खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का?
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!
फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!
Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दीपांजली, तुझीच वाट बघत होते.
दीपांजली, तुझीच वाट बघत होते. मला सांग टॅटुसाठी लोकल अॅनेस्थेशिया दिला तर काय होतं? तुझी कोणी क्लायंट्स असा हट्ट करत नाही का?
मेंदीसाठी अॅनेस्थेशिया? ऐ ते
मेंदीसाठी अॅनेस्थेशिया?
ऐ ते न च
मनिमाऊ, लो.अॅ. मुळे तो भाग
मनिमाऊ, लो.अॅ. मुळे तो भाग जरा सुजतो. त्यामुळे अॅ. उतरल्यावर डिझाइन पण जरा बिघडतं म्हणे. ही ऐकीव माहिती. मी त्या वाटेला कधी गेले नाहिये अन जाण्याची हिंमतही नाही. ब्लड टेस्ट साठी सुई लावली की मला चक्कर येते...त्यामुळे टॅटुवाल्या लोकांचं मला अतिशयच आश्चर्य वाटतं. जिममध्ये एकेकाचे टॅटु बघून घ्यावे, वा वा म्हणावे, झालंच तर दुखलं नाही का वगैरे विचारावे एवढाच माझा संबंध आजकाल पुण्यात जिममधल्या इंस्ट्रक्टर लोकांत दंडावर, पाठीवर (अजून कुठे ते मला माहीत नाही ) वगैरे टॅटु करण्याची जबरी प्रथा आहे. त्याशिवाय जणु काय ती नोकरीच मिळणार नाही.
अच्छा, ती फक्त मेंदी काढते
अच्छा, ती फक्त मेंदी काढते का? नाही मी एवढी नाजुक नाही.
नताशा, खरंच गं. बरोबर आहे
नताशा, खरंच गं. बरोबर आहे तुझं निरिक्षण.
पर्मनन्ट टॅटु नाही काढत मी .
पर्मनन्ट टॅटु नाही काढत मी :).
मनिमाऊ, शर्ट कुठे शिवून
मनिमाऊ, शर्ट कुठे शिवून घेतेस?
आणि सॅबीज, कोरेगाव पार्कातले का?
हो स्वाती सॅबीज कोरेगाव
हो स्वाती सॅबीज कोरेगाव पार्कमधले.
शर्ट्स वापरत नाही. मला फेमिनिन टॉप्स आवडतात. घेतलाच कधी तर रेडीमेड घेते. शिवुन चांगले मिळतच नाहीत. वस्ते टेलरला एक सॅम्पल शर्ट दिला तो त्याने चांगला शिवला होता. रामगीरने पण दोन चांगले शिवले म्हणुन परत दोन दिले तर त्यांची पुर्ण वाट लावली.
ओह. थॅंक्स. तू मागच्या पानावर
ओह. थॅंक्स. तू मागच्या पानावर शिवून घेण्याबद्दल लिहीलेस म्हणून विचारले.
चांगले टेलर सापडणे खरच अवघड गोष्ट आहे.
अरे वा. आज निघालेला धागा इतका
अरे वा. आज निघालेला धागा इतका धावतोय !
ते ब्राऊन बरोबरचे कॉम्बो छान दिसताहेत.
परमनंट टॅटूचा नंतर केव्हातरी प्रॉब्लेम होईल असे नाही का वाटत? ( काही देशात टॅटू असेल तर स्विमिंग पुल मधे जाऊ देत नाहीत. सहज दिसणार्या भागावर टॅटू असल्यास नोकरी मिळणे कठीण होते वगैरे गोष्टी ऐकल्या आहेत)
मनीमाऊ, पर्मनंट टॅटू म्हणजे
मनीमाऊ, पर्मनंट टॅटू म्हणजे धाडसी आहेस की!
वस्ते टेलर हा माझा लाडका आहे, अजूनतरी.
आजकाल कपडे इतके अंगाबेत शिवायची पद्धत आहे की अगदी एखाद्या किलो वजन वाढीनेही कपडा घट्ट होतो. लक्षुमी रस्त्याच्या मागे (आता नाव लक्षात नाही) पण स्वयंपाकघर नावाचे केटरर्स आहेत त्यांच्या शेजारी कोपर्यावर एक अत्यंत जुने दुकान आहे. तिथे फार सुंदर ड्रेस मटेरियल्स मिळाली होती एकदा. आजकाल एकदम पाचेक मटेरियल्स आवडून कोणते घेऊ आणि कोणते नको असे होणे ही दुर्मीळ गोष्ट वाटते. त्यावेळी तसे झाले मात्र होते. बाहेरून बघताना ते दुकान फारसे ग्रेट वाटत नाही पण कपडे मस्त असतात. मुंजाबाच्या बोळाशेजारी नुपुर नावाचे दुकान आहे. तिथे डिस्प्ले केलेले कपडेही छान असतात म्हणून एकदा तीन घेतले होते. त्यातला एक फारच कुजक्या कापडाचा लागला आहे. रंग सुंदर, एंब्रायोडरी मस्त पण कापड बघता बघता चुरुचुरू फाटत गेले. तिथे कपडे घ्यायला हरकत नाही पण जरा बघूनच.
इथे ब्राम्हिन च्या पर्सीस
इथे ब्राम्हिन च्या पर्सीस मस्त मिळतात. त्यांचा देशात पण डिलर आहे असे एकले.
एकाहून एक सुंदर अश्या पर्स मिळतात.
बाकी, ते लेगिंग च्या बाबतीत अनुमोदन. जाड्या (पायाच्या) मुलींनी ते घातलेले भयाण दिसते.
तसेच सिवलेस... जाडे हात असले की इतके भयाण वाटते ....
A-line कटचे ड्रेस सुद्धा.. फ्लॉवरर्पॉट एकदम
(मी सुद्धा बोलून घेतले... किती दिवस मनात ठेवायचे)
फ्लॉवरर्पॉट एकदम >> झंपे
फ्लॉवरर्पॉट एकदम
>> झंपे
मने पर्मनंट टॅटू काढणार आहेस? मला तर जाम भिती वाटते आणि आपली इच्छा असली तरी तो जात नाही म्हणे. काढलास आणि म्हातारी झालिस, नातवंडांनी विचारलं 'आज्जी हे काय आहे?' तर काय उत्तर देणारेस?
मुलिंनो, खालच्या आकृतीत
मुलिंनो, खालच्या आकृतीत दाखवलय तसं कुणि टोचलं आहे का? आपल्या एका माबोकरणीने तसं टोचलंय आणि तिथे मस्त खडे घातलेत, सुरेख दिसतं ते, तेव्हापासून करायचं डोक्यात आहे पण धाडस होत नाही.
शिवाय कान टोचण्याचे असंख्य प्रकार आहेत ते खालिलप्रमाणे हे मला गुगलल्यावर कळलं. आयमिन पाहिलं होतं, पण प्रत्येक ठिकाणी टोचल्यावर त्याचं नाव वेगळं वेगळं आहे हे कळलं.
अर्रे कान आहे की भोकाचा
अर्रे कान आहे की भोकाचा टोपला?
बापरे दक्षिणा! एवढ्या प्रकारे
बापरे दक्षिणा! एवढ्या प्रकारे कान टोचता येतो??
मी तर फक्त वरती एक टोचलं आहे!
बॅग्ज बद्दल कुणी लिहिणार
बॅग्ज बद्दल कुणी लिहिणार का?
पूर्वी आपल्या आया , मावश्या माम्या सरसकट वापरत त्या शोल्डर बॅग्ज ऑउट्डेटेड झाल्यात म्हणे
माझ्या कडे एक tote, एक clutch आणि एक शोल्डर बॅग आहे. अजुन काय असायला हवे?
कुणीतरी सविस्तर लिहा बरे.
मला फॉर्मल वन पिस ड्रेसेस
मला फॉर्मल वन पिस ड्रेसेस असतात ते खुप आवडतात. पण ते गुडघ्यापर्यंतच असतात. त्यामुळे घालायला नको वाटतात. त्या खाली जर काळ्या रंगाची लेगिंग्ज घातली तर ते चांगले दिसेल का?
पेरु काळ्या रंगाची लेगिंग्ज
पेरु
काळ्या रंगाची लेगिंग्ज नाही चांगली दिसणार मला वाटते. स्टॉकिंग्स चा विचार करु शकतेस..
पेरु, माधवी इज राइट.
पेरु, माधवी इज राइट. स्टॉकिंग्ज छान वाट्तील.
भारतात छान वन पीस मिळ्तायेत सध्या. या भारतवारीत भारतातुन काही सुरेख वन पीस आणलेत- गुढघ्याच्या किंचित खाली लांबी असणारे. कुणी येणारे असतील तर मागवुन बघ.
व्वा! खूप छान चाललीये चर्चा!
व्वा! खूप छान चाललीये चर्चा! वाचायला मजा येतेय!
ज्ञानात भर!
मला पण कुणीतरी मदत करा. माझी
मला पण कुणीतरी मदत करा.
माझी उंची फारच कमी म्हणजे ५ फुट आहे आणि एकदम बारीक आहे मी.
त्यामुळे वेस्टर्न फॉर्मल/ जीन्स घातले की एकदम लहान दिसते. कॉलेज मध्ये जाणारी वाटते.
त्यातून जानेवारी मध्ये सेमिनार आहे. कोणते कपडे घालू ???
plz help...
थ्री पीस मध्ये बारिक चणीच्या
थ्री पीस मध्ये बारिक चणीच्या मुली भारदस्त वाटतात. थ्री पीस ट्राऊजर्स किंवा स्कर्ट्स - काहीही छान दिसते पण माझी पसंती स्कर्ट्स ला. वन पीस ड्रेस आणि वरुन ब्लेझर असेही खूप छान दिसते.
इथे इमेज कशा टाकायच्या ? मला येत नाहीये.
कांचन ए लाईनचे फॉर्मल
कांचन ए लाईनचे फॉर्मल स्कर्ट्स घाल, त्यात मांड्या वगैरे बारिक दिसणार नाहीत. शिवाय वरून ब्लेझर सारखी पातळ कपड्याची जॅकेट्स मिळतात फॉर्मल ती घालून पहा.
मला काही फार ज्ञान नाही.. तरी वाटलं ते सुचवलं.
थ्री पीस ट्राऊजर्स आणि ए
थ्री पीस ट्राऊजर्स आणि ए लाईनचे फॉर्मल स्कर्ट्स छान वाटत आहे.
हे कसं वाटतंय? ही मॉडेल पण
हे कसं वाटतंय? ही मॉडेल पण बरीच बारिक आहे.
मला गुगल करायचा कंटाळा आलाय
मला गुगल करायचा कंटाळा आलाय आणि वेळही नाहीये.
ऑफिस फॉर्मल ड्रेस, सेमिनार वुमेन्सवेअर असं गुगल. बरीच आयडिया येईल.
प्रिंसेस इथे मजकूर लिहितो ना?
प्रिंसेस इथे मजकूर लिहितो ना? त्याच्या खाल्ली छोट्या अक्षरात मजकूरात इमेज किंवा लिन्क द्या असं लिहिलंय तिथे इमेज वर क्लिक कर... मग पुधे एक खिडकी उघडेल त्यात अपलोड वर क्लिक करून इथे इमेज टाकू शकतेस. साईज मोठा असेल तर इमेज लोड नाही होत कधीकधी.
त्यामुळे वेस्टर्न फॉर्मल/
त्यामुळे वेस्टर्न फॉर्मल/ जीन्स घातले की एकदम लहान दिसते. कॉलेज मध्ये जाणारी वाटते. >>> हायला, हा प्रॉब्लेम कसा असु शकतो. कांचन चांगलं आहे की.
दक्षे, तसं कानाच्या आत पिअर्स करायची गरज नाही. भयानक भीती वाटेल असं काही करायला. माझी जाऊ स्ट्ड किंवा मेटलची टिकली मिळते ती लावुन टाकते. छान दिसतं. कळतही नाही कि टिकली आहे. तिला कित्येक जण विचारतात कि कशी हिंमत केलीस. दुखलं का?
हा धागा मला सगळ्यात जास्त आवडला आहे.
मला जरा नेलपेंटविषयी ज्ञान
मला जरा नेलपेंटविषयी ज्ञान द्या. मी नेहमी फक्त ब्राऊन आणि ब्राऊन फॅमिलीतलेच रंग वापरते.. किंवा त्वचेशी मिळताजुळता.. मुली हिरवं पिवळं लावतात. अगदी ते नाही पण इतर कोणते रंग चांगले दिसतील? माझा रंग गव्हाळ आहे.
२री गोष्ट नखं लांब आणि आकारात कापली असतील तर फ्रेंच मेनिक्यूअर छान दिसतं. पण ते पुण्यात कोणत्या पार्लर मध्ये चांगलं करून मिळतं? मी १-२ ठिकाणी करून पाहिलं पण त्यांनी बिघडवलं. पैसे करकचून घेतले होते.
आणि लहान नखं असतील तर त्यावर कोणते रंग चांगले दिसतील?
Pages