निसर्गाच्या गप्पा (भाग-१३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2013 - 12:06

निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्‍या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.

निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एक उतारा..(महाजन सर, झाडं आणि मी मधलाच)...

'बापूंचा आवडता टॉपिक म्हणजे क्लोरोफिल. त्यावर त्यांनी माझी लागोपाठ तीन तरी सेशन्स घेतली आहेत. परत विषय निघाला तरी भरभरून बोलणं सुरू होतं. शाळेतल्या पुस्तकांपासून मी शिकत आलो होतो, की सूर्यप्रकाश,पाणी आणि कार्बन डाय ऑक्साईड यांच्या प्रक्रियेतून क्लोरोफिल हे अन्न (साखर) तयार करतं. यात आणखी काय नवीन असणार आहे? पण बापूंची रसवंती काय वर्णावी?
" जगातील सगळ्या केमिकल फॅक्टर्‍या एकत्र केल्या तरी तिथं जेवढी रासायनिक प्रक्रिया होते, त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी प्रक्रिया म्हणजे क्लोरोफिल घडवत असलेलं फोटोसिंथेसिस. या विषयात काम करणार्‍या तिघांना नोबेल पारितोषिक मिळालीत. ज्या काळात पृथ्वीवर अगदी प्राथमिक रासायनिक फॉर्म्युल्याची संयुगं होती, त्या वेळी क्लोरोफिल हे अगदी गुंतागुंतीचं संयुग कसं निर्माण झालं, हे मोठंच आश्चर्य आहे. आणि आज एवढं सायन्स आणि टेक्नॉलॉजी पुढं गेलीत, पण अजून माणसाला सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डाय ऑक्साईड यांपासून साखर लॅब मधे तयार करता आली नाही. भविष्यात करता आलीच तर त्या साखरेची किंमत एका ग्रॅमला हजार डॉलर असेल, असा एक अंदाज आहे आणि ती इथं (अंगणातल्या गवताकडे, झुड्पांकडे बोट दाखवून) कुठंही पहाल तिथे , जिथे नैसर्गिक हिरवा रंग दिसेल तिथे ती फुकट उपलब्ध आहे. हे क्लोरोफिल पहिल्यांदा एका बॅक्टेरियाच्या शरीरात निर्माण झालं. सियानो बॅक्टेरिया हे त्याचं नाव. त्याचा सर्व सजीव सृष्टीवर परिणाम झाला. त्यापूर्वी पृथ्वीवर सजीव होते; पण ते जे अन्न वापरीत, ते संपल्यावर जीवसृष्टी संपली असती. पण क्लोरोफिलमुळं प्रथमच पृथ्वीवर अन्न तयार झालं. त्यामुळं जीवसृष्टी भराभरा वाढू शकली".

पूर्वी हिरवळ किंवा हिरवी पानं पाहिली, की बालकवी किंवा सीझान हा चित्रकार आठवायचे. आता बापूंच्या प्रभावानं मला तो क्लोरोफिल महोत्सव दिसू लागला. मला त्या सियानो बॅक्टेरियाचा फोटो घरात लावावा असं वाटलं. कारण आपला मूळ पुरुष ना तो!'

>>ह्या पिवळ्या बेरीजला काही खास नाव आहे का?

बी, त्या रास्पबेरीजचाच एक प्रकार आहेत. लाल/काळ्या बेरीजमधे, पानांमधल्या हिरव्या क्लोरोफिलसारखं, लाल 'अँथोसायनिन' असतं. पुढली माहिती 'बहुतेक' कॅटगिरीतः काही जेनेटिक म्यूटेशन्समुळे हे द्रव्य तयार होऊ शकलं नाही तर असा पेल पिवळा रंग येतो.

इथे थोडीफार माहिती दिसली.

http://en.wikipedia.org/wiki/Raspberry (अँथोसायनिन द्रव्य तयार होण्याच्या प्रोसेसमधे खोळंबा आणू शकणार्‍या रेसेसिव्ह जीन्सबद्दल उल्लेख आहे. कळला नाही.)

http://forums2.gardenweb.com/forums/load/fruit/msg1013143428362.html

हे क्लोरोफिल पहिल्यांदा एका बॅक्टेरियाच्या शरीरात निर्माण झालं. सियानो बॅक्टेरिया हे त्याचं नाव. >>>> बॅक्टेरिया झिंदाबाद ......

अरे हेच काय आणिक कुठे कुठे पहिले आहेत हे कळले तर लक्षात येईल की यांच्यामुळेच "जीवन" सुरु झालं पृथ्वीवर ...
उत्क्रांतीमधे सगळ्यात पहिले अवतरले ते बॅक्टेरियाच मग हळूहळू बाकी सगळे उत्क्रांत होत गेले .....

आताही ते (बॅक्टेरिया) परमेश्वरासारखे (सर्वव्यापी) ऑम्नीप्रेझेंट आहेत म्हटलं ...... जळी -स्थळी-काष्ठी-पाषाणी ....
अगदी हिमाच्छादित शिखरांपासून पॅसिफिकच्या तळापर्यंत हे सर्वत्र आहेत .... अगदी उकळत्या पाण्याचे झरे आहेत तिथेही हे आहेतच..... आणि गंमत म्हणजे आपल्या सर्व अन्ननलिकेलाही व्यापून आहेत ते ....

फक्त आपल्या रक्तात, लघवीत व मणक्यातील द्रावात (सी एस एफ) इथे ते नसतात (कुठल्याही संपूर्ण निरोगी व्यक्तिबाबत मी म्हणतोय हे) - बाकी आपल्या त्वचेवर तर भरपूर असतात -कुठलाही साबण -शांपू यांना हटवू शकत नाही - अहो घाबरु नका - ते आहेत म्हणूनच आपण आहोत - अधून मधून जरा संधी साधतात ते (संधी साधू/ opportunistic) आणि आपण आजारी पडतो - डॉ. ला तरी कुठे कळते - बॅक्टेरिअल इन्फेक्शन आहे का व्हायरल - देतो ठोकून अँटिबायॉटिक - आपणही खूष व डॉ.चा ही खिसा फुल्ल (सर्व डॉ.नी कृपया हलके घेणे) त्यामुळे तोही खूष......

असो - बाकी अजून खूप लिहिण्यासारखे आहे या बॅक्टेरियाबाबत - लिहिन परत केव्हा तरी ......

शशान्क, बॅक्टेरियावर आजपर्यन्त वाचलेल सर्वोत्तम पुस्तक,' सर्वायवल ऑफ द सिकेस्ट' - डॉ. शॅरन मोएलम (विथ जोनाथन प्रिन्स) ......... इतक अमेझिन्ग आहेना हे पुस्तक कि वाचताना आपल्यातोन्डात बोट जात आपोआप.. बोटावर असणार्‍या बॅक्टेरियाची पर्वा न करता Lol
ऊप्स.. आज मलाही अनुस्वार त्रास देताहेत Uhoh

शशांक, आईच्या गर्भाशयातील द्रवात पण ते नसतात ना ? बॅक्टेरियाची पहिली भेट म्हणे त्याला हाताळणार्‍या पहिल्या व्यक्तीकडूनच मिळते. कुठेतरी वाचले होते हे !

चला बरं, आमच्या किलांबा कॉलनीमधल्या निसर्गाचा फेरफटका मारु या.

हा आहे साधा काशिद. आपल्याकडे हे झाड बेंगरुळच दिसते. इथे मात्र त्याचा तुरा चांगला मीटरभर लांब होतो. ( थोडी वेगळी जात आहे हि. )

टिकोमा पण जरा हळदुवा होतो इथे !

हे झाड मला अपरिचित. गोव्यात असे झाड दिसायचे पण फळाची ठेवण जरा वेगळी असे.

चला जरा जवळून बघू या !

या पिवळ्या फुलांची वेल असते. फुल असते जेमतेम १ सेमी चे पण संख्येने भरपूर. फुटपाथवर, बांधकामाच्या खडीवर हि पसरते. थोडक्यात माती नसेल तिथे पसरते. सकाळच्या वेळी अश्या हिरव्या पिवळ्या गालिच्याकडे
बघून छान वाटते.

हे आहे कडधान्य कूळातले फुल. वाटाणा घेवड्या पासून पळस पांगार्‍यापर्यंत याची व्याप्ती.

आपल्याकडे पण भरपूर असतात. कासच्या पठारावर पण दिसतात. अगदी रस्त्याच्या कडेला होती म्हणून जवळून निरखली..

आणि काय सांगू महाराजा, इतकी सुंदर नक्षी ना. पिवळा, पांढरा, निळा, गुलाबी, जांभळा.. सगळे रंग एकाच ठिकाणी..

वर्षू ला नक्कीच डिझायनर साड्या आठवणार !

पण अशी नजाकत आपल्याला खरेच जमेल का ?

साधा शंकासूर, इथे जागोजागी आहे.

जरा कॅमेराचा कोन लावला, एवढेच

प्रा महाजनांपासून - डॉ. डहाणूकरांपर्यंत सगळ्यांच्या नावडती ऑस्ट्रेलियन बाभूळ.

तशी दमट पावसाळी हवा नसूनही जागोजाग असे मश्रुम दिसतात. खाद्य नसावेत.

कॉलनीच्या बाहेरुन "वाहणारी" एक नदी.. ( मॉडेल आहे माझा नवा मित्र. )

अफलातून फोटो आलेत दा.. ते मश्रूम स्क्रोल करताना एका पक्ष्यासारखं वाटलं... पण मला सगळ्यात जास्त आवडले ते स्मिथिया,... आपले डोनाल्ड डक Happy

त्या पिवळ्या फुलाचं जे लांबट पान आहे, त्याचा देठापासचा आकार वेगळा आहे. कदाचित डिजिटॅट पानाचं हे म्युटेशन असावं का?

सुशांत, हे फूल कैलासपतीचं आहे.

Couroupita guianensis म्हणजेच कैलासपती.

शशांक, आईच्या गर्भाशयातील द्रवात पण ते (बॅक्टेरिया) नसतात ना ? >>>>> येस्स - त्यातही नसतातच ते ...

दिनेशदा - भारी आहेत तुमच्याकडील (किलांबा कॉलनीतील) झाडे, फुले ..... सर्व फोटोतील रंग काय उठून दिसताहेत ......

आज अचानकपणे पुत्रंजीवाची फुलं बघायला मिळाली. स्कूटीची बॅटरी बदलायला गॅरेजमधे गेले होते. मेकॅनिक बॅटरी घेऊन येईपर्यंत इकडे तिकडे बघताना सहज नजर गेली ती याच्याकडे. फुलं चक्क माझ्या उंचीच्या आसपासच येत होती. हाताशी मोबाईल होताच...

हा फुलोरा....

Image1305.jpg

ही कोवळी पालवी....

Image1300.jpg

ही पानांवर फुलं अशी दिसतात...

Image1298.jpg

याची फळं लहान बाळांच्या गळ्यात घालतात. बाळाला काही अपाय होऊ नाही हा त्यामागचा हेतू असतो. म्हणून याचं नाव पुत्रंजीवा. Happy

शांकली, पर्समधे एक मॅग्निफाईंग ग्लास ठेवायची. या छोट्या छोट्या फुलात कधी कधी खुप सुंदर रचना दिसते.

पुत्रंजीवीचा तसा काही उपयोग नाही. फळे अगदी छोट्या छोट्या ( सोललेल्या ) नारळासारखी दिसतात. सोलापूर
पंढरपूर भागात या तयार माळा बघितल्या होत्या.

ते पिवळ्या फुलासोबतचे पान दिसतेय ते त्या वेलाचे नाही. इथे बर्‍याच प्रकारची गवते एकत्र वाढलेली दिसतात.

टिकोमा दा हेच ते घंटी फुल ना ?
अगदी अगदी दिनेशदा, मला असं एक भिंग घ्यायचंच आहे. आणि एक बायनॉक्युलरही!! >> वा शांकलीजी आता आम्हाला निसर्गाच्या नवीन गमती जमती बघायला मिळणार तर Happy
बाकीही माहीती छानच आहे.

नितिन, या फुलांचे डॉ. डहाणुकरांनी केलेले वर्णन म्हणजे शिंकाळ्यातले लोणी काढण्यासाठी बाळ गोपाळांनी रचलेली उतरंड.. तशीच धांदल, तशीच बेशिस्त.. आहे कि नाही चपखल वर्णन !

ही घ्या ताज्या ट्युलिप्सची भेट :

जिप्सी, गुगुल+ काढून टाकण्यात मी यशस्वी झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा फोटो टाकता येतील. हुश्श्य .... कोणाला फोटोंकरता गुगल+ नको असेल आणि पुन्हा आपल्या जुन्या पिकासाबेव समवेतच जीवन जगायचं असेल तर खालील लिंकवर माहिती आणि स्टेपबायस्टेप वर्णन मिळेल. कृपया, आधी सगळी माहिती वाचून मगच काय ती अ‍ॅक्शन घ्या. नाहीतर तुमचं गुगल अकांउंट आणि फोटोबिटो सगळं डिलिट होईल.

http://picasatutorials.com/2012/05/what-happened-to-picasa-web-albums/

दिनेशदा, खूपच भटकलो. ट्युलिप्स दुकानात होती त्यामुळे क्लोजअप्स स्वित्झर्लंडमधले नाहीयेत. अमेरीकेतले देते. हे आहे अमेरिकेतलं ट्युलिप्सचं शेत:
१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

१०.

११.

१२.

१३. कापलेल्या ट्युलिप्सची अशी सजावटही करून ठेवली होती.

१४.

१५. आणि हे ट्युलिप्सच्या शेतातलं गोडुलं एंजलः

मामी, काय अप्रतिम फोटो आहेत गं!! आणि रंग पण किती सुंदर!! बहोत खूब!! ते लिटल एंजल पण गोड्डम गोड आहे हं..:स्मित:

वॉव... दिनेश दा.. काय एकेक रन्ग आहेत फुलान्चे, साधी ,नेहमीची फुलही उठून दिस्ताहेत...
(आता पटकन मला गूगल क्रोम वर अनुस्वार कसा टायपायचा ते सान्गा.. Uhoh )

सुशान्त्, सुन्दर आहे फूल...

मामी... तू अगदी ,' देखा एक ख्वाब तो ये सिलसिले' म्हणत हिन्डताना दिसलीस ट्युलिप्स मधून.. जबरदस्त फोटोज आहेत ग...

अगदी ,' देखा एक ख्वाब तो ये सिलसिले' म्हणत हिन्डताना दिसलीस ट्युलिप्स मधून.. जबरदस्त फोटोज आहेत ग...
>>>> Lol एकटीच होते की बरोबर अमिताभ (त्यावेळचा हं, आत्ताचा नक्को!) होता?????

Pages