निसर्गाच्या गप्पा (भाग १०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2012 - 14:54

निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)

मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||

हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.

- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोनाली, कडधान्यात खुपदा काही दाणे वाईट असतातच. हे सगळ्याच बियांच्या बाबतीत खरे आहे. १०० टक्के उगवण क्षमता नसतेच कधी.

सुदुपार. Happy
मी काल सुजाता भाटकरांच ’निसर्गनक्षी ’ पुस्तक वाचलं. खूप छान आहे. बर्‍याच पक्षांच वर्णन आहे त्यात. Happy
इथे वर जी 'निसर्गाशी निगडीत पुस्तके' लिस्ट दिलेय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी याचा प्रिंटआउट काढून घेतला. आता ग्रंथालयातून ही पुस्तके मला घेता येतील. Happy

अकोल्यासारखी मेंदीची मजा तर कुठेच नसावी!!!! आमच्याकडे हाताच्या तळव्याला निलगीरीचे तेल लावले जायचे. ते तेल घरात असेच असे नसे. मग आम्ही बाजूच्या कुर्रतबाजीकडे जाऊन घेऊन यायचो. मेंदी भिजवताना ती परत एकदा वस्त्रागाळ करुन घ्यायचो. मेंदी लावून झाली की बहिणी मधेच रात्री उठून साखरेचे पाणी हातावर शिंपडायच्या. आणखी एक की मेंदी नसली घरी की चहापावडरीचे मेंदीच तेल काढायचो. तो प्रकार भन्नाट होता. सगळे ताट काळेकुट्ट व्हायचे. पत्ती तव्यावर अशी जळायची की घरभर वास सुटायचा. मेंदीचे तेल बहुदा इथे कुणाला माहिती नसावे. असो.. शेवटी अकोला ते अकोलाच!!!!!

असो.. ओळखा बघू हे फळ कंचे ते;)

fig.jpg

.

हो उंबरच ते,
बी, मालाडला आमच्या परिचयातल्या एक बाई असे चहापावडरीचे काहीतरी करायच्या, पण त्यांची ती सिक्रेट रेसिपी होती. त्यांची मेंदी जरा गडद् रंगाची असायची आणि लगेच रंगायची !

दिनेशदा, हो नक्की मग ती आमची मेंदीच्या तेलाचीच सीक्रेट रेसिपी असेल. ही मेंदी लगेच रंगते.

ह्यात मेंदी नसतेच. पत्तीच्या वाफेमुळे ताटाला तेल येते. ते तेल भरभर वाटीत काढावे लागते. फार चटके बसतात. मग सुईच्या टोकाने हे तेल लावावे लागते.

श्या, काय पण बी. एक तरी फळ / फुल ओळखता आले याचा आनंद हिरावला Sad
इतके सरळ उत्तर नसणार हि शंका आलीच होती मनात.

बी,
वरचे फल उंबर नाही. साधना यू आर राईट अदर्स व्राँग!!!! हे फळ गुलेर्/गुल्लराचे आहे>>>>>>> जरा डिटेल समजावा.

दुसरा फोटो रतनगुंजेचा आहे ना?

बी,

गुलेर्/गुल्लर

गुगलून पाहीले. http://soch-meri-soch.blogspot.in/2012/03/blog-post.html ईथे माहीती मिळाली. पण वाचल्यावर वाटते कि, उंबराचीच माहीती आहे. जसे उंबराचे फूल दुर्मिळ असते तसेच गुल्लरचे फूलही दुर्मिळ असते. बाकी वरचा फोटो उंबरासारखाच वाटला.

होय बी, मधुराचं बरोबर आहे. फायकस ग्लोमेराटा म्हणजे उंबर म्हणजेच गुल्लेर! मी पण गुगलून बघितलं तर उंबरच दिसतोय!

madhu-makarand, शांकली धन्यवाद :डोमा:. तुम्हाला उंबराची गोड गोड फळे मिळोत Happy

बी मी बनवायचे मेहेंदीचे तेल. खुप थंड असते ते.

आणि चहापावडरची मेहेंदी करण्याचे उद्योग आम्ही लहानपणी खुप केले आहेत. पण त्यासाठी घरातली भांडी न वापरता आम्ही पत्र्याचा तुपाचा वगैरे डबा घ्यायचो. त्यात चहापावडर मध्ये थोडे पाणी घालून की काय आता निट आठवत नाही तो डबा आम्ही छोटी शेकोटी पेटवून त्यावर ठेवायचो डब्यात मिश्रणावरच रिकामी वाटी ठेवायची व डब्याला वरुन अलगत झाकण लावायचे. मग चहापावडरची वाफ झाकणावरून वाटीत पडायची व झाकणाला चिकटायची तिच चहापावडरची मेहेंदी.

हे गुलेर उंबरासारखे दिसते, पण झाड उंबरासारखे दिसत मात्र नाही. सगळ्यात मोठा फरक म्हणजे उंबराच्या लांबुन जरी गेले की त्याचा तो मस्त धुंद गोडगोड वास लगेच नाकात भरतो. गुलेरला अजिबात वासच नसतो.. Happy

बी, धन्यवाद, मला नाव माहित नव्हते. उत्तर प्रदेशीय याच्या कच्च्या फळांची भाजी करतात.

अरारा... गुलेर हे हिन्दीमधे म्हणता मराठी उंबर असेच म्हणतात Happy म्हणजे तुम्ही बरोबर.

मधु मकरंद, गुंजा आणि रतनगुंजामधे फरक काय आहे? मी प्रथमच रतनगुंजा हे नाव ऐकत आहे.

सुप्रभात!!!!

गुलेर आणि उंबर सारखेपणामुळे फसवी झाडे.

गुंजा म्हणजे लहानपणी ज्याला सशाचे डोळे म्हणायचो ते. याच्या बीया लहानशा उभट आकाराच्या एका बाजूला काळा रंग असलेल्या.

रतनगुंजा म्हणजे वरच्या फोटोत आहेत तशा गोल लाल रंगाच्या मधे फुगीर आकाराच्या.

बाकी जाणकार सांगतीलच.

मुंबई युनिव्हरसिटीच्या बाहेरील फूटपाथवर रतनगुंजाचे झाड आहे. शेंगा / फळे खाली पडलेली पाहील्यावर कळले कि येथे रतनगुंजाचे झाड आहे. पण त्याची फुले कधी पाहीली नाहीत / लक्षात आली नाही.

रतनगुंजांचे झाड असते, त्याला पिवळी फुले लागतात. (तूरे असतात, एक मुख्य आणि चार बाजूने )काळा ठिपका असलेल्या गुंजा, आकाराने अंडाकृती असतात आणि त्याची वेल असते, त्याला जांभळी फुले येतात.

रतनगुंजा या आकाराने उडत्या तबकडीसारख्या असतात. प्रत्येकीचे वजन सारखेच असते. म्हणून पुर्वापार सोन्याचे वजन करण्यासाठी त्या वापरल्या जातात.
(सोन्याला आगीत होरपळण्याचे दु:ख नसते ते गुंजेशी तूलना केल्याचे दु:ख असते, असे एक वचन वाचले आहे.)

व्वा!! दिनेशदा, मस्त माहिती. माझ्या ऑफिसमधे गुंजा पडलेल्या पाहील्या आहेत. आता तेथे जाउन त्याच्या वेलाचा शोध घेइन.

म्हणून पुर्वापार सोन्याचे वजन करण्यासाठी त्या वापरल्या जातात. >>>> म्हणूनच म्हणत असतील "अगदी गुंजभर सुद्धा सोने नाही"

प्रमाणित वजन-काटे येण्याआधी माणसाने गुंजेसारख्या विविध वस्तूंचा वापर मोजमापासाठी केला होता.

<<<<<(सोन्याला आगीत होरपळण्याचे दु:ख नसते ते गुंजेशी तूलना केल्याचे दु:ख असते, असे एक वचन वाचले आहे.)>>>> वा ! काय सुरेख वाक्य आहे.

बी, तुमच्या 'ओळखा पाहू' प्रश्नाला दिनेशदा सुद्धा फसले ? Wink

सोन्याला आगीत होरपळण्याचे दु:ख नसते ते गुंजेशी तूलना केल्याचे दु:ख असते>>>>> एक सुभाषीत आहे ना या अर्थाचं..

मलाही ते उंबर वाटलेलं, पण इतकं सोप्पं नसणार असं वाटलं म्हणुन लिहिलं नव्हतं Wink

बी, तुमच्या 'ओळखा पाहू' प्रश्नाला दिनेशदा सुद्धा फसले ? >>>>

हो प्रज्ञा हा आनंद अवर्णनीय आहे Happy

माझ्याकडे वॅलेटमधे मी आता ईंडोनेशियाला गेलो होतो तेंव्हा गुंजा वेचून आलो त्या चापट आहेत. पण ह्या गुंजा मला झाडाखाली मिळाल्यात वेलीवर नव्हत्या.

Pages