खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का?
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!
फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!
Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुमेधा, युट्युबवर व्हीडीओ
सुमेधा, युट्युबवर व्हीडीओ सर्च कर ते जास्त उपयोगी पडेल.
दक्षिणा, धन्यवाद.काल मी कॉम्पॅक्ट आणि दोन लिपस्टिक ऑर्डर केल्यात. ते जर धडपणे आलं तर पुढची प्रॉडक्ट्स ऑर्डर करेन.
वर्षू +१. चांगल्या स्किनसाठी योग्य आहार, योग्य व्यायाम आणि पुरेशी झोप या गोष्टी मस्ट आहेत. बाकीची प्रॉडक्ट्स वापरली नाहीत तरी. मी एकदा एक चातुर्मास चेहर्याला फेसवॉशव्यतिरीक्त काहीही लावणार नाही, या निर्धाराने घालवलं होतं. इन फॅक्ट तेव्हाच माझी स्किन खूप चांगली दिसत होती असे सर्वांचे मत.
ड्राय स्किनसाठी बायोटिकचे मॉईश्चरायझर वापरून बघा. त्याच्याने चांगला फरक पडतो. माझी स्किन विचित्र आहे, उन्हाळ्यात अति तेलकट आणी हिवाळ्यात कोरडीफटक. त्यामुळे हिवाळ्यत मॉइश्चराईझ करणे आणी उन्हाळ्यात सतत फेसवॉशने तोंड धुणे असे सीझनवाईज फंडे असतात माझे.
काल ओले टोटल इफेक्ट
काल ओले टोटल इफेक्ट घेतलं.....१४९ रु ला ८ ग्राम...... :(....पण ते खरच इफेक्टिव आहे....माझी आई तेच वापरते......
दक्षिणा अग लॅकमे स्वस्तच
दक्षिणा अग लॅकमे स्वस्तच आहे.......... बाकी रेवलॉन लोरियाल पेक्शा.....इंडियन स्किन ला ते सुट होतं आणि......( ओले ने माझे सुके केले....) त्या पेक्शा तरि नक्किच स्वस्त... पण ओले फाउंडेशन बेस वापरलं तर काहि लावायची गरज नाही....
सुमेधा, इथे दाखवलंय... बघ
सुमेधा, इथे दाखवलंय... बघ जमतंय का ते.
नंदिनी ऑनलाईन ऑर्डर केलंस?
नंदिनी ऑनलाईन ऑर्डर केलंस? स्क्रिनवर पाहून नुसत्या शेड्स कशा कळल्या तुला? त्याचं काही टेक्निक आहे का?
अग मे हे केल होत ट्राय...पण
अग मे हे केल होत ट्राय...पण इतकि सरळ लाईन येइल तर शप्पथ
दक्षे __/\__. खरच ग्रेट
दक्षे __/\__. खरच ग्रेट आहेस... फोटो कुणी काढले
पण ते फोटोत छान दिसतंय
पण ते फोटोत छान दिसतंय
दक्षिणा, आधीच्या ट्राईड अँड
दक्षिणा, आधीच्या ट्राईड अँड टेस्टेड शेड्स ऑर्डर केल्यात, नविन शेड घ्यायची झाली तर मात्र नाही करू शकणार.
दक्षिणा तु लिहिलयसं की ब्लशर
दक्षिणा
तु लिहिलयसं की ब्लशर गालावर सुद्धा वापरू शकतो.
पण ते गालावरच वापरतात ना... अजून कुठे?
यू ट्युब वर एक ब्लेअर म्हणून
यू ट्युब वर एक ब्लेअर म्हणून आहे. कॅलिफोर्नियातील तरूणी. तिचे ब्युटी ट्युटोरिअल्स बघतो आम्ही.
ब्लेअर ब्युटी गुरू असा सर्च मारा.
माधवी... सॉरी ब्लशर गालावरच
माधवी...
सॉरी ब्लशर गालावरच लावतात... डोळ्यावरही (आयशॅडो म्हणून) वापरू शकतो असं लिहायला हवं होतं खरंतर.
नंदिनी अगं ट्राईड अॅन्ड टेस्टेड असतील तर कंपनी कंपनी प्रमाणे शेड्स बदलतात.
होप यू विल गेट एक्झॅक्टली द वन दॅट यू आर एक्स्पेक्टींग.
वर्षे नेटवर ढिग मिळतात असले
वर्षे नेटवर ढिग मिळतात असले फोटो.
अनिश्का मी आले की लावून दाखविन तुला लायनर.
किंवा तू ये पुण्याला.. सोप्पय अगं एकदम. थोडी प्रॅक्टीस पाहिजे फक्त.
दक्षी, त्याच कंपनीची तीच शेड
दक्षी, त्याच कंपनीची तीच शेड तीच प्राईस.
(No subject)
मला टीनेज ला सुट होइल असे
मला टीनेज ला सुट होइल असे गॉगल्स सांगा कोणीतरी. इमेज टाका जमल्यास. मुलाला द्यायचयं. १३ वर्षे आहे म्हणुन लहान मुलांसारखे नकोयेत.
सस्मे तुला डिझाईन हवंय की
सस्मे तुला डिझाईन हवंय की कंपन्या?
दोन्ही सांग. जास्त भारीचा
दोन्ही सांग. जास्त भारीचा नकोय. मुलं काळजीपुर्वक वापरत नाहीत. १००० च्या आत.
@ दक्षिणा मागील पानावरील डोळे
@ दक्षिणा
मागील पानावरील डोळे तुझे आहेत का ? असतील फारच सुंदर आहेत.
lakme iconic pencil आणली आहे.
आता वापरून बघते.
खरतर मी असी सणक आली की खूप गोष्टी घेवून येते आणि रोजच्या रोज त्याचा वापर करत नाही, रोज जमत पण नाही. मग ड्रेसिंग टेबल आवरताना खूप काही expireझाले म्हणून टाकून द्यावे लागते.
उदा म्हणून eye shadow. रोज तर मी काही लावत नाही. हौसेनी green blue सुद्धा आणले होते. पण वापर नाही. , cleaners, face packs , foundations, ची पण तीच गत होते. जुन्या झाल्या की वापराची भीती वाटते , मग काय , द्या टाकून .
तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही कस manage करता ?
(कालच shopping करताना मनावर खूप संयम ठेवला आहे )
मृणाल माझे डोळे नाहित ते.
मृणाल माझे डोळे नाहित ते.
मी पण हौसेने ब्लू, रेड, ग्रीन आणि काळी अशी लायनर शिमर पेन्सिल्स आणलेल्या. १-२ वेळा वापरल्या आणि ठेवून दिल्या.. लोकल ब्रँड च्या आहेत त्यामुळे फार वाईट्ट वाटलं नाही. बाकी नियमित वापरते आणलं की.
Feeling lucky , Hollywood
Feeling lucky , Hollywood ani best makeup artists , professional makeup supply , makeup schools 15 min distance var ahet :).
Big makeup show IMATS happening in town on Jan 19 , unfortunately jayla vel nahiye :(.
HD makups madhe MAC , 'makeup forever 'brands are fab !
Lakme adhi awadaycha , high pigment cosmetics brand nahiye he samajata !
@ दक्षिणा मागील पानावरील डोळे
@ दक्षिणा
मागील पानावरील डोळे तुझे आहेत का ? असतील फारच सुंदर आहेत.+१११
lakme iconic pencil मी पण आणली पण ती उमटतच नाहीये. हातावर फिकट उमटतीये. ,डोळ्यान्वर अजीबात नाही. हा पीस खराब असेल का ? की माझ काही चूकतय ??
धन्नो किती किंमत आहे त्या
धन्नो किती किंमत आहे त्या पेन्सिलिची?
मी ते शेम्बॉरचं पावडर काजळ बोलले ना? ते मी ३५० का ४५० ला घेतलेलं. आणि आता दिलंय ठेवून. लावलं की डोळे थंड थंड होऊन चुरचुरल्यासारखे वाटतात. सेम विथ ओरिफ्लेम पेन्सिल्स.. कुणाला अनुभव आहे का?
सस्मित, फास्टट्रॅकचे बघा.
सस्मित, फास्टट्रॅकचे बघा. तुम्हांला हवी तशी रेंज आहे.
ही लिंक
किती किंमत आहे त्या
किती किंमत आहे त्या पेन्सिलिची <<< १९९
धनश्री, तेच, हाय पिग्मेन्ट
धनश्री,
तेच, हाय पिग्मेन्ट नाहीये लॅक्मे , समाधान नाही होत लॅक्मे कलर्ड कॉस्मेटिस्क ने अजिबात.
MAC किंवा makeupforever या HD cosmetics चे जेल आय लायनर घे, ब्रश ने लावायचं.
लिक्विड आय लायनर पेक्षा जेल आय लायन्र छान दिसतं , प्रोफेशनल्स मोस्ट्ली सगळे प्रोफेशनल्स पण जेल आय लायनर च वापरतात, लिक्विड फार कमी.
ती काय शीसपेन्सिल नाहीये. १९९
ती काय शीसपेन्सिल नाहीये. १९९ म्हणजे बरी प्राइस आहे की.
मी हे काजळ वापरते, कलरबारचे.
मी हे काजळ वापरते, कलरबारचे. उतरतही नाही आणि पसरतही नाही.
हायला दिपांजली, तु मस्त
हायला दिपांजली, तु मस्त पिल्लू सोडलंस
I am just crazy about eye liners and pencil kajal. so for me, must find this
lakme iconic pencil मी पण
lakme iconic pencil मी पण आणली पण ती उमटतच नाहीये. हातावर फिकट उमटतीये. ,डोळ्यान्वर अजीबात नाही. हा पीस खराब असेल का ? की माझ काही चूकतय ??>>>>>
अरे देवा, उगाच काल खरेदी केली.
तेच, हाय पिग्मेन्ट नाहीये लॅक्मे , समाधान नाही होत लॅक्मे कलर्ड कॉस्मेटिस्क ने अजिबात.
MAC किंवा makeupforever या HD cosmetics चे जेल आय लायनर घे, ब्रश ने लावायचं.
लिक्विड आय लायनर पेक्षा जेल आय लायन्र छान दिसतं , प्रोफेशनल्स मोस्ट्ली सगळे प्रोफेशनल्स पण जेल आय लायनर च वापरतात, लिक्विड फार कमी. >>>>>
आता हे जेल आय लायनर पुण्यात कुठे मिळेल?
मी हे काजळ वापरते, कलरबारचे. उतरतही नाही आणि पसरतही नाही.>>>
हे पण कुठे मिळेल???
Pages