निसर्गाच्या गप्पा (भाग - १२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 January, 2013 - 02:12

निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फणस - Artocarpus heterophyllus Family: Moraceae (Mulberry family)

सुरंगी - Mammea suriga Family: Clusiaceae (garcinia family)

(फ्लॉवर्स ऑफ इंडिया कृपेकरुन)

पिंपळ - Ficus religiosa Family: Moraceae (Mulberry family)
उंबर - Ficus racemosa Family: Moraceae (Mulberry family)
वड - Ficus bengalensis Family: Moraceae (mulberry family)

यावरुन वरचं सगळं शोधलं मी जरा .......

कुटुंबवत्सल इथे फ़णस हा, कटी खांद्यावर घेऊन बाळे. Happy
शकून पुण्यात कुठे रहाता? म्हणजे फ़णस पिकायच्या वेळी यायला बरं. Wink
शांकली, मला ते सुरंगीच झाड बघायच आहे. चल ना जाऊ या. Happy

शशांक, इंदिरा संतांचीच कविता ती, मृदगंध ..

फणस आपण कोकणातला समजतो पण विदर्भात पण झाडे आहेत, उत्तरेकडेही आहेत. आणि पूर्वाचलात पण, तसेच कुर्ग परिसरात पण. कुर्ग मधे फ्लाय ट्रॅप म्हणून फणसांची चारकांडे वापरतात.

सुरंगीचा विषय निघालाय त्यावरुन आठवले, शनवारवाड्यात खुद्द पेशव्यांनी लावलेले बकुळीचे झाड होते, आहे का ते ? बालगंधर्वाच्या समोर पण होते, ते मात्र दिसले नाही.

हो दिनेशदा मीही पाहिले होते ते बकुळीचे झाड लहान पणी, आता कित्तेक वर्षात गेलोच नाहि शनिवारवाड्यात...

मला सुरंगीचे फूल माहित नव्हते पण एका ठिकाणी चिपळूणच्या परफ्युम बनवणार्‍यांची भेट झाली त्यांनी सुरंगीचं परफ्युम बनवलं होतं , मला फारच आवडला वास.

काय या सुगंधी फुलांचे कसे आहे ते बघा..

गुलाब, शेवंता, सुरंगा, बकुळा.. अशी नावे घेतली कि पुढे सातारकरीण, वाईकरीण, कागलकरीण.. अशी आडनावे आठवतात. आणि बेला, चंपा, चमेली अशी नावे घेतली कि .. पान खायो सैंया हमार. असे काहीसे आठवते

देवा!!!! दिनेश दा................... Rofl Lol Biggrin

शोभे कपडे न मळवता गडबडा लोळून हस्तेय बर्का Wink

शनिवारवाड्यात बकुळ ३ वर्षांपूर्वी नक्की होती.
खुन्या मुरलीधराच्या मागे बकुळीचं झाड आहे. फर्ग्युसनच्या जवळपासही आहे कुठेतरी पण नक्की आठवत नाही.
आमच्या घराजवळ बकुळीचं मोठ्ठं झाड आणि त्याच्या जवळच सुरंगी होती.

आणि हा बहावा
Rut2914.jpg

दिनेशदा राधा पुर्ण निसर्गवेडी असली तरी स्वभाव वकिल साहेबांवरच गेलाय Happy

वर बकुळीचा बर्‍याच ठिकाणी उल्लेख आला आहे म्हणून हे माझ बकुळ पुराण.

http://www.maayboli.com/node/32841

आज रम्मी म्हणजेच श्री रमेश हिंगोरानी ( मि. वर्षू नील ) यांचा वाढदिवस. त्यांना हार्दिक शुभेच्छा.
( आज संध्याकाळी सगळ्यांनी पार्टीला यायचे आहे. )

श्री रमेश हिंगोरानी ( मि. वर्षू नील ) यांना वाढदिवसानिमित्त अनेक हार्दिक शुभेच्छा.

वर्षू - पुढील भारतभेटीत श्री. रमेश यांनाही जरुर बरोबर घेऊनशान येणे.....

श्री रमेश हिंगोरानी ( मि. वर्षू नील ) यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. >>> माझ्या कडूनही Happy

काल शोभाचा वाढदिवस होता. तिलाही खुप खुप शुभेच्छा Happy

जागूतईचे बकुळ पुराण अ‍ॅज युजल सुंदर, फोटोसहित..
पण आमच्या घराजवळच्या बकुळिची फुलं संध्याकाळी नाही. तर पहाटे पडायची. तिथेच झाडाजवळ राहणार्‍या एक काकू होत्या. झाडं शिंपायचं काम करायच्या. त्या रात्रीच जुनी साडी पसरून ठेवायच्या झाडाखाली. पहाटे गुंडाळून नेली साडी की काम झालं.. तेवढी फुलं त्यांनी नेऊनही अक्खी वाट झाकली जायची नंतर पडलेल्या फुलांनी.. तरी आम्ही आसपासच्या सुपारीच्या उंच झाडांना जोरात हलवायचो म्हणजे वर फांद्यांमधे अडकून पडलेली फुलं खाली पडायची त्या धक्क्याने.. आणि मग माडाच्या दोर्‍यात ओवायची ती फुलं..लांबलचक माळ कुणाची होते अशी स्पर्धा व्हाय्ची आमची.. Happy
बकुळीच्या फुलांची उशी करून डोक्याखाली घ्यावी म्हणतात डोकेदुखीसाठी..आणि बकुळीची फुलं खायलापण मज्जा येते. Happy

श्री रमेश हिंगोरानी ( मि. वर्षू नील ) यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.>>>>>>>>>..माझ्याकडूनही शुभेच्छा Happy

शोभे कपडे न मळवता गडबडा लोळून हस्तेय बर्का>>>>>>>>>>>.मग हरकत नाही. Happy

काल शोभाचा वाढदिवस होता. तिलाही खुप खुप शुभेच्छा >>>>>>>>>>स्निग्धे, तू बरा लक्षात ठेवलास ग. Happy
काल शोभाचा वाढदिवस होता. तिलाही खुप खुप शुभेच्छा >>>>> आमच्याकडूनही (शशांक, अंजली)>>>>>>>>.धन्यवाद! Happy

ऐ थँक्स,,, तुम्हा सर्वांच्या सदिच्छा विल् हेल्प हिम टू रिकुपरेट फास्टर,,,,,,,,,,,,,, जस्त कमिंग आऊट ऑफ हिज मेजर बॅक सर्जरी

हे..शोभा,,,तू भी मच्छी..पिसिअन्...वॉव्..बिलेटेड शुभेच्छा गं Happy

आज तब्बल अडीच महिन्यांनी नि ग वर यायला मिळालं. कसला धावतोय हा धागा ... (नेहेमीसारखीच) माहिती ओसंडून वाहते आहे!

दिनेशदांना झाडं आपल्यातलाच एक समजतात त्यामुळे त्यांच्या भाषेतली गुपितं सांगतात Happy

दिनेशदा, फणसाप्रमाणेच नारळ प्रामुख्याने समुद्रकिनार्‍यावरचं झाड आहे असा माझा समज होता, पण कर्नाटकात अगदी कोरड्या, ऊष्ण हवेतही भरपूर नारळ बघायला मिळाले!

शांकली, श्रद्धा हॉस्पिटलजवळचं ते वारसाचं झाड मी बघितलंय बरं का ... सकाळला ती झाडांविषयीची मालिका येत होती तेंव्हा आई आणि मी शक्यतो ती सगळी झाडं बघायला जायचो. फक्त तेंव्हा निग नसल्यामुळे फोटो नव्हते काढले. Happy नवसह्याद्रीमध्ये त्या भागात अनेक सुंदर झाडं आहेत. दर वर्षी किमान पळस आणि बहावा बघायला तरी मी आईला घेऊन नवसह्याद्रीची चक्कर मारते. Happy

फर्ग्युसन रोडची ती सुरंगी मी इतक्या वेळा शोधलीय, पण कधी सापडली नाही Sad आता जाणकारांना सोबत घेऊन जायला हवंय.

शोभा, आणि मि. वर्षू नील, वाढदिवसाच्या शुभेच्छा!

,, जस्त कमिंग आऊट ऑफ हिज मेजर बॅक सर्जरी>>>>>>>>>>>>>हो? अरे बापरे. काळजी घे. ती तू घेत असशीलच. Happy
हे..शोभा,,,तू भी मच्छी..पिसिअन्... Uhoh Uhoh

वॉव्..बिलेटेड शुभेच्छा गं >>>>>>>.धन्यवाद! Happy

शोभा, आणि मि. वर्षू नील, वाढदिवसाच्या शुभेच्छा!>>>>>>>>धन्यवाद गौरी. Happy

शोभा, विलंबाने वाढदिवसाच्या शुभेच्छा !

गौरी, नारळ प्रामुख्याने समुद्रकिनार्‍यावरचेच झाड आहे. नारळ समुद्राच्या पाण्यातून ( तरंगत ) वहात जावा आणि दुसर्‍या किनार्‍यावर रुजावा, अशी निसर्गाची अपेक्षा आहे. त्या काळात तग धरण्यासाठी नारळाचा आकार, कवच, आत पाण्याची सोय, अशी भक्कम योजना आहे.. त्याला किनार्‍यापासून दूर नेऊन रुजवण्यात मानवाचा
हात आहे.
आणखी नारळाचे चाहते म्हणजे हत्ती आणि काही खेकडे. पण ते खाताना नारळाचा नाशच करतात. त्यांना लागवड करता येत नाही.

Pages