निसर्गाच्या गप्पा (भाग - १२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 January, 2013 - 02:12

निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शंकासूर / संकेश्वर नावाचे पिवळ्या / गुलाबी / केशरी फुलांचे झाड अनेकांनी बघितले असेलच. त्याची पाने चिमण्या मुद्दाम खातात... का, तर मलेरीयापासून बचाव व्हावा म्हणून. जेव्हा त्या थरथर कापत असतात, त्यावेळी बहुतेक त्यांना मलेरीया झालेला असावा. आणि हे औषध त्यांच्यातल्या, इब्लिसाने सांगितले असावे.<<< खरेच अश्या मोकाट निसर्गातल्या प्राण्यांवर संशोधन झाले पाहिजे. आजारपणातील त्यांचे निसर्गोपचार त्यांना कसे समजते.
मांजर आणि कुत्रे कधिकधी दुर्वा खाताना मी पाहिलय विषेशकरून मांजरीने पाल खाल्ल्यावर ती दुर्वा-गवत
खाते.

व्वा, शशांकजी! म्हणजे अगदी दिग्गजांचा सहवास लाभलाय तुम्हाला. Happy
अशा लोकांच्या हाताखाली ट्रेनिंग घेणंसुद्धा किती भाग्याचं.

हो स_सा,
आमचा कुत्रा ही अपचन झाले की दुर्वा खायचा. आनि नंतर ते ओकुन काढायचा.

शशांक, खरेच थोर लोक होते ते. त्यांच्या आवाजात त्यांचे शिकवणे रेकॉर्ड व्हायला हवे होते.

या औषधाबाबत आणखी ( हा उल्लेख मी आधी केला होता. )
आपण ज्याला अँबर म्हणतो तो एका झाडाचा सुकलेला गोंद असतो. सुंदर रंगामुळे पुर्वी दागिन्यातही त्याचा
वापर होत असे. कठीण असला तरी तो ज्वलनशील असतो.
ज्यूरासिक पार्क चित्रपटामधे अशाच अँबरचा उपयोग केलेला होता. आणि तो ताजा असताना एखादा किटक त्याच्या संपर्कात आला तर तो त्यात अडकून, लाखो वर्षे जसाच्या तसा राहतो.
म्हणजे एखाद्या किटकाला त्याचे तूकडे करुन वापरणे म्हणजे अक्षरशः जीवावरचे काम. तरीही एक प्रकारच्या मुंग्या ( वूड अँट्स ) त्याचे लहान तूकडे करुन आपल्या वारुळावर ठेवतात.
जे झाड हे तयार करते ते एक अँटीसेप्टीक मलम म्हणून. झाडाला जखम झाली तर त्यातून हा गोंद पाझरतो
आणि तिथे हानीकारक किटक / बॅक्टेरिया वाढत नाहीत. नेमक्या ह्याच गुणाचा वापर मुंग्या करतात. या तूकड्याचा उपयोग त्या खाण्यासाठी नव्हे तर पायपुसणे म्हणून करतात. असे केल्याने त्यांचे पाय निर्जंतुक होतात आणि वारुळात इन्फेक्शन होत नाही.

आता कणभर मेंदू असणार्‍या मुंग्यांना हे शहाणपण शिकण्यासाठी किती पिढ्या खर्च कराव्या लागल्या असतील ?
आधी एकीने खाद्य नसलेला तुकडा तो का आणावा ? तिला तेवढा रिकामा वेळ कसा मिळाला ? आणला तर आणला, त्याचा वापर केल्याने नेमके काय होते याचे निरिक्षण त्यांनी कसे केले ? मग हे ज्ञान पुढच्या पिढीत कसे पोहोचवले ?

बाप्रे...किती बारीकसारीक गोष्टींचीही अचुक आणि रेअर माहिती आहे दिनेशदा तुमच्याकडे.

खरोखरच्...मलाही नेहमी प्रश्न पडतो, एवढासा मेंदु असणार्या मुंग्यांकडे किती एकोपा असतो!समुहशक्ती असते!! Happy
अशा छोट्या छोट्या प्राण्यांचे शहाणपण देखील शिकण्यासारखे आहे. Happy

दिनेश दा.. किती वाचता आणी सर्वच्या सर्व लक्षात ही ठेवता ..
खूपच कौतुक वाटतं नेहमीच.. Happy

व्वा, शशांकजी! म्हणजे अगदी दिग्गजांचा सहवास लाभलाय तुम्हाला.+१०० Happy

व्वा, शशांकजी! म्हणजे अगदी दिग्गजांचा सहवास लाभलाय तुम्हाला.+१०० >>>>> इथेही लाभतोच आहे की - तुम्हा सर्वांचा (म्हणजेच दिग्गजांचा).....

पण माझी झोळी किती फाटकी आहे याची जाणीव पदोपदी होतेय.... Sad

<<<व्वा, शशांकजी! म्हणजे अगदी दिग्गजांचा सहवास लाभलाय तुम्हाला>>>> वर्षू, आणि शशांकजी, दिनेशदा ह्या दिग्ग्जांबरोबर आपली ओळख आहे, म्हणून आपणही भाग्यवान आहोत !
<<<<बाप्रे...किती बारीकसारीक गोष्टींचीही अचुक आणि रेअर माहिती आहे दिनेशदा तुमच्याकडे>>>
आर्या, दिनेशदांच्या स्मरणशक्तीविषयी बोलण्यासाठी आता आमच्याकडे शब्दच उरले नाहीत Happy
इनमीनतीन फोटो मस्त !

सुदुपार निगकर्स,
हा सुंदर फोटो कोल्हापुरमधल्या एका फेसबुकच्या पानावर मिळाला.
(इथं टाकण्याचा मोह नाही आवरला)

mor.jpgवर्षू, आणि शशांकजी, दिनेशदा ह्या दिग्ग्जांबरोबर आपली ओळख आहे, म्हणून आपणही भाग्यवान आहोत !
१००+ अनुमोदन !

पण माझी झोळी किती फाटकी आहे याची जाणीव पदोपदी होतेय..
शशांकजी,
या अर्थाने तुम्ही तर १०० धावा काढलेल्या आहेत, आमच्या नावांवर अजुन दोन अंकी संख्या देखील जमा नाही अजुन्,त्यासाठी आणखी काही वर्षे जातील अस वाटतं

अनिल -
अजुन्,त्यासाठी आणखी काही वर्षे जातील अस वाटतं >>> माझ्याकडे १०-१२ कुंड्या आहेत हो फक्त - आणि तुम्ही खरोखरीच्या शेतात काम करणारी मंडळी ...... झाडे - वेली, शेती इ. मधे तुमच्या इतका जाणकार अजून कोण असणार ??

आणि दिनेशदा तर चालता-बोलता एनसायक्लोपिडीया - झाडे-पाने-फुले-पक्षी-कीटक-प्राणी इ. कुठल्याही विषयावर त्यांच्याकडे काहीतरी विशेष माहिती असणारच - आणि ती ही लगेच - अ‍ॅट द टिप ऑफ टंग .....
त्यामुळे - अशा दिग्गजांपुढे - "नमस्कारेण मुच्येध्वम् " - नमस्कार करुन सुटका करुन घ्या ..... (न मु)....

हो अनिल, हाच तो फोटो.

आपल्या उजूच्या फेसबुक पेजवर पण एका वेगळ्या केळ्याच्या फुलाचा फोटो आहे.

बाकी मी काय वाचलंच नाही ( इथलं ) बरं का !

आणि दिनेशदा तर चालता-बोलता एनसायक्लोपिडीया - झाडे-पाने-फुले-पक्षी-कीटक-प्राणी इ. कुठल्याही विषयावर त्यांच्याकडे काहीतरी विशेष माहिती असणारच - आणि ती ही लगेच - अ‍ॅट द टिप ऑफ टंग .....
त्यामुळे - अशा दिग्गजांपुढे - "नमस्कारेण मुच्येध्वम् " - नमस्कार करुन सुटका करुन घ्या .....>>>>>>>>>>शशांकजी १००००००००००००००० मोदक Happy

<<आणि दिनेशदा तर चालता-बोलता एनसायक्लोपिडीया<< अगदी अगदी./
<<वर्षू, आणि शशांकजी, दिनेशदा ह्या दिग्ग्जांबरोबर आपली ओळख आहे, म्हणून आपणही भाग्यवान आहोत !
<< +१०००० अनुचमोदन!

अनिल, मस्त फोटो ! मी मोर उडताना पाहिला पण बराच लांब होता.आणि कॅमेरा ऑन करेपर्यंत तो इच्छित स्थळी पोचला पण होता. Uhoh

दिनेशदा तुम्ही पाहिलात तो हा फोटो (माझ्या फेबु अकाउंट्वरचा).पण हा मी नाही क्लिक केलाय. माझ्या एका फ्रेंडच्या अकाउंट्मध्ये होता, मला खूप आवडला म्हणून मी फक्त शेअर केला तिकडे. बर झाल पण त्यामूळे त्याबद्द्ल इतकी माहिती मिळाली.

http://www.facebook.com/photo.php?fbid=497904940251145&set=a.21838316486...

अनिल, मस्त फोटो. मी पण खूपवेळा मोर उडताना पाहिले आहेत.पण फोटो मात्र नाही हा काढता आला तसा.

उडणारा मोर.

आमच्या गावात हे उडणारे मोर भरपूर दिस्तात. कधीकधी अगदी धावत्या कारसमोरून अचानक जातात आणि अ‍ॅक्सिडेंट होतो की काय अशी भिती वाटते. गावात देखणे मोर सगळीकडे असले तरी गावातलं आकर्षण म्हणजे 'ओव्हीडो चिकन्स'! हे पँट घातल्यासारखे दिसणारे कोंबडे डाउनटाउनमधे सगळीकडे हिंडतात. लहान मुलं त्यांच्यासाठी दाणे आणतात. कोंबड्यांना अजीबात माणसांची, मोटारींची भिती वाटत नाही. बिनधास्त आपल्या बाजुला येऊन खाणं टिपतात. आणि लोक आपल्या मोटारींवर, "आय ब्रेक ओन्ली फॉर ओव्हिडो चिकन्स" अशी बंपरस्टिकर्स लावून फिरतात. Happy

हे विकिपिडियामधून साभारः

Chickens:

Oviedo is known for a population of chickens that roam the downtown area. There are so many of them roaming the area that traffic often stops as they cross the roads. The chickens have been featured on Oviedo t-shirts and coffee mugs and a poster commemorating one of Oviedo's yearly festivals, "A Taste of Oviedo".

Contrary to what some believe, there are no specific laws or statutes surrounding the chickens, neither for their protection nor for their removal - the latter being something some residents would like to see due to the danger they pose with traffic in the congested town center. For others, however, the chickens add an element of fun.

There are City Ordinances that protect birds in the City Limits, the entire city is designated a bird sanctuary. Chickens are afforded the courtesy of protection under the code.[10]

The chickens were also the subject of a short documentary that was part of the Florida Film Festival 2009.[11]

मृण्मयी
उडणारा मोर भारी दिसतोय. तूम्हाला नेहमी दिसतो, सो लक्की यार.
ओव्हीडो चिकन्सचा फोटो असेल तर टाक ना.:)

सुदुपार!!!!!!!!!

DSCN8939.JPG

ईथे सगळेच दिग्गज. माझे ग्यान म्हणजे बालवाडीच्या सुरवातीचे.

मृण्मयी, मस्त आहे व्हिडियो. हा धागा इतका फास्ट धावतोय ना की १/२ दिवसांचा ब्रेक झाला इथं यायला, की खूप पुढे जातात गप्पा. Happy

श्री. मारुती चितमपल्लींचं 'नवेगावबांधचे दिवस' नावाचं पुस्तक वाचतिये. त्यातल्या काही गमतीच्या तर काही अगदी अंतर्मुख करायला लावणार्‍या गोष्टी इथे शेअर करेन.

मोर समोरून उडत जातो, त्यावेळी आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. तसाच अनुभव येतोय या व्हीडिओत.

००

आता आणखी एक अत्याचार करतो. गोरखचिंचेखालचा बाजार हे आमच्याकडचे नेहमीचे दृष्य. माझ्या घराजवळचा जो बाजार आहे त्याचा फोटो काढणे शक्य नाही कारण तिथे पूर्ण झाड किंवा बाजार फ्रेममधे घेता येईल अशी मोकळी जागाच नाही. त्यामूळे हा एक केविलवाणा प्रयत्न.

आभार वर्षू, मनातलं सगळं कागदावर नाही आलय, पण आनंद मात्र खुप मिळाला, रंगांशी खेळताना.

वॉव्..दिनेश दा ..यू आर अन आर्टिस्ट..... खूपच सुंदर आहे... >>>> +१००... काही दिवसातच नि ग चा - निसर्गचित्रे/ प्राणी चित्रे असा उपविभाग काढावा लागणार बहुतेक ..... Happy

त्यामुळे सर्वच कलाकारांना शुभेच्छा व लगे रहो......

आणि दिनेशदा तर चालता-बोलता एनसायक्लोपिडीया - झाडे-पाने-फुले-पक्षी-कीटक-प्राणी इ. कुठल्याही विषयावर त्यांच्याकडे काहीतरी विशेष माहिती असणारच - आणि ती ही लगेच - अ‍ॅट द टिप ऑफ टंग .....
त्यामुळे - अशा दिग्गजांपुढे - "नमस्कारेण मुच्येध्वम् " - नमस्कार करुन सुटका करुन घ्या .....>>>>>>>>>> ++

दिनेशदा चित्र छान आहे

आधुनिक शकुंतला
http://epaper.loksatta.com/91960/indian-express/23-02-2013#page/32/1

http://www.loksatta.com/chaturang-news/an-amazing-experience-of-andaman-...

Pages