Submitted by रोहितगद्रे१ on 12 March, 2013 - 08:17
महाराष्ट्रातील पर्जन्यछायेच्या प्रदेशातील दुष्काळी परिस्थितीवर मी लिहिले आहे.....
-----------------------------------------------------------------------------------------------------
तप्त झळा...बोचऱ्या कळा....कोरडा गळा
हलत लांब पळताहे थांबवा त्या मृगजळा
शेतात पिक ते झाले की सापळा
गर्द हिरव्या निवडुंगाचे काटे करती वाकुल्या
अवचित कधी झाकोळून जाई लागे वेडी आशा
परी वाहून नेई घन ते सारे पवन दुसऱ्या देशा
कडाड कड घनघोर घन
शीतल सुंदर आता वन
थेंब भिजविती कणा मृदेच्या
वाफा उठती निश्वासाच्या
झिरपते भेगा - भेगातून पाणी
क्षणात होई पुन्हा एकसंध धरणी
बीजे पेरितो इथे नव्याने कूस तिची उजवाया
कोंब फुटेल ,बाग फुलेल झाली वरूणमाया...
--
--रोहित गद्रे ,०९/०२/२०१३
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान . आवडली कविता .
छान . आवडली कविता .
धन्यवाद राजीव...
धन्यवाद राजीव...
छान...........
छान...........
धन्यवाद श्यामराव...
धन्यवाद श्यामराव...