निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.
निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय
आत्ता इथे हैद्राबादमधे जोरदार
आत्ता इथे हैद्राबादमधे जोरदार पाऊस झाला. चांगला १/२ तासभर पडत होता.
लक्षणीय बाब म्हणजे अनेक बेडुक पण बाहेर आले होते. असे जनरली पहिल्या पावसात होते.
आता हे बेडुक हायबरनेशन मधुन बाहेर आले असतील तर पावसाळा सुरु व्हायला अजुन २ महिने आहेत, मग ते परत हायबरनेशन मधे जातील की उन्हाने मरुन जातील की खरच पावसाळा सुरु होईल?
दिनेशदा मस्तच आहेत
दिनेशदा मस्तच आहेत फुलं
शांकली छान फोटो
मामी ट्युलीप खासच, किती प्रकार आहेत, भारीच, फोटोही मस्त.
गमभन.. जर डबकी साचलेली असतील,
गमभन.. जर डबकी साचलेली असतील, तर आपल्या सर्व अवस्था लवकर पुर्या करुन त्यांची नवीन पिढी तयार होईल. डबकी सुकली तर मात्र पक्ष्यांची चंगळ होईल. ( अर्थातच बीबीसी ने त्याचे चित्रण केलेय. )
निद्रिस्थ अवस्थेतले सर्वच बेडूक आता बाहेर आलेले नसतील. ( सगळेच असे उतावीळ नसतात. )
निवडक स्वित्झर्लंड : १.
निवडक स्वित्झर्लंड :
१. नार्नियाच्या प्रदेशात आलोय असं वाटतंय की नाही?
२. हे चॉकलेटचं गजक
टीपः चॉकलेट हे कोकोच्या झाडापासून बनलेलं असल्यामुळे हा फोटो या धाग्यावर व्हॅलिड ठरतो.
३. हिवाळा अजून पूर्णपणे संपला नसल्याने तुरटलेली झाडं
४. ही देखिल वसंताची चाहूल लागण्याची प्रतिक्षा करताहेत
५. द्राक्षांचे मळे
६. सैफ आणि करीनाचं लाडकं जीस्टाड (ट्रेनमधून)
७. लेक जिनिव्हामधील सुप्रसिध्द उंच कारंजं. Jet d'Eau ऊर्फ पाण्याचा फवारा. फ्रेंचमधून म्हटल्याने जरा स्टाईलीश वाटतं इतकंच. हे कारंजं जवळजवळ ५०० लिटर पाणी एका सेकंदात बाहेर टाकत १४० मीटर्सची उंची गाठतं.
८. जिनिव्हातलं सुप्रसिद्ध फुलांचं घड्याळ
९. मॅटर्नहॉर्नच्या सुप्रसिद्ध सुळक्यावर जाताना केबलकार मधून दिसणारं दृष्य. खाली दिसतंय ते झरमॅट गाव. झरमॅट या पायथ्यापाशी असलेल्या गावाहून सगळ्यात वरच्या पॉइंटवर जाण्यासाठी एक तास लागतो. केबलकारमध्ये सगळे स्कीइंग करणारे त्यांच्या लाठ्याकाठ्या घेऊन बसलेले असतात. मध्ये एक दोन ठिकाणी थांबे आहेत. नवशिके तिथे उतरून डोंगरावरून घसरत येतात. एक्स्पर्टस अजून वर जातात. शेवटच्या टप्प्याकरता केबलकार बदलावी लागते. हा टप्पा ग्लेशियर्सवरून जातो आणि अतिशय सरळसोट चढाचा आहे. शंभरेक माणसं उभी असलेली ती केबलकार एकदम उंची गाठून तिथल्या स्टेशनवर आपल्याला उतरवते. भर बर्फात बांधलेल्या अशा केबलकार्स बांधणार्या तंत्रज्ञांची कमाल आहे. परत जाताना सगळे घसरत जातात त्यामुळे आमच्यासारखे एखाददुसरेच परतीच्या केबलकारमध्ये होते. बाकी केबलकार्स रिकाम्या.
या केबलकार्स थांब्यांबर थांबत नाही. त्या गोल गोल फिरून परत जातात. त्यामुळे आपल्याला तेवढ्या वेळात चढणे / उतरणे या क्रिया कराव्या लागतात.
१०. मॅटर्नहॉर्न सुळका
११. आल्प्सच्या पर्वतरांगा. यांच्या पलिकडे इटली आहे.
१२. स्कीइंगस्लोप्स. छोट्या छोट्या अंतरावर वर घेऊन जाणार्या आणखीही केबलकार्स दिसताहेत. यांना आईसफ्लायर्स म्हणतात. या म्हणजे चक्क बाकं असतात. त्यांना वरून झाकणं असतात. ती झाकणं लावा किंवा उघड्या बाकांवर बसून वर जा.
१३. हॉली. ख्रिसमसच्या चित्रांतून हमखास दिसणारी.
१४. हे एका मार्केटमध्ये विकायला ठेवलेले टोमॅटो. कसले डिझायनर आहेत ना?
१५. बर्फामुळे झालेली डोंगराची झीज. मुळातच आल्प्स काहीसा ठिसूळ वाटला. एकतर अतिशय टोकाची थंडी आणि मग त्यानंतर उन्हाळा यामुळे सतत आकुंचन-प्रसरण होतं. शिवाय पाणी डोंगराच्या कपारीतून साचून थंडीत बर्फं बनतं तेव्हा प्रसरण पावतं आणि उन्हाळ्यात वाहून जातं. त्यामुळे डोंगराची झीज जलद होत असणार.
१६. बर्फाचा गालिचा.
१७. टुमदार झरमॅट
बाकीचे फोटो नंतर टाकते.
इथे इतके कडक ऊन पडते त्यात
इथे इतके कडक ऊन पडते त्यात डबकी नाही टिकणार. आशा आहे की मान्सूनच्या स्वागतासाठी "डराव डराव" काही बेडुकमामा उरतील.
मामी सगळं कसं ओळखीचं वाटतय.
मामी सगळं कसं ओळखीचं वाटतय. जून / जूलै मधे आणखी फ्रेश वाटते तिथे.
( कोको आमच्या आफ्रिकेतून(च) जातो तिकडे ! घाना / नायजेरिया मधून )
००
गमभन, माणसासाठी नाही तरी त्याच्या बेडकासारख्या दोस्तांसाठी पाऊस नक्कीच बरसेल.
मस्त मस्त मस्त फोटोज मामी..
मस्त मस्त मस्त फोटोज मामी.. पुन्हा पुन्हा बघावेसे वाटताहेत..
' चॉकलेट हे कोकोच्या झाडापासून बनलेलं असल्यामुळे हा फोटो या धाग्यावर व्हॅलिड ठरतो'
डिझायनर टोमेटोज??? हालापिनो सारखे दिसताहेत..
भन्नाट आलेत सगळे फोटो........
भन्नाट आलेत सगळे फोटो........ आम्हाला घरबसल्या स्वित्झर्लंडची सफर झाली!!
'चॉकलेट हे कोकोच्या झाडापासून बनलेलं असल्यामुळे हा फोटो या धाग्यावर व्हॅलिड ठरतो'>>>:हाहा:
डिझायनर टोमेटोज??? हालापिनो
डिझायनर टोमेटोज??? हालापिनो सारखे दिसताहेत.. >>> वर्षुताई, हे हालापिनो कसं? त्या हिरव्या आणि जाड मिरच्या असतात ना?
गुगलमध्ये tomatoes with different shapes असा सर्च देऊन बघ, जरा खाली गेल्यावर माझ्या फोटोतल्यासारखे टोमॅटो दिसतील.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/42223 एक वेगळेच बेडुकराव ----
मामी खुप सुंदर फोटो ग.
मामी खुप सुंदर फोटो ग.
रविवारी माहेरी गेले आणि ऐनाचे फोटो काढुन आणलेच. ऐन वृक्ष तसा उंचच जातो. आंब्यासारखा घेरदार पसरलेला अजुन मला तरी दिसण्यात आलेला नाही. ह्या फोटोतील झाडांचे कटींग आमच्याइथे त्याला डुखण म्हणतात ते केले आहे व त्यानंतर त्याला पालवी फुटलेली आहे.
१)
२)
३) मागील बहराची झाडावर सुकलेली फळे दूसरी पालवी आली तरी अजुन तशीच आहेत.
ही खाली पडलेली ऐनाची सुकलेली फळे.
ससा अन कासवाची गोष्ट खरी
ससा अन कासवाची गोष्ट खरी असावी अस मला वाटू लागलय. याच कारण अस की सशा शी शर्यत लावून तो झाडाखाली झोपला असता त्याला मागे टाकाव इतक्या वेगाने कासव चालू शकत हे मी नुकतच पाहिल.झाल अस की काही दिवसापूर्वी माझी सौ. स्कूटर ने घरी परत येत होती तेव्हा रस्त्यात तिला अचानक काहीतरी हलतांना दिसल. पहाते तर छोट तळहाताएवढ कासव!! स्कूटरच्या चाकाखाली येतायेता अगदी थोडक्यात वाचल. तिने ते डिकीत घालून घरी आणल. चिरंजीव जाम खूष !! मी त्या कासवाचे फोटो काढायचा प्रयत्न केला. त्या करता त्याला हॉलच्या मधोमध ठेवला पण थोडावेळ सगळ काही आत ओढून बसून झाल की मान बाहेर काढून नजीकचा कोपरा / लपायला बरी जागा दिसताच त्या दिशेने तुरुतुरू वाटचाल सुरु. कोपरा गाठताच सगळ पुन्हा आत !! त्याचे चारही पाय व मान बाहेर असा फोटो काही काढता आला नाही. कासव हळू चालत यावरचा माझा विश्वासच उडाला. बर ते चालताना डावा पुढचा/उजवा मागचा मग उजवा पुढचा / डावा मागचा असे पाय उचलत चालत होत त्यामुळे कोणत्याच फोटोत सगळ कासव काही नीट आल नाही. आता चारही पाय दिसणार अस कासव तुम्हाला दाखवायच तर मला पहिले फोटोशॉप वापरण शिकायला हव. सबब फोटो टाकत नाही.
मला वाटत वन्यजीव कायद्या नुसार कासव अस आपण घरात ठेउ शकत नाही. कुणाला माहीती असल्यास लिहा. ते कासव तरी बिचार फिशफूड किती दिवस खाणार? सोडून द्यायला हव. मुलाची समजूत मात्र काढावी लागेल.
अगा मामी,निळी नको होऊस ना..
अगा मामी,निळी नको होऊस ना.. तुझे टोमेटोज च आहेत.. ते फक्त साऊथ अमेरिकेतील लिटिल रेड पेप्पर सारखे दिसताहेत असं म्हटलं मी
या स्मॉल रेड पेप्पर्स ना पण इथे आलापिनोच म्हणतात.. असेल आलापिनोची ही दुसरी वरायटी.. याही अत्यंत जहाल असतात
यात हिरवट वरायटीही असते.पहिल्यांन्दा जेंव्हा माहीत नव्हते तेंव्हा मला या लहान आकाराच्या कॅप्सीकम वाटलेल्या आणी मी त्यात खिमा स्टफ करून बनवल्या..ऊप्स!!!! फिर क्या हुआ ,ये ना पूछो..कुछ ऐसी बात हो गई..
जागु ,फारच सुरेख दिस्तंय ऐना
जागु ,फारच सुरेख दिस्तंय ऐना चं झाड...
मामी मस्त आहेत फोटो!
मामी मस्त आहेत फोटो!
ऊप्स!!!! फिर क्या हुआ ,ये ना
ऊप्स!!!! फिर क्या हुआ ,ये ना पूछो..कुछ ऐसी बात हो गई.. >>>
नाही गं, तिथल्या लोकल फार्मर्स मार्केटमध्ये हे विकायला होते आणि जी बाई हे टोमॅटो विकत होती तिला मी इंग्रजीतून विचारलेलं काही कळत नव्हतं. त्यामुळे ते टोमॅटो असावेत अशी मी माझीमाझीच समजूत करून घेतली होती. म्हणून तू हे हालापिनो आहे म्हटल्यावर जरा कन्फ्युजन डॉट कॉम झालं.
कासवाची गोष्ट छानच.. मलापण
कासवाची गोष्ट छानच..
मलापण सांगा काय कायदा आहे.कासव पाळायची खूप इच्छा आहे. पण कायदयाने नाही येत म्हणे पाळता..
मामी अप्रतीम फोटो जागू अशी
मामी
अप्रतीम फोटो
जागू
अशी फळं पाहिली होती पण नाव माहित नव्हतं.
श्रीकांत, कासवाची कथा छानच.
श्रीकांत, कासवाची कथा छानच. आपल्याकडे कायदा काय आहे कल्पना नाही, पण कोकणात काही भागात कासव खातात. पाईल्सवर औषध आहे म्हणे ते
वर्षू, अश्याच मिरच्या पश्चिम आफ्रिकेत खाल्ल्या जातात. मी तर हाताळूही शकत नाही.
कधी कधी एखादा शब्द कसा चकवा
कधी कधी एखादा शब्द कसा चकवा देतो ते बघा.
गुरुद्वारामधे अनेकवेळा काही शीख लोक तबला पेटी वर सुंदर भजने गात असताना दिसतात. शांतरसातली हि भजने ऐकायला छानच वाटतात. त्यातल्या रचना बहुतेकदा रागांवर आधारीत असतात. ( दे हे शिवा मोहे ऐसा वर, हि शंकरा रागातली रचना लताने पण गायली आहे. ) तर त्या गायकांना "रागी" म्हणतात, असे वाचले होते.
रागात गाणारे ते रागी, हे समजायला सोपे आहे.
पण नाचणीला पण रागी का म्हणतात याचा उलगडा नुकताच झाला. माझ्या लहानपणी रागी हा शब्द फारसा
वापरात नव्ह्ता. नाचणी / नागली असेच म्हणत असत. रागी हा शब्द माझ्या समजुतीप्रमाणे कन्नड मधून आलाय ( रागीमुद्दी असा एक न्याहारीचा प्रकार असतो. ) पण त्यापेक्षा वेगळा संदर्भ आहे.
रामायणाची जी अनेक रुपे आहेत त्यातले एक रामायण कनकदासांनी रचलेले आहत, त्यात हि कथा येते.
रावणावर विजय मिळवून सगळे अयोध्येला आले त्यावेळी मोठा उत्सव झाला. तिथे थोडा काळ रमल्यावर,
मारुतीला त्याच्या किष्किंधा नगरीला जायची इच्छा झाली. तिथे जाताना सोबत नाचणी घेऊन जाण्याची
परवानगी त्याने रामाकडे मागितली. रामाला हा निर्णय ( म्हणजे मारुतीने जायचा कि त्याने सोबत नाचणी
न्यायचा, ते कळत नाही ) घ्यायला जमले नाही. मग त्याने इंद्राला तो निर्णय घ्यायची विनंती केली.
त्यालाही तो जमला नाही. पण त्याने ते डिसि़जन पेंडींग ठेवून, रामाला नाचणीला कैदेत ठेवायचे आदेश दिले ( ??? ) रामाने थोडी नाचणी आणि थोडे तांदूळ कैदेत ( म्हणजे हवाबंद डब्यात हो ) ठेवले.
हा निर्णय घ्यायला सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ गेला ( ) निर्णय काय झाला ते कळले नाही, पण
त्या काळानंतर दोन्ही डबे उघडल्यावर तांदळात कीडे झाल्याचे दिसले पण नाचणी मात्र तशीच होती.
नाचणीच्या या गुणधर्मामूळे रामाने तिला, "रागी" म्हणजे रघुकूलोत्पन्न अशी पदवी दिली. ( संदर्भ : प्रा. रेखा दिवेकर यांचा एक लेख. )
तर तात्पर्य काय, बलवान अश्या मारुतीला, नाचणी प्रिय होती. ( एवढेच ! )
मामी, फोटो एकदम भन्नाटा
मामी, फोटो एकदम भन्नाटा
सर्वांना सस्नेह आमंत्रण
सर्वांना सस्नेह आमंत्रण
http://www.maayboli.com/node/42243
पण त्याने ते डिसि़जन पेंडींग
पण त्याने ते डिसि़जन पेंडींग ठेवून>>>>
म्हणजे कीड लागेस्तोवर डिसि़जन पेंडींग ठेवायची प्रथा तेव्हा पासून आहेतर...;)
म्हणजे कीड लागेस्तोवर डिसि़जन
म्हणजे कीड लागेस्तोवर डिसि़जन पेंडींग ठेवायची प्रथा तेव्हा पासून आहेतर.>>> अगदी वाचताना डोळ्यासमोर GOI व त्यांचा कारभार उभा राहिला.
जो - एस ,मोनालिप.. ही गोष्ट
जो - एस ,मोनालिप..
ही गोष्ट पूर्वीही कुठेतरी वाचली होती.. दिनेश दानेच लिहिली होती बहुतेक..तरीही मजाच येते अश्या गोष्टी वाचायला
ऐन आणि अर्जुन एकच की वेगळे?
ऐन आणि अर्जुन एकच की वेगळे?
ऐनाचं झाड अगदी सरळसोट उभं
ऐनाचं झाड अगदी सरळसोट उभं वाढतं. याचा सरळ बुंधा मिळत असल्याने बांधकामात खूप उपयोग होतो. ऐन आणि अर्जुन एकाच कुळातले आहेत. फक्त अर्जुन पांढरा (गोरा गोरा पान) असतो तर ऐन सुसरपाठी सालीचा असतो.
श्रीकांत कासव खरंच बर्यापैकी भरभर चालतं. पूर्वी पेशवेपार्क मधे ससे आणि कासव एकाच पिंजर्यात ठेवलेले असायचे. तेव्हा ससे आळशासारखे बसून असायचे, आणि कासवं तुरूतुरू चालत असायची...:स्मित:
दा, रागीची (आपलं, रामाची!) गोष्ट मस्तय!!
कीड लागे पर्यंत पेंडिंग ठेवायचे डिसिजन....:हाहा:
धन्स शांकली...मी खरच गोंधळले
धन्स शांकली...मी खरच गोंधळले होते.
हे दोघे गोंधळात टाकणारेच
हे दोघे गोंधळात टाकणारेच आहेत, कारण खूप साम्य असतं ना दोघांच्यात. पण जुळ्यांच्यात जसा थोडासा फरक असतो तसा यांच्यातही आहे.
हे परवा दिसलं.......
हे परवा दिसलं.......
Pages