मंडळी, ह्या प्रकाशचित्रांच्या खेळासाठी तुम्हाला पार तुमच्या बालवर्गातल्या मूळाक्षरांच्या उजळणीपासून सुरुवात करायची आहे. तर मग काय तय्यार?
या खेळाचे नियम व सूचना काळजीपूर्वक वाचा बर्का! नाहीतर छोटीशीच चूक सुद्धा तुम्हाला बालवर्गात नेऊन सोडेल.
खेळाचे नियम व सूचना :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा भाग घेऊ शकेल, मात्र सलग दोन प्रकाशचित्र देऊ शकणार नाही.
४. येथे वापरण्यात येणारे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
५. मराठीत मूळाक्षरं ४८. यात १२ स्वर (अ ते अ:) व ३६ व्यंजनं (क ते ज्ञ). आजच्या खेळासाठी आपण 'क' ते 'ज्ञ' पर्यंतची ३६ व्यंजन व त्यांच्या बाराखड्या प्रकाशचित्रांच्या माध्यमातून वापरणार आहोत.
उदाहरणार्थ - पहिले प्रकाशचित्र 'क' च्या बाराखडीने (क पासून कः पर्यंतच्या कुठल्याही एका अ़क्षराने) सुरु होणारे, क क कमळाचा आहे. पुढचे प्रकाशचित्र 'ख' च्या बाराखडीचे (ख पसून खः पर्यंतच्या कुठल्याही एका अक्षराचे) असेल.
६. अशापद्धतीने आपण बाराखडी चालवत 'ज्ञ' पर्यंत पोचल्यावर पुन्हा 'क' च्या बाराखडी पासून नवीन प्रकाशचित्रांनी सुरुवात करावी. बाराखडी मधील 'ङ', 'ण', 'ञ' आणि 'ळ' ही अक्षरं वगळू शकता.
७. प्रतिसादाच्या खिडकीच्या वर जे निळे प्रश्नचिन्ह आहे त्यावर टिचकी मारा, बाराखडी मिळेल.
चला तर मग सुरू करूयात...
क क कमळाचा
आता यापुढचे प्रकाशचित्र तुम्ही ख च्या बाराखडीपासून (ख ते खः) सुरू होणारे द्यायचे...
बदक
बदक
भ - भाकरी -
भ - भाकरी
-
म म माळेतला (मण्यांतला)
म म माळेतला (मण्यांतला)
अह्हा! आर्च, भाकर्या मस्त
अह्हा! आर्च, भाकर्या मस्त दिसत आहेत!
ती बाजूला आंबावडी आहे का? एकूणात ताटच तोंपासु!
आलेले फोटु मस्त हा खेळ अवघड
आलेले फोटु मस्त
हा खेळ अवघड आहे. (माझ्यासाठी)
मुळाक्षरं मला शाळेत कधी पाठ झाली नाहीत तर आता कुठुन आठवतील
शैलजा, या खेळावर थोडा गोंधळ
शैलजा, या खेळावर थोडा गोंधळ होणार हे गृहीत धरुन, तुमच्या मदतीसाठी इथे जागरण चालू आहे. थोडी गंमत केली तर... असो. प्रतिसाद काढून टाकला आहे.
झकास य हे अक्षर घे
झकास य हे अक्षर घे
य य यादीतला य
य य यादीतला य
र राधेचा
र राधेचा
ल ल लवंगीतला ल...
ल ल लवंगीतला ल...
व वाटीचा
व वाटीचा
श - शहामृग
श - शहामृग
डॅफो, तू व वरून टाकलसं
डॅफो, तू व वरून टाकलसं माझ्याआधी ते बरं झालं, मी व विसरले होते
थोडी गंमत केली तर... असो.
थोडी गंमत केली तर... असो. प्रतिसाद काढून टाकला आहे. >> ओ संयोजक, तुम्ही स्मायल्या पाहिल्या नाहीत का माझ्या पोस्टीतल्या? जसे तुम्ही गंम्मत करत होतात, तसेच मीही गंमतीत लिहिले होते. असो, ह्यापुढे वाचनमात्र राहीन.
ष षटकोनाचा
ष षटकोनाचा
स स सोन्यातला स
स स सोन्यातला स
ह - हत्ती
ह - हत्ती
ळ बाळाचा बरोबर का हो संयोजक
ळ बाळाचा बरोबर का हो संयोजक ?
ईथे जरा निवांत बसुन फोटो
ईथे जरा निवांत बसुन फोटो शोधावे लागतील. कामावरून ते शक्य नाहिये.
पुढच्या राउंडला हजेरी लावतो. हा खेळ भारी आवडला आहे...
ळ वगळला तरी चालेल असे लिहिलय
ळ वगळला तरी चालेल असे लिहिलय वर... पुढचे अक्षर घ्या... क्ष
हा खेळ अवघड आहे.
हा खेळ अवघड आहे. (माझ्यासाठी)
मुळाक्षरं मला शाळेत कधी पाठ झाली नाहीत तर आता कुठुन आठवतील>>>>>झक्कास +१
क्ष क्ष क्षारातल (मीठ)
क्ष क्ष क्षारातल (मीठ)
क्ष...... पक्ष्यातला
क्ष...... पक्ष्यातला
ज्ञ ज्ञानमंदिराचा संयोजक
ज्ञ ज्ञानमंदिराचा
संयोजक हाणतिल आता मला...
क्ष- क्षुधेचा
क्ष- क्षुधेचा
ह हरणा चा
ह हरणा चा
मी पाही पर्यंत पहिली फेरी
मी पाही पर्यंत पहिली फेरी संपली सुद्धा
आता दुसरी फेरी हा घ्या पुन्हा क क कमळातला
ख ख खोप्यातला ख
ख ख खोप्यातला ख
भारी आहे कल्पना ही!
भारी आहे कल्पना ही!
ग गणपती चा
ग गणपती चा
Pages