फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!

Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28

खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अ‍ॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्‍याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का? Wink
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच लेकी साठी एका लग्ना साठी ड्रेस घ्यायला गेले तर आज काल लेगिंग्ज मध्ये किती अनंत प्रकार आहेत ते दिसले. शीमर म्हणुन एक झकास प्रकार घेतला. त्या मुळे कुडत्याला एक वेगळाच उठाव आला.

legings.jpg

लेगिंग्ज (Leggings) हे बरोबर आहे.

कोर्डरॉय च्या पण लेगिंग्ज छान वाटतात. कुडतीला वेगळाच गेटअप येतो.
ब्लॅक आणि ऑफ व्हाईट कलरच्या माझ्याकडे आहेत.

लेगिंग्ज.

मोठ्या वयाच्या बायकांना नाही दिसत चांगले हे शिमर लेगिंग्ज असे माझे मत. एखादी कॅरी करू शकत असेल, पण सरसकट नाही दिसत चांगले. नथिंग पर्सनल. (घालायचेच असेल, तर टॉपची लांबी किमान गुडघ्यापर्यंत असावी आणि स्लिट पार कंबरेपर्यंत गेलेली नसावी.)
तसेच 'धोती' सलवारचीही फॅशन आली आहे. तेही कॉलेज मधल्या वयाच्या मुलींपर्यंतच चांगले दिसते.

घालायचेच असेल, तर टॉपची लांबी किमान गुडघ्यापर्यंत असावी आणि स्लिट पार कंबरेपर्यंत गेलेली नसावी.)
+१०० तुला पौतै!

कॉड्रॉयच्या आहेत त्यांना जेगिंग्ज म्हणतात.
त्यांची शिलाई जीन्सप्रमाणे दोन्ही बाजूला शिवण वगैरे अशी असते.

कॉड्रॉयच्या आहेत त्यांना जेगिंग्ज म्हणतात.
त्यांची शिलाई जीन्सप्रमाणे दोन्ही बाजूला शिवण वगैरे अशी असते
>> ओह्ह, तेच मला विचारायचे होते. धन्यवाद नीधप.

मलाही घ्यायच्यात कॉर्ड्रॉयच्या जेगिंग्ज. सध्याच्या प्लेन स्काय ब्लू आहेत. एकदा जेगिंग्ज वापरायला सुरुवात केल्यावर रेग्युलर जीन्स घालायला नको वाटतं. लेगिंग्ज कलकत्त्याच्या उन्हाळ्यात नको वाटतात, पण एरवी फार मस्त. Happy

लेगिंग्ज हा मोस्ट कंफर्टेबल पण बर्‍याच वेळा मोस्ट अग्ली प्रकार आहे. लेगिंग्ज घातले म्हणजे कुर्ता वाटेल तसा असावा, उडावा, घालावा, सांभाळावा असं वाटतं बायकांना. तुमचे पाय लाँग आणि स्लीम नसतील तर कुर्ता गुडघ्याच्या खालीच असायला हवा. थंडर थायीज आणि शॉर्ट कुर्ता हे फार भयानक कॉम्बीनेशन आहे. ऑफ व्हाइट/ब्राउन्/स्कीन कलर लेगींग घालताना तर विशेषच काळजी घ्यावी. हे इतकं भयाण आणि बघणार्‍याला लाजिरवाणं असतं. स्लीम मुलींनी शॉर्ट कुर्ता घातला तर छान दिसतो. पण काही बायका/मुलींच्या बाबतीत पाय इतके बारीक असतात कि पतियाला (सलवार) घालणंच जास्त छान दिसतं. त्यांना लेगिंग अजिबात सुट करत नाही.

छान व्यवस्थित कुर्ता घातला तर लेगिंग्ज हा सगळ्यात सोपा, सोयीस्कर, आरामशीर बॉटम वेअर आहे.

हुश्श ! पण हे एकदा बोलायचंच होतं. रस्त्यावर ज्या प्रकारे लेगिंग्ज घालुन कुर्ते उडवत फिरत असतात, इतकं शॅबी वाटतं ते.

स्लिट पार कंबरेपर्यंत गेलेली नसावी. >>> मानुषी, जर कुर्ता छान पॅटर्नचा असेल तर थोडीशी अगदी किंचीतशी कंबर दाखवणारी स्लीट आवडते मला. अर्थात फिगर, सवय आणि कुर्ताची फॅशन या सगळ्या गोष्टी एकत्रित असायला हव्यात. डीप स्लीटचे कुर्ते घालायचे असतील तर नाडा बांधाव्या लागणार्‍या शलवारपेक्षा लेगिंग्ज छान दिसतात, कारण कमरेजवळ ती छान फिट बसलेली असते.

मस्त धागा. माझेही असेच होते. एखादी नवी फॅशन येऊन मी ती वस्तू घ्याअचा धीर गोळा करेपर्यंत फॅशन ३-४ वर्षे जुनी होते.
यामुळे मी रेट्रो लुकची फॅशन करतेय असा लोकांचा गैरसमज होतो. Happy

लेगिंग्ज घालायला पाय बरेच शेपमध्ये हवेत. नाहीतर पोत्यात कोंबल्यासारखे दिसते.

जेगिंग्ज मी आतापर्यंत दोन ट्राय केल्या पण अगदीच बकवास कॉलोटिच्या मध्ये उसवणार्या मिळाल्या.

सध्या पुरषांच्या कपड्यांत लिनेनची चलती आहे. लिनेन चे शर्ट एकदम रॉयल दिसतात. मी मागच्या आठवड्यात घरातल्या तमाम पुरूषाम्साठी लिनेन घेतलं. ज्येष्ठ नागरिकांनी काय हे खादी ग्रामोद्योग म्हणून संभावना केली. Happy

पण ती कापडं इतकी अ‍ॅट्रॅक्टिव आहेत की मीच तसली आणून कुर्तीज शिवून घेणार आहे.

साती - रेट्रो फॅशनबद्दल अगदी अगदी Proud

मी वेस्ट साईडची जेगिंग्ज वापरते. अतिशय उत्तम क्वालिटी मिळाली आहे आत्तापर्यंत.

मनिमाऊ, लेगिंग्ज काय कुठलेही कपडे जर तारतम्याने नाही वापरले तर गबाळे आणि वाईटच दिसतात गं!

लिनेन मस्तच! नुकतीच एक लिनेन कुर्ती घेतली.

लेगिंग्ज यायच्या अगोदर होजियरी स्लॅक्स हा प्रकारही प्रचलित होता, जो मला जास्त कम्फर्टेबल वाटतो.

नंदे Lol

लेगिंग्ज >>> सध्याचा माझा सगळ्यात फेवरेट प्रकार अगदी जीन्सलाही त्याने मागे टाकले आहे Happy

वरदा, हो नक्कीच. पण लेगिंग्जचा इतका बावळट वापर करतात ना बायका कि मला चीडच येते. माझ्या ऑफिसच्या रोडवर एक लेगिंग घातलेली मुलगी पाठीला बॅकपॅक लावुन चालत होती. कुर्ता बॅकपॅकबरोबर उलटा फोल्ड झालेला. मला गाडी थांबवुन सांगावं लागलं कि मुली प्लीज बघणार्‍यांवर दया कर आणि रोज एकदा आरशात बघत जा घरातुन निघताना. Angry

दुसरी एक टीप ( कदाचित आगावु ) - पांढर्‍या बॉटम वेअरला पांढरं फुटवेअर आणि बेज कलरला बेज कलर फुटवेअर घातलं तर चांगलं वाटतं. बेजवर पांढरं नाही. आणि पांढर्‍या शलवारवर काळं प्लीजच नाही. Happy

सिल्वर एम्ब्रॉयडरी किंवा टिकली वर्क असेल तर गोल्डन ज्वेलरी अगदीच बरी नाही दिसत. एखाद्या वेळेस मंगळसुत्र काढलेलं नाही चालणार का? ( हा मात्र वैयक्तिक मुद्दा आहे. पण आपण आता फॅशनबद्दल बोलतो आहे.:))

फॅबमधे लेगिंग्ज मिळतात? मी फक्त चुडीदार पाहिलेत. जेगिंग्ज नाही गं मिळणार तिथे, माधवी.

पांढर्‍या शलवारवर काळं प्लीजच नाही. >>> का बरं नाही?? मी काळ्याव्यतिरीक्त दुसर्‍या कुठल्या रंगाचे सँडल घेतच नाही. आणि माझ्याकडे तीन पांढर्‍या रंगाच्या सलवारी/लेगिंग्ज आहेत.

मंजू +१

कुठल्याही समारंभाला जाताना एक महत्वाचा प्रश्न भेडसावतो .... बॅग!

लेक लहान असल्यामुळे त्याच्या थोड्याफार वस्तु असतात , त्यामुळे क्लच निकामी
कुठला रंग आणी पोत बर्याच्श्या पेहरावावर जाउ शकेल ?

बर्याच पर्सेस घरात पडल्या आहेत पण प्रत्येकवेळी वाटत ही एकही मॅचिंग नाही Sad

इथे फॅब फॅन्स आहेत का? मी अगदी अ‍ॅन्टी फॅब आहे. फॅन्सचा फीडबॅक काय आहे? का आवडतं? कपडे कितपत टिकतात?

Pages

Back to top