"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.
निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf
तुम्हा सर्वांनी मल्हारचे
तुम्हा सर्वांनी मल्हारचे केलेले कौतुक त्याला सांगितले. खुष आहे. त्याचे स्वतःचे किस्सेहे भन्नाट आहेत.
ईयत्ता नववीत असताना १४.०६.२००९ ला मुम्बईत पहीला मोठा पाउस झाला. गटारातून एक साप अर्धवट बाहेर आलेला होता. शाळेतून येताना दुपारी एकच्या सुमरास मल्हारने पाहिले. घरी येउन "साप" हे पुस्तक refer केले. ४.३० च्या सुमारास खाली जाउन टि.व्ही.वर दाखवतात तसाच साप पकडला. एका मुलाच्या मदतीने प्लास्टिक पिशवीत भरला आणि घरी आणला. घरी फक्त आजी होती. आजीला शंका आली पण याने दाद दिली नाही. बादलीत पिशवी, त्यावर पाट ठेवला. आम्ही दोघेही घरी नाही. मी ७.१५ ला आले, बाबा ८.३० नंतर. मल्हार म्हणाला, "मी पुस्तक नीट refer केले आहे. हा पाणसाप आहे... दिवड. आपण याला नॅशनल पार्कच्या जंगलात सोडू या." रात्री ९ वाजता हे शक्य नव्हते. सर्पमित्रांचा शोध सुरु झाला. मल्हारकडे ८ वेग-वेगळे फोन नंबर होते. विरार, कल्याण, दहीसर, दादर ... वेग-वेगळ्या भागातील. पुन्हा प्रश्न... "तुझ्याकडे हे नंबर कसे आले?" "वर्तमानपत्रात आले होते. मी लिहून ठेवले." श्री. भरत जोशी यांचा नंबर लागला. ते म्हणाले, "जसा मिळाला तसा सोडून द्या. तुमच्याच परीसरात रहाणारा असेल. Rescue ची गरज नाही. मल्हार मोठा झाला की (कमीत कमी २१ वर्षे) मी त्याला साप पकडायला शिकवेन."
दुसरयादिवशी पहाटे ५.३० ला बाबा आणि मल्हारने बादली खाली नेली. आडवी करताच ३.५० फूटी साप सळसळत कुंपणापलिकडे गेला. सोसायटीतल्या लोकांनी पाहीला असता मारला असता म्हणून मल्हारची तळमळ. रात्र कशी काढली मला माहीत.
कालच्या धामणचे फोटो काढून आल्यावर मला म्हणाला, "ही बरयाच वेळा दिसली आहे. Flower-bed मधेच फिरते. एकदा पाठ्लाग केला होता. बदामाच्या झाडापर्यंत गेली होती. तुझी काळजी वाटते नाहीतर धरली असती."............. त्याच्या आवडी जपण्यासाठी आणलेली पुस्तके व्याप तर होणार नाहीत ना?
मधु-मकरंद, मल्हारचे किस्से
मधु-मकरंद, मल्हारचे किस्से भन्नाट आहेत.. तुम्हाला काळजी वाटणं सहाजीक आहे.. पण लेक गुणाचा आहे हो
पण लेक गुणाचा आहे हो>>>>+१
पण लेक गुणाचा आहे हो>>>>+१
वा, मल्हारचे पराक्रम भारीच
वा, मल्हारचे पराक्रम भारीच आहेत, निग चा भावी मेम्बर. मोठेपणी नक्कीच सर्प मित्र होईल. तोपर्यंत साप शिल्लक राहोत. सध्याचा जमिनी नाहिश्या होउन इमारती होण्याचा स्पिड पहाता काही सांगता येत नाही. आणि उरलेली जमीन सिमेंट, डांबर किंवा ब्लॉक्सनी झाकून टाकतात.
चि: मल्हारला, वाचण्यासाठी
चि: मल्हारला, वाचण्यासाठी आणखी पुस्तके आहेत. खास करुन प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे. साप पकडताना / पकडल्यावर काय काळजी घ्यायची, ते सचित्र दिलेले आहे. अगदी छोट्या छोट्या बाबी आहेत, उदा. साप हाताळताना मोबाईलवर बोलू नये.. अशा.
०००००००००००
आमच्याकडच्या निसर्गात अनेक बदल झालेत. बदामाच्या झाडांना नवीन पालवी आलीय.
आंबे बाजारात आलेत पण काजूला नुकतीच फुले येताहेत.
शिरिषाच्या पानांचा रंग आपल्यापेक्षा थोडा फिका आहे, पण फुले तशीच आणि भरभरून फुलली आहेत झाडे.
कडुनिंबाला पण बहर आलाय.
गोरखचिंचेला पण पाने फुटली आहेत. फुलांची वाट बघतोय.
मी भारतातून येताना, पिरॅमिड कंपनीच्या बिया आणल्या होत्या. कोथिंबीरीच्या बिया म्हणजे आपण जेवणात
वापरतो तसे धणे नव्हते तर ते सोललेले होते, शिवाय गुलाबी रंगाचे. ( मागे नलिनीने लिहिले होते, धणे पेरताना ते चपलेने / सँडलने रगडून पेरतात ) त्याची उगवण छान आहे. उगवायला उशीर लागला पण सर्व बिया उगवल्या.
इथे कोथिंबीर मिळत नाही, फक्त पार्सले मिळते. त्यामूळे घरची कोथिंबीर फार अप्रूपाची आहे. पण काय करू,
तोडायचा धीरच होत नाही !
(कालपासुन माबोवर येण जमलं
(कालपासुन माबोवर येण जमलं नाही, उशीराबद्दल दिलगीर आहे.)
दिनेशदा
मुख्य मांडव हा आधीच तयार केला जातो वाढल्यानंतर मग जे बागेत (आधारासाठी) दगड उभे केलेले असतात,त्याला असलेल्या लोखंडी ऐंगलच्या दोन्ही बाजुला २ किंवा ३ तारांचा आधार दिला जातो यामुळे द्राक्ष घडांचा बोजा या तारांवर पेलला जातो, या ऐंगल लावण्याच्या २-३ पद्धती आहेत जसे इंग्रजी 'वाय', 'व्ही', ज्यावेळी बागेत १२-१५ टन माल असतो त्यावेळी बाग जमीनीवर कोसळण्याचा धोका या भक्कम मांडवामुळे कमी होतो.
द्राक्षा पेक्षा 'मणी' हाच शब्द शेतकर्यांच्यात जास्त रुढ आहे
साधना,
हे द्राक्षाय्चे मणी येण्यापुर्वीचे फुलोरे आहेत्,याला फ्लावरींग स्टेज म्हणतात,द्राक्षबागायतदारांसाठी या काळात पाऊस हा खुप धोकादायक असतो
मी भारतातल्या फारच कमी
मी भारतातल्या फारच कमी द्राक्षांच्या बागा बघितल्यात आणि त्यासुद्धा लांबूनच.
परदेशी मात्र बघितल्यात.
आपल्याकडे द्राक्षं, देशावरच फार. कोकणात लागवड नाहीच. पण ओमान, नायजेरिया आणि न्यू झीलंडमधेही मी समुद्रालगतच्या प्रदेशात द्राक्षाचे मळे / वेली बघितल्या आहेत.
आपल्याकडचीच द्राक्षे मला जास्त गोड लागली, साखरेचे प्रमाण जास्त असते, आणि गरही जरा घट्ट असतो.
आणखी एक खास म्हणजे, आपल्याकडे पानांचा वापर खाद्यपदार्थात करत नाहीत. भूमध्य समुद्राच्या आसपास, थेट खाण्यासाठी नसला तर डोलमा या पदार्थात, कव्हर म्हणून पाने वापरतात. ती फ्रोझन किंवा बाटलीतही मिळतात.
आजच्या लोकप्रभामधे केनया आणि
आजच्या लोकप्रभामधे केनया आणि न्यू गिनी देशांतील, फुलपाखरांच्या शेतीबद्दल अनोखी माहिती आहे.
( इये भारतनामक देशी मात्र त्यांस कायद्याने बंदी आहे )
पण घरातील लहान मूलांना, पावसाळ्यात किंवा ज्यावेळी झाडावर सुरवंट / अळ्या दिसतील त्यावर प्रयोग करता येईल.
एक मोठ्या तोंडाची बाटली घेऊन त्यावर कापडाचा दादरा बांधून तयार ठेवायची. झाडावरचा सुरवंट / अळी
छोट्या फांदीसकट त्यात तिरपा ठेवायचा. बाटलीत, पाण्याने भिजवलेला कापसाचा बोळा ठेवायचा, म्हणजे
ओलावा राहतो.
ती अळी भराभरा पाने खाते, म्हणून ज्या झाडावर सापडली, त्या झाडाच्या पानासकट फांद्या, त्या बाटलीत ठेवायच्या आणि जून्या काढून टाकायच्या. एकदोनदा कात टाकून, ती अळी कोष करते, मग त्यातून पाखरू
बाहेर पडते.
जर इन्फेक्शन झाले नाही, तर हा प्रयोग नक्कीच यशस्वी होतो. मी अनेकवेळा केलाय. ( लहानपणी )
सुप्रभात.
सुप्रभात.
'आभाळानं उघडला सोनियाचा डोळा,
'आभाळानं उघडला सोनियाचा डोळा, निळ्या निळ्या अंगणात सूर्यदेव आला...'
.... आणि रात्रभर काळवंडलेली माझी स्वयंपाकघराची खिडकी हिरव्या सोनेरी चैतन्याने भरुन जाते. अन्नब्रह्माची उपासना करताना माझे हात काम करत असतात, पण नजर मात्र हिरवाईकडे लागलेली असते. खिडकीचा अर्धाअधिक भाग व्यापणारे पेल्टोफोरम किंवा सोनमोहर जोडीने सतत खिडकीसमोर चवर्या ढाळत असतात. सुखद शीतल झुळुक आत येत एक्झॉस्ट फॅन लावण्याच्या विचारावर चक्क फुली मारत असते. वसंतस्पर्शाने दोघंही नाजूक पिवळ्या फुलांचा सोनेरी मुकुट परिधान करुन बसतात. वारा जरा मोकाट सुटला की लगेच फुलं धावत खाली उतरुन अंगणात पायघड्या अंथरतात. खट्याळपणे काही फुलं आत येऊन माझ्या अंगावर पुष्पवृष्टी करत आपल्याकडे लक्ष वेधून घेतात. फुलांची हौस भागली की दोघंही तपकिरी रावळगाव टॉफीज मिरवत राहतात. 'शिशिर नेतो हिरवी पाने' अणि मग मात्र दोघेही उघडेबोडके होतात. 'कोण होतास तू काय झालास तू' असं माझं मन आक्रंदत राहतं.
....सुचित्रा साठे - 'हिरव्या खिडक्या' - वास्तुरंग, लोकसत्ता, पुणे २७ ऑक्टो. २०१२.
वा ! आज्जे फोटो छान! शशांकजी,
वा ! आज्जे फोटो छान!
शशांकजी, सुंदर उतारा आहे.
मधुरा मल्हारला घेउन माझ्याकडे
मधुरा मल्हारला घेउन माझ्याकडे ये. आमच्याकडे वरचेवर साप दिसतच असतात.
अनिल द्राक्षाचा मळा पहायची मला लहानपणापासून इच्छा आहे. पण जेव्हा जेव्हा मी नाशिकला गेले आहे तेव्हा फक्त तिथे वेलीच होत्या.
शशांकजी, सुंदर उतारा आहे.>>+१
शशांकजी, सुंदर उतारा आहे.>>+१
दिनेशदा, पुस्तकाच्या शोधात
दिनेशदा, पुस्तकाच्या शोधात आहे.
मागच्या पानावर तुम्ही शेव-गाठी खायला कावळे आणि साळुंख्या येतात, कबुतरे येत नाहीत असे लिहिले आहे. माझ्या घराजवळ एक गुजराथी टेलर आहे. सकाळी ७.३० वाजता दुकान उघडले कि शेव-गाठी घालतो. फक्त कावळेच खात असतात. इतक्या नरम शेव-गाठी पण काही कावळे माझ्या पक्ष्यांसाठी ठेवलेल्या पाण्यात आणून घालतात. जवळच्या झाडावर दबा धरून बसतात नंतर काही वेळाने येउन खातात. कबुतरे मात्र शेव-गाठी खाताना पाहिली नाही. कदाचित त्यांना कच्चे धान्य आवडत असावे.
जागू, नक्की येइन. पण मे महीन्याच्या सुट्टीत. सध्या बारावी आहे ना.
कित्ती गोडू गोडू पिल्लं
कित्ती गोडू गोडू पिल्लं आहेत... मस्त!!......... धन्यवाद आज्जे.
अनिल, द्राक्षाची माहिती छानच सांगितलीत.
हेल्लो............. बर्याच
हेल्लो.............
बर्याच दिवसांनी यायला मिळाले इथे...
सर्व नीट वाचलं नाहीये अजून...
कालच पाचगणीत आलेय. घराभोवताली जितक्या दूर दृष्टी जाईल तिथपर्यन्त पसरलेल्या निसर्गाचे दृष्टीसुख घेण्यात मग्न आहे..
काल 'first life' बघितला काल -
काल 'first life' बघितला काल - अप्रतिम आहे. युट्युबपेक्षा HiD मिळवून बघा. जिवाश्म मिळवण्याकरता घेतलेली प्रचंड मेहनत, त्यावरून ते जीव कसे दिसत असतील याची बनवलेली मॉडेल्स एकदम सुंदर आहेत.
पहिला बहुपेशीय जीव ही पेशींची वसाहत होती - प्रत्येक पेशी ही स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण होती. अशा अनेक पेशी एकत्र रहायच्या. त्यांच्यात थोडीफार देवाण-घेवाण व्हायची पण ती अगदीच नगण्य होती. पेशी fractals आकारात एकत्र रहायच्या. उत्क्रांतीची ही शाखा पुढे बंद झाली कारण या प्रकारात विकासाला फारसा वाव नव्हता.
आपण ज्या उत्क्रांतीच्या शाखेत मोडतो, त्या शाखेची सुरुवात पण बरीच रंजक होती. हालचाल करणारे अवयव, दात, भक्षक आणि भक्ष यांनी उत्क्रांतीत एकमेकांना दिलेले शह-काटशह हे सगळे अगदी बघण्यासारखे आहे. काही जीवांना दोन पेक्षा जास्त डोळे होते. ५ डोळे असलेल्या जीवाचे केलेले मॉडेल तर मस्तच आहे.
त्यातल्या इतर काही माहितीपूर्ण गोष्टी:
* आजची कोळंबी ही बर्याच अंशी तिच्या पूर्वजांचेच रूप टिकवून आहे.
* डोके हा अवयव उत्र्कांतीत बर्याच उशीरा आला
* दात किंवा तत्सम अवयव हे खूप आधी आले
* लैगिक प्रजनन (दोन पेशी एकत्र येऊन नविन जीवाची निर्मिती) हे उत्क्रांतीत खूप महत्वाचे आहे. आधी पेशी स्वतःला विभाजून दुसरी पेशी बनवायची पण त्याचे अनेक तोटे आहेत.
माधव, छान माहिती पहायला हवा
माधव, छान माहिती
पहायला हवा 'first life'
सुप्रभात
सुप्रभात
अरेच्च्या म्हटले वांगी काय
अरेच्च्या म्हटले वांगी काय लटकलीत..
<<<अरेच्च्या म्हटले वांगी काय
<<<अरेच्च्या म्हटले वांगी काय लटकलीत.>>>> मला तर ते हरभर्यासारखं वाटलं !
माधव माहिती ऊत्तम !
आणखी एक खास म्हणजे, आपल्याकडे
आणखी एक खास म्हणजे, आपल्याकडे पानांचा वापर खाद्यपदार्थात करत नाहीत. >>> दिनेशदा, Vine leaves in brine म्हणजे मिठाच्या पाण्यात प्रिझर्व केलेली द्राक्षानी पाने हा खरे तर एक चांगल उद्योग होऊ शकतो भारतात. माझ्या कामाच्या ठिकाणी मला बर्याच जणांनी विचारणा केली. पण दुर्दैवाने त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ शकलो नाही.
जिप्स्या, फुलपाखरू मस्तच.
जिप्स्या, फुलपाखरू मस्तच.
मधु, कबुतरे दाण्याबरोबर काही
मधु, कबुतरे दाण्याबरोबर काही खडेही गिळतात ( कोंबडीप्रमाणे ) त्यांच्या पोटात त्याचे पिठ होते, म्हणुन त्यांना मऊ गाठ्या आवडत नसाव्यात !
जिप्स्या, त्या खाजखुजल्या आहेत, असे वाटले होते. पण नाहीत !
माधव, मला बघितलाच पाहिजे हा. सर अटेंबरो यांचा, रेअर ग्लिम्प्सेस हा माहितीपट पण याच विषयावर आहे.
गिरिश,
आपल्याकडे तो डोलमा तसा माहित नाही ( खोटं कशाला बोला, आपल्या जिभेला तो बराही लागत नाही ) पण ती
पाने वापरुन आपल्याला रुचतील असे झणझणीत पदार्थ, तयार केले पाहिजेत. जाणकार लोकांनी ( तो मी नव्हेच. )
वर्षू, पांचगणीला भरपूर फोटो काढणार ना ?
दिनेश first life पण त्यांचाच
दिनेश first life पण त्यांचाच आहे.
दुबईला ओरिजीनल सिडी मिळते का
दुबईला ओरिजीनल सिडी मिळते का बघतो, त्या सिडीजमधे मस्त सबटायटल्स असतात.
०००००००००
माऊंट किलिमांजारोवर पण चार भागात एक माहितीपट आहे. जास्त फोकस त्या हायकर्स वर आहे, तरी पण
चांगला आहे.
एकदा मी गल्फ एअरने जात असताना, ते विमान तिथे उतरले होते. विमानातूनही तो बघायला दडपण येते. ऐन विषुवृत्ताजवळ असुनही त्याच्या माथ्यावर बर्फ आहे. तो आहे टांझानियात पण केनयाच्या बॉर्डरहून जवळ आहे.
मृत ज्वालामुखी असल्याने माथ्यावर विवर आहे आणि अजूनही त्याचा मूळ आकार शाबूत ( म्हणजे फूजियामा सारखा ) आहे. माऊंट केनया मात्र, चारी बाजूने झिजलाय.
तर या किलिमांजारोवर चढाई करण्यासाठी, किमान एक आठवडा जातो. त्यापेक्षा कमी वेळात चढायला, तिथले
सरकारच परवानगी देत नाही. वरच्या अतिविरळ हवेमूळे ते धोकादायक आहे.
या एका आठवड्यात मात्र तूम्ही चालत, विषूवृत्तापासून, उत्तर ध्रुवापर्यंत जाण्याचा अनुभव घेता.
पायथ्याशी रेनफॉरेस्ट, मग खास या पर्वतावर आढळणार्या वनस्पती ( दिवसा ऊन आणि रात्री बर्फ असे हवामान वर्षभर, त्यामूळे हि झाडे रात्री कमळासारखी मिटतात आणि दिवसा उमलतात. तसेच ही झाडे, सुकलेली पानेदेखील वाया घालवत नाहीत, या पानांचे ब्लँकेट तयार करुन, खोडाभोवती गुंडाळून ठेवतात )
त्यानंतर चिलीमधल्या वाळवंटाप्रमाणे अगदी थंड आणि कोरडा भाग आहे, तिथे कुठलिही वनस्पति
तग धरू शकत नाही. त्यावरच्या टप्प्यात बर्फाची ग्लेशियर आहे.
पण ती वहात नाही. इतका बर्फ असूनही, तिथली जमीन अगदी कोरडी आहे, कारण या बर्फाचे पाणी न होता,
थेट वाफच होते. येत्या १०० वर्षात तो असा पूर्णपणे उडून जाणार आहे.
पण तरीही, ऑक्सिजनची नळकांडी न वापरता, योग्य त्या मार्गदर्शकाच्या सहाय्याने, थेट विवरापर्यंत जाता येते. माणसे अशी जातच असतात. पण काही प्राणीदेखील जातात. अर्थातच तिथे ते तग धरु शकत नाहीत.
हरण, बिबळ्या, आफ्रिकन हत्ती यांचे सांगाडे तिथे सापडलेत. हरणामागे बिबळ्या गेला असे म्हणूया पण
ह्त्तीची रोजची चार्याची आणि पाण्याची गरज बघता, तिथे जायचे वेडे साहस त्याने का केले असेल, हे मात्र
गूढ आहे.
दिनेशदा, मला अयुष्यात एकदा
दिनेशदा, मला अयुष्यात एकदा तरी किलीमंजारो बघायचाय. माझे आजोबा त्या काळातल्या टांगानिका टेरिटरीमध्ये डॉक्टर होते. लहानपणी त्यांच्या घराच्या अंगणातून किलीमांजारो दिसायचा अशी आठवण आई सांगते!
दिनेशदा, मस्त माहिती!
दिनेशदा, मस्त माहिती!
गौरी, डॉ श्रीराम लागू
गौरी, डॉ श्रीराम लागू अभिनयाच्या क्षेत्रात येणापूर्वी टांझानियाला होते, त्यानी लिहून ठेवले आहे कि, तिथल्या
विरळ हवेमूळे माणूस भमिष्ठासारखा वागू लागतो... मला माझ्या शारिरीक क्षमतेची खात्री नाही, नाहितर
मला पण तिथे जायची ईच्छा आहे.. ( भ्रमिष्ठ व्हायचा धोका नाही मला आता..... आता काय बाकी ऊरलेय )
(No subject)
Pages