"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.
निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf
मधु, माझी आत्या तिथे रहात
मधु, माझी आत्या तिथे रहात असे, खुपदा जायचो आम्ही. आता ती मालवणला राहते.
कबुतरांचा अंडी घालण्याचा वेंधळेपणा वगैरे, दुर्गा भागवतांनी ऋतूचक्र मधे गेल्या शतकातच नोंदवून ठेवलाय.
त्या ग्रांट रोडला रहात होत्या.
पण मला नवल वाटते, आमच्या शिवसृष्टीत ( कुर्ला, पूर्व ) फारशी कबुतरे दिसत नाहीत.
आमचे शेजारी जैन आहेत, ते रोज पक्ष्यांना शेवगाठ्या टाकतात, पण ते खायला फक्त कावळे आणि साळुंक्याच
आलेल्या दिसतात. एरवीही कबुतरे दिसत नाहीत. काय कारण असावे कळत नाही.
अनुप्,साधनाताई,मधु,माधव सुंदर
अनुप्,साधनाताई,मधु,माधव सुंदर प्रचि,
अनुप फुलावरिल ते चक्र आता फिरु लागेल असच वाटतय
कबु एवढे धोकादायक असु शकतात हे आजच समजले, धन्स साधनाताई
आजची माळ गुलाबी
आजची माळ गुलाबी
हे अजुन काही
हे अजुन काही
हे माझं
हे माझं
कबुतरांचा विषय चालला आहेच तर
कबुतरांचा विषय चालला आहेच तर माझा पण अनुभव ईथे सांगतो.
घराच्या गॅलरीत एक जुनी लोखंडी कॉट बरेच दिवस भिंतील टेकवुन ठेवली होती. त्याच्या आडोश्याने कबुतराचे घर होते. ईतके दिवस आम्ही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. काही दिवसांपुर्वी ती कॉट तेथुन हलवल्यानंतर मात्र कबुतरे येऊन गॅलरीत ठेवलेल्या कुंड्यामधल्या रोपांचे शेंडे खुडुन टाकत आहेत. काहिही केले तरी उपयोग होत नाहीये.
माझ्याकडून गुलाबी माळ.. इथे..
माझ्याकडून गुलाबी माळ.. इथे.. http://www.maayboli.com/node/38747
नि कबुतरं इतकी धोकादायक असतात हे आजच कळले.. तरी नशिब गणपतीमध्ये गावी गेलो असता आमच्या गॅलरीमध्ये कबुतराने अंड घातले होते.. इच्छा नसूनही ते अंडे कचर्याच्या डब्यात टाकले.. म्हटले असे ठेवले तर देखभाल नि साफसफाई कोण करत बसणार.. नि खाली जाउन कुठे ठेवले तर कोणतरी गटटम करणार... तेव्हा खूप मोठे पाप केल्यासारखे वाटत होते.. ते कबुतर पण दोन तीन दिवस सदैव घिरट्या घालत होते.. !
सर्वांचे फोटो अप्रतिम!! ही
सर्वांचे फोटो अप्रतिम!! ही माळेची आयडिया मस्तय एकदम!
आमच्याकडच्या सर्व मांजरांना आम्ही वर दिलेलेच औषध घालतो. शिवाय कॅट्स फूडमुळे कदाचित त्यांची प्रतिकारशक्ती किंवा एकूणच तब्येत चांगली रहात असावी.
कबूतरांचे एकेक प्रताप वाचल्यानंतर त्यांची दहशतच वाटायला लागलीये.
असो... उद्या दसरा!! सर्वांना दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
विजयादशमीच्या हार्दिक
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा, सर्वांना !
कालच्या लेक्चरमधुन मिळालेले
कालच्या लेक्चरमधुन मिळालेले अजुन थोडे ज्ञानकण
आपल्याकडे घोरणा-या घोरासुरांची खुप टिंगल केली जाते पण घोरणे हा एक गंभीर प्रकार आहे याकडे आपण पुर्णपणे दुर्लक्ष करतो. घोरण्याचा संबंध नाकाशी आहे असे समजले जाते पण ते पुर्णपणे चुकीचे आहे. झोपेत आपल्या श्वासनलिकेला जीभेचा किंवा घशाकडील इतर काही गोष्टींचा अडथळा होतो, त्यामुळे हवा आत जाण्याचा मार्ग अरुंद होतो आणि मग आपण जीभ अरुंद करुन जशी शिटी वाजवतो तशी आपल्या घशातुन शिटी निर्माण होते ज्याला आपण घोरणे म्हणतो.
झोपेत घोरणारे मध्येच घोरतात, मध्ये शांत होतात. ह्या मधल्या शांत वेळेत त्यांचा श्वास बंद झालेला असतो. काही काळ श्वास बंद झाल्यावर मेंदू इमर्जन्सी श्वास घ्यायची आज्ञा देतो आणि माणसाचा श्वास आणि घोरणे परत चालु होते.
माणुस घोरतो म्हणजेच त्याला हवा कमी मिळते, त्यातला प्राणवायु कमी मिळतो. आपल्याला जरी लगेच जाणिव होत नसली तरी याचे दुरगामी परिणाम आपल्या शरिरावर होतात. कालांतराने घोरासुराला बीपी, हृदयाचा रोग आणि स्ट्रोक हेही होऊ शकते. पण आपण याचा संबंध इतर गोष्टींशी लावतो. मुळात घोरण्यापासुन याची सुरवात होते हे आपल्याला माहितही नसते.
घोरणे कमी करण्याचा एक जालिम उपाय म्हणजे आपले वजन कमी करणे. वजन कमी केल्यास घशाचा श्वासनलिकेवर पडणारा ताब कमी होतो आणि हवेचा मार्ग मोकळा होतो.
घोरणे चालु-बंद , चालु-बंद राहणे ही स्लीप अॅप्निया या रोगाची प्राथमिक लक्षणे आहेत. रात्रीच्या घोरण्यामुळॅ आणि मध्ये मध्ये बंद होणा-या श्वासामुळॅ आपली झोप नीट होत नाही. शारिरीकरित्या आपण डोळे मिटुन असतो पण सकाळी उठल्यावर झोप पुरी झालीय ही भावना येत नाही आणि दिवसभर पेंगुळल्यासारखे वाटत राहते. आपल्याकडे आपण सगळ्याच गोष्टी लाईटली घेतो पण काही प्रगत देशांमध्ये उदा. ऑस्ट्रेलियामध्ये व्यावसायीक ड्रायवर्सना दरवर्षी स्लीप अॅप्नियासाठीची टेस्ट द्यावी लागते आणि हा आजार त्यांना नाही याचे सर्टिफिकेट सोबत ठेवावे लागते.
तर मंडळी आपल्या कुटूंबात कोणी घोरासुर अस्तील तर त्यांना आता हसु नका, तर घोरणेमुक्तीसाठी त्यांना मदत करा.
आजची माळ
आजची माळ जांभळी.....
सर्वांना दसरयाच्या शुभेच्छा!!!!!!!!!!!!!
साधना, छान माहिती. झोपेच्या
साधना, छान माहिती.
झोपेच्या बाबतीत मी सुदैवी आहे. झोप लागली नाही, असे सहसा होत नाही माझ्याबाबतीत. अर्थात माझ्या
झोपण्याच्या वेळा, मी काटेकोरपणे पाळतो.
वा मस्त! सगळी पाने पाहिली
वा मस्त! सगळी पाने पाहिली वाचली निरखली!
तुम्ही सगळे जण फुलांची नावे देणे बंद करत अहात का? ईन मीन तीन.. तू जी तीन पिवळी फुले टाकलीस त्यांची नावे सांग ना प्लीज मला. रोज वाटेत भेटतात बिचारी!
साधना - या खालील लिंकमधे वेमा
साधना - या खालील लिंकमधे वेमा श्री अजय यांनी "घोरासुराचे आख्यान" हे शीर्षक असलेला हा छान लेख लिहिलेला आहे - सर्वांनी बहुतेक वाचलेला असेलच..
http://www.maayboli.com/node/30631
विजयादशमी २०१२, दुपारी ३.३०
विजयादशमी २०१२, दुपारी ३.३० चा सुमार..... सिमोल्लंघनाला कोण आले पहा बरे.....
घरातून दिसला तेव्हा मोकळ्या flower-bed मधे होता. खाली जाउन फोटो काढेपर्यंत पाला-पाचोळ्यात गडप होत होता. (फोटोग्राफर : चि. मल्हार)
एकूणच आमच्या नगरात वेग-वेगळे साप दिसतात. उंदिरही आहेत म्हणून असतील. साप आहेत म्हणून भारद्वाज देखील आहेत (हल्ली रोज दिसतात). नगराला लागून आर्मी डेपो आहे. झाडी बरीच आहेत. तिथे मुंगूसही दिसते.
वा!!! मधु फोटो ग्राफी खूपच
वा!!! मधु फोटो ग्राफी खूपच सुंदर. पानांचा आणि सापाचा रंग खूपच सारखा आहे. तरीही फोटोत स्पष्ट दिसतो यात फोटोग्राफरची किमया.
मुंबई सारख्या शहरात साप आढळेल यावर विश्वास नव्हता माझा, या फोटोमुळे बसला. खूपच सुंदर .......!!!!!!
मधुरा - ही धामण दिस्तेय....
मधुरा - ही धामण दिस्तेय.... फोटो सुरेखच, कारण प्रचंड चपळ असते ही - पहाता पहाता दिसेनाशी होते - त्यामुळे अशा सळसळणार्या धामणीचा फोटो काढणे म्हणजे एकदम स्किलफुल जॉब.... चि मल्हारचे विशेष कौतुक...
बी - इन मीन तीनने मागील पानावर टाकलेली पिवळी फुले - १
१] बहुतेक कुठली तरी वेल असावी - कारले, घोसाळे स्वरुपाची
२] रानभेंडा
३] अलामांडा
मुंबई सारख्या शहरात साप आढळेल
मुंबई सारख्या शहरात साप आढळेल यावर विश्वास नव्हता माझा
मुंबईच्या उपनगरात साप आहेत. नवी मुंबईत बेलापुरात तर भरपुर आहेत. आमच्या भागाची स्नेक प्रोन एरिआ म्हणुन नोंद आहे. सुरवातीला लोक सापांना मारायचे, नंतर थोडे ज्ञान मिळाल्यावर अग्निशामक दलाला बोलावु लागले, आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन राहायला शिकले.
रेल्वेलाईनवर मात्र खुप साप चिरडले जातात. मी आधी ट्रेनसाठी बेलापुरला जायचे तेव्हा आठवड्याला एकतरी साप पडलेला दिसायचा. गेल्या आठवड्यात पेपरात वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनला आपटुन वर गेलेल्या म्हशींचे फोटो आले होते.
साधना, छान माहिती
साधना, छान माहिती
madhu-makarand, छान फोटो
माझ्या घराभोवतीही असेच साप, मुंगसं, आणि बरेच पक्षी असतात, भारद्वाज, धनेश ही खूप आहेत पण घारी फारच आहेत.
पुण्यात युनिव्हर्सीटी रोडच्या
पुण्यात युनिव्हर्सीटी रोडच्या कडेनी काही वेल दिसतात, त्यांची पानं मोठी आणि रफ आहेत. त्याना सुंदर फेंट गुलाबी फुलं आलेली आहेत ती लांबून कॅशीया सारखी वाटतात. कोणी पाहिली आहेत का? कोणती आहेत ती.
पुण्यात युनिव्हर्सीटी रोडच्या
पुण्यात युनिव्हर्सीटी रोडच्या कडेनी काही वेल दिसतात, त्यांची पानं मोठी आणि रफ आहेत. त्याना सुंदर फेंट गुलाबी फुलं आलेली आहेत ती लांबून कॅशीया सारखी वाटतात. कोणी पाहिली आहेत का? कोणती आहेत ती. >>> बहुतेक आईस्क्रीम क्रीपर असावी... मागच्या पानावर माधव यांनी फोटो टाकलाय एक ......
अरे बापरे ! कबुतर एवढे
अरे बापरे ! कबुतर एवढे धोकादायक आहेत ? कमाल आहे.
वरील सर्व फोटो उत्तम! आणि वेगवेगळ्या विषयांवरची माहिती तर फारच छान!
चि. मल्हारचे कौतूक आहे. साधना
चि. मल्हारचे कौतूक आहे.
साधना म्हणते तसे, आता अगदी लहान मुलांनादेखील सापांबद्दल बरीच माहिती असते. माझ्या पिढीत तरी, दिसला साप कि मार त्याला, अशीच पद्धत होती.
आम्ही शिवसृष्टीत रहायला आलो त्यावेळी ( १९७४ ) खुप साप दिसायचे. पण नंतर वस्ती वाढली तसे कमी झाले.
ठाण्याच्या तलावपाळीवरच्या तलावात पण खुप दिसतात.
बाकी बहुतेक देशांत असले तरी न्यू झीलंडमधे मात्र अजिबात साप नाहीत !
धन्यवाद शशांक! इतके छान फुल
धन्यवाद शशांक!
इतके छान फुल आणि नाव अगदी सुमार.. अलामांडा! मराठी नाव नाही का ह्या फुलांना?
वा सगळ्यांचे फोटो फार सुंदर
वा सगळ्यांचे फोटो फार सुंदर आहेत.
मधु मकरंद - पहिला प्रचि सुंदर
मधु मकरंद - पहिला प्रचि सुंदर आणि दुसरा पाहुन घाबरलो चि. मल्हारचे कौतुक सुंदर टिपलाय.
न्यू झीलंडमधे मात्र अजिबात साप नाहीत >> दा त्यांच अन्न साखळीतल काम कोण करीत असेल?
शशांकजी फुलांच्या नावांसाठी धन्यवाद
बहुतेक कुठली तरी वेल असावी - कारले, घोसाळे स्वरुपाची >> हे एक छोटेच झुडुप होते जागुताईच्या रानफुलांच्या रानवाटेवर (भाग २) मधील प्रचि क्रं २३ आहे नाव माहीत नाही
http://www.maayboli.com/node/29694
नितीन, न्यू झीलंड समुद्रात
नितीन, न्यू झीलंड समुद्रात अगदी दूरवर आहे. तिथे सरपटणारे प्राणीच नाहीत. इतकेच काय, अनेक पक्षी उडण्याचेही कष्ट घेत नाहीत, काही तर उडतही नाहीत ( उदा. किवी ) कारण जमिनीवर त्यांना धोका नाहीच.
हींस्त्र प्राणीही नाहीत. उंदरांचीही समस्या आहे असे दिसत नाही, असतील त्यावर पक्षी नियंत्रण ठेवत असतील.
पाली मात्र आहेत, त्यांच्या पोहोतुकावा या राष्ट्रीय वृक्षाचे परागीवहन, पालीसारखा दिसणारा, गेको हा प्राणी करतो.
निसर्गप्रेमींना नमस्कार ! हे
निसर्गप्रेमींना नमस्कार !
हे गावाकडे गेलो असताना शेता(मळ्या)जवळचे काही फोटो काढण्याचा हा केलेला प्रयत्न ..
द्राक्षबागेत सध्या ऑक्टोबर छाटणी झालेली आहे,त्यामुळे नविन (फुट्वा) पालवी फुटली आहे
काही प्लॉटची छाटणीचा काळ हा मागे पुढे असल्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यावर्चे फोटो दिसतील..
सर्व
अनिल, तुरे आल्यावर वेलींना
अनिल, तुरे आल्यावर वेलींना मांडवाचा आधार देत वळवता का ? आणि द्राक्षांना तूम्ही मणि म्हणता ना ?
आमची माती आमची माणसं मधे हाच शब्द वापरत !
ते हिरवे गोळे कसले आहेत? ती
ते हिरवे गोळे कसले आहेत? ती द्राक्षे आहेत काय??
Pages