निसर्गाच्या गप्पा (भाग १०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2012 - 14:54

निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)

मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||

हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.

- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण बोटॅनिकल नावे इंग्रजीत असतील, तर शशांक शांकली त्यांचा अर्थ लावू शकतील. >>> काय दिनेशदा, चांगलीच फिरकी घेताय की......
मधुरा - ते कॅलेंडर दिसत नाहीये - म्हणजे वाचता येत नाहीये - जिप्सी किंवा अशाच कोणा जाणकाराचा सल्ला घेणे.......

दिनेश दा ने शोभेची हाक ऐकलेली दिसतीये>>>>>>..हो ग वर्षू, म्हणजे कोणी इथे दिसल नाही, की हाक मारायला हरकत नाही. Lol
हल्ली, जिप्सी इथे कमी असतो. काय कारण असेल ...........:डोमा:

सुदुपार

आज सकाळी माबो ओपन केल पण लगेच ऑफिसच्या कामात गुंतले.

जिप्स्याला जिप्सिण भेटली असेल शोभा.

सुदुपार !

शशांकजी,जागु,प्रज्ञा
सगळे फोटो आणि माहितीबद्दल धन्यवाद !

पुण्यात काल सकाळचा पाऊस पाहुन मी ऑफीसला दांडी मारली,पण आज सकाळी जोराच्या पावसानं चांगल भिजवुन काल चीही कसर भरुन काढली.

लुईचा पिंजरा आणि कडुलिंब याच्यामधे मस्त छोटंसं जंगल तयार झालंय. आधी अगदी एखादंच पान होतं. हा हिरवागार कोपरा डोळ्याला सुखावतो.

Photo0183.jpgPhoto0182.jpg

वॉव.. तेच रंग आहेत की फुलपाखराच्या पंखांवर.. सुंदर!!!
मानुषी..मस्त आहे तुझं छोटंस जंगल.. Happy

आज ऐशुला एक मस्त अनुभव आला.

ती कॉलेजमध्ये रस्ता क्रॉस करत होती त्याचवेळी एक बोकाही तिचा रस्ता क्रॉस करत होता. हिला पाहताच तो थबकला आणि त्याला पाहताच ही थबकली. दोघेही विचार करताहेत, हा मला आडवा गेला तर...........

शेवटी बोक्याने माघार घेतली. बहुतेक आज त्याला भर श्रावणात कुठेतरी मासे शिजल्याची बातमी मिळालेली आणि उगीच एका माणसाला तो आडवा गेल्याने त्याचे काम हुकलेले त्याला चालणार नव्हते. त्याने शेवटी रस्त्यावरच बसकण मारली आणि ऐशुला रस्ता क्रॉस करायला दिला. तिने क्रॉस केल्यावर वळून पाहिले तर बोका अतिशय वेगाने रस्ता क्रॉस करत होता.. उगीच अजुन एक माणुस यायचा आणि मग परत तो जाईपर्यंत वाट पाहात बसावी लागायची.... Happy

हलकेच घ्या.... Happy

आज नारळीपौर्णिमेनिमित्त सर्व मंडळी समुद्र्पूजनाला गेलीत का काय ????

आमच्याकडील मांजरे (एक बोका, एक भाटी) कॅट्स फूड आवडीने खातात पण मासे आणले तर लिटरली त्याला तोंड देखील लावत नाहीत - हे माझ्या एका मित्राला सांगितल्यावर त्याचे उद्गार - अरे शेवटी तुमचेच पाणी लागलेय त्यांना... त्या बिचा-या मांजरांनाही बाटवलेत या दूध्-पोळीने ????.... अरेरे रे रे - वर काही दिवसांनी तुम्हीच सांगाल - आमचा हा बोका इतका सात्विक झालाय नं, आता तर तो संकष्टी चतुर्थीही करतो ......

हलकेच घ्या.... (खरं तर हे लिहायची आवश्यकता आहे का इथे???)

शोभा, जागू आहे मी इथेच आहे Proud तुमच्या सगळ्या पोष्टी वाचतोय. Happy
सध्या कामात बीझी असल्याने आणि ऑफिसात मायबोली अ‍ॅक्सेस नसल्याने फक्त वाचक मोड मध्ये आहे.
मधुरा, तुम्ही पाठवलेली स्कॅन पीडीएफ मिळाली, बहुतेक पीडीएक हाय रीझोल्युशनला सेव्ह झाली नसल्याने ती नावे नीटशी दिसत नाही. Sad मी पुन्हा एकदा प्रयत्न करतो.

हि घ्या आज माझ्याकडुन कोथिंबीर आणि धणे. :-). मला स्वतःला हे दोन्ही फोटो अतिशय आवडले. कोथिंबीरीच्या फुलाचे इतके सुंदर रूप पाहिले नव्हते. Happy खासच ना Wink

कोथिंबीर (Coriandrum sativum)

धन्यवाद शशांक, मोनाली Happy

मधुरा हा फोटो मी पीडीएक सेव्ह करून जेपीजी मध्ये कन्व्हर्ट केला पण बहुतेक तो हाय रीझोल्युशन्ला सेव्ह नव्हता केल्यामुळे तेव्हढी क्लिएरीटी आली नाहीए (माफ करा, इतके सगळे इंग्रजी शब्द वापरले. Happy )

आमचा हा बोका इतका सात्विक झालाय नं, आता तर तो संकष्टी चतुर्थीही करतो ......

आमचा एस दुध पित नाही, त्याला दुध अज्जिबात आवडत नाही, पण साय मात्र खातो. दुध पित नसल्याने तो घरात चो-या करत नाही. कुठलाही दरवाजा उघडा दिस्ला की त्याला आत डोकावुन पाहिल्याशिवाय चैन पडत नाही. या सवयीमुळे गेल्या आठवड्यात तो रात्रभर बेडखालच्या स्टोरेजमध्ये होता. सकाळी उठुन घर, गच्ची दोन्ही शोधले, सापडेना. शेवटी बेडरुममध्ये कपाटाचा दरवाजा उघडताना म्याव म्याव ऐकु आले म्हणुन कपाटही उघडुन पाहिले. पण बेट्याचा पत्ता नाही, आवाज मात्र चालुच. शेवटी घाबरुन बेडखालचे स्टोरेज बाहेर खेचले तर स्वारी आत बसलेली म्याव म्याव करत. एकेदिवशी किचनमधल्या कपाटात सापडलेला... Happy घरात प्लॅस्टिक पिशवी, ऑफिसची बॅग, कपड्यांची बॅग काहीही जमिनीवर उघडे असेल तर हा लगबगीने आत जाऊन झोपतो.

वरची पिडिएफ मस्त आहे.. मलाही पाठवा.. Happy

पहिल्या पानावर लाल फुलां-कळ्यांचा फोटो आहे ती फुले कोणती????

साधना ,शशांक.. मनी चे किस्से इंटरेस्टिंग आहेत Happy
जिप्सी.. सुंदर आणी नाजुक कोथिंबीरीच्या क्लोजपने प्रसन्न वाटलं अगदी.. Happy
ते हिरवे धने किती गोड दिस्तायेत..

जिप्सी - या कॅलेंडरमधील फक्त तारखा व वारांची नावेच वाचता येताहेत - त्या वनस्पतींची नावे व चित्रेही स्पष्टपणे वाचता/ पहाता येत नाहीये....

अगं आमची मांजरंपण सेम अस्संच कुठलीही पिशवी दिसली की त्यात जाऊन बसतात आणि तोंड बाहेर काढून बघतात. इतकी कार्टून दिसतात ना!

अगं आमची मांजरंपण सेम अस्संच कुठलीही पिशवी दिसली की त्यात जाऊन बसतात आणि तोंड बाहेर काढून बघतात. इतकी कार्टून दिसतात ना! >>>> मार्जार पुराण सुरु..... याच्यावर शांकली एका दिवसात हजार पोस्टचाही विक्रम करु शकेल - माझ्या मुलींच्या भाषेत - आवरा

शोभा, जागू आहे मी इथेच आहे फिदीफिदी तुमच्या सगळ्या पोष्टी वाचतोय. स्मित
सध्या कामात बीझी असल्याने आणि ऑफिसात मायबोली अ‍ॅक्सेस नसल्याने फक्त वाचक मोड मध्ये आहे.>>>>>>>>>जिप्स्या, आम्ही बरोब्बर ओळखल आहे तू कुठल्या कामात बीझी आहेस ते. Wink Light 1

मांजर - मार्जार: (अर्थातच संस्कृत शब्द) - मार्जन म्हणजे स्वच्छ करणे - जी स्वतःला सतत स्वच्छ करत असते ती मार्जारः - मांजर...

Pages