Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53
या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या एका मैत्रिणीच्या घरी
माझ्या एका मैत्रिणीच्या घरी दीड फूट रूंद आणि अडीच फूट उंच एवढा कप्पा तिने केवळ पर्सेससाठी करून घेतलाय. कप्प्यामधे वरती आणि साईडला हूक्स आहेत अडकवायला. काही पर्सेस नुसत्याच ठेवलेल्या आहेत.
माझ्या एका मैत्रिणीच्या घरी
माझ्या एका मैत्रिणीच्या घरी दीड फूट रूंद आणि अडीच फूट उंच एवढा कप्पा तिने केवळ पर्सेससाठी करून घेतलाय<<<<< मी पण.
पण मी पर्सेस नुसत्याच ठेवलेल्या आहेत.
मला बॅगा आणि पर्सेसच भयंकर वेड आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे करणं आलंच
ड्रीमगर्ल चे नेकपीसेस
ड्रीमगर्ल चे नेकपीसेस आवडले..
नी, पर्सेस बॅग्स नीट ठेवायची आयडिया मस्तंच.. मी मं सारख्या ठेवते.. लेदर बॅग्स खरंच नीट ठेवाव्या लागतात नाहीतर खराब होतात फार.. आपल्या वॉर्डरोब मधे दोनेक कप्प्यात लपवून ठेवल्या कि नवरोबांना आपल्याजवळ किती आहेत याचा थांगपत्ताही लागत नाही
तेच शूज चं.. मला लेडी मार्कोस म्हणतात नवरा आणी पोरगी ..
मागे बडोदा प्रिंटबद्दल चर्चा
मागे बडोदा प्रिंटबद्दल चर्चा झाली होती. ६ वर्षांपूर्वी मी इथल्या मैत्रिणींसाठी काही मटेरियल्स आणले होते, तेव्हाचे फोटो सापडलेत ते देतेय.
संपदा............... ते हिरवं
संपदा............... ते हिरवं पिवळं सेम माझ्याकडे होतं, डिझाईन जरा वेगळं असेल. किती पादडला मी तो ड्रेस... आणि सगळ्या बडोदा प्रिंट कापडांच्या ओढण्या नीरजाला गुंडाळायची दुपटी म्हणून वापरल्या. एकदम बेस्ट!!
सहीच , ओढण्या फारच
सहीच , ओढण्या फारच बहुपयोगी असतात हं
अजून काही फोटोज
,हे ब्लॉक्स
नवरोबांना आपल्याजवळ किती आहेत
नवरोबांना आपल्याजवळ किती आहेत याचा थांगपत्ताही लागत नाही <<
माझं पर्स वगैरेचं प्रकरण जरा कमीच आहे. मी एकेकाळी टिपिकल झोळ्या घेऊन भटकायचे. पृथ्वी थिएटरची गोणपाटाची बॅग माझी फेव होती.
मला आजही रंगीबेरंगी झोळ्याच जास्त आवडतात. पावसाळ्यात मात्र लोचा होतो.
रंगीबेरंगी झोळ्याच जास्त
रंगीबेरंगी झोळ्याच जास्त आवडतात>> ह्म्म मस्त वाटतात!!
ते बडोदा प्रिंट्स खरंच खूप लोभस दिसतात... मुंबईत कुठे मिळतील? हिंदमाताला???
मला अजुनही बडोदा प्रिंटचं
मला अजुनही बडोदा प्रिंटचं (व्यवच्छेदक ;)) लक्षण कळालंच नाहीये.
अशा फ्लोरल प्रिंट्स म्हणजे बडोदा प्रिंट का?
बडोदा हे ब्लॉक प्रिंट
बडोदा हे ब्लॉक प्रिंट असतात.
फ्लोरल किंवा जिओमेट्रिकल असे दोन्ही असतात. रिपीटेटिव्ह पॅटर्न.
जनरली सलवार आणि कुडत्यात उलटपलट रंग असतात म्हणजे पांढर्या रंगावर पिस्ता नक्षी कुर्त्यावर तर पिस्त्यावर पांढरी नक्षी सलवारीवर. दुपट्ट्याला सलवारी प्रमाणे अंग आणि कुर्त्याप्रमाणे दोन्ही पदर.
हे मूळ बडोदा प्रिंट.
कुठले कुठले प्रिंट्स असलेले
कुठले कुठले प्रिंट्स असलेले कॉटन मटेरियल्स सध्या इन आहेत?
बडोदा/ ब्लॉक प्रिन्ट कायमच
बडोदा/ ब्लॉक प्रिन्ट कायमच 'इन' असतं. सध्या त्यावर कुडती विथ थोडं वर्क/ एम्ब्रॉयडरी आणि लेगिंग्ज अशी फॅशन आहे.
संपदा, सेम हिरवं-पिवळं माझ्याकडेही. सध्या त्याचीच ओढणी स्कार्फ म्हणून वापरतेय
कुठलंही कॉटन मटेरीयल नेहमीच
कुठलंही कॉटन मटेरीयल नेहमीच इन असतं, मुंबईत तरी, पावसाळा वगळता!
ओहो आता कळ्ळं. धन्स
ओहो आता कळ्ळं. धन्स नी.
कुठलंही कॉटन मटेरीयल नेहमीच इन असतं, मुंबईत तरी, पावसाळा वगळता!
>>+१
. पृथ्वी थिएटरची गोणपाटाची
. पृथ्वी थिएटरची गोणपाटाची बॅग माझी फेव होती.
मला आजही रंगीबेरंगी झोळ्याच जास्त आवडतात. पावसाळ्यात मात्र लोचा होतो......>>>>>>>>>>>
मला देखील झोळ्या खुप आवडतात ,, पण माझ्या सासु बाइ मात्र का कोण जाणे मी झोळी घेतल्यावर नाराज असतात ,, त्यांना नाहि आव्डत...हे का अस घेतल आहे असे भाव त्यांच्या चेहरा वर असतात..
वर गंजी..खाली धोती पँट किंवा कुठलीहि लूज मटेरिअल अस्णारे हॅरम .... पायात अगदी फ्लॅट चप्पल .. किंवा कोल्हापुरी चप्पल ,, व गळ्यात चन्कि नेक पिस .. शक्य्तो अॅनटिक सिल्वर ...खांद्यात झोळी ... पायात सिल्वेर अॅन्क्लेट ... आणि मी तयार ... सर्वात आवडता पोशा़ख माझा हा ....केस थोडेसे अस्ताव्यस्त.. लूझ अंबाडा टाईप ..
याही बाबतीत सासूचं ऐकायचं...
याही बाबतीत सासूचं ऐकायचं... हे देवा.
नाही ग नी ... मला जे आवडत तेच
नाही ग नी ... मला जे आवडत तेच मी करते ... अगदि हिप्पि इस्स्स्टाइल... ;;
मी लिहिल आहे न त्यांच्या चेहर्यावर भाव असतात तसे फक्त ...
दादर प्रभादेवी मधेय कुणी
दादर प्रभादेवी मधेय कुणी चांगला /चांगली ड्रेस ब्लाउज शिउन देणारं असल्यास सांगा न .. फिटिंग बेस्ट हवे .. पॅटेर्न पेक्शा फीटिंग ला जरा मी सीलेक्टिव आहे ..
मी गौरी पोषाख आवडला
मी गौरी
पोषाख आवडला
ती नखांवर चिकटवायची प्रकरणं
ती नखांवर चिकटवायची प्रकरणं कुणी टृआय केलीत ़का? त्याच्याने मूळ नखं खराब व्हायची शक्यता कितपत असते?>>
वेका, मी वापरलेत acrylic/fake nails. स्वयंपाक करताना काळजी घ्यावी लागते, पण रोजची सगळी कामे करुन सुद्धा आठ दिवस छान राहतात...(मी जास्त लक्ष न देताही). Acetone वापरून काढली तर लवकर आणि व्यवस्थित निघतात.
Under-eye circles साठी एखादं
Under-eye circles साठी एखादं चांगलं क्रीम सुचवा ना..अमेरिकेत उपलब्ध असणारं. धन्यवाद!
इथे लहानपणच्या फॅशन ट्रेंड्स
इथे लहानपणच्या फॅशन ट्रेंड्स वर चर्चा वाचून मी २००६ हितगुज दिवाळी मधे लिहिलेला लेख आठवला , इथे शेअर केल्या शिवाय् रहावल नाही
बालपणीच्या फॅशन सुखाच्या :
http://www.maayboli.com/hitguj/messages/118369/118179.html?1161308076
कितीही वाइट फॅशन आल्या तरी आय अॅम स्टिल प्राउड ऑफ माय वॉड्रोब कलेक्शन आय ऑलवेज हॅड :).
अत्ताही ते ड्रेसेस असते तर घालायला आवडले असते , आम्ही कधीच त्या बलुन स्कर्ट- पट्टेवाली ओढणी नामक कपड्यांना बळी पडलो नाही , स्वतः डिझाइन करून त्या 'विशाल टेलर' ला कटकट करून एक से एक ड्रेसेस शिउन घेतले होते :).
त्या वेळी आमच्याकडे असलेले ड्रेसेस फक्त आम्हालाच नाही , कॉलनीतल्या कित्येकांना लक्षात आहेत
सोनाली बघते ट्राय करून.
सोनाली बघते ट्राय करून.
माझ्या क्लोजेट्मध्ये पर्सेस आणि फुट्वेअर ठेवण्यासाठी काहितरी बनवणं मस्ट आहे..वरच्या सजेशन्स आणि थोडं नेट धुंडाळून काहीतरी करेन. क्लोजेट्मेड सोडून कुणी काही सुचवत असाल तर नक्की पाहिन.
वेका -- कंटेनर स्टोरची एल्फा
वेका -- कंटेनर स्टोरची एल्फा सिस्टिम पण चांगली आहे organization साठी. सध्या ३०% ऑफ चालु आहे त्यांचा. मला आवडलेली खुप.
त्यांचे बेसिक रॉड्स असतात भिंतींना लावायचे, पण त्याच्यावर ती सिस्टिम नंतर पण हवी तशी बदलता येते, म्हणजे एखादी रॅक अजुन हवी, किंवा असलेली नको, किंवा एक स्ट्र्क्चर काढून दुसरं लावणं शक्य आहे (ईन थिअरी :))
पण कंटेनर स्टोर कडून काही
पण कंटेनर स्टोर कडून काही करवून घेणं महाग आहे. मी २-३ आठवड्यांपूर्वी कोट घेतलं ६ फूट रुंदीच्या स्पेसकरता टॉप टु बॉटम साठी ते $१५०० च्या आसपास होतं .
पण त्यात ज्युलरी ठेवायसाठी फारच सही ड्रॉवर्स होते ज्यात छोटे छोटे खन आणि त्यावर बसणारं एकच मोठ्ठं झाकण. मला नीट सांगता येत नाही. त्यांच्या साइटवर आहे का बघते.
हो माहिती आहे मला ते ज्युलरी
हो माहिती आहे मला ते ज्युलरी ड्रॉवर्स, क्युट आहेत फार ते.
सेक्स अँड द सिटी सिनेमा
सेक्स अँड द सिटी सिनेमा पहिल्या भागातील वॉक इन कपाटाला पर्याय नाही. बिग आणि ती घर बघायला जातात ते. मोठे अमेरिकन घर असेल तर गो फॉर इट.
सेक्स अँड द सिटी सिनेमा
सेक्स अँड द सिटी सिनेमा पहिल्या भागातील वॉक इन कपाटाला पर्याय नाही. बिग आणि ती घर बघायला जातात ते. मोठे अमेरिकन घर असेल तर गो फॉर इट.
एल्फा सिस्टिम आणि तो बसवायचा
एल्फा सिस्टिम आणि तो बसवायचा खर्च - महाग प्रकरण. पण आहे मस्त. ज्वेलरी बॉक्स पण क्यूट आहे चांगला उपयोग होतो त्याचा. :). तिथले हँग करायचे स्वेटर्स ठेवायचे कंपार्ट्मेंट्स पण उपयोगी आहेत. हलके कपडे मस्त मावतात.
शूम्पी जर बरीच वर्षे वापरू
शूम्पी जर बरीच वर्षे वापरू शकणार असू तर कदाचित ठीक होईल नाहीतर १५०० वन टाइम जास्त वाटतात. मला काहीवेळा वैट याचं वाटतं की समहौ आपण (किंवा मी ) unlike AMericans आता इतकं महागाचं घर घेतलंय तर करूया म्हणून पटकन अशा गोष्टिंवर खर्च करायला बघणार नाही ..:)
एल्फा सिस्टीम मस्त वाट्तेय मात्र
Pages