मराठी म्हणी

Submitted by माणूस on 14 January, 2009 - 19:44

म्हणी साठीचे पान...

हमारे लिये काला अक्षर भैस बराबर है, इसलीय हमारे काले अक्षर मे चुका रहीगे तो कानपर्दा कर लो

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज उशिर झालाय, उद्या टाकते आता. Happy

ओळखीचा चोर जीवे मारी.
चोराच्या मनात चांदणं.
वरातीमागुन घोडे.
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.
आईजीच्या जीवावर बाईजी उदार.

शुभ बोल नार्‍या, तर म्हणे मांडवाला लागली आग.

srk - ओळखीचा चोर जिवे न सोडी असतं ना?

चौथीच्या आणि सातवीच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकात वाचून बर्‍याच म्हणी पाठ केल्या होत्या -
आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी
खाई त्याला खवखवे
खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी
साधलं तर सूत, नाहीतर भूत
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न
संन्याश्याच्या लग्नाला शेंडीपासून तयारी
बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर
पालथ्या घड्यावर पाणी
नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे
पूर्ण यादीच करायची म्हटलं, तर अजून पन्नास एक आठवतील अशा. पण या रोजच्या बोलीभाषेत वापरलेल्या ऐकायची फारशी संधी मिळाली नाही. ( आईकडून 'साधलं तर सूत ...' किंवा 'पालथ्या घड्यावर' भरपूर ऐकलं आहे म्हणा - आम्ही तिला या म्हणी वापरण्याची भरपूर संधी दिली लहानपणी ;))
आजीचा जन्म सासवडचा, शिक्षण पुण्यातलं. तिची भाषा खूप चित्रमय होती आजच्या बोलीभाषेच्या मानाने. तर काही खास आजीकडून ऐकलेल्या म्हणी:

हेंदरं ते हेंदरं आणि गावंदरीला चरायला चाललंय!
अपापाचा माल गपापा
कणकेचे कुxx चिकटवून चिकटत नाहीत

आणि आईच्या मैत्रिणीकडूनः
तरणी पडली धरणी आणि म्हातारी झाली हरणी

- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/

तरणी पडली धरणी आणि म्हातारी झाली हरणी

तरण्यांचे झाले कोळसे अन म्हातार्‍याला आले बाळसे !! Proud

ज्ञान सांगे लोका, शेंबूड आपल्या नाका
श्रीमंताच्या घरचा कुत्रा, त्याला म्हणा 'अहो हाडा'
सासू न सासरा जांच करे तिसरा.
साप म्हणु नये धाकला, नवरा म्हणु नये आपला
साता समुद्राकडे राजाने लावला भात, एक एक शीत नऊ नऊ हात.
साडी नेली बायनं नि चिंधी नेली गायनं
सतरा कारभारी ऐक नाही दरबारी
सख्ख्या सासूला दिली लाथ, चुलत सासूचा कापला कान, तिथे मामे-सासू मागते मान
वेश असे बावळा परी अंतरी नाना कळा
वेळना वखत आऩ गाढव चाललय भुकत
विहीणाचा पापड वाकडा
लेकीची लेकरं उडती पाखरं, लेकाची लेकरं चिकट भोकरं.

>>म्हणा 'अहो हाडा'
>>गाढव चाललय भुकत
Rofl
दक्षे नादखुळा Lol

वरून कीर्तन आतून तमाशा

मी नाही त्यातली न
कडी लावा आतली

मुश पाहून मुशारा
घोडा पाहून खरारा

आधीच मर्कट
तश्यात मद्य प्याला

लोका सांगे ब्रह्मज्ञान
स्वत: मात्र कोरडे पाषाण

लेकी बोले, सुने लागे

रंग झाला फिका आन कोणी देईना मुका.. (:हाहा:)
रोज घाली शिव्या आणि एकदशीला गाई ओव्या
मी बाई संतीण, माझ्या मागे दोन तीन...
भुरक्यावाचून जेवण नाही आणि मुरक्यावाचून बाई नाही
बाईचा तो हट्ट, पुरुषाची मात्र जिद्द.
फुकट घालाल जेवू तर सारेजन येवू, काही लागेल देणं तर नाही बा येणं.
नागोबा म्हसोबा पैशाला दोन, पंचमी झाल्यावर पुजतयं कोण?

दक्षिणा- म्हणी बेष्ट. काय कलेक्शन आहे. वा !!

दक्षिणा, भन्नाट साठा आहे Happy

    ***
    लख्ख लाखेरी देहाच्या निळ्या रेषा मापू नये
    खुळ्या, नुस्त्या डोळ्यांनी रान झेलू जाऊ नये (महानोर)

    उंदीर गेला लुटी, आन आणल्या दोन मुठी.
    आलथा पसा, पालथा पसा, माकडा तुझा संसार कसा?
    उधार्-पाधार, वाण्याचा आधार
    काडीचोर तो माडीचोर
    एकाची जळते दाढी, त्यावर पेटवा बिडी
    एकाच माळेचे मणी आणि ओवायला नाही कुणी
    काम नाही घरी, तांदूळ सांडून भरी
    काम नाही धाम आणि उघड्या अंगाला घाम
    खायला मस्त, कामाला सुस्त
    गावात नाही झाड आन म्हणे एरंडाला आला पाड
    घरची करती देवा देवा, शेजारणीला चोळी शिवा
    माझं मला झालं थोडं, त्यात व्याह्यानं धाडलं घोडं, ते पण लंगडं.

    कामाचा न धामाचा भाकरी खातो नेमाचा.
    --------------
    नंदिनी
    --------------

    काही मालवणी म्हणी -

    अकला नाचता म्हणान चकला नाचता
    झगामगा झगामगा नी माझ्याकडे बघा
    भुरावली भामीण (देवदासी), देवळात XXली
    आऊस (आई) बघता पोटयाकडे नी बायल बघता मोटल्याकडे
    (आई मुलाच्या पोटाचा विचार करते, तर बायको त्याने काय कमवल त्याचा विचार करते)
    खायला आधी, झोपायला मधी (मध्ये) आणि कामाक अधीमधी (अधून मधून)
    रुपयान गोण पण खातलो कोण (पिकते तिथे विकत नाही, स्वस्त असले तरी)
    तुझोच रेडो गाभण (तेरीच मुर्गीकी एक टांग)

    इतर -
    एकादशी नी पोटभर/दुप्पट खाशी

    'कश्यात काय आणी फाटक्यात पाय'.
    'भिकेत कावळा हागला'.
    'पाप्याच पितर आणी वर आला गवर्(गोवर).'
    'भुरि(गोरि) आणी दहा गुण चोरी.'

    बारा लुगडी अन सदा उघडी.
    काम नाही काडीचं आणि फुरसत नाही घडीची.
    बाजारात नाही तुरी अन भट भटणीला मारी.
    एक गोरी शंभर गुण चोरी

    ए रुनी,

    नऊवारी साडीची म्हण आहे ना तशी हिंदी भाषिकांमध्येपण आहे. थोडा हिणवणूकीचा वास आहे ह्याला Sad -

    "नौ गज लंबी, फिर भी पैरोंमें नंगी" - नऊवार साडी घातल्यावर फक्त अदबशीर चाललं तरच पाय झाकले रहातात नाही तर उघडेच पडतात.

    जाजु
    हिंदीतपण अशी कहावत आहे हे माहित नव्हते.

    उन्हाळ्याच्या सुट्ट्यात "करमत नाही" अशी तक्रार केली की आजी म्हणायची "कारे पाव्हण्या कुथतोस? तर म्हणे बसल्या बुडा करमेना". तीच्या म्हणींचा स्वतंत्र कोश तयार होऊ शकतो. मला वाटतं त्यातल्या निम्म्याहून जास्त स्वरचित म्हणी असाव्यात. Happy

    आणि माणसा, तुला हवे असलेले विंग्रेजी म्हणी आणि वाक्प्रचार -
    All the sizzle but no steak - नुसत्या जटा आत बुवाच नाही
    Needle in the hay stock - गवतात सुई शोधणे

    सदाला चोळी नी वर्‍हाडाला पोतेरी (इथे "सदा" हे नाव नसून "नेहमी" ह्या अर्थाने वापरलं आहे)
    उश्याच केलं पायतर तरी बुड मध्येच (पायतर म्हणजे बिछान्याचा पायाकडील भाग)
    मेलेली कोंबडी आगीला भीत नाही

    लंकेत सोन्याच्या वीटा
    शेळी जाते जिवानीशी खाणारा म्हणतो वातड कशी
    नमनाला घडाभर तेल
    वड्याच तेल वांग्यावर
    ज्याच कराव भलं तो म्हणतो माझच खर
    भुकेला कोंडा निजेला धोंडा
    कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्याम भटाची तट्टाणी
    नाचता येइना अंगण वाकडे
    आपला तो बाळ्या दुसर्‍याच कार्ट
    एकादशीच्या घरी शिवरात्र
    दुष्काळात तेरावा महीना
    कोंबडीपेक्षा मसाला महाग

    ही माझ्या आजीची खास म्हण-
    "खायची बोम्ब आणि हगायचा तरफडा"

    आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
    आमचं झालं थोडं , व्याह्यानं धाडलं घोडं
    ती नाही घरी नी गमजा करी

    सगळ्यांच्या म्हणी मस्त आहेत एकदम Rofl

    अती राग भीक माग.
    अप्पा, नुसत्या मारी गप्पा.
    जिच्या घरी ताक, तिचे वरती नाक.
    डाग झाला जुना, मला पतिव्रता म्हणा.
    तरण्या झाल्या बरण्या, आणि म्हातार्‍या झाल्या हरण्या.
    थोडक्यात नटावे आन प्रेमाने भेटावे.
    जशी दक्षिणा तशी प्रदक्षिणा... Proud
    घेणं न देणं फुक्कटचा खंदिल लावणं.
    नाकावर पदर, वेशीवर नजर
    बाईल वेडी, लेक पिसा, जावई मिळाला तो ही तसा.

    नाकावर पदर, नजर वेशीवर
    बाईल वेडी, लेक पिसा, जावई मिळाला तो ही तसा <<<
    Lol

    दक्षिणे, तुझा म्हणींचा संग्रह जबरी आहे.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    There is no charge for awesomeness.... or attractiveness.

    Pages