फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!

Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28

खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अ‍ॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्‍याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का? Wink
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ड्रीमगर्ल,' Lakme forever silk eyeliner, Shadow artist shimer stick, lakme glide on eye color

या सर्वच रेंज मधल्या पेन्सिलींचे कलर्स आणी टेक्श्चर्स मस्त आहेत. फक्त 'ती' आयकॉनिक सोडल्यास.. Happy

आयलायनर ज्याला डोळ्याखाली छान दिसते त्याने बिंधास्त लावावे.. (मी जर गोल्ड/सिल्वर्/पांढरा सोडून डार्क कलर लावलं तर भांडखोर दिसते मी..म्हणून मेरे लिये ये ऑप्शन आऊट.. Proud )

कॉस्मेटिक लेंसेस वापरत असाल तरी आयमेकप वापरायला काहीच हरकत नाही..

अंजली, वेल छानच आहेत..

ड्रिमगर्ल मी लॅक्मे इन्स्टा लायनर आणि अ‍ॅब्सोल्यूट शाईन लाईन (दोन्ही लिक्विड) वापरते. आणि काजळासाठी कोलोसेल आहे, एक शेम्बॉरचं पावडर काजळ आहे Uhoh जे आयशॅडो म्हणून सुद्धा वापरता येतं. पण ते मी डिस्कार्ड करून टाकलंय सध्या..

बरं मला सांगा की सध्याचा चांगला मस्कारा कुठला [वॉटरप्रुफ] ?

माझ्या पापण्या बर्‍याच लांब आहेत पण लाईट कलरच्या आहेत. आणि बुबुळाचा रंगही चॉकलेटी त्यामुळे कॉलेजात असताना मैत्रीणींमुळे हौसेनी ब्राऊन मस्कारा वापरत असे [आता कंपनी नाही आठवत पण तो वॉटरप्रुफ असायचा] पण गेल्या १३ वर्षात एकदाही वापरला नाहीये
इथल्या चर्चा वाचुन परत एकदा वापरायला सुरवात करावी असं वाटायला लागलंय म्हणून विचारते.
तर द्या ना माझ्या प्रश्नाचं उत्तर.
धन्यवाद बर का Happy

अनिश्का काळा ड्रेस झक्कास Happy

आणखी एक. मी काजळ किंवा काळं आयलायनर वापरलं तर माझे डोळे भयाण दिसतात....मग कुठलं आयलायनर बर दिसेल असं वाट्तं?

धन्यवाद म. काळा ड्रेस खुप जणांना आवडलाय इथे....मला पण.....आता मी अशा प्रकारात शोधणार आहे हा ड्रेस

मने मस्कारा वॉटरफ्रुफ असतो? Uhoh मला वाटलं वॉटर बेस्ड असेल.
मी जो मस्कारा वापरतेय सध्या त्याचं नाव लक्षात नाही.. बॉतलवरचं नाव गेलंय.. नविन घ्यायला झालाय मलाही. घेतला तर लॅक्मेचाच घेणार हे नक्की.

तुझ्या बुबुळाचा रंग ब्राऊन असेल तरिही तु जर काळं लायनर वापरलंस तर डोळे मस्त दिसतील. बुबुळाच्या रंगाचं लायनर तितकंसं उठून दिसणार नाही. माझ्या ऑफिसात एक साऊथ इंडियन मुलगी आहे, तिचे डोळे ब्राऊन आहेत, काळ्या लायनर मुळे मस्त चमकतात.

दक्षे हल्लीच माहीत नाही पण पुर्वी म्हणजे १३ वर्षांपुर्वी तरी वॉटरप्रुफ मिळायचा मस्कारा.
अग काळ लायनर लावलं की डोळे बाहेर आल्यासारखे उठुन दिसतात ग माझे Sad

वॉटरप्रुफ आणि कलरलेसही मस्कारा मिळतो.
मने काळं लायनर अजिबात लावू नकोस. ग्रे, प्युटर मधे जा.

एक साऊथ इंडियन मुलगी आहे, तिचे डोळे ब्राऊन आहेत, काळ्या लायनर मुळे मस्त चमकतात. <<
तिचा स्किन टोन किती डार्क आहे?
मनीच्या उजळ-गव्हाळी रंगाला ब्राऊन डोळे-ब्लॅक लायनर भयंकर दिसेल.

कलरलेस Happy
कधी कधी पापण्या व्यवस्थित मोठ्या असतात. बाकीच्या मेकपने त्या डल झालेल्या असतात पण त्यांना रंग लावून त्या खूप जास्त प्रॉमिनंट होतात. अश्या वेळेला किंचित ग्लॉस आणि शेप पुरता कलरलेस वापरायचा.

हो ग नी. काळं लायनर मला भयानक दिसतं. :९

ओक्के ग्रे ट्राय करुन बघते आता.
आणि मस्कार्याबद्दल सांग ना कोणता घेऊ ते

मला माझा बेसिक मेकप किट परत विकत घ्यायचा आहे. आधीचे सर्व प्रॉडक्ट्स नियमित न वापरल्याने मी फेकून दिले. (तसेपण बरेचसे संपत आलेच होते) काय काय घेऊ याची यादी बनवूया का? सध्या ट्रेंड्स काय आहेत याबद्दल पण जरा उजेड पाडा. ऑन्लाईन ऑर्डर करणार असल्याने एकत्र ऑर्डर केलेले चांगले पडेल.

१. लॅक्मे कॉम्पॅक्ट.
२. फाऊंडेशन (याबद्दल जरा सुचवा. मी लॅक्मे वापरते पण नियमित नाही, त्यामुळे ठेवून ठेवून खराब होतय)
३. मॉइश्चरायझर - टोनर- क्लिन्सिंग मिल्क (बायोटिक)
४. आयलायनर
५. मस्कारा
६. काजल पेन्सिल
७. लिपस्टिक- लिप ग्लॉस (मेबीलिन)
८. ब्लश आणि आय शॅडो.

अजून काही आठवलं तर सांगा मला. Proud

नंदिनी

फाऊंडेशन हवंच आहे का? लावलं आणि जरा घाम आला की तिथला पॅच निघून जातो. त्यापेक्षा फेअरनेस क्रिम आणि कॉम्पॅक्टने मी हवा तो इफेक्ट आणते.

चेहर्‍याला मॉईश्चरायझर ऐवजी लॅक्टोकॅलामाईन चालेल बहुतेक.
बाकी अंगाला लॅक्मे अतिशय उत्तम.
लिप्स्टिक मेबिलिन, शेंबॉर पण छान आहे, आजकाल लॅक्मेत सुद्धा उत्तम शेडस मिळतात.
माझ्याकडे शेंबॉर चा ५९ स्टार डिलाईट हा ब्लशर आहे, मी त्याचा वापर आयशॅडो म्हणून सुद्धा करते. न्यूड शेड आहे त्यामुळे कोणत्याही ड्रेसवर जाते... आणि फार मेकप केल्यासारखं दिसत नाही.

macara.jpg

मी हा वापरते. छान आहे. पण वॉटरप्रुफ नाही. आणि वॉटरप्रुफ असेल तर तो काढण्यासाठी एक वेगळे लिक्विड मिळते ते लागते ना?

दक्षे, लॅक्टोकॅलामाईन सूट होत नाही. मी फेअरनेस क्रीम वापरत नाही. (एक तत्त्व म्हणून!!! :फिदी:) पण फाऊंडेशन घेऊ की नको हे ठरवतेच आहे.

माझ्याकडे शेंबॉर चा ५९ स्टार डिलाईट हा ब्लशर आहे, मी त्याचा वापर आयशॅडो म्हणून सुद्धा करते. न्यूड शेड आहे त्यामुळे कोणत्याही ड्रेसवर जाते<>< हे बघते जरा. मला लॅक्मेची आयशॅडोची छोटे छोटे डबे मिळतात ते फार आवडतात. बाहेर जाताना पर्समधे घेऊन फिरायला बरं. Happy

मला लेक्मेचे कॉम्पेक्ट लावले तर पिंपल्स येतात.असा कोणाला अनुभव आहे का?
पिंपल्स न येण्यासाठि कोणते कॉम्पेक्ट लावावे

हो अविगा मलाही अस अनुभव आला होता. मी मॅक चे वापरले होते एकदा फार भारी होते. पण नंतर तसे मिळालेच नाही.

Sad

बेअर मिनरल्स ची सर्व मेकअपची प्रॉडक्ट्स छान असतात.
भारतात मिळतात का?
(आता भारतात परतणार आहोत त्यामुळे हा प्रश्ण)..

Pages