एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज जे काही झालं त्यात महत्वाचं एवढंच की घनाने अमेरिकेत जायला नकार दिला
त्याच्या साहेबाने त्याला इथेच तेवढंच पॅकेज दिलं जेवढं त्याला ऑनसाईट जाऊन मिळणार होतं Uhoh
आमचे मॅनेजर का पाहात नाहीत एलदुगो Sad

शेवटी वालाच्या बिरड्याचं महत्व पटलं तर! Wink
तिथं बॉससमोर काय भावनाविवश व्हायच?
काहीही दाखवतात. सेलफोन हरवला किंवा जे काय असेल ते, ऑफीसातल्या फोनवरून आजकाल गरजेचा एक फोनही करता येत नाही का? अमेरिकेतून भारतातल्या घरी फोन करण्याबद्दल कंपनीचे उच्च विचार ऐकले पण भारतातल्या भारतात, त्याच शहरात तरी करू द्या म्हणावं. Wink खरं तर मालिका आज संपल्यासारखी वाटतीये पण आणखी तीन, चार दिवस आहेत.

मैना मला तर काही दिवसांपुर्वीच मालिका संपल्यासारखी वाटत होती
पाणी टाकून टाकून इथपर्यंत आलीये

घनाच्या बॉसने त्याला अमेरीकेला न पाठवण्याची जी काही महाभयंकर अतार्कीक भन्नाट कारण सांगीतली ती ऐकुन हसुन हसुन पुरती वाट लागली. मॅरीड लोक डॉलर भारतात काय पाठवतात, ईंडीया कॉलींग काय, त्यामुळे कामावर परीणाम, मग GC बद्दल लोक, काहीही लॉजीक. ते संवाद ऐकुन एक गोष्ट मात्र नक्की की एलदुगो च्या लेखिकेने त्या "विश्व बंधु गुप्ता" कडुन क्रॅश कोर्स केला असेल नक्कीच. हे बघाच Happy http://www.youtube.com/watch?v=ApQlMm39xr0
आता सॉफ्टवेअरबद्दलच्या संवादात एवढी माती खाल्लीच आहे तर मग ईथले "क्लाऊड कंप्युटींग" बद्दलचे विचार सुद्धा घनाच्या तोंडी टाकले तर या मालिकेचा TRP आकाशाला भिडेल Happy

मला तर काही दिवसांपुर्वीच मालिका संपल्यासारखी
म्हणजे शेवटी राधाच्या प्रेमाखातर भारतात थांबण्याबद्दल म्हणतियेस का रिया?
ते होणारच होतं गं पण बिरड्यासाठी तो थांबेल असा इथे कोणीही अंदाज तरी केला होता काय? Wink
'आय लव्ह यू राधा' म्हणणं सोपं आहे पण 'आय लव्ह बिरडं' (तेही चाचरत बोलणं सोपं नाहिये) यामुळे कथेस जबरदस्त कलाटणी मिळालीये ना! Wink

बिरडं घनासाठी नाही हो. घनाच्या बॉससाठी. त्याच्यासाठी रोज डब्यातून बिरडं आणायचं म्हणून घनाने अमेरिकेची ऑफर नाकारली आणि त्याच कंपनीत भारतातली नोकरी हृदय घट्ट करून स्वीकारली.

काळेवाडीच्या बाहेरचा आणि घनाच्या ऑफिसजवळचा हे दोन्ही मातीचे रस्ते पाहून , ''घना महाराष्ट्रातल्या अतिदुर्गम, मागास विभागात रहात असल्यानेच त्याला अमेरिकेचे पॅशन आहे'' असा माझा निष्कर्ष.

हम्म्म्म. काल एकदाचा लावला काय तो सोक्षमोक्ष.

आता आज घरातला प्रत्येक मेंबर राधा कुठे गेली असेल यावर चर्चा करेल.

उद्या सगळ्यांना स्टेप बाय स्टेप कळेल राधा कुठे आहे ते. राधा जिथे आहे तिथे आधीच दोन माठ पोचलेत पण आपल्यासारखे सामान्य लोक लगेच एकमेकांना फोन लावुन ठावठिकाणा विचारु शकतात, माठांना ते एकतर शक्य होत नाही किंवा सुचले तरीही मोकळ्या जागी भर वस्तीतही त्यांच्या मोबाईलला रेंज नसते. त्यामुळे कोणालाच दुसरे काय करतेय ते कळणार नाही.

शनिवार २५ तारिख हा तर प्रत्यक्ष कृतीचा दिवस.. त्या दिवशी प्रत्येकजण मिळेल त्या वाहनाने उदा सायकल, मोटरसायकल, गाडी, घोडा, गाढव, विमान, बोट. होडी, नाव,... जे मिळेल ते पकडुन राधेच्या शोधावर निघेल. (माईची व्हिलचेअर राहिलीच की लिहायची ).. अर्थात घनालाच तिचा सगळ्यात आधी पत्ता लागेल. निराश झालेली राधा आत्महत्येचा विचार करत असताना (आता तिने आधीच एवढा आचरटपणा केलाय त्यात आत्महत्येचा विचार करणे म्हणजे केकवरची चेरीच की हो..) घना येईल धावत, मग सिनेस्टाईलमध्ये जे काही होईल ते सांगायला मी कशाला हवीय......... मग मागुन समस्त काळे परिवार येऊन ते दृश्य कृतकृत्य नजरेने पाहिल, त्यांच्या मागुन महेश आणि आत्तीही कोणीही न सांगता तिथे येऊन थडकतील आणि गदगद नजरेने सगळे पाहतील. शेवटी all is well म्हणजे आपण सगळे विहिरीत........

बाहेरून घरी आले, तर घरात एलदुगोची शेवटटची काही मिनिट्स चाललेली

माझं अमेरिकेवर प्रेम आहे सर.. :ह्या वाक्यावर मी फुटले
भारतात तेवढच पॅकेज मिळतय म्हटल्यावर तो रडायला लागला - मी अचंबित (पैशापुढे प्रेमबिम सब झुट!)
माझी बायको रोज वालाचं बिरडं करून देईलः आँ? काहीही!!!

मानव आणि माऊली सायकलवर बोंबलत.......
नशीब आपलं की सगळी काळेवाडी रस्त्यावर सैरावैरा धावतेय असं दाखवलं नाही !

पांचट, फालतु, पाचकळ शेवटाकडे आलेली मालिका.
सुरवात जबरी होती. मध्येच ढासळली.
असो.
आमच्याकडे इतर सिरियली पाहिल्या जात नाहीत.
त्यामुळे मी सुखी पती आहे. Happy

ही इज सर से पांव तक छपरी

ह्या ह्या. आणि त्यांचा सो called स्टाफ.. म्हणजे गणपतीत छपरी एक हात वर करून नाचतात .. तसे घोळका करून.. मंद आवाजात कायतरी बडबडत , गात होते .

आणि अंगड त्यांचा म्होरक्या वाटत वाटत होता .
ह्याला MNC म्हणतात?
चायला मग आमच्या हापिस ला NASA च म्हटले पायजे Biggrin

मैना Lol
साधना अबीरला पण दे की एण्ट्री... तेवढंच आमच्यासारख्यांच्या डोळ्याला बघण्यालायक होतं मालिकेत Wink Proud
नानबा फूल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल पोस्टबद्दल हजार मोदक.. हेच असच वाटलेलं मला सगळंच्या सगळं!
नासा प्रसन्न Rofl

काल, आजच्या भागाची झलक दाखवताना समस्त काळे लोक घनाकडे बघत उभे राहीलेले बघून मला हॉरर पिक्चर मध्ये खूप भुत, आत्मे कसे सावजाची वाट बघत उभे असतात त्याची आठवण झाली.

एक महिन्यापूर्वी जॉईन झालेल्या माणसाला ऑनसाईटैतकं पॅकेज????
कुठे आहे ही कंपनी? जॉइन करावी म्हणते. आम्ही इथे नऊ नऊ वर्षं खपतोय तरी आमचे म्यानेजर असं काही म्हणत नाहीत, रेसिग्नेशन लेटर घेऊन गेलं तर उद्या नको, आत्ताच जा म्हणतील!

>>त्याच्या साहेबाने त्याला इथेच तेवढंच पॅकेज दिलं जेवढं त्याला ऑनसाईट जाऊन मिळणार होतं. आमचे मॅनेजर का पाहात नाहीत एलदुगो

ह्या अगदी दिलसे आलेल्या पोस्टीला अनेकानेक अनुमोदन! Proud

>>आजच्या भागाची झलक दाखवताना समस्त काळे लोक घनाकडे बघत उभे राहीलेले बघून मला हॉरर पिक्चर मध्ये खूप भुत, आत्मे कसे सावजाची वाट बघत उभे असतात त्याची आठवण झाली

Proud

>>निराश झालेली राधा आत्महत्येचा विचार करत असताना (आता तिने आधीच एवढा आचरटपणा केलाय त्यात आत्महत्येचा विचार करणे म्हणजे केकवरची चेरीच की हो..) घना येईल धावत, मग सिनेस्टाईलमध्ये जे काही होईल ते सांगायला मी कशाला हवीय..

केस १: 'जहर' अस़ं लिहिलेली किंवा कवटीआणि हाडाचं चित्र असलेली बाटली उघडून ती प्राशन करायच्या तयारीत असलेली राधा. खोलीच्या बाहेरून समस्त काळेमंडळी ओरडताहेत. घनाचे बाबा 'सीआयडी अभिजित' स्टाईल मध्ये म्हणतत 'घना, तोड दो दरवाजा'. घना 'सीआयडी दया' स्टाईल दरवाजा तोडतो. आणि राधाच्या हाताताली बाटली उडवतो. 'तू, हे काय करत होतीस.....राधा?'. 'मला जगायचं नाहिये....घन:श्याम'. 'माझं तुझ्यावर प्रेम असलं तरी? राधा'. 'घनःश्याम'....ह्यापुढचं मी लिहित नाही.

केस १.१. राधा थोडं विष घेते. घना तिला उचलून धावत सुटतो तो थेट हॉस्पिटल गाठतो. 'डॉक्टर, डॉक्टर, माझ्या बयकोला वाचवा डॉक्टर.' मग रोगी चेहेरा असलेले डॉ़क्टर येतात. लगेच ऑपरेशन थिएटरबाहेरचा लाल दिवा लागतो. मग काही वेळाने तो विझतो आणि डॉक्टर चिंतातूर चेहेरा करून येतात. काळे मंडळी गोळा होतात. 'आम्ही प्रयत्न केलेत. आता सर्व देवाच्या हाती. इन्हे अब दवाकी नही दुवाकी जरुरत है'. मग सगळे काळे हॉस्पिटलमध्ये असलेल्या गणपतीला साकडं घालतात, भजन म्हणतात आणि.....राधा शुध्दीवर येते.

केस २: राधा भरधाव रुळावरून धावत सुटलेय. घना तिच्यामागून. मग कुहू-प्रभात, वल्ली-वल्लभ, दिग्या-सुप्रिया. त्यांच्या मागे घनाचे आईबाबा, त्याची आत्या आणि राधाचे बाबा, आत्या. त्यंच्यमागे व्हीलचेअरवरल्या माईला घेऊन माउली आणि ती परी. एव्हढयात क्धी नव्हे ती गाडी वेळेवर येते. गाडीचा घनाचा, राधाचा असे सगळ्यांचे क्लोजअप दाखवण्यात एक एपिसोड जातो. नंतरच्या एपिसोडमध्ये प्रभातचे बाबा किंवा घना नुस्त्या हाताने गाडी थांबवतात. किंवा घना ऐनवेळी राधाला खेचून बाजूला करतो.

साधना, स्वप्ना Biggrin
स्वप्ना एकच अ‍ॅडिशन करना वरती Wink
>>>'डॉक्टर, डॉक्टर, माझ्या बयकोला वाचवा डॉक्टर <<< या ऐवजी >>>'डॉक्टर, डॉक्टर, माझ्या बयकोला वाचवा ........... डॉक्टर.' Proud
स्वप्ना, केस दोन वाचताना मी अगदी Rofl डोळ्यासमोर दृश्य उभे राहिले ..... नाही नाही उभे नाही राहिले पळाले Wink

स्वप्ना Rofl
मला आता "शेवट सुचवा" धाग्याची आठवण झाली Lol
माझ्याकडून पण एक

राधा घरात नाहीये हे पाहून घना गोंधळलाय (हा अगदी जिवंत अभिनय असेल Proud )
खुप धावपळ करूनही घनाला राधा सापडत नाही..मग तो परत पहिल्या प्रेमाकडे (अमेरिकेकडे) परततो... अनेक वर्ष अशीच निघुन जाता.
म्हातारा झालेला घना अमेरिकेवरून परत येतो.. जुन्या आठवणींनी टेंन्स्ड होतो आणि पाणीपुरी खायला जातो (बॅक ग्राऊंडला तुझ्याविना....)
पहातो तर काय एक कोणी तरी तरूण मुलगी पाणीपुरीवाल्याला गेटॉलने हात धुवायला लावत असते.
अगदी हुबेहुब राधाच!
तो चौकशी करतो... तेंव्हा कळत ती राधाचीच मुलगी आहे.....
.
.
.
.
..

..

.

.
.

.
.
.

.
.
अबीर आणि राधाची मुलगी...
तिला पाहून घनाचा कंठ दाटून येतो.. आणि तो एकच वाक्य बोलतो... "हे तू काय केलस........... राधा"
तेवढ्यात तिकडून अबीर आणि राधा येतात.....
आणि म्हणतात "आमचं वेगळं आहे" Proud
आणि पडदा पडतो.....
एका लग्नाची ही दुसरी गोष्ट अशा रितीने समाप्त Proud

>>>'डॉक्टर, डॉक्टर, माझ्या बयकोला वाचवा डॉक्टर <<< या ऐवजी >>>'डॉक्टर, डॉक्टर, माझ्या बयकोला वाचवा ........... डॉक्टर.' फिदीफिदी
>>>
+ हवं तर माझी बायको तुम्हालापण बिरड्यांची उसळ करून खायला घालेल Proud

कालच्या भागात सगळ्यांनी मोबाईल असुनसुद्धा मुद्दाम वापरायचा नाही ठरवले होते वाटतं

गेले काही दिवस जाहिरातीमुळे अर्ध्या तासाची मालीका १० ते १५ मिनीटांच्यावर जात नाहीये.

Pages