खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का?
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!
फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!
Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती गोरी व घारी आहे - पर्पल
ती गोरी व घारी आहे - पर्पल शेड पण छान दिसते. . शेड बघताना डार्क वाटते पण छान दिसते. मागे काही पानावर दक्षिणा नी एक लिपस्टिक चे फोटो दिलेत बघ . त्या शेड ची eye shadow पण छान वाटेल. eye liner कधीच black नाही.
हाय मी सध्या हिमालयाचे फेस
हाय मी सध्या हिमालयाचे फेस वॉश्,फेसपेक आणी clerina हे क्रिम वापरते माझे पिंपल्स जाताहेत असे वाटते आहे तो, परत येतात काय करु?
zebra print skirt वर काळा,
zebra print skirt वर काळा, पांढरा टॉप सोडून अजून कोणत्या रंगाचा टॉप छान दिसेल?
फिटिंग रेड किंवा टर्कॉइज टॉप
फिटिंग रेड किंवा टर्कॉइज टॉप मस्त दिसेल, मॅचिंग (रेड /टरकॉइज) अॅक्सेसरीज - जसे ब्रेसलेट, सॅन्डल्स, क्लच /बॅग इ. घातल्या तर पूर्ण आउटफिट मिळून येईल व्यवस्थित.
हे बघ काँबिनेशन कसे दिसेल याची आयडिया येण्यासाठी
- >>> ओले टोटल इफेक्ट बेस्ट
-
>>> ओले टोटल इफेक्ट बेस्ट आहे.......<<<
अगदी अगदी... जो वो बोलते है, वह वो करते है.....;)
लोरियाल प्युअर झोन एक्सफोलिएटींग जेल वॉश + ओले टो इ. ऑल टाईम हिट कॉम्बो आहे.
अविगा -- >>>>हाय मी सध्या
अविगा --
>>>>हाय मी सध्या हिमालयाचे फेस वॉश्,फेसपेक आणी clerina हे क्रिम वापरते माझे पिंपल्स जाताहेत असे वाटते आहे तो, परत येतात काय करु?<<<<
डँड्र्फ आहे का ते चेक कर. बर्याच वेळा आपल्याला माहित नसला तरी असतो (ओला किंवा सुका). व्यक्तीशः मला सेलसन शॅम्पुने खुप चांगला परिणाम मिळालेला आहे. एखादा जरी पिंपल् दिसला कि मी एक- दोन वेळा सेलसनने केस धुते. थोडा चेहेरा आणी खांद्यांवर सुद्धा लावते. लगेच ईफे़क्ट मिळतो. पण हा शॅम्पु रेग्युलर वापरासाठी नाही. शिवाय वासही सहन होण्यासारखा नाही. पण औषधाप्रमाणे वापरायचा आहे.
झेब्रा प्रिंटवर कुठलाही सॉलिड
झेब्रा प्रिंटवर कुठलाही सॉलिड कलर (सॉल्लिड नव्हे प्लेन या अर्थी)
धन्यवाद मैत्रेयी आणि नीधप
धन्यवाद मैत्रेयी आणि नीधप
मॅक फ्लुइडलाईन जेल आयलायनर
मॅक फ्लुइडलाईन जेल आयलायनर भारतात १००० रुपयाला मिळते.
दक्षिणाताई छानच टिप्स आहेत
दक्षिणाताई छानच टिप्स आहेत तुमच्या
माझ्याकडे wrinkled ओढणी आहे,
माझ्याकडे wrinkled ओढणी आहे, ती धुतल्यावर त्याच्या wrinkles/creases जातील ना ! मग त्या परत कशा आणायच्या की तशीच प्लेन वापरायची ?
wrinkled ओढणी हाताने धुवायची,
wrinkled ओढणी हाताने धुवायची, आणि चुकुनही इस्त्री करायची नाही. wrinkles तशाच राहतात.
wrinkled ओढणी हाताने धुवायची,
wrinkled ओढणी हाताने धुवायची, आणि चुकुनही इस्त्री करायची नाही. wrinkles तशाच राहतात.>>>+१
wrinkled ओढण्या धुतल्यानंतर
wrinkled ओढण्या धुतल्यानंतर घडी करुन ठेवण्यापेक्षा पिळा करुन ठेवल्या तर त्या छान राहतात.
चमकी, जर रिन्कल्स कमी झाले तर
चमकी, जर रिन्कल्स कमी झाले तर धुतल्यावर थोडी वाळत आली की ती धुण्याचा पिळा ठेवतो तशी पिळून ठेवून वाळू द्यायची आणि पुन्हा वापरेपर्यन्त तो पिळा तसाच ठेवायचा.
@ पारिजाता ... धन्यवाद, तसाच
@ पारिजाता ... धन्यवाद, तसाच पिळा ठेवला तर रिन्कल्स राहतील असं वाट्टंय .. करुन बघते !
चमकी मी नेहमी पिळाची ओढणी
चमकी मी नेहमी पिळाची ओढणी पिळूनच ठेवते कपाटात.
धुवायला साबणा ऐवजी वॉशिंग पावडर च्या पाण्यात भिजवून मग पाण्यातून काढून निथळत ठेव. होप धिस विल वर्क.
चमकी, पिळाची ओढणी धुवुन
चमकी, पिळाची ओढणी धुवुन पुन्हा पीळ करून वाळत ठेवायची आणि वाळली की पुन्हा पीळ घालुनच कपाटात.. असं दुकान्दाराने सांगितलं होतं.
१
१
आधीच्या पिळदार पण आता इस्त्री
आधीच्या पिळदार पण आता इस्त्री करून सरळ झालेल्या ओढण्यांना परत पिळ मारता येतो का
सुमेधा गुड क्वेश्चन नविनच
सुमेधा गुड क्वेश्चन
नविनच घे...
>> आधीच्या पिळदार पण आता
>> आधीच्या पिळदार पण आता इस्त्री करून सरळ झालेल्या ओढण्यांना परत पिळ मारता येतो का स्मित
>>सुमेधा गुड क्वेश्चन हाहा
नविनच घे...
आता नवीन घ्यायचा प्लॅन झालाच असेल तर जुनिला पण पीळ मारून बघा. धुवून घट्ट पिळ मारून तो पिळ्याचा गुंडाळा दोन तीन दिवस तसाच ठेवून मग बघता यिल.
ए ती सागर वेणी स्वतःची
ए ती सागर वेणी स्वतःची स्वतःला घालता येते का? खुप मुली घालतात ऑफिसमधे!
सुमेघा ओढणी ज्या पाण्यातुन
सुमेघा ओढणी ज्या पाण्यातुन काढणार त्यात स्टार्च घालुन बघ. न झाडता वाळत घाल. सुकत आली की पिळा मारुन उनात ठेउन दे. प्रयोग फसलाच तर परत पाण्यातुन काढ.
कॉटन आहे का? कॉटन असेल तर
कॉटन आहे का?
कॉटन असेल तर ओढणी पाण्याचा स्प्रे मारून भिजव बारीक चुण्या करत करत एका हातात धर. चुण्या मुठीत धरून वरपासून खालपर्यंत हात फिरव. आणि मग दर ४-५ इंचावर पुड्याच्या दोर्याने बांधून टाक. सावलीत तसेच सुकव.
कॉटन असेल तर ओढणी पाण्याचा
कॉटन असेल तर ओढणी पाण्याचा स्प्रे मारून भिजव >>>>>>पाण्यात स्टार्च घालू का ?
नको. स्टार्चने अति कडक होईल.
नको. स्टार्चने अति कडक होईल.
माधवी, सागरवेणी स्वत:ची स्वत:
माधवी, सागरवेणी स्वत:ची स्वत: घालता येते, पेशन्स आणि प्रॅक्टीस हवी फक्त.
एनीबडी नोज अबाऊट टिथ ज्वेलरी?
एनीबडी नोज अबाऊट टिथ ज्वेलरी?
दक्षिणा कुठे बघितलसं हे ..
दक्षिणा कुठे बघितलसं हे .. किती छोटी ज्वेलरी ती!! माझा अख्खा दात चांदीचा आहे
Pages