निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर
ईन मीन तीन - सुंदर फोटो
ईन मीन तीन - सुंदर फोटो -
www.maayboli.com/node/36675?page=29 इथे मी फुलपाखरु व मॉथ मधील फरक दिलेला आहे.
जरा वेगळाच आकार आहे याचा.
जरा वेगळाच आकार आहे याचा. पंखाखाली कदाचित दुसरा रंग असायची शक्यता आहे. ( माझ्या घरी एकदा आला होता त्याच्या पंखाखाली नारींगी रंगाचा आणखी एक पंख होता.)
ईनमीनतीन आणि मानुषीताई थँक्स
ईनमीनतीन आणि मानुषीताई थँक्स मी झाडाला आंघोळ घातली आहे, पाहू आता.. कण्हेरपण किडली आहे. आधी खूप फुलं यायची. आता एकेरी संख्येत येतात फुलं
दिनेशदा, तुम्ही फक्त चित्रच नाही तर पूर्ण कन्सेप्ट उतरवण्याचा प्रयत्न करताय. फारच छान.
सर्व फोटो मस्त!
इथे आले की ज्ञानात भर पडतेच!
ओह........वैशाली , मग माझंही
ओह........वैशाली , मग माझंही लिंबाचं रोप यानेच खाल्लं की काय? आणि तू म्हणतेस तशी आत्ता परत सुंदर कोवळी पालवी आली आहे.
आशुतोष पक्ष्यांचे फोटो फार छान!
दिनेशदा...... कोषाबाबत ही माहितीही नवीनच. की यातलं पाखरू मेलंय!
सामी.......काय गोड पोझ दिलीये तुला माऊने!
शशांक प्रेइंग अॅन्टिसवरचा लेख फारच आवडला होता.
आणि माझ्या लेकाला हा फोटो दाखवला तेव्हा त्याने हे नाव सांगितलंच होतं आणि त्याची हात जोडलेली पोझही करून दाखवली होती. मीच विसरले होते नाव.
ईन मीन तीन - सुंदर फोटो - मला
ईन मीन तीन - सुंदर फोटो -
मला एकदा मोठं फुलपाखरू दिसलं होतं त्याचा स्पॅन ९ ते१० इंच व पंखांची उंची ७ ते ८ इंच होती. पंखांना खाली लांब टोके होती. इथे फोटो टाकला होता पहा ...
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/117975.html?1161061017
जो_एस, ते खुप दुर्मिळ आहे.
जो_एस, ते खुप दुर्मिळ आहे. आपल्याकडे क्वचितच दिसते.
दिनेशदा : यातलं पाखरू मेलंय
दिनेशदा : यातलं पाखरू मेलंय ते कसं कळलं ? झाडला लटकलेल्या कोषात पाखरू पिल्लू वाढत आहे की नाही हे बाहेरून पण कळतं का ?
सुरेख फोटो आहेत सगळ्यांचे. उडणारा मोर सुपर्ब ! आधुनिक शकुंतला जाम आवडली. कधी भेटायची संधी लाभली तर काय बहार येइल !
२-३ महिन्याच्या विश्रांती
२-३ महिन्याच्या विश्रांती नंतर हे झाड पुन्हा फुललं..
ही नविन कुंडी
अनिल, हा वेली गुलाब का? कधी
अनिल, हा वेली गुलाब का? कधी अशा गेंदेदार फुलांचा, इतक्या सुंदर रंगात बघितला नव्हता.
अनिल, कसले सुंदर आहेत गुलाब!!
अनिल, कसले सुंदर आहेत गुलाब!! आणि एका कुंडीतल्या रोपाला इतके लगडलेत की काही विचारूच नका!! मस्त!
जानेवारी २०१३ च्या निसर्गसेवकच्या अंकात श्री. मारुती चितमपल्लींनी कुठली झाडं कशासाठी लावावीत याबद्द्ल लिहिलंय. त्यातला थोडा भाग.....
बारा तासांपेक्षा अधिक काळ प्राणवायू देणारी झाडं - वड, पिंपळ, उंबर, नांद्रुक, कडुनिंब, कदंब.
औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण निवारण करण्यासाठी - पिंपळ, पेल्टोफोरम, पुत्रंजीवा, उंबर, अशोक (उंच व पसरणारा), शिरीष, आंबा, सीताफळ, जांभूळ, सप्तपर्णी, अमलताश (बहावा), पेरू, बोर, कडुनिंब, आवळा, चिंच, कदंब, बेल,
धूलीकण व विषारी वायू पासून निवारण - आंबा, अशोक, बकुळ, रेन ट्री, जास्वंद, पारिजातक, रातराणी, मेंदी, तुळस, सर्व जीवनदायी वृक्ष.
हवेतील प्रदूषण दर्शवणारी झाडं - हळद, पळस, चारोळी ( हवेतील प्रदूषण मर्यादेपलिकडे गेल्यास या झाडांची पानं, फुलं, साल, फळं यांमधे विकृती निर्माण होते.
रस्त्याच्या मधील भागात लावण्यास उपयुक्त झाडं - कोरफड, शेर, रुई, जट्रोफा, अश्वगंधा, निवडुंगाचे प्रकार ( ही झाडं वाहनामधून निर्माण होणारे वायू शोषण करून परिसर स्वच्छ ठेवतात.)
जीवनदायी वृक्ष - वड, उंबर, पाखर, नांद्रुक, पिंपळ.
शकुन, कोषाला मुंग्या लागल्या
शकुन, कोषाला मुंग्या लागल्या तर तो किटक जगणे अशक्य. ( फोटोतल्या कोषाला मुंग्यांनी भोक पाडलेले आहे.)
तसा कोष सुप्तावस्थेत असला तर पहिली मुंगी लागल्यास थोडी हालचाल करतो. पण मुंग्या चिवट असतात.
पक्षी सहसा कोष खात नाहीत, कदाचित त्यांना तो नीट दिसत नसावा. पण कधी कधी इन्फेक्शन होते. त्यावेळी
अचानक कोष पुर्णपणे काळा पडतो. जर नीट वाढ झाली तर पाखराच्या अवयवाची आऊटलाईन बाहेरुनही दिसते.
ज्या दिवशी पाखरू बाहेर पडणार असेल, त्यादिवशी अगदी पहाटेच हालचाल सुरु होते. पाखरू बाहेर आल्यावर पंख, लहान , ओले असतात. मग पाखरु फांदीच्या टोकावर जाते. तिथे पंख आपल्या डोळ्यादेखत मोठे होतात.
आणि पाखरु उड्डाण करते.
भारताबाहेर अनेक देशांत, फुलपाखरांचे पार्कस आहेत. तिथे कोषांची जोपासना करतात. भारतात असे पार्क करायला कायदेशीर मान्यता नाही. पण सामान्यत: फुलपाखरे येतील, अशी झाडे लावल्यास आणि त्यांना आवडेल असे अन्न ठेवल्यास ( अति पिकलेली फले, केळी / पपई / अननस) ती येतातच.
हो दिनेशदा मलाही एवढं मोठं
हो दिनेशदा मलाही एवढं मोठं फुल्पाखरू पाहून आश्चर्यच वाटलं होतं.
अनिल मस्त फुलं ....
शांकली मस्त माहिती...
शांकली मस्त माहिती...
भारतात असे पार्क करायला
भारतात असे पार्क करायला कायदेशीर मान्यता नाही. >> खरेच का? कारण ठाण्यात दोन ठिकाणी फुलपाखरे उद्यान आहेत.
शांकली मस्त माहिती. हा निसर्गसेवकचा अंक कुठे मिळेल?
मधे लोकसत्तामधे लेख आला होता.
मधे लोकसत्तामधे लेख आला होता. फुलपाखरांची जोपासना करुन ती पाश्चात्य देशांतील म्यूझियम्स ना विकण्याचा धंदा काही देशांत जोरात आहे. त्याला भारतात परवानगी नाही. माझ्या माहितीप्रमाणे ठाण्यातील उद्याने अशी कृत्रिम जोपासना करत नाहीत.
शांकली , दा - खुप छान माहीती
शांकली , दा - खुप छान माहीती
हो कृत्रिम जोपासना करत नाहीत
हो कृत्रिम जोपासना करत नाहीत इथे.
निसर्गाचा कंट्रोल फार चांगला
निसर्गाचा कंट्रोल फार चांगला असतो. पक्ष्यांनी खाऊन फुलपाखरांच्या सगळ्याच अळ्या संपल्या असे होत नाही कधी. पण कृत्रिम वाढ, अगदी फुलपाखरांची पण, योग्य नव्हे. त्यानेही समतोल बिघडू शकतो. असा विचार असावा बहुतेक.
अनिल, मस्त फोटो ! गुलाब तर
अनिल, मस्त फोटो ! गुलाब तर लाजवाब!
अनिल, हा वेली गुलाब का? कधी
अनिल, हा वेली गुलाब का? कधी अशा गेंदेदार फुलांचा, इतक्या सुंदर रंगात बघितला नव्हता.
मृण्मयी ,
या गुलाबाचा प्रकार मलाही माहित नाही, बहुतेक तुम्ही म्हणताय तो वेलीच असेल
अनिल गुलाबाचा रंग
अनिल गुलाबाचा रंग मस्तच!
शांकली उपयुक्त आणि नवीन माहिती.
अनिल, आधी फोटो दिसत नव्हते
अनिल, आधी फोटो दिसत नव्हते मला.
मस्त जोमदार वाढ आहे रोपाला,
होना, खूपच उपयुक्त माहिती आहे
होना, खूपच उपयुक्त माहिती आहे ही. त्यामुळे इथे शेअर केली.
श्री. चितमपल्ली म्हणजे चालता बोलता निसर्गकोषच आहेत!! त्यांच्या बद्दल कितीही बोलावं तेवढं कमीच आहे. ते खर्या अर्थाने साधूपुरूष आहेत.
ही जंगली बदामाची
ही जंगली बदामाची फुलं....दिसायला सुंदर पण वासाने अगदी दुर्गंधी! यांचा बहर आता ओसरलाय...
आणि यांचा बहर सुरू झालाय.... ही आहेत शेव्हिंग ब्रश!.... स्युडोबाँबॅक्स एलिप्टिकम हे आहे बॉटनी मधलं याचं अगडबंब नाव ! हा पुण्यातला एकमेव पांढरा शेव्हिंग ब्रश, सहकारनगर नं २ मधे स्वानंद सोसायटीच्या बसस्टॉपजवळ आहे.
'लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध याचा छपेल का?'.... हा पण सहकार नगर नं २ मधेच श्री पुंडलिक यांच्या बागेत आहे.
शांकली, पुण्यातही एकेक का
शांकली, पुण्यातही एकेक का होईना, पण विविध झाडे आहेत नाही. फक्त मान वर करुन बघायला पाहिजे.
००
इथे आमच्याकडे ऑफिस शिफ्ट व्हायचे आहे. आवराआवर सुरु केल्यावर, कसा माहीत नाही पण मुंग्यांना पत्ता लागला. आठवडाभर काळ्या मुंग्या तुरळक दिसू लागल्या होत्याच. काल मिटिंगसाठी म्हणून दुपारीच ऑफिस बंद करुन गेलो होतो आणि आज सकाळी ऑफिसच्या भिंतीवर ३ फूट वारुळ. आधी मला वाटले वाळवी पण नाही काळ्या मुंग्याच होत्या.
ऑफिस साफ करणार्या मुलीने ते खरवडून काढले आणि काजूची पाने चुरगळून तिथे चोळलीत. अजून तरी मुंग्या नाहीत. उद्या सकाळी बघतो.
मुंग्यांची लगबग सुरु झाली म्हणजे मोठा पाऊस येणार !
मान वर करून बघायला पाहिजे हे
मान वर करून बघायला पाहिजे हे खरं! त्याच बरोबर डोळे उघडे ठेऊनही बघायला पाहिजे नै! खरंतर ही संपदा जपायला पाहिजे.
आजच मी आणिक एक नवल बघितलं. सदाशिव पेठेत (म्हणजे अगदी हार्ट ऑफ द सिटीच!) एक बोळ सदृश रस्ता आहे. बाजीराव रोडवर गंगधर मिठाईवाले यांच्या दुकानाकडून एक बोळ चिमण्या गणपतीकडे जातो. त्या रस्त्यावर गद्रे चेंबर्सच्या दारात दोन मोठ्या करमळीचे वृक्ष केविलवाणेपणे उभे आहेत. मी तिथे सायंकाळी काही कामानिमित्त गेले होते; पानं खूप परिचयाची वाटली म्हणून निरखून बघितलं, तर मोठा करमळ! बिचारे अगदी खुरटून गेले आहेत. त्यांच्या मुळापाशी डांबर, खडी ओतली आहे आणि भोवताली मोडकळीस आलेला पिंजरा आहे.
मला वाटतं की चुकून लावले गेले असावेत ते. राजघराण्यातल्या कुणाला अजाणतेपणी झोपडीत नेऊन ठेवल्यावर कसं दिसेल? तसे दिसत होते ते!!
दा, मुंग्यांचं आणि पावसाचं काहीतरी नक्की मैत्र आहे खास!
आमच्या कॉलनीत एक छान वाढलेला
आमच्या कॉलनीत एक छान वाढलेला मोठा करमळ आहे. फुले फळे पण येतात त्याला.
पुणे विद्यापिठाच्याच आवारात वनस्पति उद्यान आहे का ? मी कधीच त्या आवारात गेलेलो नाही. तिथे एक गुलाबी शेव्हींग ब्रशचे झाड आहे, असे वाचले होते. असेल तर त्यालाही या दिवसात फुले आले असतील.
शांकली, पुण्यातही एकेक का
शांकली, पुण्यातही एकेक का होईना, पण विविध झाडे आहेत नाही. फक्त मान वर करुन बघायला पाहिजे.
दिनेशदा, शांकली
इथल्या निसर्गप्रेमींच्या सपर्कात आल्यापासुन मान वर करुन बघायची सवय लागु लागली आहे.
(पण त्या बरो बरच मान वरती केलं कि आपलं या विषयीच अज्ञान प्रकट होऊन समोर येतं हेही खरच आहे):हाहा:
(पण त्या बरो बरच मान वरती
(पण त्या बरो बरच मान वरती केलं कि आपलं या विषयीच अज्ञान प्रकट होऊन समोर येतं हेही खरच आहे)
अनिल, तुम्ही स्वतःला अज्ञानी म्हटले तर माझ्यासारख्यांना जन्माला यायला किती अवधी आहे अजुन
झाडांच्या बाबतीत नाव वगैरे
झाडांच्या बाबतीत नाव वगैरे माहीत असायची गरज नसते. एखादे वेगळे झाड दिसले तर इथे लिहायचे. नाव मिळाले तर ठिक, नाही तर म्हणायचे, नावात काय आहे ?
Pages