खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का?
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!
फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!
Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माधवी एक्झॅक्ट्ली!! मला असं
माधवी एक्झॅक्ट्ली!! मला असं वाटत लहानपणीची घातली आहे
असे हील्स घालुन चालणे वगैरे
असे हील्स घालुन चालणे वगैरे अपेक्षित नसतं>> ओह ओक्के.
म्हणजे पार्टी किंवा फन्क्शन.
मला असं वाटत लहानपणीची घातली
मला असं वाटत लहानपणीची घातली आहे>>
खूप वेळ उभं राहिलं तर दुखु
खूप वेळ उभं राहिलं तर दुखु शकतात पाय, या शिवाय असे हिल्स घालून वावरायची सवय पाहिजे.
पण जर गाडीतून उतरून पार्टीला जाणे, पार्टीत कायम उभं रहायला लागत नसले आणि पुन्हा गाडीने घरी येणे अशा सिच्युएशन मधे पाय न दुखता- ट्विस्ट न होता घालु शकतो हील्स :).
गाडी स्वतः चालवत असु तर या ड्रायव्हिंग ला पण चालत नाहीत, कार मधे एखादे फ्लॅट सँडल्स कायम ठेवावे.
नी... लुक हू इज
नी... लुक हू इज टॉकिंग!!!!!!!! निर्विवादपणे you are very very graceful..
हाय हील्स घालून चालता येणे फक्त या एकाच गोष्टीवर ग्रेस कश्काय ठरणार.. नै ??
माधवी, चनस
माधवी , मला पर्सनली ती अँकल लेंग्थ ची , निमुळत्या बॉटमची पँट आवडते . वर असे निमुळते हील्स चे सँडल घालून मला आपली हाईट ( तात्पुरती का होईना !! ) वाढलीशी वाटते
कसले gorgeous heels आहेत ते.
कसले gorgeous heels आहेत ते. पण ramp walk किम्वा function ला sitting pretty सोडून इतर काय जमणार नाही याच्यात. पाय तासंतास perpendicular to ground कसा ठेवायचा?
अगदी अगदी मे हेच लिहीणार
अगदी अगदी मे हेच लिहीणार होते. गाडीतून उतरताना जाम ग्रेसफुल दिसते.
डीजे, (सगळे हिल्सकडेच बघत
डीजे, (सगळे हिल्सकडेच बघत आहेत) पण डीझाईन मस्त आहे. मला आवडलं.
आजकाल भारतात एस्पेशली
आजकाल भारतात एस्पेशली पुण्यामुंबईत कपड्यांत काय फॅशन प्रचलित आहे??
यंदा लेक भारतात जाणारे म्हणून मी आपल्याकडून स्टडी करून ठेवतेय..
, " नखशृंगाराची व्याप्ती" ची नी ची व्याख्या वाचून
>> गाडीतून उतरताना जाम
>> गाडीतून उतरताना जाम ग्रेसफुल दिसते.
अश्विनीमामी, अगदी डोळ्यासमोर आलं. किती films मधे दाखवलं असेल अस्ले हील्स घालून हीरॉइन्स गाडीतून उतरताना.. or better still हिरोइन्सची entry होते अशी.
डीजे, मस्त आहेत हे हील्स. -)
डीजे, मस्त आहेत हे हील्स. -)
उसगावचे जीन्स म्ह्न्जे काय ?
उसगावचे जीन्स म्ह्न्जे काय ?
उसगावचे जीन्स म्ह्न्जे काय
उसगावचे जीन्स म्ह्न्जे काय >> US मधल्या जीन्स
वर्षु नील, सध्या अनार्कली
वर्षु नील,
सध्या अनार्कली खूप हिट आहे.
त्यात casual (every day wear) आणि पार्टी वेअर असे दोन्ही प्रकार मिळत आहेत.
western मधे cropped pants, blouses
smart long tops with ankle length leggings, jeggings etc
बाकी पुण्या/मुंबई कर च सांगतील..
हाय हिल्स फॅन्स साठी
हाय हिल्स फॅन्स साठी अतिउपयोगी प्रोडक्टः
http://www.drscholls.com/drscholls/products/HighHeelInsoles.jspa#tab-link1
हे भारतात मिळतं.
हो नताशा. हे मोची मधे मिळतात.
हो नताशा.
हे मोची मधे मिळतात. उत्तम दर्जाचे!
धन्स इन्द्रधनु..
धन्स इन्द्रधनु..
अछ्छा इन्द्रधनु, त्या
अछ्छा इन्द्रधनु,
त्या घोट्यापर्यंत उंची असणार्या ट्राउजर्सना cropped pants म्हणतात का?
फार चालावे लागणार नसेल तरच
फार चालावे लागणार नसेल तरच हाय हिल्स बर्या.. चित्रातल्या हिल्स फक्त घालून पार्टीत बसणे, गाडीत बसणे, कार्पेटवर चालणे इ. साठी ठिक. बस पकडायला पळणे, भाजीला थांबणे असेल तर घालू नये.
बस पकडायला पळणे, भाजीला
बस पकडायला पळणे, भाजीला थांबणे >>> डोळ्यापुढे आणून बघितलं दृष्य!
मुंबईच्या ट्रेनमधेही घालू
मुंबईच्या ट्रेनमधेही घालू नयेत. एखादीच्या पावलाचा बळी जातो.
मुंबईच्या ट्रेनमधेही घालू
मुंबईच्या ट्रेनमधेही घालू नयेत. एखादीच्या पावलाचा बळी जातो. <<<
अयाया कल्पनेनेही जीव कळवळला!!
मुंबईच्या ट्रेनमधेही घालू
मुंबईच्या ट्रेनमधेही घालू नयेत. एखादीच्या पावलाचा बळी जातो. >> आणि जेन्व्हा platform no. 1 पे आनेवाली ट्रेन आज platform no. 4 पे आयेगी अशी announcement होते तेव्हाही कुचकामी ठरतात.
अगदी अगदी..
अगदी अगदी..
(No subject)
मी असल्या सोलच्या चपला घेत
मी असल्या सोलच्या चपला घेत नाही. एकदा घेतल्या होत्या, तर खालचं प्लास्टिकच जामच टॉक टॉक करत होत्या. जिने उतरताना तर धरणी पोटात घेईल तर बरं पण हा आवाज नको असं होऊन जायचं. एकदा होस्टेलमध्ये राहात असताना एका रूमच्या दरवाजापाशी पाय घसरला, तर त्या प्लास्टिकमुळे पुढच्या दरवाजापर्यंत माझं बूड घसरत गेलं आणि चप्पल पायातून सटकून त्याच्याही पुढच्या दरवाजापर्यंत गेली. तेव्हापासून कानाला खडा लावून साध्या हार्ड प्लास्टिक(बहुधा पू म्हणतात त्याला)च्या चपला घेते.
http://t2.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcS-r11Z-8c4c1K5-UiiHVMmmEO1_6FUM...
अशा चपलांचाही एक धोका आताशा लक्षात आलाय. धावाधाव करताना असल्या चपलांचे हील्स आ ऊट ऑफ बॅलन्स होतात. दिसताना त्यात काहीच वेगळं दिसत नाही, पण चालताना सॉलीड जाणवतं. दोन चपलांचे असे बळी गेल्यावर आता मी पहिलीवहिली प्लॅटफॉर्म बेसची घेतलीय. उंची कमी असल्याने फ्लॅट शक्यतो घालतच नाही, आणि बॉटम्समध्येही एखादीच सलवार आहे माझ्याकडे. त्यामुळे वरती (बहुतेक) मनिमाऊ नं चुडीदारवर प्लॅटफॉर्म्स चांगल्या दिसत नाहीत म्हटल्यावर माझं बिनसलंय
चुडीदारवर प्लॅटफॉर्म्स
चुडीदारवर प्लॅटफॉर्म्स चांगल्या दिसत नाहीत म्हटल्यावर माझं बिनसलंय>>> अस काहि नाहि त्याहि छान दिसतात
फक्त थोड्या डिझायनर हव्यात
धावाधाव करताना फ्लोटर्स किंवा
धावाधाव करताना फ्लोटर्स किंवा वॉकिंग शूजच उत्तम.
साध्या सॅण्डल्सना कोणी फ्लोटर्सच्या सारखे सोल लावून दिले तर काय बहार येईल!!
मक, बिनसलंय काय... पायावर
मक, बिनसलंय काय... पायावर जरा नाजूक डिझाइन असेल तर छान दिसतं. मग सोल प्लॅटफॉर्मचा का असेना.
बादवे मी माझे ऑर्थोहिलचे फ्लोटर्स जीन्स, सलवार, चुडीदार सगळ्यावर घालून फिरायचे. सुरूवातीचे दीड वर्ष ते उत्तम दिसायचे. मग ते पसरत गेले. तरी तसेच दीड वर्ष वापरले. आता ते भीषण तर दिसतातच पण उपयोगाचेही नाहीयेत. दुर्दैव माझं की तसले सेम मला कुठे मिळत नाहीयेत.
हेवा वाटतोय...माझ्या पायाला
हेवा वाटतोय...माझ्या पायाला नंबर ३ च्या चप्पल चालतात , म्हण्जे पाय त्याहून लहान आहे पण चप्पल मिळत नाही. त्यामुळे नंबर ३ मधे जी मिळते त्यातल्या त्यात बरी ती घ्यावी लागते
Pages