Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुहु रॉक्स अगेन खरंच मला पण
कुहु रॉक्स अगेन खरंच मला पण ब्लॅक अॅण्ड वाईट मधे जगायला आवडेन....गोष्टी खुपच सोप्या होत्या...
कालचा ज्ञानाचा डाय्लोग " लग्न म्ह्ण्जे काय आयुष्याचा रीर्चाज अस्तो का ??? " ज्ञाना माऊली ना माझा साष्टांग नमस्कार
>>>>म्हणजे घना अमेरिकेला 'वॉर
>>>>म्हणजे घना अमेरिकेला 'वॉर ऑन टेरर' मध्ये टेक्निकल सहाय्य करायला जातोय आणि तालिबान्यांकडून आपण मारले गेलो तर आपल्यामागे राधाची परवड होऊ नये वगैरे उदात्त विचार तर नसावा ना.<<
घना 'सफर' मधला राजेश खन्ना बनायचा विचार असेल. . म्हणून लग्न, प्रेम नाकारत असेल.
लोकं अजून सिरियल बघतात मान
लोकं अजून सिरियल बघतात मान गरे पेशन्स
आज बर्याच दिवसाने वाचायला आले... अपने मे इतना पेशन्स नहीच है...
एकुणात सर्व सिरियल प्रकार बोरच आहे. हिंदी काय मराठी काय..
गंगाधर टिपरे मला आवडायची.
बोक्या सातबंडे पण सिरियल होती ना? (आठवत नाही.. पण आवडली).
>>तिथे मी असते तर आधीच
>>तिथे मी असते तर आधीच आणलेल्या घटस्फोटाच्या कागदावर सही करुन ते राधा, विनोद नी आज्जीसमोर टाकले असते आणि बॅग भरण्याइतपतही वेळ वाया न घालवता तडक आधी या असल्या माणसाच्या घराबाहेर आणि आयुष्याबाहेर पडले असते
'घना,विनोद नी आज्जीसमोर'! +१००००००
कालचा एपिसोड अत्यंत रटाळ. कुत्रा कशी आपली शेपटी पकडायला गोलगोल फिरतो तशी मालिका फिरतेय नुसती. बहुतेक 'अभिमन्यू, चक्रव्यूह मे फस गया है तू' अशी लेखिकेची स्थिती झाली आहे.
कुहू काल प्रभातला म्हणाली 'चंद्राला उशीला घेऊन तुझ्या कुशीत झोपून जाईन'.....ते ठीक आहे पण तो प्रभात कुशीवर वळला तर कुहू आणि चंद्र ह्या दोघांचं काय होईल सांगता येत नाही.
(कोणाच्या दिसण्यावर टीका करू नये हे एक्दम मान्य. म्हणून ह्या पोस्टीसाठी सॉरी. मोह आवरला नाही अगदी)
साधने, म्हणून तुझ्यावर मालिका
साधने, म्हणून तुझ्यावर मालिका निघत नाही
हो गं. पहिल्याच दिवशी दि
हो गं. पहिल्याच दिवशी दि एन्ड व्हायचे...
प्रभात कुशीवर वळला तर कुहू आणि चंद्र ह्या दोघांचं काय होईल सांगता येत नाही.
प्रभात लग्न ठरल्यावर वाळलाय बराच...
माझ्याकडे अतिशय संथ नेट
माझ्याकडे अतिशय संथ नेट असल्याने मी हि मालिका बघूच शकणार नाहि. आधी फार वाईट वाटलेलं पण आता ईथले अपडेट्स वाचून फ्फार फ्फार बरं वाटतय. राधाला अशी कणाहिन पाहून फार राग येतो.
कुहू साठी उखाणा: बागेत फुलली
कुहू साठी उखाणा:
बागेत फुलली फुलं, बागेत फुलली फुलं
त्यावर 'भुंगा' करतो गुंजन
प्रभातराव, आता तरी थोडं कमी करा की वजन
ऑन अ सिरियस नोट, मला वाटतं की
ऑन अ सिरियस नोट, मला वाटतं की घनाच्या मनात ही भीती असावी की त्याच्या मैत्रिणीवर त्याचं प्रेम होतं आणि ती वारली तसं राधावर प्रेम केलं तरी तिचंही तसंच होईल. म्हणून कदाचित तो डिव्होर्स फाईल करायचं म्हणत असावा.
साधना जबरी पोस्ट. फारच
साधना जबरी पोस्ट. फारच आवडली. मला तुझ्यावाणी लिहीता येत न्हाई.
बरं एक दिसण्याचं सोडा, राधा सोडल्यास काळे घरात फार स्टुपिड स्त्रिया आहेत का? म्हणजे इथे समोर दिस्ते आहे नवरा/ सासू काळजीत आहे तरीही इला काकूंनी पिडले क्वाऑय होते आहे तुम्हाला ऑस्स्स का बॉलताय. वल्ली चं तेच. लिसन पैदाइशी प्रॉब्लेम आहे पण चलता है. कुहु अशक्य आहे
वैनुडीची मंगळा गौर म्हणून ओरडत काय जाते.
बरं दिसण्याचं म्हणाल, तर विनय फार पहिल्यापासून आवडतो.( त्यात तो सिंगल पेरेंट म्हणजे आमचे मत्त त्यालाच की) उल्का फारच छान दिसते आणि आय र्हाइम विथ हर, आणि तिचा नवरा एकटा आहे( प्रत्यक्षात) म्हणून त्याची काळजी वाट्ते., हे सगळे अनकनेक्टेड सिंगल लोक आहेत म्हणून मी नेहमी त्यांची चौकशी करतच असते. वजन केशरचना वगैरेवर मत एका आत्मियतेतून आहे. उगीच टोकायचे म्हणून नाही.
सिरियल विनोदी आहेच पण त्याहून
सिरियल विनोदी आहेच पण त्याहून विनोदी इथल्या महान पोस्ट्स आहेत..
>> कुहु अशक्य आहे. वैनुडीची
>> कुहु अशक्य आहे. वैनुडीची मंगळा गौर म्हणून ओरडत काय जाते.
आणि ती काल प्रभातला म्हणाली 'पुढल्या वर्षी आपली मंगळागौर असेल'
सबंध सिरिअलमधे, वल्लभ काकाचं
सबंध सिरिअलमधे, वल्लभ काकाचं पहिलं सेंसिबल वाक्य, ज्ञानामाऊलीला उद्देशून, 'तुझ्या वयाची मुलं बघ, ती जशी वागतात ना, तसं वाग जरा'
त्यात तो सिंगल पेरेंट म्हणजे
त्यात तो सिंगल पेरेंट म्हणजे आमचे मत्त त्यालाच की)>>> असे काहीही नाहीये बरं का....
काल एक प्रसंग पाहिला त्यात ते ज्ञानाचे वडील त्याला म्हणातात, 'अरे असे जर चोरून दुसर्याचे बोलणे ऐकत राहिलास तर पुढच्या जन्मी भिंतीवरची पाल होशिल...'
आणि त्यावर त्याचं थंड उत्तर, 'पुनर्जन्म हा एक वेगळा आणि गहन विषय आहे, त्यावर आपण नंतर बोलू'
कुहूची आई काल "सत्यनारायण
कुहूची आई काल "सत्यनारायण घालूया" म्हणाली.....
मला वाटलं आता साड्यांमध्ये पण एखादा "सत्यनारायण पॅटर्न" आला की काय
काहीही होऊ शकतं बॉस
मग ईलाकाकू म्हणाळ्या करूया ग सत्यनारायण...... मग जीवात जीव आला सत्यनारायणाच्या
ज्ञाना प्रभातला लग्नानंतर
ज्ञाना प्रभातला लग्नानंतर पोटापाण्याच्या प्रश्नाबद्दल विचारतो तेव्हा ब-यच दिवसांनी काहीतरी सेन्सिबल वाक्य आले असे वाटले.
अर्थातच ज्ञानाचा उद्देश वेगळा होता पण दोन्ही घरच्या लोकांनी एकदा ह्यावर विचार करायला हवा होता असे मला आपले वाटले.. मी कधीकधी खुपच प्रॅक्टिकल होते, प्रेम वगैरे गोष्टी न कळण्याच्या पलिकडे जाते असे हल्ली वाटायला लागलेय....
प्रभात आणि कुहू लग्नाळलेले
प्रभात आणि कुहू लग्नाळलेले आहेत इतके..... पण पोटापाण्यासाठी काय करतात हा प्रश्न मलाही होता....... पण दिग्या काकाला बघून जाणवलं.... काळेवाडीतल्यांना सुट्या टाकून घरी बसायचा पगार मिळतो कंपनीकडून
'सत्यनारायण घालणं' हे
'सत्यनारायण घालणं' हे बर्यापैकी रूढ आहे.
चिनूक्सा, मोदक घे हो.
चिनूक्सा, मोदक घे हो.
चिनूक्स.... मान्य आहे ते. पण
चिनूक्स.... मान्य आहे ते. पण ऐकताना खटकलं राव
आणि सत्यनारायणाची पूजा घालूया ठीक.... डायरेक्ट सत्यनारायणच घालायचा म्हणजे
चिनूक्सा, मोदक घे हो. <<<<
चिनूक्सा, मोदक घे हो.
<<<< सत्यनारायणाला शिरा असतो प्रसादाला. प्राची, रीत बदलू नकोस.
(मायबोलीकरांना) काहीही खटकू
(मायबोलीकरांना) काहीही खटकू शकतं (चिनूक्स) बॉस
श्र शिर्याचे मोदक करू आपण
श्र
शिर्याचे मोदक करू आपण हा का ना का
शिर्याचे मोदक नवी पाकृ
शिर्याचे मोदक
नवी पाकृ
(मायबोलीकरांना) काहीही खटकू
(मायबोलीकरांना) काहीही खटकू शकतं
>>>>>>
कथेत काहीही विशेष होत नसलं की
कथेत काहीही विशेष होत नसलं की असं होतं बघा......
काँट्रॅक्ट मॅरेजपायी आता काँट्रॅक्ट मंगळागौर...... त्यात आता मंगळागौर मंडळ पण कॉंट्रॅक्टवर बोलावणार
ज्ञाना मोड ऑन :- कृपया असल्या
ज्ञाना मोड ऑन :-
कृपया असल्या ( फालतू ) पोस्टी टाकून २५ ऑगस्ट पर्यंत आणखी एक नवीन बाफ उघडायची वेळ कोणावरही आणू नका. मागे मी म्हंटल्याप्रमाणे " एका लग्नाची दुसरी गोष्ट - आता पुरे " असे त्या बाफचे नामकरण करायची वेळ येईल.
ज्ञाना मोड ऑफ.
डी, अहो मी माझे पर्स्पेक्टिव
डी, अहो मी माझे पर्स्पेक्टिव मांडले. विनयचा माझं पिल्लू आहे ते. डायलॉग अगदी खरा वाटला. मुलीशी फोनवर बोलतो ते पण. एकूणच काळ्यांपेक्षा ही माहेरची मंडळी खूप सेन्सिबल आहेत.
कुहू ला बघताना मला ग्यासचा फुगा आपण घेतो कि नाही आणि कधीतरी एकदम हातातून दोरा सुटल्यावर तो फुगा वर वर जाताना आपण बघत राह्तो तस्से फीलिन्ग येते. अगदी तरंगते क्यारेक्टर
उलट २००० पोस्टी पूर्ण करायची
उलट २००० पोस्टी पूर्ण करायची जबाबदारी आहे.......
सगळेच श्रद्धा,संपदा _/\_
सगळेच
श्रद्धा,संपदा _/\_
Pages