फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि केसांचा बहुतेक वर्षं बॉय कट होता. नंतर वाढवले आणि ते चोरून फ्लिक्स प्रकरण पण केले बरीच वर्षे. आणि वर आत्या मामीनी विचारले की सांगायचे की माझे नवीन येणारे केस असेच तुटक दिस्तात Lol

पारि Happy

बाप रे हसुन हसुन पोट दुखले ... अर्ली ९०स ... काय सुखद आठवणींचा काळ ... कोलेजातले नविन नविन दिवस .. हाहाहा ... धोती, बन्जरा ड्रेस, अनारकली , ए लाइन ड्रेस्,बेल स्लीवस्,पॅरलल पेण्ट्,कमरेखाली ए लाइन चे फ्रोक आणि त्यावर अति जाडा घट्ट बसणारा बेल्ट ,आइ ला लाडि गोडी लाउन तिच्या साड्यांचे अनारकली पंजाबी ड्रेस्,त्या आधी मैने प्यार किया,आशिकी चा जमाना ,,
टिकली टिकली चे चनिया चोली,साडी घालायची तर पल्लु गुजरातिच(ते का कधी कळल नाही)..
बॉय कट .. ते सुध्हा बार्बर शोप मधेय... का तर ते एक्स्पर्ट अस्तात असा समझ .. हाय पोनी टेल आणि पुढे फ्लिक्स्...बर्मुडा आणि टी शर्ट ...
हाहाहाहाहा .... पण त्या केलेल्या ,त्या वेळच्या फॅशन त्या वेळी आपल्याला छानच वाटत होत्या ..

ए आताच्या फॅशन बद्दल बोला
तुम्ही जे बोलताय त्याबद्दल मला काहीच बोलता येत नाहीये

हायला.. दुपारपर्यंत १३२ पोस्टी... वाचून संपल्या सगळ्या आत्ता... काय काय गप्पा निघाल्यात.. हसून हसून कोलमडून ही झालं..
दक्षे .. बलून फ्राक्काय, जंजीर मधे प्राण ची जुल्फें काय.. Rofl
राहुल रॉयची हेअर स्टाईल आणी पुढे आलेले दाताचे सुळके पाहून मला हमखास ड्रॅकुला ची आठवण येते.. अजूनही.. Proud
स्क्रंचीज.. ई.....
पोनी ला रुमाला ऐवजी शिफॉन चा स्कार्फ बांधत असे..
@ रिया. .. अगा तुझ्या ज्ञानात अजून भर पाडून राहिले ना सगळेजण.. Wink

त्या ८०-९० च्या भयाण फॅशन परत मात्र नाही आल्या फिरून..

अगागा... तुम्हाला चोरुन केस कापावे लागत होते... मला बळाजबरी नेत असत Sad
एक्दा आई-बाबा ६ महिने नव्हते. मी मस्त वेण्यांपर्यंत वाढवले केस.. नंतर बॉयकट झाला त्याचा Angry

>> पारे सुदैवाने मला ती नाही हसून हसून गडबडा लोळण
मी भेटल्यावर खात्री करून घेईन Proud
बाय द वे, हे दुसर्‍याचे पोस्ट कॉपी केले की स्मायलीज चे जे काहि टेक्स्ट येते ते वाचून सुधा Lol होते. हसून हसून गडबडा लोळण Lol

स्वत:चे फ्लिक्स कापणे पासून अ‍ॅन्टिब्युटी इफेक्टवाल्या कपड्यांपर्यंत मला आईकडून कपाळाला हात आणि बाबांकडून 'काय या मुलीचं करायचं!' या अर्थाने मान हलवणे एवढ्याच रिअ‍ॅक्शन्स मिळत.
विक्रमकडे ग्रीनरूममधे शिकत असताना आम्ही सगळ्यांनीच एकेक बट मुद्दामून ब्लीच केली होती. पोपट झालाच होता. जे दिसायचं ते अगदी विक्रमच्या भाषेतच कावळा शिटल्यासारखे दिसत होते. Happy

पहिली आहे त्यातलीच एक काळ्या रंगाची माझ्याकडे आहे.
दुसरी दिसायला एवढी छान नाहीये पण स्पेस खुप आहे तिच्यात.

माझे केस कमरेपर्यंत लांब होते... अगदी कॉलेजात जाईपर्यंत
नंतर कापून टाकले ... पार मानेपर्यंत केले..
आता वाटतय नको होते कापायला Sad

वर्षूतै Proud
पण मला बोलता येत नाहीये ना काही
नुसतं ऐकुन किती घ्यायचं Proud

मला एकही बॅग नाही आवडली
माझ्याकडे बॅग्सच मस्त कलेक्शन आहे. आई म्हणजे जॉब सोडून एक दुकानच काढ आता Proud

मला बाकी कशाने नाही झाडुने मारल्याशिवाय आईचं समाधान व्हायचं नाही

अय्यो, मला वाटले फक्त माझीच आई हातात झाडू घ्यायची, कचरा काढण्याव्यतिरिक्त इतर असल्या कामांसाठीही.... आईचा मार भरपुर खाल्लाय मी...

>> आई म्हणजे जॉब सोडून एक दुकानच काढ आता फिदीफिदी
परवा भावाबरोबर जाताना मी एम जी रोडवर एका दुकानातल्या खुप सही नेकपिस कडे (भावाच्या शब्दात) आशाळभूतपणे पहात होते. तर तिथून मला हाताला धरून खेचत गाडीकडं नेत तो म्हणाला, दया कर आणि लौकर चल. त्या दुकानात आहेत त्यापेक्षा जास्त accessories तुझ्याकडे आहेत. Proud

मी फक्त एकदाच पुण्यात गेली होती मीटींग ला....मी पुण्यात एम जी रोड वर फिरले आहे....ऑसम प्लेस......

आता वाटतय नको होते कापायला <<
वाढव की परत मग.
किमान ३५ पर्यंत काही प्रॉब्लेम नसतो वाढायला. नंतर वाढ कमी होते, कामाचे प्रेशर वाढते वगैरे Happy

पेरु पहिली बॅग छान आहे...समहाउ मला त्या काळ्या चेन्स बघुन दादा कोंडके च्या नाडया आठवल्या... Sad

मला बाकी कशाने नाही झाडुने मारल्याशिवाय आईचं समाधान व्हायचं नाही

अय्यो, मला वाटले फक्त माझीच आई हातात झाडू घ्यायची, कचरा काढण्याव्यतिरिक्त इतर असल्या कामांसाठीही.... आईचा मार भरपुर खाल्लाय मी...
>>>>>>>> मी पण

पहिली चांगली आहे. दुसरी बोर आहे. सॉरी.
इथल्या सगळ्या डिझायनर बॅग्जमधे काही म्हणा मला बॅगीटच्याच आवडतात (मी एक पण घेतलेली नाहीये अजून). लेडिज बॅग्ज म्हणून विनाकारण डेन्टी (dainty), पर्की नसतात केलेल्या. व्हेरी सॉफिस्टिकेटेड करीअर वुमन टाइप म्हणून मला आवडतात.

1952a9a6653e48976138166de32772b1bf40.png
सेम ब्लॅक बॅग माझाजवळ आहे....दिसायला छान पण वापरायला गैरसोयिची..पट्कन सुट्टे पैसे जरी कढायचं झाले तरी अक्खी बॅग उघडावी लागते....

17.jpeg19.jpeg

18_0.jpeg

नी आता काही केल्या केस अजिबात पुर्वी सारखे जाड आणि दाट होत नाहीये Sad
आता लांब होतील पण दाट मुळीच नाही
ते लांब पण विरळ विरळ चांगले नाही दिसत मग Sad

मला भरभक्कम बॅगा लागतात ऑफिससाठी. सगळ्या वस्तु छत्री, पाण्याची बाटली वगैरे त्यातच रहायला पाहीजेत. आधीच्या बॅगा बघुन बॉस विचारायचा नेहमी, ऑफिसमधुन पळुन वगैरे जायची तयारी करतेयस काय??

मला मोठ्या बॅग्जच लागतात....भरपुर काय काय ठेवयला मिळतं त्यात.....

Pages