मंडळी, ह्या प्रकाशचित्रांच्या खेळासाठी तुम्हाला पार तुमच्या बालवर्गातल्या मूळाक्षरांच्या उजळणीपासून सुरुवात करायची आहे. तर मग काय तय्यार?
या खेळाचे नियम व सूचना काळजीपूर्वक वाचा बर्का! नाहीतर छोटीशीच चूक सुद्धा तुम्हाला बालवर्गात नेऊन सोडेल.
खेळाचे नियम व सूचना :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा भाग घेऊ शकेल, मात्र सलग दोन प्रकाशचित्र देऊ शकणार नाही.
४. येथे वापरण्यात येणारे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
५. मराठीत मूळाक्षरं ४८. यात १२ स्वर (अ ते अ:) व ३६ व्यंजनं (क ते ज्ञ). आजच्या खेळासाठी आपण 'क' ते 'ज्ञ' पर्यंतची ३६ व्यंजन व त्यांच्या बाराखड्या प्रकाशचित्रांच्या माध्यमातून वापरणार आहोत.
उदाहरणार्थ - पहिले प्रकाशचित्र 'क' च्या बाराखडीने (क पासून कः पर्यंतच्या कुठल्याही एका अ़क्षराने) सुरु होणारे, क क कमळाचा आहे. पुढचे प्रकाशचित्र 'ख' च्या बाराखडीचे (ख पसून खः पर्यंतच्या कुठल्याही एका अक्षराचे) असेल.
६. अशापद्धतीने आपण बाराखडी चालवत 'ज्ञ' पर्यंत पोचल्यावर पुन्हा 'क' च्या बाराखडी पासून नवीन प्रकाशचित्रांनी सुरुवात करावी. बाराखडी मधील 'ङ', 'ण', 'ञ' आणि 'ळ' ही अक्षरं वगळू शकता.
७. प्रतिसादाच्या खिडकीच्या वर जे निळे प्रश्नचिन्ह आहे त्यावर टिचकी मारा, बाराखडी मिळेल.
चला तर मग सुरू करूयात...
क क कमळाचा
आता यापुढचे प्रकाशचित्र तुम्ही ख च्या बाराखडीपासून (ख ते खः) सुरू होणारे द्यायचे...
(No subject)
खडक
खडक
(No subject)
ही कल्पना भारी आहे
ही कल्पना भारी आहे प्रकाशचित्रांची अंताक्षरी.
अरे, ऑलमोस्ट एकाचवेळेस टाकलेत
अरे, ऑलमोस्ट एकाचवेळेस टाकलेत फोटो ... चालतिल का संयोजक...
बाद!!
बाद!!
गणपतीबाप्पा
गणपतीबाप्पा
घंटा!!
घंटा!!
चॉकलेट
चॉकलेट
सह्ही आहे की कल्पना
सह्ही आहे की कल्पना
छत्र्या
छत्र्या
चांगला खेळ आहे, यामुळे
चांगला खेळ आहे, यामुळे बाराखडीची मस्त उजळणी होईल
जास्वंद
जास्वंद
झाडं
झाडं
एकाच वेळेला टाकल्यामुळे, एका
एकाच वेळेला टाकल्यामुळे, एका मूळाक्षराचे २/३ फोटो आल्यास ते तसेच राहू देत. मात्र पुढचा फोटो पुढच्या मूळाक्षरानी टाका.
टोपी लेकीची लॉली टोटो
टोपी लेकीची लॉली टोटो
ज्या वस्तुचं प्रकाशचित्र
ज्या वस्तुचं प्रकाशचित्र अभिप्रेत आहे ती वस्तु त्या त्या प्रकाशचित्रात प्रामुख्याने दिसू देत.
तसंच वस्तुचं नांव लिहीताना आम्ही लिहीलं आहे तसं ' क क कमळाचा' या पद्धतीत लिहीलं तर मजा येईल व मूळाक्षरं आणि बाराखडया पक्क्या होऊन जातील. कसं?
ठ - ठ्सा
ठ - ठ्सा
डोकी...
डोकी...
बाद!
बाद!
ढ - ढगाचा
ढ - ढगाचा
ढ ढगांचा
ढ ढगांचा
डॅफो...मस्त
डॅफो...मस्त
बित्तुबंगा, तुम्हाला परत ख
बित्तुबंगा, तुम्हाला परत ख येईपर्यंत वाट पहावी लागेल. नियम ६ बघा.
आर्च, ठश्याचा फोटो ताजा
आर्च, ठश्याचा फोटो ताजा दिसतोय.
ख काढून टाका, प्लीज! तुमचा
ख काढून टाका, प्लीज! तुमचा फोटो दुसरी राऊंड सुरु होईल त्यासाठी राखून ठेवा.
धन्यवाद आर्च! खेळाची कल्पना
धन्यवाद आर्च!
खेळाची कल्पना आवडली!
धन्स बित्तु ! ढ झाला आता ण
धन्स बित्तु !
ढ झाला आता ण
पाणी
पाणी
भारीये हा खेळ. यासाठी
भारीये हा खेळ.
यासाठी मुळाक्षरे आणि बाराखडी तर माहित असायला हवीच, शिवाय आपल्याकडे कुठल्या अक्षरांनी सुरूवात होणार्या वस्तूंचे फोटो आहेत हे देखील माहित असायला हवं.
Pages