गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे गाणे कुणाला माहिती आहे का? मला अतिशय आवडते..खूप वर्षान्पूर्वी ऐकले होते. गायिका, गीतकार आठवत नाहीत आता.
तुला मानिला देव मी प्राण माझा अशी एक पन्चारती वाहू दे
तुझे बोल हिन्दोळ त्या आठवाचे मला गाउ दे रे मला गाउ दे

अजून एक गाणे.. गायिका, गीतकार आठवत नाहीत.
जा शोध जा किनारा, जीवनधारा गोते खाई नाही कोठे विसावा

लावणीसम्राज्ञी रोशन सातारकर
रोशन बाईनी शृंगारिक लावण्यांबरोबर "माझ्या नव-यान सोडलीय दारू" सारख्या प्रबोधन करणा-या लावण्या तसेच उडत्या चालीवरील "डार्लिंग डार्लिंग" सारखी गाणी गायली. अखेरच्या काळामध्ये तमाशाचे बदल लेले स्वरूप पाहून त्यांचे मन विषण्ण होत असे. शासन दरबारी त्यांची दाखल घेतली नाही याची त्यांना खंत होतीच पण रसिकांकडून मिळालेले प्रेम त्यांना महत्वाचे वाटे.
लावणीसम्राज्ञी रोशन सातारकर, श्रीक्षेत्र जेजुरी आणि श्रीखंडोबाविषयी अधिक माहितीसाठी लॉग इन करा 'सांस्क्रुतिक जेजुरी'
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा...

आज बर्‍याच दिवसांनी पुन्हा या धाग्यावर येण्याचे कारण उषा मंगेशकर यांचे पहिल्यांदाच (मी) ऐकलेले एक अप्रतिम गाणे " बरस रे घना......तूच आज शमवी तृषीत माझ्या मना".

दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणं इथे ऐका. (बाजुच्या हिरव्या चौकटीतील प्ले बटनावर क्लिक करा. Happy

"नथी चा आकडा ..
बंदोबस्त केला म्हणुन एवढा " हे मी मराठी बाणा नाटकात एकलेले गाणे आहे..कोणाकडे असेल तर कृपया इथे द्यावी>>>>>पियापेटी, गाणं मिळालं का? नसेल तर मला संपर्कातुन तुमचा ईमेल पाठवा.

रच्याकने,

जा शोध जा किनारा, जीवनधारा गोते खाई नाही कोठे विसावा>>>>हे गाणे "अनोळखी" चित्रपटातील ना?
स्वरः सुधीर फडके (बाबूजी).

लता मंगेशकर यांची एक सुंदर लावणी काल मिळाली. ही लावणी उषा मंगेशकर यांनीही गायली आहे.
मला आणा एक हीरयाची मोरणी
लावणी - शान्ता शेळके.
संगीत - पं. ह्र्दयनाथ मंगेशकर.
चित्रपट - पवनाकाठचा धोंडी.
यातला लावणीचा बाज आणि कोरस मस्तच आहे.

श्रीनिवास खळ्यांच्या चाली ऐकताना अगदी साध्यासोप्या आणि सह्ज वाटतात पण आपण सोबत गुणगुणायला तोंड उघडलं की कळतं काय चीज आहे ते...
लहानपणीच यांची अनेक गाणी ऐकली होती.
आई व्हावी मुलगी माझी,
आई आणिक बाबा यातील कोण आवडे अधिक तुला,
एक कोल्हा बहु भुकेला.
ही गाणी तर अजुनही आवडतात.
पुढे जसं समजायला लागलं बालगीत, लावणी, भक्तीगीत, चित्रपट संगीत यातली विविधता ऐकायला मिळाली आणि खळेकाका काय प्रकरण आहे ते कळू लागलं.
त्यांचा 'अभंग तुक्याचे' हा album तर आठवड्यातून एकदा सकाळी लावलाच जातो.
त्यांचं एक गाणं 'निळा सावळा नाथ' ऐकुन लतादीदींनी दाद दिली होती आणि हे गाणं ऐकल्यानंतर दीदी खळेकाकांकडे गायल्या होत्या, असं कुठेतरी वाचल्याचं आठवतं!

लता मंगेशकर यांची एक सुंदर लावणी काल मिळाली. ही लावणी उषा मंगेशकर यांनीही गायली आहे.>>>>पूर्वी, याच चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेली "रातीची झोप मज येईना.....कुणी तरी सांगा हो सजणा" हि लावणी देखील ऐका. छानच आहे. Happy

ऐकताना अगदी साध्यासोप्या आणि सह्ज वाटतात पण आपण सोबत गुणगुणायला तोंड उघडलं की कळतं काय चीज आहे ते...>>>>>अगदी अगदी. "बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात" हे गाणं ऐकायला जितक सोपं वाटत तितकंच ते "गुणगुणायलाही" अवघड. Happy

त्यांचं एक गाणं 'निळा सावळा नाथ' ऐकुन लतादीदींनी दाद दिली होती आणि हे गाणं ऐकल्यानंतर दीदी खळेकाकांकडे गायल्या होत्या, असं कुठेतरी वाचल्याचं आठवतं!>>>>>रच्याकने, "निळा सावळा नाथ" हे कुंदा बोकील यांनी गायलं आहे ना?

@ जिप्सी
होय. 'निळा सावळा नाथ' हे कुंदा बोकील यांनी गायलं आहे, आणि शब्द गंगाधर महाम्बरे यांचे.
रातीची झोप मज येईना.....कुणी तरी सांगा हो सजणा ही लावणी कुठे मिळेल?
plz मला ही लावणी e-mail कराल का?

यू ट्यूबवर, शुभमंगल सावधान नावाचा सिनेमा आहे. रिमा, अशोक सराफ असूनही सिनेमा मात्र लई ब्येकार आहे. पण त्यात अगदी शेवटी, लताने गायलेले एक सुंदर भजन आहे. शेवटची १० मिनिटे तेवढा सिनेमा बघा.

आज बर्‍याच दिवसांनी कानावर पडले ते...
'रात्र काळी, घागर काळी
यमूना जळे ही काळी हो माय'
.

विष्णूदास नामदेवांची रचना, प्रत्येक शब्दाशब्दात एक सूंदर लय, गोडवा आहे; इतकं आपण त्या 'काळी' शब्दाच्या प्रेमात पडतो. प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे दुसरे कडवे ध्रूवपदासारखे वापरलेय. कुणी सौ. शकूंतला आगाटे यांनी या रचनेचे छान रसग्रहण केलेय, त्यावर त्यांचे पूस्तक प्रकाशित झालेय असे वाचनात आलेय.

@ जिप्सी
रातीची झोप मज येईना.....कुणी तरी सांगा हो सजणा ही लावणी मिळत नाहीय.
plz मला ही लावणी e-mail कराल का?

@दिनेशदा
तुमच्या आधीच्या post वाचल्या, खुप छान महिती मिळाली.
लताने गायलेले एक सुंदर भजन ऐकले.
'गाणी मनातली' च्या सदस्यांसाठी ही त्याची link देत आहे.
http://www.youtube.com/watch?v=L6HnbG1XRB4

शोभा गुर्टु यांचं उघड्या पुन्हा जहाल्या, त्यानीच छेडिले गं, पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा ही गाणी ऐकली होती. त्यांचं आणखी एक गाणं सापडलं 'रे नंद्लाला तू छेडू नको'. यात 'नको बासरीच्या घेऊस ताना' यानंतर वाजणारी बासरी खासच आहे. जरुर ऐका.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Re_Nandalala_Tu_Chedu

धिंगाणा डॉट कॉम वर, लावणी झाली गं रागिणी या चित्रपटातली गाणी ऐकून बघा. सुंदर आहेत, (नेहमीच्या ऐकण्यातली नाहीत.) खास करुन सुलक्षणा पंडीत आणि मन्ना डे नी गायलेले, बिलासखानी तोडी रागातले गाणे ऐकाच.

@ जिप्सी
रातीची झोप मज येईना.....कुणी तरी सांगा हो सजणा ही लावणी मिळत नाहीय.
plz मला ही लावणी e-mail कराल का?>>>>>नक्कीच Happy मला संपर्कातुन तुमचा ईमेल आयडी पाठवा.

जिप्सी (योगेश),
तुम्ही पठवलेली गाणी मिळाली. Happy
आता ऐकत आहे.
मनःपूर्वक आभार.

'उषा मंगेशकर' यांचं 'ना ना ना ना नाही नाही गं' हे गाणं काल किती वेळा ऐकलं त्याची गणतीच नाही. अजुनही ऐकते आहे.

याच धाग्यावर साधना यांनी या गाण्याबद्द्ल लिहीलंय "हे ह्याआधी अनेकदा ऐकलेय, अतिशय गोड लडिवाळ, खट्याळ चालीचे गाणे तितक्याच खट्याळपणे गायलेय..."
अगदी सहमत साधनाताई... Happy

फक्त अडचण अशी आहे मंगेशकरांनी (मग ती आशा असो की उषा) गाण्यात केलेला 'गोड लडिवाळ, खट्याळपणा' आपण गायला गेलं की आपल्याला करणं झेपत नाही.
आणि इथेच मंगेशकर या नावाची जादू कळते....

जुनी गाणी कितीही वेळा ऐकली तरी कंटाळा येत नाही, पण आताची गाणी सलग ऐकायला गेलं की जरा वेळाने त्रासच व्हायला लगतो. (अर्थात काही चांगली गाणी अपवाद उदा. नटरंग, जोगवा, क्षणभर विश्रांती...)
याचं कारण काय असेल?
आताच्या गाण्यांचं recording stereophonic soundवर केलं जातं त्यामुळे गीताचे चाल, शब्द, गायक/गायिका चांगले असूनही आताची गाणी 'मनाला भिडत नाहीत.' असं असेल का?

आणि इथेच मंगेशकर या नावाची जादू कळते....>>>>>>+१ अगदी अगदी. Happy

उषा मंगेशकर यांचे
"हा उनाड अवखळ वारा, या टपोर श्रावणधारा फुलवून पिसारा सारा तू नाच आज रे मोरा...."

आणि आशा भोसले/वर्षा भोसले यांचे "चांदोबा चांदोबा भागलास का?...." हि दोन गाणी सध्या मन भरून ऐकतोय. Happy

@ चंबू
छान गाण्याची आठवण करुन दिलीत.

<<<प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे दुसरे कडवे धृवपदासारखे वापरलेय.>>>
हे आधी माझ्या लक्षातच आले नव्हते.

आणखी एक मला जाणवलेली गोष्ट म्हणजे गाण्यात कोरस हा मुख्य गायक/ गायिकेच्या सहाय्याला वापरला जातो, पण या गाण्यात कोरसचा वापर हा मुख्य गायिकेच्या बरोबरीने केला आहे आणि तो ऐकताना कुठेही खटकत नाहीच उलट त्यामुळे या गाण्याचे माधुर्य वाढते.

लता आणि सत्यशील देशपांडेंनी गायिलेलं 'हे गीत जीवनाचे' चित्रपटातील 'सुर येती विरुन जाती' हे गाणं फार छान आहे. इथे ऐकता येईल.
बंधनी आहे तरीही मुक्त झालो आज मी,
पंख झालो या स्वरांचे, विहरलो मेघांतरी... हे शब्द आणि शेवटी लता आणि सत्यशील यांनी एका मागोमाग म्हटलेलं 'सुर येती' हे विशेष आवडतं.

पूर्वी : शोभा गुर्टून्च्या आवाजातल्या या गीतान्चे सन्गीत माझ्या आठवणीप्रमाणे श्रीकान्त ठाकरे यान्चे आहे. अतीशय सुन्दर !

शास्त्रीय सन्गीत गायकान्च्या आवाजातलि गाणी आठवताना मला इथे कुमार गन्धर्वान्ची गाणी आठवतात.

अजुनी रुसूनी आहे
प्रेम केले काय हा झाला गुन्हा
कोणा कशी कळावी वेडात काय गोडी

परवीन सुलताना यान्नी गाइलेले हे गाणे सुध्धा
रसिका तुझ्याच साठी मी एक गीत गाते ( कवी गन्गाधर महाम्बरे आणी सन्गीत राम फाटक)

<<<< जुनी गाणी कितीही वेळा ऐकली तरी कंटाळा येत नाही, पण आताची गाणी सलग ऐकायला गेलं की जरा वेळाने त्रासच व्हायला लगतो. >>>>
जरा वेहळा विचार ज्यामुळे विचारसरणी बदलेल !
१. प्रत्येक पिढीला असेच वाटते कि आमच्या काळातले भारी होते ; आताचे कसले उथळ आहे हे सन्गीत! हा स्व्भाव आहे.
२. सर्व काळात चान्गले आणी वाइट निर्माण होत असते. चान्गले टिकते त्यामुळे स्मरणात रहाते.वाइट होते ते मेन्दू विसरून जातो.
आजही चान्गले सन्गीत निर्माण होतच असणार. उदा. श्रीधर फडक्यान्चे सन्गीत.
आपण डोळे आणी कान सजग ठेवले पाहिजेत.

तरी पण मी तुमच्या मताशी सहमत आहे कि चान्गल्या सन्गीताचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्याची कारणे वेगळ्या ठिकाणी आहेत. १९९० पासून जर नीट लक्श्य दिले तर दिसेल की फक्त वरलिया रूपाला मह्त्व प्राप्त होत गेले. उत्क्रुशट सिन्थेसाइझ्ड सन्गीत बोकाळले. उत्तम "म्युझिक सिस्टीम" वरून ऐकायला मिळू लागले. पण सन्गीताच्या गाभ्याकडे जण्याचे महत्व विसरले गेले. कश्ट प्राप्य गोश्टी मागे पडल्या. तपश्चर्या हा शब्द विस्म्रुतीत गेला. सन्गीताचा ध्यास घेण्याची व्रुत्ती गेली. व्यासन्ग मागे पडला फक्त "कलेक्शन" वाढली. "मला खूप शिकायचे आहे" ही तळमळ जाउन "मला हे येतच आहे" आणी "हे चान्गलेच आहे" हा दुराभिमान वाढला.
आताच्या गाण्यान्मधे खरी वाद्ये ऐकायला मिळत नाहीत. सिन्थ मधून तयार झालेले इलेक्त्ट्रऑनिक स्वर कानावर पडतात.
"कागज के फूल ; खुशबू कहासे लाएन्गे !"

तरी पण ह्या इथे छान चर्चा वाचायला मिळतात. चान्गल्या सन्गीताचे चाहते भेटतात. त्यामुळे आनन्द वाटतो.

काल देवराइ सिनेमा बघितला .. त्यातल ... गवताच वार्यावर डोलतय .... ला लाअ ला ...
किती गोड गाण्/कविता आहे .. कुणी गायला आहे ??
नितळ सिनेमातील देखील गाणी अतिशय छान आहेत ...

सुरेश भट- श्रीधर फडके- वैशाली भैसने माडे -
'येणारा दिवस मला येताना हसणारच'
पुन्हा पुन्हा ऐकावी अशी गझल. कोणाला अल्बमचे नाव माहीत असेल तर सांगा.

धारा बरसती धारा
वारा सननसन वारा
जीवलगा अशा वेळी दूर का ये ना..

छान उडती चाल आहे या गाण्याची..

हे गाणं कुणी गायलय.. संगीतकार आणि गीतकार कोण? माहीतीये का??

@मी गौरी
मला जेवढं येतं तेवढं खाली लिहिलय गाणं . अजुन एक कडवं आहे.

गवताचं पातं वा-यावर डोलतं
डोलताना म्हणतं खेळायला चला (२)

झिम्म्ड पावसात गारांची बरसात
बरसात म्हणते वेचायला चला (२)

झ-याचं पाणी खळाखळा हसतं
हसताना म्हणतं ला ला ला ल ला (२)

ही बहुदा कुसुमाग्रजांची कविता आहे.

अग सायली.... हो हेच आहे .. किती छान चाल आणि आवाज आहे न सिनेमा मधेय जे कुणी गायल आहे ...

चंबू ....."रात्र काळी" या गाण्याने फार जुन्या आठवणी जागवल्यास. मला वाटतं की हे अगदी साठच्या दशकात रेडिओवर लागत असे. सकाळीसकाळीच! खूपच गोड!

Pages

Back to top