निसर्गाच्या गप्पा (भाग - १२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 January, 2013 - 02:12

निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षु नील मस्त आहेत फळं

दिनेशदा खासच आलय चित्र, एवढ्या वर्षात काढलं नाहीये तरीही, आता सुरू केलय तर अजून येऊद्यात ....

दिनेशदा, (सॉरी! नवीनदा....!) चित्रं मस्तच आलंय!३५ वर्षांनंतर ब्रश हातात घेतलाय असं अजिबात वाटत नाहीये. अजून चित्रं बघायला खूप आवडतील.

वर्षूतै, खरंच खूप अनोळखी फळांची मस्त ओळख करून दिलीस. अग्दी फळबाजार समोर उभा केलास!>>+१००

दोन रंगातील गुलाब
05.jpg
वाशीतील फूल, भाज्या आणि फळे प्रदर्शनातील प्रची. मोबाईल ची डेटा केबल मिळत नसल्यामुळे आणि कामाच्या गडबडीत आज मुहूर्त मिळाला.
06.jpg07.jpg

पान ११ पासून पुढे अप्रतीम चित्रं आणि माहिती. शेत, झाडं, फुलं, वेली आणि फळं सगळच मस्त. (पान ११ च्या आधीच्या पोष्टींचं कौतुक आधीच केलं आहे :प )

<<शांकली, पत्ते शोधण्याचे कष्ट घेतलेत खरे पण जिप्स्याला पुण्यातली एवढी माहिती नाही. त्याला सोबत लागेल >>
अय्यो.. आम्ही आहोत की. जिप्सी आणि शांकली सारखे तज्ञ झाडांच्या शोधात निघाले तर त्यांची सोबत करायची संधी दवडणार नाही. त्यांच्याकडच्या अफाट ज्ञानातलं थोडंफार पदरात पाडून घेउच. Happy
शिवाय पुण्यातल्या 'वर्ल्ड फेमस' खाद्यग्रुहांची ओळखही करवून देउ जिप्सींना Happy

जिप्सी : पुण्यात यायचं मनावर घ्याच. Happy

सामी, वाशीत भरलं होतं का प्रदर्शन ? महाराष्ट्र सरकारचे होते का ?
ती गुलाब सोडून बाकिची फुले आहेत ती स्विस मधे आणि गल्फ मधे ठायीठायी असतात. आपल्याकडे कसे दिवाळीला ठरवून एखाद्या सोसायटीत सगळे एकाच प्रकारचे कंदिल लावतात तसे स्विसमधे एकाच रंगाची फुले लावतात. प्रत्येकाच्या खिडकीत एकाच रंगाची फुले. गल्फमधे खुप कष्टाने हि झाडे वाढवतात. पण वर्षभर फुलत राहतील, याची काळजी घेतात. यांना गल्फमधे मंद सुगंध पण असतो.

जो_एस, शांकली - आभार Happy

शकुन, जिप्सींना... अशी हाक मारली तर भोवळ येईल त्याला. जिप्स्या म्हंटल्याशिवाय "ओ" पण देत नाही तो.

शकुन, ४-२ झाडं, पक्षी ओळखता आलं म्हणजे काहीच विशेष नाही. निसर्गापुढे कोण तज्ञ असू शकेल? त्यामुळे प्लीज असं मनात पण आणू नका.

सामी, ती पिटूनियाची फुलं गोsssड दिसताहेत हं अगदी!!

शांकली, आपल्यालाच काय, शास्त्रज्ञानाही सर्व सजींवांचा अभ्यास तर सोडाच, नामांकनही जमलेले नाही.
अजूनही नव्या नव्या प्रजाती सापडतात.

रावी, संभाजी पार्कातही काही खास झाडे कायमची वस्तीला आहेत. तिथेच कलाबाश ( कलिंगडासारखी भली मोठी फळे येणारे, पण त्या फळाचा "बेगर्स पॉट" सोडून काही उपयोग नसलेले ) झाड बघितले होते.

सामी, वाशीत भरलं होतं का प्रदर्शन ? महाराष्ट्र सरकारचे होते का ?

महाराष्ट्र सरकार काय नाय करत वो... हे लोकल म्युन्सिपाल्टीचे काम हाय...

माझे चुकले बघाय्चे. ऑफिस ते घर असा एकमार्गी रस्ता अवलंबलेल्या लोकांना हे काय बघाय्ला मिळणार, त्यात घरी डिएने येतो. त्यात असले काही छापत नाहीत Sad

दिनेशदा, चित्र खूप सुंदर आहे.
नमस्कार नि. ग.! मला हा बाफ लयीच आवडतो Happy
तर प्रश्नः माझ्याकडे दुहेरी जास्वंद आहे. त्याची पानं पिवळी होवून गळत आहेत. झाडावर कीड होती आधी. त्या फांद्या तोडल्यावर एखादे फूल येतंय हल्ली, काय करू? पाणी देखील फक्त एखादा तांब्याच घालते. मदत करा प्लीज.

आमच्या स्क्रॅपयार्डात वाढलेले देशी बदामाचे हे आवाढव्य आणि वेगळ्या आकारातले झाड. रोजच्या दुपारच्या जेवणानंतर आमचे कामगार त्या झाडाखाली असतात, आणि प्रत्येकाला ४/५ देशी बदाम मिळतातच. मी पण
त्या बाबतीत रसिक असल्याने, २/४ मोठेसे बघून मलाही देतात.

त्या झाडाखालीच वाढलेली हि कलिंगडे. याची ना कुणी मुद्दाम लागवड केली ना कुणी त्यांना पाणी घालत.
पण प्रत्येक वेलीला ५/६ लागलेली आहेत. कामगार आता खाऊन कंटाळले.

काल मी पण घरी नेले. मस्त गोड आहे. पण अर्धेही नाही संपले.

आणि हे काजूचे झाड. संध्याकाळी ड्रायव्हरला यायला उशीर झाला तर मी या झाडाखाली वाट बघतो.

दिनेशदा, नवी मुंबई महानगर पालिकेने भरवले होते. २६,२७ , २८ जानेवारी.
साधना मलाही शेवटच्या दिवशीच जायला मिळाले. बरीच फूले कोमेजली होती. नि.ग. बरोबर शेअर करायला फोटो काढले पण मोबाईल ने काढल्यामुळे क्लीअर नाही आले .
शांकली खूपच क्युट रंग आहे फुलांचा.

सामी खूपच सुंदर आहेत फुलं,दुहेरी रंगात किती मस्त शेड्स आहेत..

वॉव.. दिनेश दा निसर्गाच्या सान्निध्यातच राहतायेत की.. काजू,बदाम्,कलिंगड अगदी आसपास म्हंजे काय.. लकी!! Happy

दिनेशदा मस्तच. खरोखर लकी. >> हे मात्र खरच.
ईथे अशी वेलीवर लागलेली कलिंगड फोटो काढायला तरी दिसतील काय.

इथे आम्हाला स्थानिक आणि आयात केलेली अशी दोन्ही प्रकारची फळे मिळतात. आयात केलेली रंगाने भडक, एकसमान आकाराची आणि एकाच चवीची असतात तर स्थानिक रंगरुपाने ओबडधोबड पण चवीला अप्रतिम असतात. २/४ अगदी वेगळ्या प्रकारची पण मिळतात पण फार थोडे दिवस सिझन असतो त्यांचा. आता कॅमेरा आहे, तर फोटो काढून दाखवेनच.

आपल्याकडे कलिंगडाच्या वाफ्यात फार मेहनत घ्यावी लागते. पण इथे ती बघा कशी, विनातक्रार वाढताहेत.
मध्यंतरी महिनाभर पावसाची रजा होती, तरी या नाजूक वेली कोमेजल्या नव्हत्या.

मी राहतो तो अंगोलाचा पश्चिम भाग. इथे वाळवंट असले तरी झाडेही भरपूर आहेत. पुर्वेला मात्र डोंगराळ हिरवागार भाग आहे. तिथे कॉफीचे मळे आणि सफरचंदाच्या बागा आहेत.

दिनेशदा>>>+१
शांकली, शकुन पुण्यातील या जागा माहित नाही. Happy
तेंव्हा पुणे दौर्‍याच्या वेळेस तुम्ही सगळे बरोबर पाहिजेच Happy Happy

दिनेशदांचा "परत फिरा रे" हा लेख आमच्या एरीयामधील चिमण्यांनी वाचला बहुतेक. Proud सध्या शेवग्याच्या झाडावर त्यांचा भरपूर वावर चालु आहे. जास्त संख्येने या येतात आणि बिचार्‍या सनबर्डला हाकलुन लावतात. सनबर्ड यातील मध चोखतो तर चिमण्या सरळ कळ्याच तोडतात. Happy पण यांची हि धम्माल बघण्यासारखी असते. Happy

चिमण्यांच्या फोटोसोबत लगडलेल्या शेवग्याच्या शेंगाही पहा. Happy Wink

हिची सर्कस पहा Happy

दिनेशदा पेन्टिन्ग मस्त! आणि काजू, बदाम कलिंगड सगळं अगदी समोरच्या झाडावर!
जिप्सीच्या फोटोत साध्यासुध्या रोजच्या चिमण्याही किती गोड दिसतात!
माझ्या कडच्या कुंडीतल्या लिंबाच्या झाडाची पानं अचानकच गळून गेली आहेत. सगळीच्या सगळी. झाड म्हणजे अगदी रोपच आहे दीडफुटी. जगेल की नाही?

जिप्स्या, ऋतुचक्र वाचलं असशीलच. त्यात अशा चिमण्यांचे वर्णन आहे.
मानुषी, तिकडे थंड हवामान आहे का ? म्हणून गळाली असतील. परत येईल बहर. देठ मात्र हिरवे राहिले पाहिजेत.

काल ऑफिसच्या खिडकीत लाल मानेचा सनबर्ड आला होता. म्हणजे गळ्यावर आपल्या अंगठ्याएवढा लाल टिळा. मी कधी असा सनबर्ड बघितला नव्हता. पण सनबर्डच असावा. चोच तशीच होती.

या सनबर्डाच्या चोचीवरुन आठवले. त्या चोचीला सोयीस्कर आकार असलेल्या फुलातून त्यांनी साखरपाणी प्यावे अशी ( निसर्गाची) अपेक्षा होती. असे करताना त्यांच्या "कपाळा"वर परागकणांचा टिळा लागला असता आणि त्यांचे वहन झाले असते. पण ते "माथ्यावरचे ओझे" त्यांना हल्ली नकोसे झालेय. त्यामुळे आपल्या अण्कुचीदार चोचीचा वापर करुन ते फुलांना बाहेरुनच भोक पाडतात, आणि आपला स्वार्थ साधतात. परागवहन काही करत नाहीत. त्यामूळे त्यांनी त्यांच्यासाठी असलेली झाडे शोधावीत हेच बरे. शेवग्याची फुले ( कळ्या नाहीत ) चिमण्यांनी वापरावीत.

दिनेशदा, चित्रकला चांगलीच आहे. आम्ही शाळेत असताना, डोंगर, त्यामागून उगवणारा सूर्य, ४ च्या आकड्यातले पक्षी, वळणदार नदी ह्यापलीकडे आमची चित्रकला फारशी गेलीच नाही. Happy
मोनालि, मी म्हणते ते हे फळ नाही. दिनेशदांनी सांगितल्याप्रमाणे अगदि रामफळासारखेच पण आकाराने मोठे, आतील गर रवाळ पण अगदि मिष्ट गोड असा होता.
जिप्सी, 'चिमण्यांचे झाड' मस्तच !
सामी, फुले छान आहेत.
बाकीचे सर्वांचेच फोटो सुरेख आहेत अगदि !

आमच्या वॉशिंग मशिनच्या मागे कबूतराचे पिल्लू पडले आहे. त्याला अजून उडता येत नहिये. कुणाला पक्षीप्रेमींचा फोने नंबर माहित असल्यास लवकर मला कळवा.

धन्यवाद
साक्षी.

मोनालि, मी म्हणते ते हे फळ नाही. >>> आता प्रत्येकाने आपापल्या कडी व खाल्लेल्या फळांचे फळवाल्याने दिलेल्या नावासकट फोटो टाकायला हवे तर Happy
सनबर्ड बहुदा टेस्ट चेन्ज म्हणुन दुसर्‍या झाडांवर जात असावेत. हल्ली आमच्या गॅलरीत शोभेच्या फुलांवर येउन बसत्तात दुपारी.

माझ्याकडे रोज सकाळी ४-५ साधे हिरवे, पिवळे, पांढरे सनबर्ड्स येतात आणि सोबत एकच झळाळत्या निळ्या रंगाचा शिंजीर असतो. ऐशुच्या मते त्या ४-५ बायांचा हा एकटा दादला असावा Happy

तसेही हल्ली आमच्याकडे जोड्या जुळवा प्रकरण जोरात चालु आहे. एक प्रौढ मांजर गच्चीत येऊन प्रेमगीते गात असते आणि ती आली की आमचा एस 'कुठुन ही ब्याद आली?" असा चेहरा करुन घरात पळुन येतो.

त्यामुळे आपल्या अण्कुचीदार चोचीचा वापर करुन ते फुलांना बाहेरुनच भोक पाडतात, आणि आपला स्वार्थ साधतात. परागवहन काही करत नाहीत. >> Interesting. दिनेशदा, कुठे वाचायला मिळेल हे ऑबजर्वेशन? Happy

Pages