही !
टीव्ही .....फक्त चित्रच पाहतेय. कारण बाहेरच्या आवाजापेक्षा टीव्हीचा आवाज मोठा केला तर मी ठारच बहिरी होईन.
आणि गाण्यांचा चॉइस? काहीच लॉजिक नाही. १) आया है राजा २) सात समुंदर पार मै तेरे३)हिम्मतवाला, मधेच इन्गिश गाणी. आणि जमल्यास "भीमस्तवनही"!
रात्री तर छळवादच!......................(खूप रागाने डोळे फिरवणारी बाहुली)

जागू, हिरवा चाफा पिवळा पडतो का फुलल्यावर? मी हिरव्याच रंगाचा पाहिला आहे, अस कधीच नव्हता पाहिला.

बरं इथे मला कोणी देऊ शकत असेल तर एक सल्ला द्या. माझे एक गुलाबाचे रोपटे मेले Sad
उन्हे, पाणी, खत, माती सगळे ठीक आहे (असे निदान मला वाटते) तरी असे का झाले असावे.
दुसर्‍याची पाने पिवळी पडत आहेत व कळ्या गळाल्या... असे का होत असेल? काय करु?

सकाळची उन्हे डायरेक्ट मिळतात झाडांना. मग दुपारची तीव्र उन्हे मिळत नाहीत पण बाहेरच्या उजेडातच आहेत झाडे. नवीनच घेतली होती रोपटी Sad

तू रोपटी किती दिवसांपुर्वी घेतली होतीस शैलजा? लावताना कशी लावलीस? लावताना त्याची माती तशीच ठेवायची असते. ती काढायची नसते. मुळांना जास्त मोकळे करुन दुसर्‍या ठिकाणी लावले की गुलाब जगताना खुप कठीण असतात. दुसरी शक्यता किड लागणे आहे. आणि जाणकार सांगतीलच.

हिरवा चाफा पुर्ण तयार झाल्यावर पिवळा होतो व पिवळा होऊन खळतो. पिवळा झाल्यावर त्याचा खुप गडद वास येतो.

मामी निसर्गाचे नैसर्गिक आशिर्वाद असावेत. Happy

माती तशीच ठेवली होती जागू. रोपटी ह्याआधीपण लावली आहेत. हे असं पहिल्यांदाच पाहते आहे, म्हणून कळत नाहीये, काय होतेय ते.

खराटे पुराण मस्तच झालय.

जागू आणि तुझ्या आईच्या उत्साहाला hats off ...फेटे उडवा... फेटे उडवा....

हा तयार झालेला खराटा. आमच्या इथे ह्याला बुताराही म्हणतात >>>>> काहीजण हिराची झाडू म्हणतात. माझी एक मैत्रीण सलेतरा म्हणते.

किंगफिशर

कालच पक्षांसाठी पाण्याचं मातीचं भांडं आणलं. तर आधी साधनाचे आवडते पक्षिराज अगदी झुंडीने आले पाणी प्यायला. अगदी पिकनिकला आल्यासारखे उंडारत होते. त्यांना इग्नोर मारलं.
पण हे होले पहा.......होलेच ना?

मानुषी, खुपच छान. पाणी पिताना पक्षी बघणे म्हणजे निव्वळ आनंद.

सध्या दुपारी १२ ते १२.३० दरम्यान २-३ बुलबुल येतात. पाणी तर पितातच पण त्या भाड्यात डुबकी मारून आंघोळसुद्धा करतात. अंग फुगवून बसतात. तसे धीट आहेत. २ फुटावर उभे राहीले तरी उडून जात नाहीत.

कालच पक्षांसाठी पाण्याचं मातीचं भांडं आणलं.>>>>> मातीचं भांडं ठेवण्यात काही कारण आहे का? मी स्टीलचेच ठेवले आहे.

खुप दिवसांपासुन बरच काही वाचायचं राहिलं होतं. आज सकाळपासुन वेळ मिळेल तसं वाचुन काढलं..

जागु, आईला खराखुरा सा. न. घाल माझ्यातर्फे ... Happy

मधु म......... मला वाटतं स्टीलच्या भांड्यात पाणी लवकर गरम होत असणार.. विशेषतः या उन्हाळ्यात. त्यामानाने मातीच्या भांड्यात थंड रहात असणार.
आणि जेवढे लवकर गरम होईल तेवढेच त्याचे बाष्पीभवनही लवकर होत असेल.??????????
जाणकार प्रकाश टाका.......शशांकली, दिनेशदा, जागू........

<<खुप दिवसांपासुन बरच काही वाचायचं राहिलं होतं. आज सकाळपासुन वेळ मिळेल तसं वाचुन काढलं<< +१
जागु...तुझ्या आईला सलाम! Happy

खराट्यावरुन आठवलं. गावाकडे असतांना आज्जी तुरीच्या काड्यांचा, मेंदीच्या झाडाच्या वाळक्या काड्यांचा खराटा करायची. एकदा गंमत झाली. असाच अवेळी पाऊस झाला, भरपुर. मेंदीच्या काटक्यांचा खराटा रात्रभर अंगणार भिजत राहिला. दोन दिवसांनी बाहेर काढला तर खराट्याला छान छोटी छोटी हिरवीगार पानं फुटलेली. जगण्याची इतकी तीव्र इच्छा बघुन मजा वाटली. Happy

जागू, आईंना काम करताना बघून खरोखर पाय धरावेसे वाटले. त्यांचा उत्साह कणभराने तरी आम्हाला लाभो.
मधू, धातूची भांडी उन्हात चमकतात त्यांनी पक्षी बुजतात. कावळ्यांना सवय असल्याने त्यांना फरक पडत नाही.

आर्या, तुरीचा मूळांना पण मस्त आकार असतो. मी त्यापासून काही शोभेचा वस्तू केल्या होत्या. ( बहिणीच्या लग्नात, १९७९ ला Happy )

---

आभाळात संध्याकाळी मोरपिशी हिरवा रंग मला गेल्या ४/५ वर्षांपासूनच जाणवायला लागलाय. गोव्यातल्या घरातूनही रोज सूर्यास्त बघत असे, पण हा रंग नसे. आफ्रिकेत आल्यापासून मात्र हि छटा जवळजवळ रोजच दिसायला लागली आहे.

वा दिनेशदा खुपच छान फोटो आहेत.

माधुरी, आर्या, चिमुरी आईला तुमचा मेसेज देते. धन्स.

आमच्याकडे पाणी ठेवावे लागत नाही. कारण झाडांना पाणी घालताना वगैरे डबक्यात पाणी साचते. पण आता हळू हळू सुकेल. पण मी आता आमच्याकडे असलेल्य दगडी भांड्यात पाणी ठेवणार आहे. हल्लि बुलबुल तर रोज फुटलेल्या पाईपच्या फवार्‍यावर अंघोळ करतात.

खराटा, पक्षांसाठी भांडी.... मस्त.
मी गेल्या वर्षी प्लॅस्टीकच्या पसरट भांड्यात पाणी ठेवायचे. पक्षी कधी दिसले नाही, पण सकाळी परत स्वच्छ पाणी भरायला गेले की त्यांची पांढरट पिसे व विष्ठा दिसायची. हं आता त्यावरुन कोणते पक्षी ते मात्र नाही सांगु शकणार Wink

दिनेशदा, आकाश अगदी दिवसंरात्रीही सुंदरच भासते. तुमच्या फोटोत तर कित्ती ते रंग उधळलेत. छान. Happy

Pages